सन २००४ साठी ईश्वरशासित सेवा प्रशाला
१ विश्वव्यापी महत्त्व असलेले काम साध्य करण्यासाठी यहोवा सामान्य लोकांना सज्ज करतो. असे तो एका मार्गाने अर्थात दर आठवडी ईश्वरशासित सेवा प्रशालेतील प्रशिक्षणाद्वारे करतो. तुमची परिस्थिती अनुमती देते त्याप्रमाणे तुम्ही या प्रशालेत पूर्ण सहभाग घेत आहात का? या व्यवस्थेचा विद्यार्थ्यांना होता होईल तितका लाभ मिळावा म्हणून जानेवारीपासून त्यात काही फेरबदल केले जातील.
२ सहायक सल्लागार आळीपाळीने: बोधप्रद भाषण व बायबलचे ठळक मुद्दे हे भाग हाताळणाऱ्या बांधवांनी, सहायक सल्लागाराने दिलेल्या सूचनांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. पुरेसे वडील असलेल्या मंडळीत, सहायक सल्लागाराची नेमणूक दर वर्षी आळीपाळीने होऊ शकते. अशाप्रकारे कामाची उचितरीत्या वाटणी होईल पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे, वडिलांना आणि सेवा सेवकांना वेगवेगळ्या सुयोग्य वक्त्यांच्या व शिक्षकांच्या सामुहिक अनुभवातून पुष्कळ काही शिकता येऊ शकेल.
३ तोंडी उजळणीचा आराखडा: तोंडी उजळणी असलेल्या आठवड्यात तुमच्या मंडळीचे विभागीय संमेलन असेल तर उजळणी (आणि त्या सप्ताहातील प्रशालेचे सर्व भाग) संमेलनानंतरच्या आठवडी घेण्याची व्यवस्था करावी आणि त्या आठवड्यातील भाग विभागीय संमेलन असलेल्या आठवडी घ्यावेत. परंतु, विभागीय पर्यवेक्षकांची भेट आणि तोंडी उजळणी एकाच आठवड्यात येत असल्यास दोन आठवड्यांच्या आराखड्यात अदलाबदल करण्याची गरज नाही. उलट, गीत, भाषणाच्या गुणाचा भाग आणि बायबलचे ठळक मुद्दे त्याच आठवड्याच्या आराखड्यानुसार सादर केले जावेत. बोधप्रद भाषण (भाषणाच्या गुणाच्या भागानंतर दिले जाणारे) पुढील आठवड्याच्या आराखड्यातून घेतले जावे. बायबलच्या ठळक मुद्द्यांच्या भागानंतर अर्ध्या तासाची सेवा सभा होईल; ही सेवा सभा, १०-१० मिनिटांचे तीन भाग किंवा १५-१५ मिनिटांचे दोन भाग अशाप्रकारे आखण्यात येऊ शकते. (सुरवातीच्या घोषणेचा भाग या आठवड्यात वगळण्यात यावा.) सेवा सभेनंतर गीत आणि अर्ध्या तासाचे विभागीय पर्यवेक्षकांचे भाषण असेल. पुढच्या आठवड्याची ईश्वरशासित सेवा प्रशाला, आराखड्यानुसार भाषणाच्या गुणाचा भाग, बायबलचे ठळक मुद्दे आणि मग तोंडी उजळणी अशाप्रकारे असेल.
४ आध्यात्मिक वाढीसाठी मिळणाऱ्या प्रत्येक संधीचा फायदा घ्या. ईश्वरशासित सेवा प्रशालेचा तुम्हाला जसजसा लाभ होत जातो तसतसे तुम्ही मंडळीतल्या सर्वांना उत्तेजन देता, बायबल भविष्यवाणी पूर्ण करण्यात भाग घेता आणि आपण ज्याची घोषणा केली पाहिजे त्या अद्भुत संदेशाच्या उगमकर्त्याची स्तुती करता.—यश. ३२:३, ४; प्रकटी. ९:१९.