ईश्वरशासित सेवा प्रशालेतून पूर्ण लाभ मिळवणे
१ इतरांना पवित्र शास्त्रीय सत्यांना प्रभावकारी पद्धतीने कळवण्यास, आम्हाला ‘शिक्षणाच्या कलेत’ प्रशिक्षित करण्यासाठी, ईश्वरशासित सेवा प्रशाला साधनीभूत ठरली आहे. (२ तीम. ४:२, NW) आम्हाला प्रत्येक आठवडी विविध पवित्र शास्त्रीय विषयांवर मौल्यवान सूक्ष्मदृष्टी प्राप्त होते. ही प्रशाला पुरवीत असलेल्या महत्त्वपूर्ण सूचनांपासून आम्हाला संपूर्ण लाभ होत आहे याची आम्ही खात्री कशी करू शकतो?
२ प्रशाला पर्यवेक्षकांच्या सुरवातीच्या विवेचनांकडे काळजीपूर्वक लक्ष द्या. सभेच्या दरम्यान तुम्ही शिकू शकाल अशा आस्था निर्माण करणाऱ्या मुद्यांना ते ठळकपणे मांडतील. ते कोणते प्रश्न विचारतील याबद्दल विचार करा. तुम्ही त्या प्रश्नांच्या उत्तरांना तुमच्या सेवेत कसे लागू करू शकता याबद्दलही विचार करा.
३ बोधप्रद भाषण केवळ छापील साहित्याची उजळणी नाही. ते माहितीच्या व्यावहारिक मूल्यावर आणि तुम्हाला त्याचा व्यक्तिगत लाभ कसा होईल त्यावर केंद्रित करते. आगाऊ तयारी केल्यामुळे, ते मुख्य मुद्यांवर चांगल्याप्रकारे मनन करण्यासाठी तसेच त्यानंतरच्या तोंडी उजळणीत सहभाग घेण्यासाठी मदत करील.
४ साप्ताहिक पवित्र शास्त्र वाचन, नियमितपणे करीत राहिल्यामुळे, देव वचनाबद्दल तुमची गुणग्राहकता सखोल होईल. अधिक संशोधन केल्यामुळे, नवीन व मनोरंजक माहितीच्या गोष्टी प्रकट होतील. त्या गोष्टी सत्याबद्दलची तुमची समज अधिक वाढवतील. पवित्र शास्त्रीय ठळक मुद्यांची सादरता ही, केवळ पवित्र शास्त्र अहवालाच्या पुनरावृत्तीपेक्षाही अधिक आहे. संक्षिप्त उजळणी केल्यावर, वक्ता नेमून दिलेल्या भागातील उल्लेखनीय मुद्यांना ठळकपणे मांडेल. ते आमच्या जीवन व उपासनेशी कसे संबंधित आहेत हे देखील दाखवून देईल. पवित्र शास्त्रीय सूचना उत्तमरितीने कशी लागू करावी हे शिकण्यासाठी सतर्क असा.—स्तोत्र. ११९:१०५.
५ तुम्हाला विद्यार्थी भाषण नेमून देण्यात आले असल्यास, तुम्ही सध्या काम करीत असलेल्या सल्ल्याच्या मुद्याची नोंद घ्या. त्या भाषणाच्या गुणाशी संबंधित प्रशाला मार्गदर्शक पुस्तक यातील सूचना वाचून काढा. त्यांचा अवलंब करण्याचा प्रयत्न करा. तुमच्या भाषणासाठी साहित्य निवडताना, क्षेत्रात व्यावहारिक असणाऱ्या मुद्यांवर जोर द्या.—sg पृ. ९६-९ (इंग्रजी).
६ तुम्ही एक बहीण असाल व तुम्हाला, भाषण क्र. ३ किंवा भाषण क्र. ४ नेमून देण्यात आले असल्यास, साहित्य एका वास्तविक पद्धतीत सादर करण्याचा प्रयत्न करा. तुम्ही सांगाल त्या सर्व गोष्टींशी घरमालक सहमत असेल किंवा नसेल. मूलभूत पवित्र शास्त्र तत्त्वांवर तर्क करण्यात तुम्ही त्या व्यक्तीची मदत कशी कराल ते दाखवण्याचा प्रयत्न करा. (sg पृ. १५३-८) (इंग्रजी) यामुळे, क्षेत्र सेवेत तोंड द्याव्या लागणाऱ्या अशाच अडथळ्यांचा सामना कसा करावा हे पाहण्यास श्रोतेजनांना मदत मिळते. आगाऊ तयारी करा. तुमच्या घरमालकासोबत लवकरच तालीम करण्यासाठी योजना करा. सभा सुरू झाल्यावर, तालीम करण्याची गरज नसावी.
७ भाषण देणाऱ्या विद्यार्थ्यांना सभागृहाच्या पुढील बाजूस बसावयास उत्तेजन दिले जाते. यामुळे वेळ वाचतो आणि प्रशाला पर्यवेक्षकांना त्यांची विवेचने व्यक्तिगत पद्धतीने सादर करावयास मदत मिळते. प्रशाला मार्गदर्शक पुस्तक यावर आधारित नम्र व विशिष्ट सूचनांद्वारे सर्वांना लाभ होऊ शकेल. भाषण सल्ला पत्रकावर ज्या क्रमाने भाषणाचे मुद्दे दिले आहेत त्यालाच ते अनुसरणार नाहीत. परंतु, तुम्हाला उत्तम प्रगती करण्यासाठी ज्याची गरज आहे त्यावर आधारित असा एखादा सल्ल्याचा मुद्दा ते निवडतील.
८ ईश्वरशासित सेवा प्रशालेसाठी दर आठवडी तयारी करण्यासाठी व उपस्थित राहण्यासाठी ही सर्व चांगली कारणे आहेत. ती आम्हाला मिळणाऱ्या सूचनेद्वारे आमच्या सेवेत सुज्ञ व कुशल होण्यासाठी मदत करू शकतात.—नीती. १:५.