वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ९/०० पृ. ५
  • देवाच्या वचनांकडे लक्ष द्या

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • देवाच्या वचनांकडे लक्ष द्या
  • आमची राज्य सेवा—२०००
  • मिळती जुळती माहिती
  • ‘ऐकून ज्ञान वाढवा’
    आमची राज्य सेवा—२००१
  • ऐका आणि शिका
    आमची राज्य सेवा—२०१३
  • माणसाचे नव्हे—देवाचे वचन
    आमची राज्य सेवा—१९९०
  • १९९१ च्या “स्वातंत्र्याचे चाहते” प्रांतिय अधिवेशनाला उपस्थित राहण्यासाठी आत्ताच योजना आखा
    आमची राज्य सेवा—१९९१
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२०००
km ९/०० पृ. ५

देवाच्या वचनांकडे लक्ष द्या

१ लोकांचे प्रत्येक बोलणे आपण गंभीरपणे घेण्याची गरज नाही. परंतु देवाच्या प्रत्येक वचनाकडे लक्ष देण्याचे आपल्याकडे एक महत्त्वाचे कारण आहे. (अनु. २८:१, २) ईश्‍वरप्रेरित लेखकांनी आपल्या लाभाकरता “देवाची वचने” लिहून ठेवल्याबद्दल आपण त्यांचे खूप आभारी आहोत. (रोम. ३:२) येणाऱ्‍या अधिवेशनांमध्ये आपल्याला ही वचने ऐकण्याची उत्तम संधी मिळेल, कारण तेव्हा बायबलच्या वचनांचे वाचन व चर्चा केली जाईल. तेव्हा आपण लक्ष देऊन कसे ऐकू शकू?

२ तिन्ही दिवशी सकाळी लवकर या: यहोवा देवाने सीनाय पर्वतावर इस्राएल लोकांना नियमशास्त्रातून ऐकण्याकरता बोलवले तेव्हा त्यांना किती आनंद झाला असावा याची कल्पना करा! (निर्ग. १९:१०, ११, १६-१९) प्रांतीय अधिवेशनात मिळणाऱ्‍या यहोवाच्या सूचनांबद्दल तुमची देखील अशीच मनोवृत्ती असेल तर तुम्ही तिन्ही दिवशी सकाळी लवकर येण्याचा प्रयत्न कराल. आपण उशीरा आलो तर आपल्याला पूर्ण कार्यक्रम ऐकायला मिळणार नाही. उशीरा आल्यामुळे जागा शोधण्यात आपला वेळ जाईल आणि इतरांनाही आपल्यामुळे त्रास होईल. अधिवेशनाच्या ठिकाणी सकाळी ८ वाजता प्रवेश दिला जाईल. दररोज सकाळी ९:३० वाजता कार्यक्रम सुरू होईल.

३ काहीजण लवकर येऊनसुद्धा कार्यक्रम सुरू होतो तेव्हा आपल्या जागेवर बसलेले नसतात. असे का? अधिवेशन चेअरमन जोपर्यंत सुरवातीच्या गीताची घोषणा करीत नाही तोपर्यंत ते आपल्या मित्रांबरोबर बोलत राहतात. आपण सर्वांनी या गोष्टीची नोंद घ्यावी, की प्रत्येक कार्यक्रमाच्या सुरवातीला होणाऱ्‍या गीताच्या पुष्कळ मिनिटांआधी चेअरमन स्टेजवर येऊन बसतात तेव्हा सुरवातीचे राज्य संगीत लावले जाते. यावरून आपण समजून घ्यावे, की आता आपल्याला आपापल्या जागी बसले पाहिजे. मग जेव्हा राज्य गीत गायला सर्वांना आमंत्रण दिले जाते तेव्हा आपण सर्व जण आपापल्या जागेवर उभे राहून यहोवाचे स्तुतीगीत गाऊ शकतो.

४ कुटुंब मिळून एकत्र बसा: प्राचीन काळी इस्राएल लोकांत देवाची पवित्र वचने एकत्र जमलेल्या कुटुंबांपुढे वाचली जायची तेव्हा, “बालके” देखील ऐकून शिकत असत. (अनु. ३१:१२) आजच्या आपल्या अधिवेशनांमध्ये पालकांनी आपल्या मुलांना “मोकळे” सोडू नये. (नीति. २९:१५) पालकहो, संपूर्ण कुटुंब मिळून एकत्र बसा. आपल्या लहान अथवा तरुण मुलांना आपल्यासोबत बसवा. काही काही पालक तर सुरवातीचे राज्य गीत सुरू होईपर्यंत शांत बसतात आणि सर्वांनी गायला सुरवात केल्यावर मग आपल्या मुलांना लघवीसाठी बाहेर घेऊन जातात. पण असे केल्यामुळे, त्यांच्या मुलांना आपल्या उपासनेतील गीते आणि प्रार्थना यांचे महत्त्व कळणार नाही. तेव्हा, शक्य असल्यास प्रत्येक कार्यक्रमाची सुरवात होण्याच्या आधी सर्व काही आटपून घेतले तर किती बरे होईल!

५ अधिवेशनांच्या दिवसांत रात्रीच्या वेळी आपण सर्वांनी पुरेशी झोप घेतल्यास व दिवसा पोट गच्च भरेपर्यंत खाण्याचे टाळल्यास अधिवेशनातील सर्व कार्यक्रम ऐकायला आपल्याला त्रास होणार नाही. वक्‍ता काय म्हणतो त्याकडे लक्ष द्या. तुमचे मन इकडे तिकडे भटकू देऊ नका. वचने वाचली जातात तेव्हा तुमचे बायबल उघडून ती पाहा. संक्षिप्त नोट्‌स घ्या. प्रत्येक भाषणाच्या वेळी वक्‍त्‌याने काय म्हटले त्याची उजळणी करा आणि तुम्ही ती माहिती आपल्या जीवनात कशी लागू कराल त्याचाही विचार करा. घरी गेल्यावर कुटुंब मिळून सर्व कार्यक्रमाची चर्चा करा. कुटुंबातील प्रत्येकाला कोणता मुद्दा आवडला? तुमचे कुटुंब या माहितीचा चांगल्याप्रकारे कसा उपयोग करू शकते?

६ देवाच्या वचनाबद्दल आदर दाखवा: अधिवेशनांमध्ये आपल्याला आपल्या मित्रांशी बोलायला मिळते. कार्यक्रम सुरू व्हायच्या आधी आपण लवकर आलो तर आपल्याला सर्वांबरोबर बोलता येईल. काही लोक कार्यक्रम चालू असताना बोलत असतात. त्यांना वाटते, की इतक्या मोठ्या हॉलमध्ये आपल्या बोलण्यामुळे कोणाला त्रास होणार नाही. पण हा त्यांचा गैरसमज आहे! अधिवेशन हॉलमध्ये जी सभा चालली आहे ती राज्य सभागृहात चालणाऱ्‍या सभांइतकीच महत्त्वाची आहे. राज्य सभागृहात लहान प्रमाणावर सभा होतात आणि अधिवेशनाच्या वेळी मोठ्या प्रमाणावर सभा होतात. या सर्व सभांना उपस्थित राहून चाललेला कार्यक्रम ऐकल्यानेच आपल्याला फायदा होऊ शकतो. काहींजवळ सेल्युलर फोन, पेजर, व्हिडिओ कॅमेरा आणि कॅमेरा असल्यास, त्यांनी कार्यक्रम ऐकणाऱ्‍यांचे लक्ष विचलित होणार नाही याची खबरदारी घ्यावी.

७ मोशे जेव्हा यहोवाकडून नियमशास्त्र घ्यायला सीनाय पर्वतावर गेला होता तेव्हा त्याने “भाकर खाल्ली नाही, आणि तो पाणीहि प्याला नाही.” (निर्ग. ३४:२८) तसेच, अधिवेशनात कार्यक्रम चालू असताना खाणे पिणे उचित नाही. आरोग्याची गंभीर समस्या असेल तर गोष्ट वेगळी. नाहीतर, खाण्यापिण्याचा ‘उचित समय’ येईपर्यंत थांबलेले बरे.—उप. ३:१.

८ वारंवार सांगूनही काही अधिवेशनांमध्ये, कार्यक्रम चालू असताना काही बंधूभगिनी आणि मुले देखील सभागृहाच्या बाहेर फिरत असताना दिसतात. अशांना आपापल्या जागी जाऊन बसण्यास अटेन्डेंट सांगतील. वेगवेगळ्या विभागांमध्ये स्वयंसेवक म्हणून काम करणाऱ्‍यांनी काम संपल्याबरोबर सभागृहात जाऊन बसावे. कार्यक्रमादरम्यान काही महत्त्वाचे काम करायचे असेल तरच स्वयंसेवकांनी बाहेर यावे. नसल्यास, त्यांनी सभागृहात बसून कार्यक्रम ऐकावा अशी त्यांच्याकडून अपेक्षा केली जाते. कार्यक्रम चालू असताना, त्यांनी एका विभागातून दुसऱ्‍या विभागात जाऊन बांधवांबरोबर गप्पा करत उभे राहू नये.

९ देवाचे वचन ऐकताना आपल्यातील कोणालाही “मंद” व्हायला आवडणार नाही. (इब्री. ५:१) तेव्हा येणाऱ्‍या प्रांतीय अधिवेशनात यहोवाच्या पवित्र वचनांची चर्चा केली जाईल त्यावेळेस आपण सर्व ते लक्ष देऊन ऐकण्याद्वारे यहोवाला आदर दाखवू या.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा