मासिके कशी सादर कराल?
सावध राहा! जाने.-मार्च
“वैद्यकीय शास्त्र, आजारपणाचा आणि एड्सचाही कधी अंत करील असे तुम्हाला वाटते का? [उत्तर ऐका.] आपला निर्माणकर्ता असे अभिवचन देतो, की एक काळ असा येईल जेव्हा कोणीही ‘मी रोगी आहे,’ असे म्हणणार नाही. [यशया ३३:२४ वाचा.] एड्सचे थैमान कोठवर चालणार? या प्रश्नाचे उत्तर सावध राहा! याच्या या अंकात देण्यात आले आहे.”
टेहळणी बुरूज फेब्रु.१५
“देव एक व्यक्ती आहे याबाबत पुष्कळ लोकांच्या मनात शंका आहे. काही म्हणतात, की तो अस्तित्वात आहे असा त्यांचा विश्वास आहे परंतु तो त्यांच्यापासून खूप दूर आहे असे त्यांना वाटते. तुम्हालाही असेच वाटते का? [उत्तर ऐका.] देवाशी ओळख करून घेणे इतके महत्त्वाचे का आहे ते पाहा. [योहान १७:३ वाचा.] या अंकातील हे सुरवातीचे लेख तुम्हाला आवडतील.”
सावध राहा! जाने.-मार्च
“पुष्कळ लोकांना एक किंवा अनेक वाईट सवयी असतात. वाईट सवयींवर आपण मात करायचा प्रयत्न केला पाहिजे असे तुम्हाला वाटते का? [उत्तर ऐका.] बहुतेकांना मात करायची इच्छा असते, पण तुमचा प्रत्यक्ष अनुभव येथे सांगितलेल्या गोष्टीशी कदाचित जुळत असेल. [रोमकर ७:१८, १९ वाचा.] सावध राहा! याचा हा अंक, [पृष्ठ २६ काढा] देवाचा काय दृष्टिकोन आहे ते समजावून सांगतो व कोणत्याही प्रकारच्या वाईट सवयीवर मात करण्यास आपली मदत करू शकतो.”
टेहळणी बुरूज मार्च१
“या लक्षवेधक वचनाबद्दल तुमचे काय मत आहे ते तुम्ही सांगू शकता. [मत्तय ५:१० वाचा.] छळ होत असतानाही एखादी व्यक्ती आनंदी कशी राहू शकते? [उत्तर ऐका.] काहींनी छळातही त्यांचा आनंद टिकवून कसा ठेवला ते तुम्हाला या नियतकालिकातल्या पहिल्या दोन लेखात वाचायला मिळेल. त्यांच्याबद्दल तुम्हाला वाचायला नक्कीच आवडेल.”