सर्वात महत्त्वपूर्ण कार्यांसाठी आपल्याला निपुण बनवणारी प्रशाला
१ जीवनातली ध्येये मिळवण्यास मदत व्हावी म्हणून लोक शिक्षणासाठी शाळेत जातात. पण, जो जीवनदाता आहे त्याची स्तुती करण्यापेक्षा, त्याच्या उद्देशांबद्दल व मार्गांबद्दल इतरांना शिकण्यास मदत करण्यापेक्षा इतर कोणतेही ध्येय महत्त्वपूर्ण असू शकते? कोणतेच नाही. ईश्वरशासित सेवा प्रशालेचा हेतू, इतरांना आपला विश्वास शिकवण्यासाठी आपल्याला तयार करणे हा आहे. म्हणूनच, दर आठवडी आपण या प्रशालेत उपस्थित राहतो तेव्हा, जीवनातल्या सर्वात महत्त्वपूर्ण कार्यांसाठी आपल्याला निपुण बनवणारी कौशल्ये, आपण प्राप्त करत असतो.
२ गेल्या महिन्याच्या आपली राज्य सेवा यात “सन २००३ साठी ईश्वरशासित सेवा प्रशालेचा आराखडा” देण्यात आला होता. या आराखड्यात, प्रशाला कशी चालवली जाईल त्याचे सविस्तर वर्णन देण्यात आले आहे. ईश्वरशासित सेवा प्रशालेसाठी तुम्हाला आणाव्या लागणाऱ्या ईश्वरशासित सेवा प्रशालेच्या शिक्षणाचा फायदा घ्या (इंग्रजी), या पुस्तकाच्या तुमच्या व्यक्तिगत प्रतीत हा आराखडा ठेवणे फायदेकारक असल्याचे तुम्हाला दिसून येईल. सन २००३ साठी ईश्वरशासित सेवा प्रशालेच्या आराखड्यातील काही वैशिष्ट्यांचा आपण विचार करू या.
३ भाषणाचा गुण: जानेवारीपासून प्रत्येक ईश्वरशासित सभा, भाषणाच्या एखाद्या गुणावर किंवा वाचनाच्या, अभ्यासाच्या अथवा शिकवण्याच्या एखाद्या पैलूवर पाच मिनिटाच्या भाषणाने सुरू होईल. प्रशाला पर्यवेक्षक ही सुरवातीची भाषणे सादर करतील किंवा इतर कोणत्याही योग्य वडिलांना हे भाषण सादर करायला नेमतील. वक्ता भाषणाच्या गुणाची व्याख्या आणि त्याचे महत्त्व यांची चर्चा करू शकतात. आणि मग शास्त्रवचनांतील उदाहरणांची ते चर्चा करतील आणि तो गुण कसा लागू करायचा हे दाखवतील व असे केल्याने आपली क्षेत्र सेवा आपण कशाप्रकारे सुधारू शकतो या गोष्टीकडे श्रोत्यांचे लक्ष आकर्षित करतील.
४ नेमणूक क्रमांक १: बोधप्रद भाषण देणाऱ्या बांधवांना पुन्हा एकदा सल्ला दिला जातो की त्यांनी “चर्चिल्या जात असलेल्या माहितीच्या व्यावहारिक मूल्यावर लक्ष केंद्रित” करावे. याचा अर्थ, त्या माहितीचा उपयोग कसा करायचा हे त्यांनी मंडळीला दाखवून दिले पाहिजे. तुम्हाला ही नेमणूक मिळाली असेल तर, सेवा प्रशाला (इंग्रजी) पुस्तकाची पृष्ठे ४८-९ वरील विषयसूचीतील “व्यावहारिक अवलंब” यांत दाखवलेले संदर्भ कसे तयार करायचे आणि अभ्यास कसा करायचा त्याबद्दलच्या सूचना पाहा.
५ बायबल वाचन आराखडा: आतापर्यंत तुम्ही साप्ताहिक बायबल वाचनासाठी नेमलेला बायबलमधील भाग वाचण्याची अद्याप सवय केली नसल्यास या वर्षाच्या आराखड्यानुसार वाचण्याचा निश्चय करणे चांगले नव्हे का? जे असा निश्चय करतात ते वर्षाच्या शेवटी ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचने वाचून पूर्ण करतील. बायबलमधील ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचने वाचण्याचा कार्यक्रम सुरू करण्याच्या फायद्यांविषयी सेवा प्रशाला (इंग्रजी) पुस्तकाच्या पृष्ठ १०, परिच्छेद ४ मध्ये माहिती देण्यात आली आहे.
६ बायबल वाचनातील ठळक मुद्दे: या भागाची वेळ वाढवून ती दहा मिनिटे करण्यात आली आहे जेणेकरून श्रोत्यांना आठवड्याच्या वाचनावर आपले विवेचन मांडता येईल. हा भाग ज्या बांधवाला दिला जातो त्या बांधवाने ठरलेल्या वेळेतच तो पूर्ण करावा. हा भाग दर आठवडी आणि तोंडी उजळणी असलेल्या आठवड्यांतही सादर केला जाईल. आठवड्यासाठी नेमलेले अध्याय तुम्ही वाचत असताना, तुमच्या कौटुंबिक अभ्यासात, तुमच्या सेवेत किंवा जीवनशैलीत तुम्हाला उपयोगी पडणारे मुद्दे पाहा. लोकांबरोबरच्या आणि राष्ट्रांबरोबरच्या यहोवाच्या व्यवहारात कोणते गुण प्रदर्शित झाले? तुमचा विश्वास बळकट करणारा आणि यहोवाबद्दलची कदर वाढवणारा कोणता मुद्दा तुम्ही शिकलात? ठरलेल्या अध्यायांतील कोणत्याही मुद्द्यावर विवेचन मांडण्यास कुचराई करू नका; नेमणूक क्रमांक २ हाताळणाऱ्या बांधवाला जो भाग नेमण्यात आला आहे त्या भागातूनही तुम्ही मुद्दे सांगू शकता कारण हा बांधव वचनांवर विवेचन मांडणार नाही.
७ नेमणूक क्रमांक २: दर आठवड्याची पहिली विद्यार्थी नेमणूक हा सार्वजनिक वाचनाचा अभ्यास असेल. महिन्याच्या शेवटी येणारे वाचन सोडून बाकी सर्व वाचनाचा भाग आठवड्याच्या बायबल वाचनातून घेतलेला असेल. महिन्याच्या शेवटचे वाचन टेहळणी बुरूज मधून असेल. विद्यार्थ्याने नेमलेला भाग प्रस्तावना किंवा समारोप न देता वाचावा. अशाप्रकारे तो प्रामुख्याने आपले लक्ष त्याच्या वाचन कौशल्यावर केंद्रित करू शकतो.—१ तीम. ४:१३.
८ नेमणूक क्रमांक ३ आणि ४: यांतील काही नेमणुकांची अधिक माहिती ही, दुसऱ्या पुस्तकांपेक्षा युक्तीवाद (इंग्रजी) पुस्तकातून आहे. जेथे युक्तीवाद पुस्तक उपलब्ध नाही तेथे अतिरिक्त संदर्भ देण्यात आले आहेत. काही नेमणुकांना फक्त विषय देण्यात आला आहे. मर्यादित माहिती किंवा केवळ विषय असलेल्या नेमणुका मिळालेल्यांना, आपल्या ख्रिस्ती प्रकाशनांमध्ये संशोधन करून आपले भाग सादर करण्याची संधी मिळेल. यामुळे भगिनींना आपली विवेचने आपल्या सहायक भगिनीला लक्षात ठेवून तयार करता येऊ शकतील.
९. दृश्यरचना: सेवा प्रशाला (इंग्रजी) पुस्तकाच्या पृष्ठ ४५ वर सूचित केल्याप्रमाणे शाळा पर्यवेक्षक एक दृश्यरचना नेमतील. त्यांनी दृश्यरचना दिले नाही तर मग भगिनी पृष्ठ ८२ वरील यादीतील एखादी दृश्यरचना निवडू शकतात. एखादी भगिनी दर दोन महिन्यांतून एकदा भाषण देत असेल तर पाच वर्षांपर्यंत तिला वेगवेगळ्या अशा ३० दृश्यरचना करता येतील. ज्या भगिनी, खासकरून दृश्यरचना क्रमांक ३०, “तुमच्या क्षेत्रात उचित ठरणारी दुसरी एखादी दृश्यरचना,” निवडतील त्यांनी आपल्या नेमणूक पत्रकावर (S-89) खाली किंवा मागे दृश्यरचना लिहावी. प्रशाला पर्यवेक्षक विद्यार्थीनीच्या भाषणाची तारीख, तिच्या पुस्तकाच्या पृष्ठ ८२ वर तिने वापरलेल्या दृश्यरचनेशेजारी लिहितील. विद्यार्थीनीच्या सल्ला फॉर्मवर शेरा देतानाही ते असे लिहून ठेवू शकतात.
१० सल्ला फॉर्म: तुमचा सल्ला फॉर्म तुमच्या पुस्तकातच आहे. पृष्ठे ७९-८१ वर तो दिला आहे. त्यामुळे तुम्हाला भाषण देण्याची नेमणूक मिळते तेव्हा तुम्हाला तुमचे पुस्तक, प्रशाला पर्यवेक्षकांना द्यावे लागेल. प्रशाला पर्यवेक्षकांना सल्ला गुणांचा एक रेकॉर्ड बाळगावा लागेल जेणेकरून प्रत्येक विद्यार्थी कोणत्या गुणावर काम करत आहे हे त्यांना समजेल.
११ तोंडी उजळणी: ईश्वरशासित सेवा प्रशालेची उजळणी तोंडीच घेतली जाईल. ती दर दोन महिन्यातून एकदा ३० मिनिटांची असेल. उजळणीच्या वेळेस विचारले जाणारे प्रश्न नेहमीप्रमाणे आमची राज्य सेवा यातच येतील. तोंडी उजळणी असलेल्या आठवड्यात जर विभागीय संमेलन असेल किंवा विभागीय पर्यवेक्षकांची भेट असेल तर पुढील आठवड्याची भाषणे ही एक आठवडा आधी दिली जावीत आणि मग पुढील आठवडी तोंडी उजळणी घ्यावी.
१२ जादा वर्ग: ५० पेक्षा अधिक विद्यार्थी असलेल्या मंडळ्यांत, वडील जन जादा वर्ग घेण्याचा विचार करतील. “ही व्यवस्था सर्व विद्यार्थी सादरतांसाठी किंवा केवळ शेवटल्या दोन सादरतांसाठी उपयोगात आणली जाऊ शकते.” (सेवा प्रशाला पृष्ठ २८५) वर सांगितलेली व्यवस्था, ज्या मंडळ्यात पुष्कळ भगिनी व वाचनाची नेमणूक करण्यासाठी कमी बांधव असतात त्या मंडळ्यांसाठी उपयुक्त आहे. हे वर्ग घेण्यासाठी वडिलांनी योग्य बांधवांना निवडावे.
१३ जादा सल्लागार: ईश्वरशासित सेवा प्रशालेच्या आराखड्यात सांगितल्याप्रमाणे, बायबल वाचनातील ठळक मुद्दे आणि बोधप्रद भाषण देणाऱ्या वडिलांना व सेवा सेवकांना खासगीत सल्ला देण्याकरता वडील वर्गाने एक जादा सल्लागार नियुक्त करावा. हा बांधव अनुभवी असला पाहिजे जेणेकरून त्याने दिलेल्या सल्ल्याचा इतर वडील आदर करतील. या बांधवाचा सल्ला उपयुक्त असला पाहिजे, उत्तम भाषणाच्या आणि शिकवण्याच्या कलेची त्याने प्रशंसा केली पाहिजे आणि सुधारणेसाठी एक किंवा दोन मुद्दे सुचवले पाहिजेत. नेहमी भाषण देणाऱ्या बांधवाच्या प्रत्येक भाषणानंतर त्याला सल्ला देण्याची गरज नाही; परंतु, जादा सल्लागार म्हणून नेमण्यात आलेल्या बांधवाने हे समजून घ्यावे, की जे बांधव आता जाहीर भाषणे देतात त्यांना प्रगती करण्यास मदत केली जाऊ शकते.—१ तीम. ४:१५.
१४ सल्लागारांनी कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यावे: कोणती गोष्ट सल्लागाराला, एखाद्या बांधवाच्या भाषणाकडे लक्ष देण्यास मदत करू शकते? सेवा प्रशाला (इंग्रजी) पुस्तकाच्या ५३ अध्यायांतील बहुतेक अध्यायात, तुम्हाला तिसऱ्या चौकोनात, कोणत्या गोष्टीकडे लक्ष द्यावे या संबंधाने संक्षिप्त वर्णन देण्यात आले आहे. प्रशाला पर्यवेक्षकांनी पुस्तकातील आठवण करून देणाऱ्या इतर मुद्द्यांची किंवा सूचनांची देखील दखल घ्यावी जेणेकरून त्यांना, एखाद्या सादरतेची सुसंगतता व प्रभावीपणा लगेच ठरवता येईल. जसे की, पृष्ठ ५५ च्या वरच्या बाजूला असलेली प्रश्नमालिका आणि पृष्ठ १६३ वरील शेवटल्या परिच्छेदातील सूचना पाहाव्यात.
१५ रिकाम्या जागा भरा: सेवा प्रशाला (इंग्रजी) पुस्तकातील समासात भरपूर जागा आहे; शिवाय, पुष्कळ ठिकाणी रिकाम्या जागा आहेत जेणेकरून तुम्ही तुमच्या व्यक्तिगत अभ्यासादरम्यान आणि ईश्वरशासित सेवा प्रशालेदरम्यान काही नोंदी करू शकता. (पृष्ठे ७७, ९२, १६५, २४३, २४६ आणि २५० पाहा.) दर आठवडी तुमचे पुस्तक न विसरता आणत जा. पहिल्या भाषणापासूनच पुस्तकात पाहात जा. प्रशाला संपेपर्यंत पुस्तक उघडेच ठेवा. प्रशाला पर्यवेक्षकांनी सुचवलेले मुद्दे लिहून घ्या. वक्त्यांच्या शिकवण्याच्या पद्धतीकडे, प्रश्नांकडे, त्यांनी दिलेल्या उदाहरणांकडे, अलंकारिक भाषेकडे, दाखल्यांकडे, दृश्यसाधनांकडे व विभिन्नतेकडे लक्ष द्या. अशा फायदेकारक नोंदी घेतल्यामुळे तुम्हाला प्रशालेतून शिकलेले अनेक उत्तम मुद्दे आठवून त्यांचा उपयोग करता येईल.
१६ देवाच्या राज्याची सुवार्ता सांगणे हा सर्वात मोठा बहुमान आहे हे येशू ख्रिस्ताला माहीत होते. ही त्याची सर्वात प्रमुख कामगिरी होती. (मार्क १:३८) त्याने म्हटले: “मला . . . देवाच्या राज्याची सुवार्ता सांगितली पाहिजे, कारण त्यासाठीच मला पाठविले आहे.” (लूक ४:४३) त्याच्यामागे चालण्याचे आमंत्रण स्वीकारलेले आपण देखील सुवार्तेचा प्रचार करण्यात गढून गेलो आहोत आणि आपल्या ‘स्तुतीच्या यज्ञाचा’ दर्जा सुधारण्यासाठी आपण सतत प्रयत्न करत असतो. (इब्री १३:१५) तेव्हा, आपण सर्व, आपल्या जीवनातील सर्वात महत्त्वपूर्ण कार्यांत आपल्याला निपुण बनण्यास मदत करणाऱ्या प्रशालेत अर्थात ईश्वरशासित सेवा प्रशालेत नियमितरीत्या भाग घेण्याचा निश्चय करू या.