“तुम्ही जे काही करता ते सर्व प्रीतीने करावे”
१ अमेरिकेतील एका शहरात ज्या स्टेडियममध्ये आपल्या अधिवेशनाची सोय केली होती, तेथील व्यवस्थापकांनी असे म्हटले: “तुमचे सदस्य आले की खरोखर आनंद होतो; त्यांचं वागणं अतिशय चांगलं आणि आदरणीय असतं.” लोक आपल्या वागणुकीची प्रशंसा करतात तेव्हा आपल्याला खूप उत्तेजन मिळते. यावरून असे दिसते, की ‘आपण जे काही करतो ते सर्व प्रीतीने करतो.’ (१ करिंथ. १६:१४) पण यासोबतच काही महत्त्वाचे मुद्दे आहेत ज्यांच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. ते लक्षात घेतले नाही तर देवाच्या लोकांचे नाव खराब होईल.
२ रुम बुकींगच्या समस्या: अधिवेशन ज्या शहरात होते त्या शहरातील मंडळीत एक रुमींग डिपार्टमेंट तयार केले जाते. या डिपार्टमेंटमध्ये काम करणारे बांधव हॉटेल किंवा लॉजमध्ये जाऊन सर्वांना परवडतील अशा स्वस्त दराच्या खोल्यांचे बुकींग करण्याचा प्रयत्न करतात. त्यासाठी त्यांना किती तरी वेळ खर्च करावा लागतो. हे सर्व ते आपल्या बांधवांसाठी करतात. काही हॉटेल मालक, इतर धार्मिक गटाच्या लोकांकडून वाईट अनुभव आल्यामुळे सुरवातीला आपल्या बांधवांनाही स्वस्त दरात खोल्यांचे बुकींग करायला तयार नव्हते. पण रुमिंग डिपार्टमेंटच्या आपल्या बांधवांनी त्यांना जेव्हा याची खात्री दिली, की आमचे सर्व प्रतिनिधी हॉटेलला सहकार्य देतील तेव्हा पुष्कळ हॉटेल मालक तयार झाले.
३ पण दुःखाची गोष्ट अशी आहे, की गेल्या वर्षी अनेक हॉटेल मालकांनी अशी तक्रार केली, की आपल्यापैकी अनेक लोकांनी शेवटच्या मिनिटाला येऊन बुकींग रद्द केले. त्यांनी असे का केले? काही लोकांनी दोन हॉटेल्समध्ये खोल्या बुक केल्या आणि मग शेवटच्या मिनिटाला एका हॉटेलची बुक केलेली रुम रद्द करायला सांगितली, शिवाय बुकींग रद्द करताना हॉटेलला डिपॉझिट देखील त्यांनी पाठवले नाही. इतरांनी, त्यांच्याबरोबर प्रवास करणाऱ्या बांधवांना राहायला मिळेल म्हणून एका पेक्षा अधिक खोल्या बुक केल्या. पण हॉटेलमध्ये पोहंचल्यावर मात्र एकच खोली घेतली आणि बाकीच्या सर्व रद्द केल्या. ज्या हॉटेल्समध्ये असे घडले त्या सर्वांनी म्हटले की वॉचटावरच्या लोकांनी पूर्वी असे कधीही केले नव्हते.
४ यामुळे हॉटेलच्या लोकांना आणि अधिवेशनाची व्यवस्था करणाऱ्या आपल्या बांधवांपुढे गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. कारण बुक केलेल्या खोल्या हॉटेल मालक दुसऱ्या गिऱ्हाईकांना देत नाहीत, असे समजून की आपण त्या बुक केल्या आहेत. म्हणून अधिवेशनाला आलेल्या प्रतिनिधींनी ऐनवेळी बुकींग रद्द केले तर राहण्याची सोय करणाऱ्या बांधवांना अशा हॉटेल्समध्ये पुन्हा सहजपणे जाता येणार नाही. त्यामुळे, तुम्हाला जितक्या खोल्या लागणार आहेत फक्त तितक्याच खोल्यांचे बुकींग करावे.
५ काही हॉटेलमालक आपल्या हॉटेलमध्ये राहणाऱ्या प्रतिनिधींसाठी खास सोय करतात. ते सकाळचा नाश्ता मोफत देतात. पण त्यांनी अशी तक्रार केली आहे, की आपल्या बांधवांनी हॉटेलवाल्यांकडून सकाळी मिळणाऱ्या नाश्त्याच्या व्यवस्थेचा गैरफायदा घेतला. त्यांनी हॉटेलमध्ये नाश्ता झाल्यानंतर पुष्कळ खाद्यपदार्थ डब्यात भरून घेतले. हॉटेलमध्ये मोफत नाश्ता पुरवला जातो याचा अर्थ जे लोक हॉटेलमध्ये राहतात फक्त त्यांच्यासाठीच तो असतो. आपले खाऊन झाल्यावर अधिवेशनातील आपल्या मित्रमंडळींसाठी तो डब्यात भरून घेणे चुकीचे आहे. आपण जर हॉटेलवाल्यांचा असा गैरफायदा घेतला तर ते कदाचित अशा मोफत नाश्त्याची सोय रद्द करतील, खोल्यांचे दर वाढवतील किंवा कदाचित आपल्याशी पुढे कोणताही व्यवहार करायला तयार होणार नाहीत.
६ सर्वांचे बरे करावे: यहोवा आणि शेजाऱ्यांवरील प्रेम आपल्याला चांगले आचरण राखण्यास मदत करील. (मत्त. २२:३७-३९; याको. ३:१३) बायबल आपल्याला सर्व लोकांप्रती प्रेमळ असण्याचे, त्यांना समजून घेण्याचे उत्तेजन देते. (गलती. ६:१०) हॉटेल्समध्ये राहत असतानाही हेच तत्त्व लागू होते. आपण सहकार्य दिले नाही तर आपले नाव खराब होते, कमी दरात खोली मिळण्याची सोय कदाचित आपण गमावू आणि बांधवांच्या भावनाही दुखावल्या जाऊ शकतात. एखाद्या शहरातील हॉटेलने समजा, कमी दरात खोल्या देण्यास नाकारले तर ज्या बांधवांना महागड्या खोल्या परवडत नाहीत त्यांना किती त्रास होईल याचा विचार करा.
७ आपण जास्त दर असलेली एखादी खोली आधीच बुक करतो आणि मग शेवटच्या मिनिटाला ती रद्द करतो तेव्हा, ज्या बांधवाने खोली बुक करायचा प्रयत्न केलेला असतो त्याला ती आपल्यामुळे मिळत नाही. त्याला कदाचित दुसरीकडे कोठेतरी लांब जावे लागेल किंवा मग निम्न दर्जाची खोली घ्यावी लागेल. आपले हे असे वागणे प्रेमळपणाचे किंवा विचारीपणाचे आहे का? म्हणूनच, स्वतःचा स्वार्थ पाहण्याऐवजी सर्वांबद्दल प्रेम दाखवणे, सर्वांचे बरे करणे किती उत्तम आहे!—मत्त. ७:१२; योहा. १३:३४, ३५.
८ आपण सर्वजण “देवाच्या वचनानुसार आचरण करणारे” या प्रांतीय अधिवेशनाला उपस्थित राहायला उत्सुक आहोत. तुमची सर्व तयारी झाली आहे का? हॉटेल्समध्ये रुम बुकींग आणि ट्रेन अथवा बसचे बुकींग झाले आहे का? तुम्ही ज्या हॉटेलमध्ये राहणार आहात किंवा ज्या शहरांत अधिवेशन आहे तेथेही तुमच्या आचरणावरून लोकांना समजो की तुमच्याकडे सत्य आहे आणि आपल्या निर्माणकर्त्यावर आपले प्रेम आहे.