यहोवाची सेवा हृदयापासून करण्यासाठी मुलांना मदत करा
१ शलमोनाने घोषित केले की, “संतती ही परमेश्वराने [यहोवा, न्यू.व.] दिलेले धन आहे.” (स्तोत्र १२७:३-५) ते खरोखर अनमोल धन आहेत. पालकांना त्यांच्या मुलांना शिकवणे, तालीम देणे, व शिस्त लावण्याची देवाने दिलेली जबाबदारी आहे. यामध्ये, सेवेत प्रशिक्षण देणे, यहोवा व त्याच्या राज्याविषयी हृदयापासून बोलण्याचे त्यांना उत्तेजन देणे समाविष्ट आहे.—इफिस ६:४.
२ पालकांनी ही तालीम कोणत्या वयापासून सुरू केली पाहिजे? पवित्र शास्त्राचे उत्तर स्पष्ट आहे: ते बालपणापासूनच असावे. (२ तीम ३:१४, १५) जितक्या लवकर तालीम सुरू कराल तितक्या अधिकपणे सत्यामध्ये मुले दृढ भूमिका धारण करून प्रगती करतील व सेवेला त्यांच्या जीवनाचे ध्येय बनवतील. ही लवकर दिलेली तालीम त्यांना जगाच्या विचारसरणी व मनोवृत्तीपासून सुध्दा सुरक्षित ठेवील.
३ शाळेला जाण्याआधीच घरात केल्या गेलेल्या कामामध्ये पुष्कळशा लहान मुलांनी गुंतागुंतीच्या कुशलता प्राप्त करण्याएवढी योग्यता दाखवली आहे. त्यामुळे लहान वयापासून शिकवणे हे कुशलतेने त्यांना तालीम देण्याकडे निरविले पाहिजे ज्यामुळे यहोवाची पसंती मिळते. (w88 8⁄1 p 15; w89 12⁄1 p 31) पुष्कळांनी तर कोवळ्या वयातच बाप्तिस्मा न झालेले प्रचारक बनण्यापर्यंतची प्रगती केली आहे. काही मुले किशोरावस्थेत पदार्पण करण्याआधीच समर्पण व बाप्तिस्मा घेतात. ह्यामुळे शालेय शिक्षण संपण्यापूर्वीच त्यांच्यासाठी सहाय्यक पायनियरिंग व नियमीत पायनियरिंग करण्याचा मार्ग उघडा झाला. ही ध्येयांची प्राप्ती करण्यासाठी, त्यांना पवित्रशास्त्रातील विविध विषयांवर लोकांशी संभाषण करण्याचे शिकवणे आवश्यक आहे.
४ काही प्रौढ आजच्या तरूणांकडे सर्वसाधारणपणे ते उध्दट व अनादरकारक आहेत ह्या रितीने पाहात असल्यामुळे त्यांच्या दारी आलेल्या तरूणाबरोबर संभाषण करण्यास कदाचित फार कमी आस्था दाखवतील. घरोघरच्या कार्यात ह्या बाधेवर मात करण्यासाठी व प्रौढ घरमालकाचे लक्ष एकाग्र करण्यासाठी एक तरूण प्रचारक काय म्हणू शकतो? एका तरुण प्रचारकाने काही अशाप्रकारे केले: “नमस्ते, माझे नाव आहे. मी माझ्या शेजाऱ्यांच्या आज भेटी घेत आहे कारण भविष्याबद्दल आज पुष्कळ चिंतीत आहेत. प्रौढ असल्यामुळे जीवनातील गोष्टींचा अनुभव तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त आहे. तथापि, आम्हा सर्वांचे सांत्वन करणारे एक शास्त्रवचन असे आहे.” प्रकटीकरण २१:३, ४ वाचल्यानंतर संभाषण शांतीदायक नवीन जगातील जीवन या हस्तपत्रिकेवर केंद्रित करावे.
५ दुसरा प्रस्ताव आहे: “नमस्ते, माझे नाव आहे. मी शेजाऱ्यांच्या भेटी घेत आहे कारण तरूणजन जो मार्ग स्वीकारत आहेत याची प्रौढांना चिंता वाटते हे मला ठाऊक आहे. कधी कधी तरुण मुले अनादर आणि बंडखोर वृत्ती दाखवल्याचे आपण बघतो. परंतु मी एका वचनाची सहभागिता करत आहे जे दाखवते की कसे एके दिवशी सर्वजण शांतीने एकत्र राहाण्यास शिकतील.” मग स्तोत्र ३७:११ वाचा व त्यावर योग्य स्पष्टीकरण द्या. आमच्या तरूण प्रचारकाकडून हे उचित बोल जेव्हा घरमालक ऐकेल, तेव्हा त्यांच्यावर चांगली छाप पडली जाऊ शकते.
६ हजारो तरुण प्रचारक राज्य प्रचार व शिष्य बनविण्याच्या कामास चांगला हातभार लावीत आहेत. त्यांची उबदार स्तुती केली जावी. ईश्वरी पालकांकडून ज्या तरुणांना बालपणीच तालीम मिळाली ते सेवेच्या विविध पैलूत पूर्ण सहभाग घेऊन काम करण्याच्या मिळालेल्या उत्तेजनास चांगला प्रतिसाद देण्यास तयार असतात. शाळेत जाणाऱ्यांना सहविद्यार्थ्यांना तसेच शिक्षकांना साक्ष देण्याची उत्कृष्ठ संधी आहे. अशा या खास क्षेत्रात साक्ष दिल्यामुळे पुष्कळांना चांगल्या अनुभवाचा आनंद मिळाला.
७ यास्तव तुमच्या मंडळीतील तरूण प्रचारकांना सहाय्य करा; जेणेकरून ते संधीचा फायदा घेऊन तरुणपणाच्या जोमाने यहोवाची सेवा करतील व हृदयापासून त्याची स्तुती करू शकतील.—उपदेशक १२:१.