प्रात्येक प्रासंगी वर्गण्या सादर करा
१ टेहळणी बुरुज आणि अवेक! यांची गुणग्राहकता बाळगण्याचे आपल्याजवळ चांगले कारण आहे. इतर कोणत्या नियतकालिकांना आंतरराष्ट्रीय प्रामाणावर इतके पसंत केले जाते? या महिन्यात, आपल्या प्राचारकार्यात या नियतकालिकांच्या वर्गण्या सादर केल्या जातील; व ऑक्टोबरच्या अंकांमध्ये किती जोरदार माहिती आहे! बहुधा, घरोघरच्या कार्यात आपण अधिकांश नियतकालिकांचे वाटप व वर्गण्या करतो; तथापि, इतर प्रात्येक उचित प्रासंगी ती सादर करण्यास आपल्याला तयार राहण्यास आवडेल.
२ ऑक्टोबर १ चे “टेहळणी बुरूज” सादर करताना “युद्ध नसलेले जग—केव्हा?” या लेखाबद्दल असे म्हणून तुम्ही आस्था निर्माण करू शकता:
▪ “मनुष्यांनी सर्व प्रायत्न करूनही शांतीदायक जग असाध्य असल्याचे का वाटते याविषयी अनेक लोक बुचकळ्यात पडले आहेत. ऑक्टोबर १ टेहळणी बुरूज नियतकालिकाच्या पृष्ठ ४ वरील या विधानांविषयी तुमचे काय मत आहे? [पृष्ठाच्या शेवटी दिलेल्या चौकोनातील काही विधाने वाचा व प्रातिसादासाठी वाव द्या.] अर्थात, याचा अर्थ शांती कधीच येणार नाही असा नाही. यशया ९:६, ७ येथील देवाच्या अभिवचनाकडे लक्ष द्या.” तुम्ही हे वचन बायबलमधून किंवा टेहळणी बुरूज नियतकालिकात पृष्ठ ७ वरील दुसऱ्या रकान्यामध्ये वरती उद्धृत केले आहे ते वाचून दाखवू शकता. टेहळणी बुरूज नियतकालिक, यहोवाचे राज्य हेच केवळ शांतीदायक जगाची एकमेव आशा असल्याचे समर्थन करते असे संक्षिप्तपणे स्पष्टीकरण द्या, व त्या व्यक्तीला तो लेख वाचण्यास उत्तेजन द्या.
३ बायबलच्या एखाद्या विषयाबद्दल आस्था असल्याची फारशी शक्यता नसणाऱ्या व्यक्तींसोबत बोलत असताना, तुम्ही ऑक्टोबर २२ चे “अवेक!” प्रास्तुत करून असे म्हणू शकता:
▪ “‘जीवन इतके अल्पकालीन का आहे?’ या नियतकालिकाच्या मुखपृष्ठावरील प्राश्नाविषयी तुम्हाला काय वाटते? [प्रातिसादासाठी वाव द्या.] वार्धक्याबद्दल आधुनिक शास्त्रज्ञ व इतरांना जे सांगायचे आहे त्यावर या लेखांची श्रृंखला लक्ष आकर्षित करते व त्यानंतर सार्वकालिक जीवनाच्या भवितव्याविषयी आपल्या निर्माणकर्त्याने जे अभिवचन दिले आहे त्यावर ते अधिक लक्ष देते. हे नियतकालिक तुम्हाला नियमितरित्या पोस्टाने मिळावे अशी माझी इच्छा आहे.”
४ धार्मिकतेकडे कल असणारे लोक तुम्हाला भेटतात त्या वेळी, ऑक्टोबर १५ च्या “टेहळणी बुरूज” नियतकालिकातून एखादा लेख का दाखवू नये? या प्रास्तुतीमुळे कदाचित अनुकूल प्रातिसाद मिळेल:
▪ “देवावर प्रोम करणे व त्याच वेळी त्याचे भय बाळगणे शक्य आहे का?, या प्राश्नाबद्दल तुमचे काय मत आहे ते जाणण्यास मला आवडेल.” उत्तरासाठी वाव द्या, व त्यानंतर, “खऱ्या देवाचे भय आता का बाळगावे?” या लेखाचा मथळा वाचा. (उप. १२:१३) रिझनींग पुस्तकाच्या पृष्ठ १९९ वरील एखाद्या उदाहरणाचा उपयोग करा आणि वर्गणी सादर करा.
५ घरोघरी प्राचार करत असताना, लहान टपऱ्या व दुकानांकडे दुर्लक्ष करू नका. नियमितपणे टपऱ्यांना भेटी देणारे, ही कार्यहालचाल आनंदविणारी व फलदायी असल्याचे वर्णन करतात. ऑक्टोबर ८ चा अवेक! सादर करताना तुम्ही अशीच एखादी साधी प्रास्तावना मांडण्याचा प्रायत्न करू शकता:
▪ “व्यापारी लोक त्यांच्या समाजावर परिणाम करणाऱ्या विषयांबद्दल अद्ययावत असण्याची इच्छा बाळगतात हे आपल्याला ठाऊक आहे. हे लेख तुम्हाला आस्थेचे वाटतील याची मला खात्री आहे.” मग, “एक-पालकीय कुटुंबे—ते किती यशस्वी असू शकतात?” या लेखातील एखाद्या मुद्याबद्दल संक्षिप्तपणे सांगा.
६ तुम्ही ज्या व्यक्तीकडे जाता, ती खरोखर कामात असल्यास, नियतकालिके प्रादर्शित करून तुम्ही असे म्हणू शकता:
▪ “कोणी भेटायला येईल अशी तुम्ही अपेक्षा करत नव्हता हे मला माहीत आहे म्हणून मी संक्षिप्तपणे बोलतो. काही महत्त्वपूर्ण वाचण्यास तुम्हाला संधी द्यावयास मला आवडेल.” तुम्ही निवडलेला एक लेख दाखवा, व नियतकालिके सादर करा.
७ घरोघरचा अहवाल काळजीपूर्वक ठेवा, व नियतकालिके वाटप केलेल्या सर्वांना भेटी द्या. वर्गणी नाकारण्यात आल्यास, नियतकालिकांच्या किरकोळ प्राती सादर करण्यास विसरू नका. त्यानंतर पुनर्भेटीच्या वेळी पुन्हा वर्गणी सादर करा. प्रात्येक उचित प्रासंगी वर्गण्या सादर करण्यास आपण तयार व दक्ष राहू या.