शिष्य बनविण्यास आम्हास साहाय्य करणाऱ्या सभा
डिसेंबर १० ने सुरु होणारा सप्ताह
गीत १८० (६२)
१० मि: स्थानिक घोषणा व आमची राज्य सेवा यामधून निवडक घोषणा. या आठवडी दिल्या जाणाऱ्या अलिकडील मासिकातील विशिष्ट लेख दाखवा. बंधूजनांना पुढील आठवडी सेवा सभेला येताना देवाची इच्छा आचरणे हे माहितीपत्रक आणण्यास सांगावे.
२० मि: “देवाच्या वचनाची शिफारस करणे.” प्रश्नोत्तर रुपाने विचारविनिमय. परिच्छेद ३ व ४ चा विचार करताना लायक प्रचारकांमार्फत संभाषणाच्या नव्या विषयाचे प्रात्यक्षिक दाखवा.
१५ मि: न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन रेफरन्स बायबलचे महत्त्व. चर्चा. वडील रेफरन्स बायबलचा चांगला वापर केलेल्या दोघा किंवा तिघा प्रचारकांसोबत त्याच्या मूल्यतेविषयी चर्चा करतात. न्यू वर्ल्ड बायबल ट्रान्सलेशन कमिटीच्या पान ५ वरील माहितीचा विचार करा. तळटीपा, आडवे संदर्भ, दोन सूचि आणि अनुक्रमणिका याविषयीची ठळक वैशिष्ट्ये दाखवा. या प्रकाशनाचा वापर व्यक्तीगत अभ्यास आणि मंडळीच्या सभांची तयारी करतेवेळी करण्याच्या महत्त्वावर जोर द्या.
गीत ४६ (२०) व समाप्तीची प्रार्थना.
डिसेंबर १७ ने सुरु होणारा सप्ताह
गीत ६ (४)
८ मिः स्थानिक घोषणा व मंडळीचा हिशेब. संस्थेच्या जागतिक कार्यास पाठविलेल्या ज्या अनुदानाची पोच मिळाली असेल ती वाचून दाखवा. शिवाय मंडळीने स्थानिकरित्या खर्चाला जो हातभार लावला आहे त्याविषयी आपली रसिकता व्यक्त करा. डिसेंबर २५ रोजी आयोजित करण्यात आलेल्या खास क्षेत्रकार्याची माहिती द्या.
१७ मिः “पवित्र शास्त्र अभ्यास घेणाऱ्या विद्यार्थ्यांना यहोवाच्या संस्थेकडे निरविणे.” प्रश्नोत्तर रुपाने चर्चा. परिच्छेद ३ चा विचार होताना एका लायक प्रचारकाकरवी विद्यार्थ्याला देवाची इच्छा आचरणे या माहितीपत्रकातील १४ व १५ पानावरील माहितीचा वापर करून मंडळीच्या सभांना उपस्थित राहण्याविषयी कसे प्रोत्साहन दिले जाते त्याचे प्रात्यक्षिक दाखवा.
२० मिः “खास अधिवेशने यहोवाचा सन्मान करतात.” प्रश्नोत्तर रुपाने चर्चा. खास अधिवेशनांसाठी संस्थेने जी योजना आखली आहे तिला सर्वांनी सहकार्य दाखवावे यावर जोर द्या.
गीत ३६ (१४) व समाप्तीची प्रार्थना.
डिसेंबर २४ ने सुरु होणारा सप्ताह
गीत १०१ (२३)
५ मिः स्थानिक घोषणा व ईश्वरशासित वृत्त. सर्वांनी आठवड्याच्या शेवटी आयोजित करण्यात आलेल्या क्षेत्रकार्याला पाठबळ द्यावे असे उत्तेजन द्या.
२० मिः “देवाच्या वचनाचा वापर कुशलतेने करण्यासाठी इतरांना मदत द्या.” प्रश्नोत्तर रुपाने विचारविनिमय. उपाध्यपणाच्या विविध प्रकारात अधिक प्रभावी होण्यासाठी एकमेकांना मदत देण्याच्या गरजेवर जोर द्या. एका लायक पवित्र शास्त्र अभ्यास विद्यार्थ्याला एक प्रचारक किंवा एक पालक आपल्या लहान मुलाला क्षेत्रकार्याच्या तयारीविषयी कशी मदत देतो त्याचे प्रात्यक्षिक दाखवा.
२० मिः “विश्वासास आव्हान देणाऱ्या वैद्यकीय परिस्थितीचा सामना करण्यासाठी तुम्ही तयारीत आहात का?” लायक वडीलांकरवी परिच्छेद १ ते २२ पर्यंत, “गरजेच्या वेळी मौल्यवान मदत” या शिर्षकापर्यंत प्रश्नोत्तराने हाताळणी. काही घडेपर्यंत थांबून राहू नका यावर अधिक भर द्या. कुटुंब या नात्याने आत्ताच योजना करा—तयार राहा!
गीत १८३ (७३) व समाप्तीची प्रार्थना.
डिसेंबर ३१ ने सुरु होणारा सप्ताह
गीत १६१ (७०)
५ मिः स्थानिक घोषणा. मंडळीला याचे स्मरण द्या की, जानेवारीमध्ये यंग पीपल आस्क . . . या पुस्तकाची सादरता करावयाची आहे. सर्वांनी या प्रकाशनाच्या वितरणात पूर्ण सहभाग घेण्याची इच्छा धरावी व त्यासाठी चांगली तयारी करावी.
१० मिः “सुवार्ता सादरता—प्रार्थनाशील पद्धतीने.” उबदार आर्जविणारे भाषण. आमच्या उपाध्यपणावर देवाचे मार्गदर्शन तसेच आशीर्वाद मिळावा यासाठी प्रार्थना करण्याच्या गरजेवर भर द्या.
१८ मिः “विश्वासास आव्हान देणाऱ्या वैद्यकीय परिस्थितीचा सामना करण्यासाठी तुम्ही तयारीत आहात का?” अनुभवी वक्ता “गरजेच्या वेळी मौल्यवान मदत” या उपशिर्षकापासून पुढे पुरवणीतील लेखाच्या शेवटपर्यंत स्पष्ट रुपात भाषण देतो. तातडीची वैद्यकीय गरज उद्भवते तेव्हा वडीलांसोबत मिळून कार्य करण्याच्या लाभावर जोर द्या.
१२ मिः जानेवारीत यंग पीपल आस्क . . . पुस्तकाची सादरता करा. वडील पुस्तकाची सभागृहासोबत चर्चा करतात. थोडक्यात पुस्तकात असणाऱ्या दहा विभागांची ठळकपणे माहिती द्या. निवडक अध्यायांचा विचार करा. जी प्रभावी चित्रे, जसे की, पृष्ठ २७ वर आहे, त्यांचा विचार करा. युवक, पालक व इतरांनी पुस्तकातील समयोचित सूचनांविषयी विचार करावा म्हणून उत्तेजन द्या. सर्वांनी क्षेत्रकार्यात या पुस्तकाचे वितरण करावे यासाठी तयारी करावी. कौटुंबिक चर्चेत याचा कसा वापर केला जाऊ शकेल त्याचे मार्ग सांगा.
गीत १८८ (७०) व समाप्तीची प्रार्थना.