मासिके कशी सादर कराल?
सावध राहा! जुलै-सप्टें.
“आपल्या शहरात अनेक दवाखाने व वैद्यकीय केंद्रे सुरू करण्यात आली आहेत; तरीसुद्धा आज लोकांच्या तब्येती चांगल्या आहेत का? [घरमालकाचे मत ऐकल्यावर यशया ३३:२४ वाचा.] वैद्यकशास्त्राने कोणती प्रगती केली व ते ध्येय साध्य करण्यासाठी काय करणे अद्याप बाकी आहे, हे या मासिकात सांगितले आहे.”
टेहळणी बुरूज सप्टें. १५
“जवळजवळ सर्व धर्मांमध्ये सत्याचे चाहते आहेत. तरीही, धर्मामुळेच माणसामाणसांत फुटी निर्माण होतात. प्रामाणिक अंतःकरणाच्या लोकांमध्ये कशाप्रकारे ऐक्य निर्माण होऊ शकेल? [घरमालकाचे मत ऐकल्यावर, सफन्या ३:९ वाचा.] खऱ्या देवाचे ज्ञान संपूर्ण जगभरातील लोकांमध्ये ऐक्य कसे निर्माण करत आहे त्याविषयी या मासिकात सांगितले आहे.”
सावध राहा! जुलै-सप्टें.
“आपल्यातील बहुतेक जण जीवनात कधी ना कधी तरी प्रार्थना करतात; पण देव आपल्या प्रार्थना ऐकतो असे तुम्हाला वाटते का? [घरमालकास उत्तर देऊ द्या.] प्रार्थनांचे आपल्याला उत्तर हवे असेल तर काय करण्याची आवश्यकता आहे हे, “देव माझ्या प्रार्थना ऐकेल का?” या लेखात सांगितले आहे. तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला हा लेख वाचायला जरूर आवडेल याची मला खात्री आहे.”
टेहळणी बुरूज ऑक्टो. १
“आज, विश्वास या गुणाबद्दल लोकांना पहिल्याइतकी आवड राहिली नाही, आणि फार कमी या विषयावर बोलू इच्छितात, याबाबतीत तुम्ही माझ्याशी सहमत असाल. परंतु असे का झाले आहे? [घरमालकाचे मत ऐकल्यावर इब्री लोकांस ११:१ वाचा.] खरा विश्वास काय आहे आणि आपण विश्वास बाळगतो अथवा बाळगत नाही हे महत्त्वाचे आहे का, याबद्दल या मासिकात चर्चा करण्यात आली आहे.”