वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ११/९२ पृ. १
  • मासिकांचा चांगला उपयोग करा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • मासिकांचा चांगला उपयोग करा
  • आमची राज्य सेवा—१९९२
  • मिळती जुळती माहिती
  • तुमच्या सेवेत नियतकालिके सादर करा
    आमची राज्य सेवा—२००५
  • सुवार्ता सादरता
    आमची राज्य सेवा—१९९०
  • टेहळणी बुरूज व सावध राहा! यांतून लाभ मिळवत राहा
    आमची राज्य सेवा—२००२
  • प्रात्येक प्रासंगी वर्गण्या सादर करा
    आमची राज्य सेवा—१९९५
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—१९९२
km ११/९२ पृ. १

मासिकांचा चांगला उपयोग करा

१ तुम्ही पुस्तकालयाला भेट दिल्यावर तेथे तुम्हाला कॉमिक्स पासून वैज्ञानिक तंत्रज्ञानापर्यंतच्या मासिकांची सुंदर रचना करून ठेवलेली दिसेल. तुम्ही ते सर्व कधीच वाचू शकणार नाही. काही मासिकांमध्ये उपयुक्‍त अशी खरोखरच मौलवान माहिती असली तरी पुष्कळ मासिके खालच्या दर्जाची असल्यामुळे त्यांना टाळलेले बरे.

२ पण वॉचटावर व अवेक सोबत तुलना केल्यावर किती मोठा फरक जाणवतो! ही मासिके सत्य शोधण्यासाठी व ते गाजवण्यासाठी समर्पित आहेत, ज्यांचा उपयोग, जे देवाच्या प्रेमाला प्रतिसाद देतात अशांच्या तारणासाठी करू शकतो.

३ अवेक! मासिकात विस्तृत माहिती व वेगवेगळे विषय असल्यामुळे ते सर्व प्रकारच्या लोकांपर्यंत अगदी प्रभावीपणे पोंचू शकते. प्रत्येक अंकाच्या ४थ्या पानावर दिलेल्या माहितीनुसार, “हे मासिक संपूर्ण परिवाराच्या बोधासाठी आहे.” ह्‍या मासिकात लोकांचा, धर्माचा, व विज्ञानाचा समावेश असणारे विविध विषय आहेत. सध्या घडत असलेल्या घटनांच्या अगदी खोल जाऊन हे मासिक आम्हास त्यांच्यामागील खरा अर्थ दर्शविते. याहूनही अधिक, ते “सृष्टिकर्त्याने दिलेल्या एका नवीन व शांतीमय जगाच्या अभिवचनावर विश्‍वास अधिक बळकट करते.”

४ अवेक! याचा नोव्हेंबर ८चा अंक, “जागतिक लोकसंख्या—भविष्याबद्दल काय?” हा विषय सादर करीत आहे. जागतिक लोकसंख्या अशीच अमर्यादितपणे वाढत राहून, अधिक त्रासात भर पडत राहील का? हे मासिक सादर करताना मनुष्य जातीच्या उज्ज्वल भवितव्यावर लक्ष केंद्रित केल्यावर पुष्कळांच्या भावनेला हा विषय स्पर्श करील. ह्‍या मासिकातील, “लेकरे ही बहुमूल्य आहेत पण पुत्रांची गरज आहे” हा लेख दाखवून लोकांचे कान आम्हाकडे वळवून, त्या लेखातील काही मुद्दे त्यांच्या लक्षात आणून देऊ शकतो. व हा लेख कुटूंब मोठे असण्याबद्दलच्या भारतीय दृष्टिकोणाला प्रतिबिंबित करतो.

५ द वॉचटावर मासिकाने देवाच्या राज्याच्या सुवार्तेचे व ते राज्य मानवजातीला जे चिरकालिक आशीर्वाद देणार आहे त्याचे जगविख्यात समर्थक असल्याचे स्वतःबद्दल सिद्ध केले आहे. नोव्हेंबर १चा अंक, पान ६ वर, “चिरकालिक जीवनाचे देवाचे दान” हे सांत्वनदायक अभिवचन सादर करतो. पान ७ वरील सुंदर चित्राचा उपयोग करून लोकांना, यहोवाने आपल्या जवळच्या भवितव्यात कोणत्या परिस्थितीचे अभिवचन दिले, त्या बद्दलची माहिती देऊ शकतो. मासिकाचे शीर्षक व लक्ष वेधवून घेणारे चित्र दाखवून त्यांना आपण सांगू शकू की यहोवाने आम्हास जीवन दिले आहे, व दुसरा लेख दाखवतो की आम्ही त्या जीवनाबद्दल कशी गुणग्राहकता दाखवू शकू.

६ प्रामाणिक आस्थेवाईकांना हे मौलवान मासिक नियमितरीत्या मिळावे अशी आमची इच्छा आहे. ह्‍या मासिकाचा काय लाभ होईल यावर चर्चा करताना, तो व्यक्‍ति खरोखरच आस्थेवाईक आहे की नाही हे तुम्ही ओळखू शकाल. आरंभाला आस्था आहे असे आढळल्यास, तुम्ही त्या व्यक्‍तिला काही अंक वैयक्‍तिकरीत्या देऊन तुमच्या मासिक मार्गाचा एक भाग करू शकता, व अशा तऱ्‍हेने आस्था वाढवू शकता. हा मनुष्य खरोखरच आस्थेवाईक आहे ही जेव्हा तुम्हाला खात्री पटते तेव्हा त्याला वर्गणी भरुन मासिक पोस्टाने मागवण्याचे उत्तेजन द्या. तो व्यक्‍ति कबूल झाला तर त्याच्या नावाची एक वर्गणी भरा.

७ आपल्याला स्वत:ला आपल्या मासिकांच्या मूल्याची खात्री पटली असल्यामुळे त्यांची शिफारस आम्हाला इतरांना करता येईल. आपल्याकडे काहीतरी उत्तम आहे, व आम्ही त्याची दुसऱ्‍यांबरोबर ख्रिस्ताप्रमाणे सहभागिता केली पाहिजे.—नीतिसूत्रे ३:२७; इब्री १३:१६.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा