महत्त्वपूर्ण वैद्यकीय प्रघाताची वैशिष्ट्ये दाखवणारा व्हिडिओ
कायदा आणि आरोग्य तज्ज्ञ अलीकडे मोठ्या प्रमाणावर रुग्णांच्या नैतिक दृष्टिकोनांकडे व हक्कांकडे लक्ष देऊ लागले आहेत. यामुळे नवनवीन उपचार पद्धती निघाल्या आहेत ज्यांचा फायदा यहोवाच्या साक्षीदारांनाही घेता येतो. (प्रे. कृत्ये १५:२८, २९) याच गोष्टीवर, संक्रमण-पर्यायी वैद्यकीय सेवा—रुग्णाच्या गरजा व हक्क पूर्ण करणे (इंग्रजी) हा व्हिडिओ केंद्रित आहे. हा व्हिडिओ पाहा आणि मग जे शिकला त्याची उजळणी करा.—सूचना: या व्हिडिओत, शस्त्रक्रियेची लहान दृश्ये दाखवण्यात आलेली आहेत तेव्हा, आपल्या लहान मुलांबरोबर हा व्हिडिओ पाहायचा की नाही हे पालकांनी ठरवावे.
(१) आज वैद्यकीय क्षेत्रातले लोक, रक्त संक्रमणाच्या उपयोगाविषयी फेरविचार का करत आहेत? (२) रक्त संक्रमणाविना केल्या जाणाऱ्या तीन जटिल शस्त्रक्रियांची नावे सांगा. (३) संपूर्ण जगभरातील किती शल्यचिकित्सकांनी रक्त संक्रमणाविना रुग्णांवर उपचार करण्याची तयारी दर्शवली आहे? ते असे करण्यास का तयार झाले आहेत? (४) अलीकडील इस्पितळ अभ्यासांमध्ये रक्ताच्या वापराविषयी काय उजेडात आले आहे? (५) रक्त संक्रमणाशी कोणते वैद्यकीय धोके संबंधित आहेत? (६) संक्रमण पर्यायांच्या फायद्यांविषयी अनेक तज्ज्ञांनी कोणता निष्कर्ष काढला आहे? (७) रक्ताक्षय कशामुळे होतो? मानव हा रोग कितपत सहन करू शकतात? रक्ताची कमी भरून काढण्यासाठी काय केले जाऊ शकते? (८) रुग्णाच्या शरीरात लाल-पेशींचे उत्पादन कशामुळे वाढवता येते? (९) शस्त्रक्रियेच्या वेळी अशा कोणत्या पद्धती आहेत ज्यांमुळे रक्तस्राव कमी करता येऊ शकतो? (१०) संक्रमण पर्याय लहान मुलांसाठी आणि जीवन धोक्यात आणणाऱ्या तातडीच्या प्रसंगात असलेल्यांसाठीसुद्धा चालू शकतो का? (११) उत्तम वैद्यकीय सेवेच्या नैतिक तत्त्वांतील एक प्रमुख तत्त्व कोणते आहे? (१२) रक्ताविना असलेल्या उपचारांची ख्रिश्चनांनी आधीच निवड करणे का महत्त्वाचे आहे? हे आपण कसे करू शकतो?
या व्हिडिओत दाखवलेले काही उपचार निवडणे, हे प्रत्येकाच्या बायबल प्रशिक्षित विवेकावर अवलंबून आहे. तुमच्यासाठी आणि तुमच्या मुलांसाठी तुम्ही कोणते संक्रमण पर्याय निवडणार, हे तुम्ही ठरवले आहे का? साक्षीदार नसलेल्या कुटुंबातील सदस्यांना देखील तुमच्या निर्णयांबद्दल व त्याच्या कारणांबद्दल सविस्तर माहिती दिली पाहिजे.—टेहळणी बुरूज, जून १५ आणि ऑक्टोबर १५, २००० च्या अंकातील “वाचकांचे प्रश्न” हे सदर पाहा.