ईश्वरी भक्तीचे ध्येय ठेऊन स्वतःला तालीम द्या
१ ईश्वरशासित उपाध्यपणाची शाळा आम्हाला ‘सत्याचे वचन नीट सांगण्यास’ प्रगतीशिलपणे तालीम देते. (२ तीमथ्य २:१५) तुम्ही सामील झालात का? जर नाही, तर आता त्या चांगल्या व्यवस्थेपासून फायदा घेण्यासाठी, व तुम्ही लायक आहात तर तुमचे नाव देऊन भाग का घेत नाही?
२ शाळेचा महत्वाचा भाग साप्ताहिक पवित्र शास्त्र वाचनाचा कार्यक्रम आहे. तुमच्या व्यक्तिगत आराखड्यात नियुक्त केलेल्या पवित्र शास्त्राच्या अध्यायांचा समावेश असला पाहिजे, जेणेकडून काही काळातच तुम्ही संपूर्ण पवित्र शास्त्राचे वाचन केलेले असेल.
३ १९९३ शाळेच्या आराखड्याची सुरूवात करताना, भाषण क्र. २ पवित्र शास्त्रीय वाचन पूर्ण करील व सर्व वचने मध्यंतरी न थांबता व विवेचन न देता वाचली जातील. याचाच अर्थ हे भाषण देणाऱ्या वक्त्याला सुरूवातीस व समाप्तीलाच त्रोटक विचारांना सामील करता येईल. पवित्र शास्त्र वचनातील ठळक मुद्दे हाताळताना नियुक्त केलेल्या बांधवाने, भाषण क्र. २ साठी नेमलेल्या वचनावरील विवेचन मर्यादित ठेवावे यामुळे हे भाषण देणारा वक्ता पवित्र शास्त्र वचनाची माहिती पूर्ण विकसित करू शकतो.
४ शाळा देखरेखे, भाषण क्रं. २, ३ व ४ देणाऱ्याच्या स्पिच कौन्सिल स्लिपवर शेरा देतील. कौन्सिल स्लिप मध्ये दिलेल्या विषयाच्या अनुक्रमाप्रमाणे नव्हे तर, ज्या मुद्यावर विद्यार्थ्याने प्रगती करण्याची आवश्यकता आहे यावर ते उचित सल्ला देतील. नेमणूक क्र. १ हा भाग हाताळणाऱ्या बांधवाच्या कौन्सिल स्लिपवर शेरा मारण्याची जरूरी नाही, तथापि गरज भासल्यास खाजगी सल्ला दिला जाऊ शकतो.
५ लायक बनण्याचा जे प्रयत्न करीत आहेत, त्या सर्वांनी यहोवाने केलेल्या आध्यात्मिक योजनांचा ज्यात ईश्वरशासित उपाध्यपण शाळेत दिलेल्या तालमीचा समावेश आहे, त्याचा पूर्ण फायदा घेतला पाहिजे. अशी तालीम अधिक फलदायक सेवेप्रत निरवू शकते.—१ तीमथ्य. ४:७