परत भेट घेण्याची खात्री करा
१ “गेल्या दोन वर्षात मी [क्रिएशन पुस्तक] चार वेळा वाचून काढले आहे, आणि तरी देखील या पुस्तकाच्या निर्मितीसाठी जो सखोल अभ्यास, विद्वत्ता, आणि दस्तऐवज कामी लागला त्याचे मला नेहमीच कुतूहल वाटत राहते. कृपया याचे प्रकाशन चालूच ठेवा. हे पुस्तक जगातील प्रत्येक व्यक्तिच्या हातात असले पाहिजे. हे झालेच तर आमचा मूळारंभ कोणता याबद्दल दोष काढत राहणे व घोटाळा यांचा आणि नास्तिकतेचा लगेचच अंत होईल.” अशा प्रकारे एक सेवानिवृत्त होत असलेल्या वकिलाने कळवले. हा वृत्तांत अवेक! मासिकात एप्रिल २२, १९९२ च्या अंकात पृष्ठ ३२ वर पहावयास मिळेल.
२ या प्रकाशनाला एवढी ही संमतीदर्शक पावती मिळालेली असताना, आम्ही सर्वांनी हे क्रिएशन पुस्तक शक्य आहे तितक्या सर्व आस्थेवाईक लोकांच्या हाती पडण्याचे श्रम घेण्यात आपला संपूर्ण अंतःकरणाचा पाठिंबा द्यावयास नको का? यासाठी, आपण पुनर्भेट घेण्याची खात्री करून या प्रकाशनाबद्दल आस्था नित्याने चेतविली पाहिजे.
३ उत्क्रांतीवाद्यांनी प्रसृत केलेल्या विविध तत्त्वांचा आपणापैकी कोणीही इतका सखोल अभ्यास केलेला नाही. वास्तविकपणे, उत्क्रांती ही दुसरे काही नसून, मानवजातीचा निर्माणकर्ता यहोवा देव याचा अपमान करण्यासाठी सैतानाने सामोरे आणलेले साधन आहे हे प्रामाणिक अंतःकरणाच्या लोकांना सकारण दाखविण्यासाठी उत्क्रांतीचा अभ्यास तितका काही जरुरीचा नाही. यास्तव, घरमालक काही तांत्रिक प्रश्न आपल्याला घालतील याचे भय वाटू देऊन पुनर्भेट घेण्याची टाळाटाळ करू नका. हे प्रकाशनच स्वतः, त्यातील प्रत्येक विधानामागे भरपूर दस्तऐवज सादर करते.
४ याखेरीज, १६ ते २० अध्यायापर्यंत, मानवजातीचा आरंभ, देवाचा ही पृथ्वी व मानव याबद्दलचा उद्देश, आणि आज मानवजातीपुढे कोणत्या निवडी उभ्या आहेत याबद्दल पवित्र शास्त्र शिक्षणाचा सखोल अभ्यास देणारा माहितीचा साठा आहे. याकरताच, पुनर्भेट घेण्यासाठी खूप सुंदर माहिती उपलब्ध आहे.
५ तुम्ही पुस्तक वितरीत केलेल्या जागी पुनर्भेटी घेण्याबद्दल संकोच वाटत असला तर आपल्यासोबत मंडळीतील एखाद्या अनुभवी बांधवाला किंवा ज्याला उत्क्रांतीच्या शिक्षणाची चांगली माहिती आहे त्याला न्या. कदाचित तो शाळेला जाणारा भाऊ किंवा बहीण असेल, ज्याला शाळेत उत्क्रांतीचा विषय शिकवला जात असल्यामुळे याचा अधिक परिचय असू शकेल. याशिवाय, तुमच्या मंडळीमध्ये कदाचित असा कोणी असू शकेल की, जो पूर्वी उत्क्रांतीवर विश्वास ठेवून होता, पण पवित्र शास्त्रातील सत्य शिकल्यामुळे आता तो या खोट्या शिकवणीचे चांगल्या प्रकारे खंडण करण्यात आमची मदत करू शकतो.
६ आपल्या पुनर्भेटीच्या चर्चेसाठी क्रिएशन पुस्तकाच्या १९व्या अध्यायाकडे लक्ष केंद्रित करण्यात आणि भविष्यासाठी पवित्र शास्त्रीय आशेचा आधार वापरण्यात हेळसांड करू नका. या अध्यायात, लोकांनी पवित्र शास्त्राने भविष्याबद्दल पुरविलेल्या अभिवचनांकडे लक्ष देण्याचे उत्तेजन द्यावे म्हणून बरेच मुद्दे आहेत. तुम्हाला कदाचित पृष्ठ २३६ मध्ये सुरु होणाऱ्या “द अर्थ् ट्रान्स्फॉर्मड्” पोटमथळ्यापासून सुरु करून पृष्ठे २३८-९ वरील “ॲन एण्ड टू पावर्टी,” आणि “नो मोअर सिकनेस्” या पोटमथळ्याखालील माहितीचा उपयोग करता येईल.
७ या सुंदर प्रकाशनाने पुष्कळ लोकांना जीवनाचा मार्ग दाखवला. यामुळेच आपल्याला आणखी लोकांना क्रिएशन पुस्तक जीवनाबद्दल आणि आम्ही येथे कसे आलो याबद्दल काय म्हणते ते वाचण्यास व त्यावर विचार करण्याचे उत्तेजन देण्याची मदत देता येऊ शकेल.