मासिके कशी सादर कराल
टेहळणी बुरूज फेब्रु. १
“तुम्हाला काय वाटते, पैसा महत्त्वाचा की नैतिकता महत्त्वाची? [उत्तर ऐकून घ्या. मग उपदेशक ७:१२ वाचा.] आपण पैशाबद्दल एक संतुलित दृष्टिकोन कसा बाळगू शकतो, हे या मासिकात सांगितले आहे.”
सावध राहा! जाने.-मार्च
“आज पुष्कळ लोक उपाशी आहेत. जगातील अन्नाच्या समस्येवर कधी तोडगा निघेल, असे तुम्हाला वाटते का? [उत्तर ऐका आणि मग स्तोत्र १४५:१५ वाचा व पृष्ठ १२ उघडा.] या लेखात जगाच्या परिस्थितीचे आणि निर्माणकर्ता या समस्येवर तोडगा कसा काढणार आहे त्याचे वर्णन केले आहे.”
टेहळणी बुरूज मार्च १
“आपण मित्रत्वाच्या विषयावर चर्चा करीत होतो. तुमच्या मते, चांगले मित्र कसे बनवता येतात? [उत्तर ऐका आणि मग लूक ६:३१ वाचा व पृष्ठ ३२ उघडा.] आपण खरी मैत्री कशी वाढवू शकतो, हे या लेखात सांगितले आहे.”
सावध राहा! जाने.-मार्च
“आजची आर्थिक स्थिती पाहता, विवाहसोहळ्यांचा खर्च दिवसेंदिवस ओझ्यासमान झाला आहे. काही जण साधा विवाह ठेवतात तर काही भपकेदार. विवाह कसा ठेवायचा, हे एक व्यक्ती कशावरून ठरवू शकते? [उत्तर ऐका. मग रोमकर १२:२ वाचा.] या सावध राहा! अंकाच्या पृष्ठ २५ वर काही बायबल तत्त्वे दिली आहेत ज्यांच्या आधारावर तुम्ही सुज्ञ निर्णय घेऊ शकाल.”