टेहळणी बुरूज व सावध राहा! यांतून लाभ मिळवत राहा
सुलभ साहित्य वितरण योजना नव्याने सुरू केल्यामुळे टेहळणी बुरूज व सावध राहा! मासिकांची पोस्टाने वर्गणी थांबवण्याचे ठरवण्यात आले आहे. यामुळे आपल्याला आणि आपण ज्यांना प्रचार करतो त्या लोकांना मासिकांचे सर्व अंक मिळतील याची खात्री करण्यासाठी ज्यादा प्रयत्न करावे लागतील.
व्यक्तिगत प्रती: तुमची व्यक्तिगत वर्गणी संपते तेव्हा तुम्ही तुमच्या नियतकालिकांचा कोटा वाढवू शकता. पालकांनी पुरेशा नियतकालिकांची ऑर्डर द्यावी, जेणेकरून कुटुंबातील प्रत्येक सदस्याकडे स्वतःची एक प्रत असेल. तुमच्या व्यक्तिगत नियतकालिकावर तुम्ही स्वतःचे नाव लिहिल्यास ते चुकीने क्षेत्र सेवेत तुम्ही कोणाला देणार नाही. मंडळीमध्ये नियतकालिके येतात तेव्हा, जे बांधव नियतकालिकांचे काम पाहतात ते राज्य सभागृहात लगेच प्रत्येक अंक देतील.
मॅग्झीन रूट: प्रत्येक अंक वाचू इच्छिणाऱ्या सर्व आस्थेवाईक लोकांकडे मॅग्झीन रूट सुरू करण्याचा प्रचारकांनी प्रयत्न करावा. अशा लोकांना नियतकालिके दिल्याने, आपल्याला त्यांची आस्था आणखी वाढवण्याची व बायबल अभ्यास सुरू करण्याची संधी मिळते.—पाहा, आमची राज्य सेवा ऑक्टोबर १९९८, पृष्ठ ८.
खास गरजा असलेले लोक: एखाद्या व्यक्तीला खरोखरच आस्था आहे परंतु ती, अशा क्षेत्रात राहत असेल जे कोणाला नेमलेले नसेल तरच तिला पोस्टाने वर्गणी पाठवली जाऊ शकतात. मंडळीच्या क्षेत्रात राहणाऱ्या व्यक्तीकडे जर मॅग्झीन रूट सुरू करता येत नाही परंतु तिला खरोखरच नियतकालिके वाचायला आवडत असतील तर याविषयी मंडळीच्या सेवा समितीशी चर्चा करावी. त्यांची संमती असेल तर त्या व्यक्तीसाठी वर्गणीची विनंती केली जाऊ शकते. यासाठी आपले नेहमीचे वर्गणीचे फॉर्म (M-1 व M-101) भरले जावेत.
आपण हा भरवसा बाळगू शकतो, की टेहळणी बुरूज व सावध राहा! नियतकालिकांद्वारे राज्याची घोषणा करण्यासाठी आपण करत असलेल्या प्रयत्नांना यहोवा नेहमी यशस्वी करेल.