वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km १२/०७ पृ. ४
  • सत्याविषयी साक्ष देणारी मासिके द्या

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • सत्याविषयी साक्ष देणारी मासिके द्या
  • आमची राज्य सेवा—२००७
  • मिळती जुळती माहिती
  • मासिक सादर करण्याची तयारी कशी कराल
    आमची राज्य सेवा—२००६
  • नमुना म्हणून दिलेल्या सादरतांचा कसा वापर करावा?
    आमची राज्य सेवा—२००५
  • आपल्या नियतकालिकांचा सर्वोत्तम उपयोग करा
    आमची राज्य सेवा—१९९६
  • नियतकालिके राज्याची घोषणा करतात
    आमची राज्य सेवा—१९९८
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२००७
km १२/०७ पृ. ४

सत्याविषयी साक्ष देणारी मासिके द्या

१. टेहळणी बुरूज मासिक कोणती भूमिका बजावते?

१ टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचे प्रकाशक हे मासिक, राज्य प्रचार कार्यात व शिष्य बनवण्याच्या कार्यात अग्रगामी आहे. (मत्त. २४:१४; २८:१९, २०) राज्य सेवेच्या विविध पैलूत भाग घेत असताना आपल्याला हे समयोचित मासिक सादर करण्यास खूप आनंद होतो.

२. टेहळणी बुरूज मासिकात कोणकोणते बदल करण्यात आले आहेत आणि का?

२ या मासिकाच्या आकारात, त्यातील आशयात आणि ते सादर करण्याच्या पद्धतीत अनेक बदल झालेले आपण पाहिले आहेत. हे मासिक अधिक आकर्षक व प्रभावी बनवण्याच्या उद्देशाने हे बदल करण्यात आले जेणेकरून राज्याचा संदेश ‘सर्व माणसांच्या’ हृदयापर्यंत पोहचेल व ते ‘सत्याच्या परिपूर्ण ज्ञानाप्रत पोहचतील.’—१ तीम. २:४.

३. त्रैमासिक अंक क्षेत्र सेवेत कशाप्रकारे उपयोगात आणला जाईल?

३ सावध राहा! याचा त्रैमासिक अंक लोकांच्या हातात देण्याकरता आपण विविध सादरतांचा उपयोग करण्यात तरबेज झालो आहोत. आता आपण क्षेत्र सेवेत टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचे प्रकाशक याचा केवळ एक त्रैमासिक अंक असाच सादर करणार आहोत. या मासिकाची नमुना सादरता आमची राज्य सेवा याच्या मागच्या पानावर दिली आहे. या सादरतेत सहसा मासिकाच्या सुरुवातीला असलेल्या एखाद्या लेखाचा उल्लेख असेल; पण, इतर वेळी, लोकांना आवडतील अशा मासिकातील इतर लेखांचा देखील या सादरतांमध्ये उल्लेख केला जाईल. नमुना सादरतेत ज्या लेखाचा उल्लेख करण्यात आला आहे तो लेख जर आपण चांगल्याप्रकारे वाचून काढला आणि मग या सादरतेचा आपण आपल्या स्वतःच्या शब्दांत क्षेत्रात उपयोग केला तर या सुचवलेल्या सादरता अधिक प्रभावी ठरू शकतील.

४. आमची राज्य सेवा यात सुचवलेल्या मासिकाच्या सादरतेव्यतिरिक्‍त इतर सादरता वापरणे फायदेकारक का ठरू शकेल?

४ आमची राज्य सेवा यात प्रत्येक अंकाच्या सादरता असल्या तरी तुम्ही तुमची स्वतःची सादरता देखील वापरू शकता. असे करण्याचे एक कारण हे असू शकते, की त्या मासिकातील इतर लेखांपैकी एखादा लेख तुमच्या क्षेत्रातील लोकांना कदाचित जास्त आवडेल. किंवा, तुम्हाला जास्त आवडलेल्या एखाद्या लेखाचा उपयोग करून तुम्ही अधिक प्रभावी सादरता तयार करू शकाल, असे तुम्हाला वाटेल.

५. मासिकाच्या सादरतेची तयारी करण्याआधी तुम्ही काय केले पाहिजे?

५ सादरता कशी तयार करायची: सर्वात आधी, तुम्ही जो लेख घरमालकाला दाखवू इच्छित आहात तो तुम्ही चांगल्याप्रकारे वाचून काढला पाहिजे. मासिकातील प्रत्येकच लेख तुम्ही नेहमी, क्षेत्र सेवेत उपयोगात आणायच्या आधी चांगल्याप्रकारे वाचून काढू शकणार नाही. परंतु, जे लेख तुम्ही सादर करू इच्छिता ते तुम्ही उत्साहाने आणि प्रामाणिकपणे सादर करावेत. असे तुम्ही तेव्हाच करू शकाल जेव्हा तुम्ही स्वतः आधी लेखातील माहिती चांगल्याप्रकारे समजून घ्याल.

६. आपण आपल्या स्वतःच्या सादरता कशाप्रकारे तयार करू शकतो?

६ नंतर, संभाषणाच्या सुरुवातीला तुम्ही जे शब्द वापराल ते परिस्थितीनुरूप असावेत. संभाषण सुरू करण्याकरता लेखाशी संबंधित असलेला एखादा वेधक प्रश्‍न विचारा. तुम्ही जे काही बोलाल त्याचा घरमालकाच्या हृदयाला स्पर्श व्हावा म्हणून नेहमी देवाच्या वचनाच्या शक्‍तीवर अवलंबून राहा. (इब्री ४:१२) तुम्ही जो विषय बोलणार आहात त्याजशी संबंधित असलेले एक उचित शास्त्रवचन निवडा. शक्यतो, असे वचन जे, तुम्ही सादर करत असलेल्या लेखात उल्लेखित किंवा उद्धृत आहे. या वचनाची लेखाशी कशी सांगड घालायची त्यावर विचार करा.

७. आपण तयार केलेल्या मासिकाच्या सादरतेत आपण सुधारणा कशी करू शकतो?

७ प्रत्येक प्रसंगी: सादरता प्रभावी ठरण्याकरता क्षेत्र सेवेत तिचा उपयोग करण्याची गरज आहे. शनिवारच्या दिवशी मंडळीच्या मासिक कार्यात भाग घ्या. आपली प्रकाशने आधी ज्या लोकांनी घेतली आहेत अशांना मासिक दाखवा. तुमच्या बायबल विद्यार्थ्याला किंवा तुम्ही जेव्हा पुनर्भेट द्यायला जाता तेव्हा तिथे हजर असलेल्या लोकांना मासिक द्या. तुम्ही जेव्हा बाजारात जाता, प्रवास करता किंवा दवाखान्यात बसलेले असता तेव्हा तिथे तुम्ही लोकांना मासिक देऊ शकता. संपूर्ण महिनाभर तुम्ही जेव्हा जेव्हा या मासिकाची सादरता वापराल तेव्हा तेव्हा त्यात सुधारणा करा.

८. टेहळणी बुरूज मासिक कोणत्या अर्थाने अनोखे आहे?

८ टेहळणी बुरूज मासिक हे अनोखे मासिक आहे. विश्‍वाचा सार्वभौम शासक म्हणून ते यहोवाला उंचावते. (प्रे. कृत्ये ४:२४) त्यातून देवाच्या राज्याच्या सुवार्तेची बातमी वाचून लोकांना दिलासा मिळतो. येशू ख्रिस्तावर विश्‍वास ठेवण्याचे लोकांना उत्तेजन मिळते. (मत्त. २४:१४; प्रे. कृत्ये १०:४३) शिवाय, ते जागतिक घडामोडींवर नजर ठेवते कारण या घडामोडी बायबल भविष्यवाण्या पूर्ण करतात. (मत्त. २५:१३) प्रत्येक संधीला हे मासिक सादर करता यावे म्हणून ते चांगल्याप्रकारे वाचून काढा जेणेकरून तुम्ही तुमच्या क्षेत्रातील लोकांना त्यातून फायदा मिळवून घेण्यास मदत करू शकाल.

९. आपण कशाप्रकारे पुनर्भेटीसाठी पाया घालू शकतो?

९ मासिक दिल्यानंतर किंवा एखाद्या धार्मिक विषयावर तुमची घरमालकाबरोबर छान चर्चा झाल्यानंतर, घरमालकाला एखादा प्रश्‍न विचारा किंवा त्याला विचार करायला लावेल असे एखादे वाक्य बोला. यामुळे पुनर्भेटीसाठी मार्ग मोकळा होईल आणि तुम्ही आणखी एखाद्या धार्मिक विषयावर चर्चा करू शकाल. सत्याचे बी पेरण्यात आपण आवेश दाखवला तर जे लोक यहोवाला खरोखरच जाणू इच्छितात व त्याची सेवा करू इच्छितात अशांचे अंतःकरण तो नक्की उघडेल अशी आपण खात्री बाळगू शकतो.—१ करिंथ. ३:६.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा