वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km १०/९० पृ. ८
  • सुवार्ता सादरता

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • सुवार्ता सादरता
  • आमची राज्य सेवा—१९९०
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • मासिकाद्वारे
  • प्रापंचिक मासिकासारखी नाहीत
  • आमचा कार्यभाग पार पाडणे
  • तुमच्या सेवेत नियतकालिके सादर करा
    आमची राज्य सेवा—२००५
  • द वॉचटावर व अवेक!—सत्याची समयोचित नियतकालिके
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
  • आपल्या नियतकालिकांचा सर्वोत्तम उपयोग करा
    आमची राज्य सेवा—१९९६
  • नियतकालिके राज्याची घोषणा करतात
    आमची राज्य सेवा—१९९८
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—१९९०
km १०/९० पृ. ८

सुवार्ता सादरता

मासिकाद्वारे

१ द वॉचटावर व अवेक! या मासिकांनी लोकांच्या जीवनावर जो चांगला प्रभाव घडवून आणला तसा कोणत्याही मासिकाने घडवला नाही. त्यांचा प्रत्येक अंक जीवन-प्रदायक आध्यात्मिक आहाराने भरलेला असतो. सखोल संशोधनासोबत सादर करण्यात आलेले शास्त्रवचनीय स्पष्टीकरण आमच्या मनावर व अंतःकरणावर सत्याचा संदेश बिंबवते.

२ द वॉचटावर हे मासिक पवित्र शास्त्राच्या शिकवणींचे स्पष्टीकरण आपल्या पानांमधून देते व ते आमच्या लक्षात कित्येक पवित्र शास्त्रीय भविष्यवादांची पूर्णता आणून देते. जे आध्यात्मिकरित्या भूकेले आहेत अशांना ते आपल्या मनाचे नवीकरण करून नवे व्यक्‍तीमत्व धारण करण्याचे उत्तेजन देते. (रोम. १२:२; इफिस. ४:२२-२४) अवेक! हे मासिक आपल्या वाचकांना जगात ज्या अभूतपूर्व घटना घडत आहेत त्याविषयीची माहिती देते. निर्मितीत दिसून येणारी विविधता ही या मासिकात ज्या लक्षवेधक चित्रांनी आमच्या समोर मांडण्यात येते त्याकरवी आमच्या मनात नव्या जगाविषयीची आशा तीव्र केली जाते व प्रेमळ निर्मात्याविषयी खोल आस्था रुजविली जाते.

प्रापंचिक मासिकासारखी नाहीत

३ प्रापंचिक मासिके या जगात समाधानकारक जीवन कसे जगता येते हे लोकांना दाखवीत नाहीत. ती मासिके भविष्यासाठी काही आशा देत नाहीत; तसेच सार्वकालिक जीवनाची प्राप्ती कशी करता येईल याचे शिक्षण देण्यात मागे पडली आहेत. ही जगातील मासिके जगात असणाऱ्‍या गोष्टीची वाढ करण्यासाठी आयोजलेली आहेत. पण, द वॉचटावर आणि अवेक! ही मासिके ही यापेक्षा केवढी भिन्‍न आहेत!—१ योहान २:१५-१७.

४ द वॉचटावर तसेच अवेक! मासिकाच्या प्रत्येक अंकाविषयी तुम्हाला सखोल कृतज्ञता वाटत असेल यात काही शंका नाही. कारण या मासिकात “विश्‍वासू व बुद्धीमान दास” वर्गाकडून येणाऱ्‍या सत्याचा गोड सुगंध आहे. (लूक १२:४२) तर मग, आम्ही आमच्या मासिकांचे अधिक वितरण कसे वाढवू शकतो आणि त्यापासून लोकांना अधिक लाभ कसा देऊ शकतो?

आमचा कार्यभाग पार पाडणे

५ सरळ हृदयांच्या लोकांना आमची मासिके वाचण्याचे प्रोत्साहन देण्याआधी आमच्या मासिकात काय माहिती आहे हे स्वतः आपल्याला माहीत असले पाहिजे. यासाठी उपाध्यपणाला जाण्याआधी आपण प्रत्येक अंक वाचून काढण्याची गरज आहे. आता त्यातील माहितीशी चांगले परिचित बनल्यामुळे आपल्याला त्यांची सादरता घरोघरचे कार्य, रस्त्यावरील साक्षीकार्य आणि अनौपचारिक साक्ष देताना करता येऊ शकेल.

६ तसेच आम्ही आपल्यासोबत अलिकडील मासिके बाळगल्यास आम्ही बाजाराला जाताना, प्रवास करताना, शाळेत असताना, कामावर असताना किंवा जेथे कोठे आम्ही जाऊ तेथे योग्य संधिचा फायदा घेऊन त्या मासिकांद्वारे आम्हाला साक्ष देता येईल. रिझनिंग पुस्तकातून निवडून घेतलेली प्रस्तावना तसेच मासिकातील लेखातून काढलेले निवडक मुद्दे लोकांना आमची मासिके वाचण्याची आस्था जागृत करील.

७ मासिके देताना आमचे संभाषण मोजकेच असेल तरी ते आम्ही काही मिनिटापुरते मर्यादित ठेवलेच पाहिजे असा नियम नाही. ज्याच्याशी आम्ही बोलत आहोत ती व्यक्‍ती आम्ही देत असलेल्या संदेशात खरी आस्थेवाईक आहे का व ती आमची मासिके वाचील का याची खात्री आम्हाला करता आली पाहिजे. काही प्रश्‍न सामोरे आणले गेल्यास त्यांना उत्तरे देण्यासाठी आम्ही आपल्याकडील पवित्र शास्त्र किंवा रिझनिंग पुस्तकाचा पूर्णपणे वापर करावा. आमच्या आशेचे असे समर्थन केल्यामुळे आम्हाला अद्‌भुत आशीर्वाद मिळू शकतील.—१ पेत्र ३:१५.

८ कोणा माणसाने आमची मासिके वाचण्यासाठी घेतली तर आम्ही आमच्या कामाचे स्वरुप त्याचप्रमाणे ही मासिके जागतिक पवित्र शास्त्रीय शैक्षणिक कार्यक्रमाचा भाग या नात्याने कशी नियमितपणे प्रकाशित होत असतात हे त्याला समजावून सांगू शकतो. हीच गोष्ट द वॉचटावरच्या २ ऱ्‍या पानावर तर अवेक!च्या ४ थ्या पानावर अगदी सुंदररित्या सांगण्यात आली आहे. पुढील अंकी हे सदर मासिकात नेहमीच असल्यामुळे त्यानुरुपचे प्रश्‍न विचारुन येणाऱ्‍या लेखांविषयीची आस्था जागृत करू शकतो. यामुळे त्या माणसाची इच्छा अधिक तीव्र बनेल व पुढचा अंक प्रसिद्ध झाल्यावर तोही घेण्याची तो इच्छा दर्शवील. यामुळे मासिक मार्ग सुरु करता येईल.

९ या व्यवस्थेचा अंत जवळ येत आहे तसतसा आम्ही प्रामाणिक जणांना मोठ्या बाबेलमधून बाहेर पडण्याच्या व त्यांना सत्यामध्ये आणण्याच्या कामी मदत देण्याचा आमचा वेग वाढवू या. (प्रक. १८:४) आमच्या जगभरातील पवित्र शास्त्रीय शैक्षणिक कार्यक्रमात द वॉचटावर व अवेक! ही मासिके प्रबळ साहाय्य देत आहेत. ही मासिके आमच्या उपाध्यपणासाठी उपलब्ध केल्याबद्दल आम्ही यहोवा देवाचे कृतज्ञ आहोत. या मासिकांचा आम्ही करीत असलेला दक्षतापूर्वक तसेच विस्तृत वापर यहोवा आणखी आशीर्वादित करो!

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा