ईश्वरशासित सेवा प्रशालेचा आपल्याला फायदा कसा होऊ शकतो
१ यहोवाच्या लोकांना त्याच्याकडून प्रशिक्षण प्राप्त करण्याचा अनोखा विशेषाधिकार लाभला आहे. (यश. ५४:१३; योहा. ६:४५) परंतु, या प्रशिक्षणाचा आपल्याला कितपत लाभ होतो हे, आपण जितका प्रयत्न करतो त्यावर अवलंबून आहे. ईश्वरशासित सेवा प्रशालेचा तुमच्या आध्यात्मिकतेवर किती सकारात्मक प्रभाव पडत आहे, हे तुम्हाला दिसून आले आहे का?
२ प्रशंसोद्गार: अनेक प्रशाला पर्यवेक्षकांनी असे म्हटले आहे, की भाषण गुणांचा सखोल अभ्यास केल्यामुळे, मंडळीचा क्षेत्र सेवेतील प्रभावीपणा सुधारला आहे. शिवाय, एका प्रशाला पर्यवेक्षकांना असे दिसून आले आहे, की बायबलमधील ठळक मुद्द्यांच्या भागात श्रोत्यांना आपले मत व्यक्त करण्याच्या व्यवस्थेमुळे अनेक जण साप्ताहिक बायबल वाचन आराखड्यानुसार वाचन करू शकत आहेत. प्रस्तावना व समाप्ती याची तयारी करण्यात वेळ घालवण्याऐवजी, साहित्याच्या वाचनावर अधिक लक्ष केंद्रित केल्याने खूप फायदा झाला आहे, असे नेमणूक क्रमांक २ हाताळणाऱ्या अनेक बांधवांनी आपले मत व्यक्त केले आहे. हा भाग ज्या बांधवांना मिळतो ते आता, आपल्या वाचनाची कौशल्ये सुधारण्याकडे अधिक लक्ष देत आहेत.—१ तीम. ४:१३.
३ सर्वांचा फायदा होतो: सभांमध्ये उत्तरे दिल्याने आनंद मिळू शकतो. (नीति. १५:२३) तोंडी उजळणीचे प्रश्न आगाऊ मिळत असल्यामुळे आपल्याला, तयारी करायला भरपूर वेळ मिळतो आणि मग उजळणीच्या वेळी आनंदाने सहभाग घेता येतो. शिवाय, टेहळणी बुरूज याच्या जानेवारी १, २००४ अंकापासून, बायबल पुस्तकांतील ठळक मुद्दे छापण्यात येऊ लागले आहेत; हे ठळक मुद्दे, ईश्वरशासित सेवा प्रशालेत नेमलेल्या बायबल वाचनाच्यादरम्यानच आपल्याला मिळतात. या लेखांमुळे पुष्कळांना मंडळीत बायबलमधील ठळक मुद्द्यांच्या भागादरम्यान उभारणीकारक टिपणी करण्यास मदत मिळाली आहे.
४ प्रशालेत भाग घेणाऱ्या प्रत्येकाला, नेमणुकांची तयारी करण्याचा व त्या सादर करण्याचा खास सुहक्क मिळाला आहे. स्टेजवरून प्रशाला पर्यवेक्षकांच्या प्रशंसोद्गारांचा सर्वांना लाभ होऊ शकतो. शिवाय, प्रत्येक विद्यार्थी, सभेनंतर प्रशाला पर्यवेक्षकांनी खासगीत त्याला दिलेल्या सल्ल्यातूनही फायदा मिळवू शकतो. ईश्वरशासित सेवा प्रशालेतील शिक्षणाचा लाभ मिळवा (इंग्रजी) या पुस्तकातील प्रत्येक अध्यायाच्या शेवटी भाषण गुणांची चर्चा करणारा अभ्यास देखील आणखी मदत देऊ शकतो.
५ प्रशालेदरम्यान व नंतर, व्यावहारिक व शास्त्रवचनीय मुद्दे तुमच्या लक्षात आणून दिले जातात तेव्हा सेवा प्रशाला (इंग्रजी) पुस्तकाच्या तुमच्या व्यक्तिगत प्रतीत त्यांची नोंद करा. तुम्ही जे शिकलात त्यावर मनन करा आणि यहोवाकडून मिळणाऱ्या शिक्षणाच्या या पैलूमुळे तुमची आध्यात्मिकता सुधारण्यास तुम्हाला कशाप्रकारे मदत मिळत आहे, यावर विचार करा.