सेवा सभा आराखडा
सप्टेंबर १० ने सुरू होणारा सप्ताह
गीत क्र. २३ (२००)
१० मि: स्थानीय घोषणा. आमची राज्य सेवा यातून निवडक घोषणा.
१३ मि: स्थानीय गरजा.
२२ मि: “तुम्ही आपली सेवा चांगल्याप्रकारे पूर्ण करीत आहात का?”a श्रोत्यांबरोबर १-३ परिच्छेदांची चर्चा केल्यानंतर, जुलै ते सप्टेंबर चे सावध राहा! तसेच सप्टेंबर १५ चे टेहळणी बुरूज या मासिकांचा उपयोग करून दोन संक्षिप्त प्रात्यक्षिके दाखवा. परिच्छेद ४ वर चर्चा केल्यानंतर ज्ञान पुस्तकाचा उपयोग करून सुचवलेली सादरता करून दाखवा.
गीत क्र. १३ (१२४) आणि समाप्तीची प्रार्थना.
सप्टेंबर १७ ने सुरू होणारा सप्ताह
गीत क्र. ४ (४३)
१५ मि: स्थानीय घोषणा. जमाखर्च अहवाल. “ते इंडेक्समध्ये आहे.” निर्मिती (इंग्रजी) या पुस्तकासाठी सादरता कशा शोधायच्या ते दाखवा.
१५ मि: आपण मागच्या वर्षी कसे कार्य केले? सेवा पर्यवेक्षकांचे भाषण. २००१ सेवा वर्षाच्या मंडळीच्या अहवालाचे काही ठळक मुद्दे सांगा. साध्य केलेल्या सर्व चांगल्या गोष्टींबद्दल सर्वांची प्रशंसा करा. सभांची उपस्थिती, क्षेत्र सेवेतील नियमितपणा, बायबल अभ्यास यांच्या बाबतीत मंडळीने कसे कार्य केले आहे ते दाखवा आणि सुधारणा करण्यासाठी काही व्यावहारिक सूचना द्या. येत्या वर्षी साध्य करता येतील अशी ध्येये ठेवण्यास सर्वांना उत्तेजन द्या.
१५ मि: प्रश्न पेटी. भाषण. क्षेत्र सेवेसाठी असलेल्या मंडळीच्या साप्ताहिक आराखड्याची उजळणी करा. या सभांना उपस्थित राहणारे सर्व जण फलदायी चर्चेत भाग कसा घेऊ शकतात ते सांगा. सेवेसाठी केलेल्या व्यवस्थेला मंडळीतील सर्वांनी पाठिंबा द्यावा म्हणून उत्तेजन द्या.
गीत क्र. १८ (१६२) आणि समाप्तीची प्रार्थना.
सप्टेंबर २४ ने सुरू होणारा सप्ताह
गीत क्र. ६ (४५)
१५ मि: स्थानीय घोषणा. “मासिके कशी सादर कराल?” यांत सुचवलेल्या सूचनांचा उपयोग करून जुलै ते सप्टेंबर सावध राहा! आणि ऑक्टोबर १ चे टेहळणी बुरूज ही मासिके कशी सादर करावीत त्याची दोन प्रात्यक्षिके दाखवा.
३० मि: जगातील वस्तुंवर नव्हे तर—देवावर प्रेम करा. (१ योहान २:१५-१७) गेल्या सेवा वर्षात झालेल्या विभागीय संमेलनाच्या कार्यक्रमावर आधारित भाषण द्या व श्रोत्यांबरोबर चर्चा करा. प्रचारकांना, शिकलेल्या मुख्य मुद्यांवर विवेचन मांडण्यास तसेच त्यांनी हे मुद्दे आपल्या व्यक्तिगत जीवनात किंवा कुटुंबात कसे लागू केले ते सांगण्यास सांगा. (काही भाग आगाऊच नेमून देऊ शकता.) कार्यक्रमातील या भागांवर चर्चा करा: (१) “देवाबद्दल प्रेम बाळगल्याने आपल्याला सेवेत प्रेरणा मिळते.” अशाप्रकारचे प्रेम आपल्याला, आपल्या सेवेत अडथळा आणू शकणाऱ्या भावना जसे की बुजरेपणा, उणे पडत असल्याची भावना, मनुष्याचे भय यांसारख्या नकारात्मक भावनांवर मात करायला मदत करेल. (२) “यहोवावर प्रेम करणारे वाईटाचा द्वेष करतात.” (w-MR९९ १०/१ २८-३१) देवाबरोबर नातेसंबंध जोडणे, त्याला घृणा असलेल्या गोष्टींची—दिसत असणाऱ्याच नव्हे तर स्पष्टपणे न दिसणाऱ्या वाईट गोष्टींचीही—घृणा करण्यावर अवलंबून आहे. (३) “प्रीतीच्या सर्वोत्कृष्ट मार्गाचे अनुसरण करा.” (w९२ ७/१५ २७-३०) इतरांच्या अपरिपूर्णता आपण सहन का करतो, आत्म-केंद्रितपणा, स्पर्धात्मक प्रवृत्ती, हानीकारक चहाडी का टाळतो आणि देवाच्या संघटनेशी एकनिष्ठ का राहतो यांविषयी १ करिंथकर १३:४-८ मध्ये सांगण्यात आले आहे. (४) “जगातील गोष्टींबद्दल—आपला काय दृष्टिकोन आहे?” आपण जगातील गोष्टींवर प्रेम करू नये, शरीराच्या अभिलाषांच्या बळी पडू नये, डोळ्यांच्या अभिलाषांद्वारे फसवणूक करून घेऊ नये किंवा आपल्याजवळील वस्तूंचा टेंभा मिरवू नये. (५) “जगाचा भाग न बनल्यामुळे आपले संरक्षण होते.” दुसरे करिंथकर ६:१४-१७ दाखवते, की विशिष्ट विश्वास, रूढी व रीतीरिवाज यांचे आचरण केल्यामुळे देव आपला अस्वीकार करेल. दियाबलाच्या क्लृप्त्या समजून त्या गोष्टी आपण टाळल्या पाहिजेत. (६) “देवावर प्रेम करणाऱ्यांसाठी देवाचे अभिवचन.” (w-MR८७ ११/१ ५-६) यहोवाच्या आशीर्वादांमुळे आपले जीवन आनंदी होते आणि आपण आध्यात्मिकरीत्या समृद्ध होतो.—१ तीम. ६:१७-१९.
गीत क्र. ३ (३२) आणि समाप्तीची प्रार्थना.
ऑक्टोबर १ ने सुरू होणारा सप्ताह
गीत क्र. ७ (५१)
१० मि: स्थानीय घोषणा. सर्व प्रचारकांना सप्टेंबर महिन्याचा क्षेत्र सेवा अहवाल देण्याची आठवण करून द्या.
१५ मि: मी शाळेचा अभ्यास अधिक चांगल्याप्रकारे कसा करू शकतो? एक वडील आणि त्यांची पत्नी अथवा एक सेवा सेवक आणि त्यांची पत्नी शाळेत जाणाऱ्या त्यांच्या मुलाबरोबर चर्चा करतात. मूल शाळेच्या अभ्यासात मागे पडत चालले आहे हे त्यांच्या लक्षात आल्यामुळे ते दोघेही चिंतेत आहेत. ते तरुणांचे प्रश्न पुस्तकाच्या १८ व्या अध्यायातील सल्ल्याची उजळणी करतात आणि मुलाला सुधारणुकीसाठी कशाची आवश्यकता आहे याची चर्चा करतात. पवित्र सेवेत आपल्या सर्व क्षमतांचा उपयोग करता यावा म्हणून मूलभूत शिक्षण अत्यावश्यक आहे यावर पालक जोर देतात.
२० मि: “प्रचार कार्यास ते अडखळण आहे का?” b नोकरीच्या बाबतीत संतुलन बाळगणे, राज्याला प्राथमिकता देणे महत्त्वाचे आहे यावर जोर द्या. आध्यात्मिक गरजांकडे दुर्लक्ष न करता मंडळीतील काही कुटुंब प्रमुख आपल्या कुटुंबाला आर्थिक साहाय्य कसे काय देतात हे सांगण्यासाठी त्यांना बोलवा.
गीत क्र. ११ (८५) आणि समाप्तीची प्रार्थना.
[तळटीपा]
a एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्न उत्तराने लेखाची चर्चा करा.
b एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्न उत्तराने लेखाची चर्चा करा.