वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km १/१० पृ. ३
  • तुम्ही विलंब लावत आहात का?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • तुम्ही विलंब लावत आहात का?
  • आमची राज्य सेवा—२०१०
  • मिळती जुळती माहिती
  • तुम्ही वेळ लावत आहात का?
    आमची राज्य सेवा—२००८
  • आणीबाणीच्या वैद्यकीय प्रसंगासाठी तुम्ही तयार आहात का?
    आमची राज्य सेवा—२०१२
  • कोणते पर्याय निवडायचे तुम्हाला माहीत आहे का?
    आमची राज्य सेवा—२००९
  • कोणते पर्याय निवडायचे तुम्हाला माहीत आहे का?
    आमची राज्य सेवा—२०११
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२०१०
km १/१० पृ. ३

तुम्ही विलंब लावत आहात का?

कशासाठी विलंब? बाप्तिस्मा घेतलेल्या साक्षीदारांना पुरवलेले ॲडवान्स हेल्थ केअर डायरेक्टीव्ह कार्ड भरण्यास विलंब लावत आहात का? “तुम्हाला उद्याचे समजत” नसल्यामुळे, आणीबाणीची वैद्यकीय परिस्थिती निर्माण झाल्यास तुम्ही कोणत्या प्रकारचे उपचार व पद्धती स्वीकाराल हे आधीच लेखी स्वरूपात ठरवणे आवश्‍यक आहे. (याको. ४:१४; प्रे. कृत्ये १५:२८, २९) हे कार्ड दरवर्षी भरावे लागते. ज्या साक्षीदार पालकांची बाप्तिस्मा न घेतलेली मुले आहेत त्यांनी आयडेंटी कार्ड भरले पाहिजे.

स्वतःसाठी व आपल्या मुलांसाठी कोणती उपचार पद्धत निवडायची हे ठरवून मग तुम्ही ॲडवान्स हेल्थ केअर डायरेक्टीव्ह कार्ड भरले आहे का? याबाबतची सविस्तर चर्चा टेहळणी बुरूज जून १५, २००४ मधील “वाचकांचे प्रश्‍न” आणि आमची राज्य सेवा याच्या नोव्हेंबर २००६ अंकातील “रक्‍ताचे अंश आणि माझ्याच रक्‍ताचा वापर करणाऱ्‍या वैद्यकीय प्रक्रियांविषयी माझा निर्णय काय असेल?” असे शीर्षक असलेल्या पुरवणीत करण्यात आली आहे. तेव्हा, या दोन्ही लेखांची काळजीपूर्वक उजळणी करा. आणि नंतर मग तुम्ही केलेली निवड ॲडवान्स हेल्थ केअर डायरेक्टीव्ह कार्डवर भरा. सत्यात नसलेल्या तुमच्या नातेवाईकांना तुम्ही केलेली निवड समजावून सांगा.

ॲडवान्स हेल्थ केअर डायरेक्टीव्ह कार्ड तुम्ही घरीसुद्धा भरू शकता. फक्‍त, दोन साक्षीदारांसमक्षच त्यावर सही केली पाहिजे व तारीख लिहिली पाहिजे. हे तुम्ही राज्य सभागृहात गट पर्यवेक्षकांची किंवा दुसऱ्‍या एखाद्या वडिलांची मदत घेऊन करू शकता. कार्डावरील “साक्षीदारांची साक्ष” या शीर्षकाखाली असलेल्या माहितीनुसार कार्ड धारकाने त्याची सही करणे व तारीख लिहिणे आवश्‍यक आहे. हे नवीन कार्ड ज्यांनी अजून भरले नाही त्यांना मदतीची गरज आहे का, हे गट पर्यवेक्षकांनी अधूनमधून पाहावे.

ज्यांना इंग्रजी भाषा वाचता येते व चांगल्या प्रकारे समजते त्यांनी ॲडवान्स हेल्थ केअर डायरेक्टीव्ह कार्ड (dpa-E In ११/०४) भरले पाहिजे. ज्यांना इंग्रजी वाचता येत नाही व समजत नाही त्यांनी त्यांच्याकरता तयार केलेले (dpa-१-E In ११/०४) हे कार्ड भरावे. या दुसऱ्‍या कार्डात क्र. ८ चा एक जादा प्रश्‍न आहे. ज्या व्यक्‍तीने कार्डधारकाला कार्डावरचा मजकूर वाचून दाखवला व समजावून सांगितला आहे तिने तिचे नाव तेथे लिहावे. प्रचारकांनी डायरेक्टीव्ह कार्डाची मूळ प्रत बाळगावी, झेरॉक्स प्रत नव्हे.

[३ पानांवरील चौकट]

• स्वतःसाठी आणि आपल्या मुलांसाठी कोणती उपचार पद्धत निवडायची हे तुम्ही ठरवले आहे का?

• तुम्ही स्वतःजवळ नेहमीच ॲडवान्स हेल्थ केअर डायरेक्टीव्ह कार्ड बाळगता का, म्हणजे तातडीच्या प्रसंगी त्याचा उपयोग होऊ शकेल?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा