घोषणा
◼ साहित्य सादरता डिसेंबर: सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य. पर्यायी सादरता म्हणून तुम्ही, बायबल कथांचं माझं पुस्तक किंवा तुम्ही पृथ्वीवर नंदनवनात अनंतकाळ जगू शकाल ही पुस्तके सादर करू शकता. जानेवारी: मंडळीकडे असलेल्या साठ्यातील १९८८ च्या आधीचे कोणतेही पुस्तक. यांपैकी एकाचाही साठा तुमच्याकडे नसल्यास, जवळपासच्या मंडळीत जुन्या पुस्तकांचा अधिक साठा आहे का याची विचारपूस करा म्हणजे तुम्ही ती पुस्तके वापरू शकता. ज्या मंडळ्यांकडे जुन्या पुस्तकांचा साठा नाही त्या, कौटुंबिक सौख्यानंदाचे रहस्य किंवा तरुणांचे प्रश्न—उपयुक्त उत्तरे ही पुस्तके सादर करू शकतात. फेब्रुवारी: यहोवाच्या जवळ या (इंग्रजी). हे प्रकाशन उपलब्ध नसल्यास, पर्यायी सादरता म्हणून जीवन—येथे कसे आले? उत्क्रांतीने की निर्मितीने? (इंग्रजी) किंवा प्रकटीकरण—त्याचा भव्य कळस जवळ आहे! यांचा उपयोग तुम्ही करू शकता. मार्च: सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान. गृह बायबल अभ्यास सुरू करण्याचे खास प्रयत्न केले जातील. लोकांकडे हे पुस्तक असेल तर दानीएलाच्या भविष्यवाणीकडे लक्ष द्या! (इंग्रजी) हे पुस्तक सादर केले जाऊ शकते.
◼ मंडळीचा जमाखर्च पाहणाऱ्या बांधवांना ही आठवण करून दिली जात आहे, की जगव्याप्त कार्यासाठी व राज्य सभागृह निधीसाठी असलेल्या पेट्यांमधील दान दर महिन्याला पाठवले पाहिजे व त्याचा उपयोग राज्य सभागृह जागेचे कर्ज फेडण्याकरता किंवा मंडळीतील इतर कोणत्याही खर्चाकरता वापरू नये.
◼ २००५ सालचा स्मारक विधी गुरुवार, मार्च २४ तारखेला सूर्यास्तानंतर साजरा केला जाईल, याची कृपया नोंद घ्यावी. ही आगाऊ सूचना देण्याचा उद्देश असा की एकच राज्य सभागृह अनेक मंडळ्या वापरत असल्यामुळे स्मारक विधीकरता इतर सभागृह भाड्याने घेणे आवश्यक असल्यास, बांधवांना सभागृहांकरता आधीपासूनच आवश्यक तरतुदी किंवा बुकींग करता येईल. स्मारक विधी शांतीने आणि सुव्यवस्थितपणे पार पडावा म्हणून भाड्याने घेतलेल्या सभागृहाच्या इमारतीत त्या दिवशी इतर कोणत्या कार्यक्रमामुळे गडबड किंवा गोंधळ होऊ नये, याविषयी वडिलांनी सभागृहाच्या व्यवस्थापन अधिकाऱ्यांना आधीच सांगावे. ही सभा अतिशय महत्त्वाची आहे त्यामुळे याप्रसंगी भाषण कोण देणार हे ठरवताना वडील वर्गाने दर वर्षी आलटून पालटून भाषण देण्यापेक्षा किंवा दर वर्षी एकाच बांधवाने भाषण देण्यापेक्षा उत्तम वक्त्याची निवड करावी. अभिषिक्तांपैकी एक अनुभवी बांधव भाषण देण्याकरता उपलब्ध असल्यास त्यांची निवड केली जावी.
◼ युक्तिवाद पुस्तक केवळ इंग्रजी, तामीळ आणि मल्याळम भाषेतच उपलब्ध असल्यामुळे, ज्या मंडळ्या हे प्रकाशन उपयोगात आणू शकतात त्यांनी “सन २००४ साठी ईश्वरशासित सेवा प्रशाला” यात ते वापरावे. ज्या मंडळ्या आपल्या भाषेत युक्तिवाद पुस्तक वापरू शकत नाहीत त्यांनी, “सन २००४ साठी ईश्वरशासित सेवा प्रशाला” यात चर्चेसाठी पवित्रशास्त्र विषय [td-MR] वापरावे. यासाठी आमची राज्य सेवा याच्या या अंकात एका पुरवणीचा समावेश करण्यात आला आहे. आपल्या मंडळ्यांनी “सन २००४ साठी ईश्वरशासित सेवा प्रशाला” यात कोणत्या प्रकाशनांचा उपयोग करावा हे स्थानीय मंडळ्यांतील वडील वर्गाने ठरवावे.
◼ मार्च १५, २००४ पासून मे १६, २००५ पर्यंत, यहोवाजवळ या (इंग्रजी), हे पुस्तक मंडळीच्या पुस्तक अभ्यासात अभ्यासले जाईल.
◼ पुन्हा उपलब्ध असलेली प्रकाशने:
कौटुंबिक जीवनाचा आनंद लुटा (पत्रिका क्र. २१) —पंजाबी