मासिके कशी सादर कराल
टेहळणी बुरूज फेब्रु. १
“प्रामाणिक असणे महत्त्वाचे आहे असे बऱ्याच जणांचे मत आहे. पण प्रामाणिक असणे का महत्त्वाचे आहे याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? [उत्तर ऐकून घ्या आणि मग इफिसकर ४:२५ वाचा. पृष्ठ ४ वरील अध्याय उघडून दाखवा.] या लेखात खोटे बोलणे म्हणजे नेमके काय हे सांगितले आहे, पण इतकेच नव्हे. हा लेख आपल्याला सर्व प्रसंगी प्रामाणिक असण्याची प्रेरणाही देतो.”
सावध राहा! जाने.-मार्च
“जर एक प्रेमळ, न्यायी आणि सर्वशक्तिमान देव आहे तर मग जगात इतके दुःख का आहे याचा कधी तुम्ही विचार केला आहे का? [उत्तर ऐकून घ्या.] दुःख अस्तित्वात असण्याच्या कारणासंबंधी या शास्त्रवचनात काय म्हटले आहे पाहा. [१ योहान ५:१९ वाचा.] या मासिकात बायबलमधून याचा खुलासा करण्यात आला आहे की दुःखाचा अंत करण्याकरता देव काय करत आहे.”
टेहळणी बुरूज मार्च १
“काही जणांचे असे मत आहे की मनुष्य पृथ्वीग्रहाचे बरेच नुकसान करत आहे. तुम्हाला कधी याविषयी काळजी वाटते का? [उत्तर ऐकून घ्या.] या शास्त्रवचनात कोणते आशादायक आश्वासन दिले आहे पाहा. [प्रकटीकरण ११:१८ वाचा.] पृथ्वी ग्रह कोणत्या कारणांमुळे अगदी एकमेव आहे याविषयी या मासिकात सांगितले आहे. तसेच पृथ्वीच्या भविष्याविषयी बायबल काय सांगते हे देखील यात सांगितले आहे.”
सावध राहा! जाने.-मार्च
“आज बऱ्याच मुलांना आईवडिलांनी नियम बनवलेले आवडत नाहीत. एका बुद्धिमान मनुष्याने एकेकाळी काय लिहिले होते हे मी तुम्हाला वाचून दाखवू इच्छितो. याविषयी तुमचा काय अभिप्राय आहे हे कृपया मला सांगा. [नीतिसूत्रे ६:२० वाचा आणि मग उत्तर ऐकून घ्या. त्यानंतर पृष्ठ १० वरील लेख दाखवा.] हा लेख मुलांना हे समजून घेण्यास मदत करतो की आईवडिलांनी अनेक नियम बनवल्यास त्यांनी काय करावे?”