ईश्वरशासित कार्यहालचालींचा उन्हाळ्यात पाठलाग करीत राहा
१ उन्हाळ्याचा काळ, विविध कार्यहालचालींमध्ये सहभाग घेण्यास संधी सादर करतो. आम्हापैकी पुष्कळांना, काहीतरी वेगळे व आरामदायक करण्याद्वारे शाळेच्या सुटीचा लाभ घेण्यास आवडते. तथापि, आमच्या ईश्वरशासित नित्यक्रमात कोणताही अडथळा येऊ नये म्हणून आम्ही दक्ष असले पाहिजे.—फिलि. ३:१६.
२ आम्ही विभागीय संमेलने व खास दिवसीय संमेलनांची आतुरतेने वाट पाहात आहोत. यापैकीचे एक उन्हाळ्यात घेतले जाणार आहे तर, उपस्थित राहण्यासाठी तुम्ही निश्चित योजना केल्या आहेत का? आवश्यकतेप्रमाणे प्रवास व राहण्याच्या सोयी केल्या आहेत का? तुमच्या मंडळीत, व्यक्तिगत मदत हवी असणाऱ्या कोणा व्यक्तीला तुम्हासोबत घेण्याचा तुम्ही विचार केला का? अशा उत्तम नम्रतेच्या कृतीमुळे दोहोंनाही आशीर्वाद प्राप्त होतील.
३ शाळेच्या सुट्यांमध्ये तुम्हाला वेळ असेल तर, सेवेत अधिक सहभाग घेण्याचा विचार तुम्ही केला का? पुष्कळांना साहाय्यक पायनियर या नात्याने नाव नोंदवण्यास ही उत्तम वेळ आहे असे दिसून आले आहे. याद्वारे बहुधा, सेवेच्या अधिक सुहक्कांसाठी मार्ग मोकळा झाला आहे. संपूर्ण दिवस सेवेत एकत्र काम करून कुटुंबांना खऱ्या आनंदाचा अनुभव घेता येतो. परिस्थिती कोणतीही असली तरी, तुम्ही सेवेत घालवत असलेला वेळ अधिक वाढवू शकता का? दिवस मोठा असल्यामुळे, पुष्कळांना संध्याकाळच्या साक्षकार्यात सहभाग घेतल्याने लाभ मिळाले पाहिजे.
४ एखाद्या मंडळीला तिचे क्षेत्र पूर्ण करण्यात मदत हवी असल्यास, साहाय्य देण्याबाबत काय? तुमच्या मंडळीत असे इतर असतील ज्यांना तुमच्यासोबत एक किंवा दोन आठवड्यांसाठी, अधिक गरज असेल तेथे सेवा करण्यास आवडेल. तुमचा गट लहान असेल तर, शेजारच्या मंडळीतील प्रचारकांना कदाचित तुमच्यासोबत येण्यास आवडेल. प्रवास किती करावा याबाबतीत तुमच्या काही मर्यादा असतील तर, विभागीय पर्यवेक्षक जवळपासच्या एका मंडळीबद्दल सुचवतील. ती मंडळी तुमच्या मदतीची गुणग्राहकता बाळगेल.
५ सुटीसाठी घरापासून दूर जाण्याची योजना तुम्ही करत आहात का? असे आहे तर, तुम्ही भेट देत आहात तेथे सभांना उपस्थित राहण्यास तुम्ही योजित आहात का? तेथील बांधवांसोबत क्षेत्र सेवेत कार्य करण्याबाबत काय? या गोष्टींचा समावेश तुमच्या सुटीत केल्यामुळे, तुम्हाला तसेच इतरांना त्याचा लाभ होऊ शकेल. (रोम. १:११, १२) तसेच, प्रवास करीत असताना तुम्ही अनौपचारिक साक्षकार्य करू शकता का? तुमचे पवित्र शास्त्र व साहित्याचा साठा नक्की सोबत घ्या. वाचन किंवा पवित्र शास्त्र अभ्यासात तुम्ही मागे पडला असाल तर त्याला गाठण्यासाठी, तुम्ही तुमच्या फावल्या वेळेचा उपयोग करू शकता. लक्षात ठेवा की, ऐहिक उद्योगांपासून आम्हाला वेळोवेळी सुटी घेण्याची गरज असली तरी, यहोवाची सेवा करण्यापासून आम्हाला विश्रांती घ्यावयाची नाही.
६ मंडळीच्या कार्यहालचालींची योग्य व्यवस्था करण्यासाठी वडिलांनी दक्ष असावे. कोणी वडील किंवा सेवा सेवक, सुटीला जाणार असतील तर, इतरांनी त्यांच्या जबाबदाऱ्या संभाळाव्यात यासाठी योजना केल्या पाहिजेत. हे बांधव कधी सुटीला जाणार असतील त्या तारखांबद्दल अध्यक्षीय पर्यवेक्षकांना आगाऊपणे सांगितल्याने, योग्य व्यवस्था केल्या आहेत हे पाहण्यात त्यांना मदत मिळते.
७ होय, उन्हाळ्याचा कालावधी फारच गडबडीचा असू शकतो. परंतु, राज्य सेवेच्या तुमच्या चांगल्या नित्यक्रमात विचलित करणाऱ्या गोष्टींमुळे अडथळा येऊ शकतो. तुमच्या उन्हाळ्यातील संधींचा पुरेपुर फायदा घ्या. हितकारक आध्यात्मिक प्राधान्याच्या गोष्टींना ओळखा आणि त्यांना धरून राहा.—फिलि. १:१०.