आपण यहोवाच्या अपेक्षा पूर्ण करू शकतो
१. कधीकधी आपल्या मनात कोणकोणते विचार येऊ शकतात व का?
१ यहोवाच्या नियमांचे व तत्त्वांचे पालन करणेच आज जीवनाचा उत्तम मार्ग आहे आणि त्यामुळे आपल्याला अनंतकाळच्या भविष्यासाठी पाया रचायला मदत होते. (स्तो. १९:७-११; १ तीम. ६:१९) परंतु, सैतानाचे जग आपल्यावर पुष्कळ दबाव आणते. त्यात आपल्या अपरिपूर्ण शरीराची आणखी भर पडते. आपल्या शास्त्रवचनीय जबाबदाऱ्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करताना कधीकधी आपल्याला थकवा येऊ शकतो. (स्त्रो. ४०:१२; ५५:१-८) यहोवा आपल्याकडून ज्या अपेक्षा करतो त्या आपण पूर्ण करू शकू का, असा कदाचित आपल्या मनात प्रश्न येईल. अशा वेळी, आपले आध्यात्मिक संतुलन बाळगण्यास आपल्याला मदत कशी मिळू शकेल?
२. यहोवा आपल्याकडून वाजवी अपेक्षा कशा करतो?
२ यहोवाच्या आज्ञा कठीण नाहीत: यहोवा आपल्याकडून अवाजवी अपेक्षा कधीच करत नाही. त्याच्या आज्ञा कठीण नाहीत तर आपल्याच हिताच्या आहेत. (अनु. १०:१२, १३; १ योहा. ५:३) आपण “केवळ माती आहो” हे लक्षात ठेवून तो आपले दौर्बल्य जाणतो. (स्तो. १०३:१३, १४) परिस्थितीमुळे आपली सेवा मर्यादित होत असली तरी, ती आपण आपल्या परीने करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा देव दयाळुपणे ती स्वीकारतो. (लेवी. ५:७, ११; मार्क १४:८) आपला भार त्याच्यावर टाकण्याचे तो आपल्याला आमंत्रण देतो आणि आपल्याला असे आश्वासन देतो, की तो आपल्याला विश्वासू राहायला मदत करेल.—स्तो. ५५:२२; १ करिंथ. १०:१३.
३. धीर धरण्यासाठी यहोवा आपल्याला बळकट कसे करतो?
३ धीर धरण्याची गरज: बायबलमधील एलीया, यिर्मया, पौल यांसारख्या सचोटी राखणाऱ्यांच्या उदाहरणावरून आपल्याला दिसून येते की आपल्याला धीर धरण्याची गरज आहे. (इब्री १०:३६) संकट व निरुत्साहाच्या समयी यहोवाने त्यांना टिकून राहायला मदत केली. (१ राजे १९:१४-१८; यिर्म. २०:७-११; २ करिंथ. १:८-११) आधुनिक काळांतील आपल्या बांधवांची एकनिष्ठा पाहून आपल्याला किती प्रेरणा मिळते. (१ पेत्र ५:९) अशा उदाहरणांवर मनन केल्याने आपण निरुत्साहित होणार नाही.
४. देवाने दिलेले अभिवचन मनात सतत तेवत ठेवणे का महत्त्वाचे आहे?
४ देवाच्या अभिवचनांवरील आशा ही “आपल्याला जीवाचा नांगर” आहे. (इब्री ६:१९) या आशेनेच अब्राहाम व साराला, स्वतःचे घर सोडून ‘वचनयुक्त देशात परदेशी म्हणून राहण्याची’ यहोवाने त्यांना केलेली विनंती स्वीकारण्यास प्रवृत्त केले. याच आशेने मोशेला खऱ्या उपासनेसाठी निडर भूमिका घेण्यास शक्ती दिली. येशूला वधस्तंभावरील मृत्यू सहन करण्यास याच आशेमुळे शक्य झाले. (इब्री ११:८-१०, १३, २४-२६; १२:२, ३) धार्मिक नव्या जगाविषयी देवाने दिलेले वचन आपल्या हृदयात तेवत ठेवल्यानेही आपल्याला अढळ राहायला नक्कीच मदत होईल.—२ पेत्र ३:११-१३.
५. एकनिष्ठेच्या आपल्याच गत कार्यांवर विचार केल्याने आपल्याला प्रोत्साहन कसे मिळू शकते?
५ गतकाळात आपण स्वतः दाखवलेली एकनिष्ठा, आत्म-त्याग आणि धाडस या कार्यांवर विचार केल्याने देखील आपण सेवेत पुन्हा आवेशी होऊ शकतो. (इब्री १०:३२-३४) पूर्ण जिवाने यहोवाची भक्ती करण्याची त्याची अपेक्षा पूर्ण केल्यामुळे आपल्याला जो आनंद मिळतो त्या आनंदाची आपल्याला आठवण होते.—मत्त. २२:३७.