मासिके कशी सादर कराल?
सावध राहा! जाने.-मार्च
“आपल्यातील बहुतेक जण मधुमेह असलेल्यांना ओळखतात. तुम्हाला या आजाराविषयी काही माहिती आहे का? [नियतकालिकाचे मुखपृष्ठ दाखवा आणि घरमालकाचे मत ऐका.] या नियतकालिकात, मधुमेहाच्या कारणांचा आणि उपचाराचा बारकाईने तपास लावण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यामध्ये हेही सांगण्यात आले आहे, की बायबलमध्ये सर्व आजार कायमचे नाहीसे केले जातील अशा एका काळाविषयी सांगितले आहे.” यशया ३३:२४ वाचून संभाषण समाप्त करा.
टेहळणी बुरूज फेब्रु.१५
“धर्माच्या नावाखाली केलेल्या वाईट गोष्टी पाहून पुष्कळ लोक अस्वस्थ होतात. काहींना वाटते, की धर्मच मानवजातीच्या सर्व समस्यांचे मूळ आहे. तुमच्या मनात कधी असा विचार आला का? [उत्तर ऐका. मग प्रकटीकरण १८:२४ वाचा.] बायबल या विषयावर काय म्हणते त्याचे या नियतकालिकात परीक्षण करण्यात आले आहे.”
सावध राहा! जाने.-मार्च
“तुमच्या जवळच्या व्यक्तीच्या क्षमता तुमच्यापेक्षा वरचढ असतात तेव्हा तुमच्या मनात तिच्याविषयी राग किंवा द्वेषभावना येते का? [उत्तर ऐका आणि पृष्ठ १३ वरील लेख दाखवा.] मनात अशा भावना येतात तेव्हा तुम्ही काय करू शकता, हे या नियतकालिकात सांगितले आहे.”
टेहळणी बुरूज मार्च१
“एकदा, येशू ख्रिस्ताला विचारण्यात आले की ‘सर्वांत पहिली आज्ञा कोणती?’ त्याने काय उत्तर दिले ते पाहा. [मार्क १२:२९, ३०.] येशूच्या बोलण्याचा काय अर्थ असावा? [उत्तर ऐका.] ‘देवावर आपले प्रेम आहे हे आपण कसे दाखवतो’ या लेखात येशूच्या या प्रसिद्ध शब्दांच्या अर्थाचे परीक्षण करण्यात आले आहे.”