पवित्र शास्त्र अभ्यास घेणाऱ्या विद्यार्थ्यांना यहोवाच्या संस्थेकडे निरविणे
१ येशूने योहान १०:१६ मध्ये ज्या ‘एका कळपा’विषयीची बोलणी केली त्याच्या संघटनेची ओळख पवित्र शास्त्र विद्यार्थ्यांना होणे जरुरीचे आहे. आपल्या तारणासाठी त्यांनी स्वतःची ओळख यहोवाच्या संस्थेसोबत ठेवणे अगत्याचे आहे हे त्यांनी ओळखले पाहिजे. (प्रक. ७:९, १०, १५) या कारणास्तव आम्ही पवित्र शास्त्राचा अभ्यास आरंभितो तेव्हा होता होईल तितक्या लवकर विद्यार्थ्यांचे लक्ष संस्थेकडे निरविण्यास हवे.
२ यहोवाच्या पार्थिव संस्थेमध्ये जी वेगवेगळी वैशिष्ट्ये आहेत त्याच्याशी परिचित होण्यात तुमच्या पवित्र शास्त्र विद्यार्थ्यांचे साहाय्य करा. पहिल्या शतकातील मंडळ्यांच्या नमुन्याला अनुसरुन आज यहोवाचे लोक अशा मंडळ्यात आहेत ज्यात वडील, उपाध्य सेवक व प्रचारक आहेत. मंडळीतील सभासदांना आठवड्यातील पाच सभांना उपस्थित राहण्यास आनंद वाटतो. दरवर्षी संमेलने व अधिवेशन आयोजित केली जातात आणि यामध्ये खास सूचना प्रदान केल्या जातात व शिवाय वेगवेगळ्या विभागातून आलेल्या साक्षीदार बांधवांच्या गाठीभेटी होतात. तसेच संस्थेत पायनियर्स, मिशनरी, फिरते देखरेखे आहेत आणि जागतिक कायार्वर नियंत्रण करणारे नियमन मंडळही आहे. यहोवाच्या संस्थेच्या या विविध वैशिष्ट्यांसोबत तुम्हाला तुमच्या पवित्र शास्त्र विद्यार्थ्याला कसा परिचय करुन देता येईल? संघटनेचा आराखडा हा पवित्र शास्त्रावर आधारलेला आहे हे तुम्हाला त्यांना कसे दाखविता येईल?
देवाची इच्छा आचरणे माहितीपत्रक वापरा
३ देवाची इच्छा आचरणे हे माहितीपत्रक देवाच्या संस्थेविषयी बहुव्यापक माहिती समाविष्ट करून आहे. याच्या मदतीने तुम्हाला पवित्र शास्त्र विद्यार्थ्याला संस्थेचा परिचय करून देता येईल व त्यांच्यामध्ये संस्थेच्या कार्यवहनाविषयीची रसिकता उभारता येईल. राज्य सभागृहात जे काही चालते त्याविषयीची चर्चा करण्याद्वारे याची चांगली सुरवात करता येईल. यामुळे विद्यार्थ्याला सभांना उपस्थित राहण्याचे उत्तेजन मिळेल. त्याला जाहीर व्याख्यानाचे निमंत्रण देण्याआधी माहितीपत्रकातील १४ व १५ पानावर असलेल्या माहितीची उजळणी करा. चित्रांकडे त्याचे लक्ष वेधवा. स्थानिक राज्य सभागृहाचे स्वरुप वर्णन करून सांगा. तुम्ही जेथे उपस्थित राहता त्या सभागृहाचा फोटो देखील दाखवू शकता.
४ विभागीय देखरेख्यांची भेट मंडळीला जाहीर होते तेव्हा तुमच्या विद्यार्थ्यासोबत माहितीपत्रकातील पान २० व २१वरील माहितीचा विचार करा. २१ व्या पानाच्या तळाशी जे प्रश्न दिले आहेत त्यांची विचारणा करून मुख्य मुद्दे त्याच्याकडून काढा. आमची सध्याची व्यवस्था कशाप्रकारे शास्त्रवचनीय पार्श्वभूमीवर आधारीत आहे ते पान २० वरील पहिल्या परिच्छेदाचा वापर करून स्पष्ट करा. ही माहिती मिळाल्यामुळे तुमच्या विद्यार्थ्याने राज्य सभागृहाला दिलेली भेट अर्थभरीत ठरू शकेल.
५ याचप्रमाणे प्रांतिय अधिवेशन, विभागीय संमेलन किंवा खास संमेलन दिवस याच्या आधी पान १९ वर जी माहिती आहे त्याची उजळणी त्याच्यासोबत करा. मोठमोठी अधिवेशने कशी होतात ते, तसेच पान १८ वर दिलेल्या चित्रात केवढा आंतरराष्ट्रीय विस्तार दिसतो त्याकडे त्याचे लक्ष वेधवा. जेथे नव्या प्रकाशनाचे प्रकाशन केले जात आहे त्या चित्रावर तुम्ही आपले विवेचन सादर करताना तुम्ही त्याची तयारी पान २४ व २५ वरील माहितीवर अधिक चर्चा करण्यासाठी करू शकता. पायनियरिंगविषयी स्पष्टता देताना पान २२ व २३ वर असलेली माहिती समाविष्ट करा.
गरजेनुरुप जुळवून घ्या
६ तुम्हाला हे दिसेलच की, अगदीच सुरवातीला देवाची इच्छा आचरणे या माहितीपत्रकाची सुरवात करणे तितके आवश्यक नाही. पण जशी संधि येते व गरज उद्भवते त्यानुसार माहितीपत्रकातून विशिष्ट मुद्दे हाताळा जे विद्यार्थ्यामध्ये यहोवाच्या संस्थेविषयी रसिकता उभारतील व त्याला स्थानिक मंडळीतील सभांना उपस्थित राहण्याचे उत्तेजन देतील.
७ या गोष्टीची चर्चा करताना खात्रीपूर्वक बोलणी केल्यामुळे त्याची छाप तुमच्या विद्यार्थ्यावर दीर्घकाल राहू शकेल. आत्म्याने आवेशी व्हा. (प्रे. कृत्ये १८:२५) याचप्रमाणे तुम्ही ‘जे दुसऱ्याला शिकवता’ ते स्वतःच यहोवाच्या संस्थेविषयी रसिकता दाखविण्यात आपले चांगले उदाहरण दाखवून आहात याची खात्री करा. (रोम. २:२१) असे केल्यामुळे तुम्हाला इतरांना त्या एका कळपात समाविष्ट करता येईल ज्याचे नेतृत्व येशू आज सार्वकालिक जीवनाकडे करीत आहे.