तुम्ही आपली सेवा चांगल्याप्रकारे पूर्ण करीत आहात का?
१ प्रेषितांची कृत्ये या पुस्तकात, येशूच्या शिष्यांनी, लोकांना “[“चांगल्याप्रकारे”, NW] साक्ष” देण्याद्वारे आपली सेवा पूर्ण केल्याचा अहवाल आपल्याला वाचायला मिळतो. (प्रे. कृत्ये २:४०; ८:२५; २८:२३) प्रेषित पौलाचा हाच उद्देश होता. (प्रे. कृत्ये २०:२४) सुवार्तेचा सेवक या नात्याने तुमचे देखील हेच ध्येय असू नये का? हे ध्येय तुम्ही कशाप्रकारे पूर्ण करू शकाल?
२ प्रस्तावना तयार करा: सेवेमध्ये प्रभावकारी साक्ष देण्याकरता तुम्ही पूर्व तयारी करणे महत्त्वाचे आहे. मासिके सादर करताना खासकरून हे खरे आहे कारण, मासिकांचे विषय नेहमी बदलत असतात. या बाबतीत आपल्याला मदत करण्याकरता आमची राज्य सेवा याच्या या अंकात एक नवीन सदर सुरू करण्यात आले आहे. डाव्या बाजूच्या रकान्यात, अगदी अलीकडील टेहळणी बुरूज आणि सावध राहा! मासिकांना सादर करण्याचे काही नमुने दिले आहेत. बहुतेक लोकांचे लक्ष वेधेल अशाप्रकारचा एक समयोचित विषय प्रत्येक अंकासाठी दिला जाईल. या संक्षिप्त सादरता तुम्ही पुढे कशा वाढवू शकाल?
३ तुमच्या क्षेत्रात कोणती प्रस्तावना सर्वात प्रभावकारी ठरेल ते पाहा. ज्या लेखाच्या आधारावर ती प्रस्तावना आहे तो लेख लक्षपूर्वक वाचून काढा आणि लोकांना आवडतील अशा विशिष्ट मुद्द्यांची नोंद घ्या. त्या मासिकात उल्लेखलेले एखादे वचन शोधा जे चर्चेशी संबंधित आहे व जे तुम्ही घरमालकाला वाचून दाखवू शकाल. घरमालकाला मासिके वाचण्यास उत्तेजन द्या तसेच उचित असल्यास, यहोवाच्या साक्षीदारांच्या जागतिक कार्याला दान दिले जाऊ शकते हे संक्षिप्तपणे सांगून शेवट करा. आता या प्रस्तावनेचा सराव करा.
४ बायबलचा उपयोग करण्याची योजना: चांगल्याप्रकारे योजना केल्यास, तुम्ही तुमच्या प्रस्तावनेत एखाद्या शास्त्रवचनाचा उपयोग करू शकता. प्रथम, आपल्या क्षेत्रातील लोक बोलत असलेल्या भाषेमध्ये संपूर्ण बायबल घेऊन जाणे महत्त्वाचे आहे. आणि मग, बायबल वापरण्यास कोणाची काही हरकत नसेल तर आपण त्यातूनच आपले संभाषण सुरू करू शकतो. मैत्रीपूर्णरीतीने ओळखपाळख करून घेतल्यानंतर आपण म्हणू शकतो:
◼ “आम्ही लोकांना, . . . यावर त्यांचा विश्वास बसतो का ते विचारत आहोत,” आणि मग उत्पत्ति १:१ वाचून विचारा: “या वाक्याशी तुम्ही सहमत आहात का?” समोरची व्यक्ती हो म्हणाली तर पुढे म्हणा: “मीही सहमत आहे. परंतु, तुम्हाला काय वाटते, जर देवाने सर्व गोष्टी निर्माण केल्या आहेत तर दुष्टाईला देखील तोच जबाबदार आहे का?” समोरच्या व्यक्तीचे मत ऐकल्यावर उपदेशक ७:२९ वाचा. ज्ञान पुस्तकाचे पान ७१ काढून त्यावरील २ रा परिच्छेद वाचा. घरमालकाला ज्ञान पुस्तक वाचण्याचे उत्तेजन द्या. घरमालकाला उत्पत्ति १:१ मधील शब्द पटत नसतील तर त्याला निर्मिती हे इंग्रजीतील पुस्तक वाचण्यास उत्तेजन द्या.
५ आवड दाखवणाऱ्या प्रक व्यक्तीला न्हा ट द्या: आवड दाखवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तुम्ही पुन्हा जाऊन भेट दिली नाही तर तुम्ही तुमची सेवा पूर्णार्थाने पूर्ण करू शकणार नाही. घरमालकाने मासिके किंवा इतर प्रकाशने घेतली अथवा घेतली नसली तरी, त्याने तुमच्याशी खूप चांगल्याप्रकारे चर्चा केली असेल तर त्याचे नाव आणि पत्ता लिहून घ्या. अशा लोकांची होता होईल तितक्या लवकर पुन्हा भेट घेऊन त्यांची आस्था वाढवण्याचा प्रयत्न करा. व बायबल अभ्यासाविषयी सांगायला विसरू नका.
६ पहिल्या शतकातील शिष्यांना माहीत होते, की येशूने त्यांना “[“चांगल्याप्रकारे,” NW] साक्ष” देण्याची आज्ञा दिली होती. (प्रे. कृत्ये १०:४२) आपल्यालाही आज हीच आज्ञा आहे; कारण, शिष्य बनवण्याचा हाच एकमेव मार्ग आहे. (मत्त. २८:१९, २०) तेव्हा, आपली सेवा चांगल्याप्रकारे पूर्ण करण्याचा आपण आपल्या परीने प्रयत्न करू या.—२ तीम. ४:५.