मासिक सादर करण्याची तयारी कशी कराल
१. आमची राज्य सेवा मध्ये दिलेल्या मासिक सादरतांचा नमुना पाठ करण्यापेक्षा स्वतःच्या शब्दांत एखाद्या सादरतेची तयारी करणे योग्य का आहे?
१ ‘आमची राज्य सेवाच्या प्रत्येक अंकामध्ये मासिक सादरता येत असतात, मग मासिक सादर करण्याची तयारी का करावी?’ असा प्रश्न तुमच्या मनात येईल. अनेकांना, नमुना म्हणून दिलेल्या सादरतांची मदत होते, तरीही व्यक्तिगत तयारी करणे गरजेचे आहे. एका क्षेत्रात प्रभावी असणारी सादरता दुसऱ्या ठिकाणीही योग्य असेल असे नाही. म्हणून, नमुना म्हणून दिलेल्या सादरतांमध्ये ज्या प्रकारे मासिक सादरता असतात त्या जशाच तशा बोलून दाखवल्या पाहिजेत, असे आपण समजू नये. आपण नमुन्यासाठी दिलेल्या सादरतेचा उपयोग करण्याचे ठरवले तरी आपण ती स्वतःच्या शब्दात व्यक्त करणे योग्य ठरेल.
२. तुम्ही कोणता लेख दाखवणार हे ठरवणे का आवश्यक आहे?
२ लेख निवडा: तुम्ही प्रथम संपूर्ण मासिक वाचल्यानंतर तुमच्या क्षेत्राकरता योग्य असणारा आणि खासकरून तुम्हाला आवडलेला लेख निवडा. मासिक सादर करतानाचा तुमचा आवेश आणि दृढविश्वास पाहून घरमालकालाही तो लेख वाचण्याची इच्छा होऊ शकेल. जरी एखादा खास लेख तुमच्या क्षेत्रातील लोकांना आकर्षक वाटत असला तरी मासिकातील इतर लेखांचीही चांगली ओळख करून घ्या. यामुळे ज्यांना इतर विषयामध्ये आवड आहे असे कोणीतरी भेटले तर तुमच्या सादरतेमध्ये बदल करता येईल.
३. योग्य परिणाम मिळण्यासाठी तुम्ही कोणत्या प्रकारची प्रस्तावना निवडाल?
३ प्रश्न विचारा: तुमची प्रस्तावना खूप महत्वाची आहे, म्हणून सुरुवातीच्या शब्दांची काळजीपूर्वक तयारी करा. घरमालकाला विचार करण्यास प्रवृत्त करतील असे प्रश्न विचारल्यानेही मदत होईल, त्यामुळे तुम्ही दाखवत असलेल्या लेखाविषयी त्यांची आस्था वाढवण्यासाठी उत्तेजन मिळेल. विचार करायला लावणारे प्रश्न बरेचदा परिणामकारक ठरतात. घरमालकाला अस्वस्थ करणारे किंवा ज्यामुळे वाद होऊ शकतो असे प्रश्न विचारू नका.
४. वेळ असल्यास वचन वाचल्यामुळे काय फायदा होईल?
४ वचन वाचा: शेवटी, वेळ असल्यास, एक वचन वाचा कदाचित तुम्ही जो लेख दाखवत आहात त्यातीलच एखादे वचन वाचू शकता. वचन वाचल्यामुळे आपला संदेश देवाच्या वचनातून आहे हे समजून घेण्यास घरमालकाला मदत होईल. (१ थेस्सलनी. २:१३) जरी त्याने मासिक स्वीकारले नाही तरी वचनातूनही त्याला साक्ष मिळेल. काहींना योग्य प्रश्न विचारण्याअगोदर वचन वाचल्यामुळे घरमालकामध्ये आवड निर्माण करण्यास मदत मिळाली आहे. वचनाची ओळख करण्यासाठी तुम्ही असे म्हणू शकता, “बायबल मधील या वचनामध्ये जे स्पष्ट केले आहे त्याविषयी तुमचे मत जाणून घ्यायला मला आवडेल.” नंतर मासिकातील संबंधीत भागाकडे त्या व्यक्तीचे लक्ष वेधा आणि मासिक सादर करण्याअगोदर पुढे त्याची आवड वाढवण्यासाठी थोडक्यात बोला.
५. मासिक सादर करण्याची तयारी करताना कोणते मूलभूत मार्गदर्शन लक्षात ठेवणे आवश्यक आहे?
५ मासिक सादर करत असताना काय बोलायचे याविषयी कोणताही कडक नियम नाही. सर्वसाधारणपणे, तुमची सादरता साधी आणि थोडक्यात असावी. अशी पध्दत निवडा की जिच्यामुळे तुम्हीही निश्चिंत असाल आणि परिणामही चांगले मिळतील. मासिकाचा जो श्रेष्ठ दर्जा आहे त्यावर लक्ष केंद्रित करा आणि उत्साही असा. जर तुम्ही चांगली तयारी केली तर जे “सार्वकालिक जीवनासाठी नेमलेले” आहेत त्यांना टेहळणी बुरुज आणि सावध राहा! प्रभावीपणे सादर करू शकाल.—प्रे. कृत्ये १३:४८.