देवाच्या वचनाची शिफारस करणे
१ आज पुष्कळांची पवित्र शास्त्राविषयीची धारणा ही आहे की, ते कालबाह्य व अव्यवहारिक आहे. तथापि, देवाच्या वचनामध्ये लोकांच्या जीवनाला बदलण्याचे सामर्थ्य आहे. (इब्री. ४:१२) हे आज विविध लोकांची विचारशैली, वागणूक तसेच प्रवृत्तीत घडलेली सुधारणा याकरवी स्पष्ट दिसत आहे. (इफिस. ४:२४) पवित्र शास्त्रातील सल्ल्याचे अवलंबन केल्यास आनंदी कौटुंबिक वातावरण वाढीस लागण्यास मदत होते. त्यामुळे शेजाऱ्यांशी, मग ते कोणत्याही वंशाचे, वर्णाचे वा सामाजिक स्तरातील असले तरी, संबंध सुधारले जातात.—लूक १०:२९-३७.
२ देवाच्या वचनाशी आमचा जो व्यक्तीगत परिचय आहे त्याने आम्हास इतरांना, पवित्र शास्त्राच्या खऱ्या मोलाचे त्यांनी स्वतः परिक्षण करुन पाहण्याचे उत्तेजन देण्याची चालना दिली पाहिजे. हे करण्याचा उत्तम मार्ग आमच्या नव्या संभाषणाच्या विषयामध्ये, “पवित्र शास्त्र का वाचावे?” यामध्ये देण्यात आला आहे. या नव्या संभाषणाच्या विषयाचा वापर डिसेंबरमध्ये करून आम्हाला न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन आणि त्रैक्य किंवा “पहा!” यापैकीचे एक माहितीपत्रक कसे सादर करता येईल?
संभाषणाचा विषयाचा वापर करणे
३ छोट्या प्रस्तावनेनंतर तुम्हाला असे म्हणता येईलः “आज कुटुंबावर इतके दबाव व समस्या येत असताना आम्ही याविषयी व्यावहारिक मदतीचा जो एकमात्र उगम आहे त्याकडे लोकांचे लक्ष वेधवीत आहोत. गतकाळी लोक पवित्र शास्त्राकडे मार्गदर्शनासाठी बघत असत. पण आज काळ बदलला आहे, होय, ना? तर मग, आज मादक द्रव्याचा वापर, बाल गुन्हेगारी आणि विभक्त घरे या समस्यांविषयी पवित्र शास्त्र काही मदत देऊ शकते असे आपल्याला वाटते का? [प्रतिसादास वाव द्या.] पहा, येथे पवित्र शास्त्रात २ तीमथ्य ३:१६ मध्ये काय म्हटले आहे. [वाचा.] असा हा लाभदायक प्रभाव पवित्र शास्त्र आजही घडवून आणू शकते असे तुम्हास वाटते का? [प्रतिसादास वाव द्या.] जीवनात समस्या आल्या किंवा काही निर्णय घेण्याची वेळ आली म्हणजे काही प्रकारचे मार्गदर्शन मिळावे असे लोकांना वाटत असते, होय, ना? तर मग, देवाच्या वचनाचे अनुकरण आम्हाला कोठे निरवू शकते ते पहा. [वाचा योहान १७:३.] पवित्र शास्त्र व्यक्तीगत मतभेद मिटविण्यासाठी मदत तसेच भविष्यासाठी एक खात्रीलायक आशेचा किरण देते.” त्या व्यक्तीने देवाच्या वचनाची समज मिळावी यासाठी खरी आस्था दाखविल्यास आम्हाला त्याला न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशनचे किंवा एखाद्या माहितीपत्रकाचे मूल्य दाखविता येईल.
४ न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन प्रस्तुत करताना घरमालकाला त्याच्याकडे त्याचे पवित्र शास्त्र आहे का व ते त्याला वाचण्यास सोपे वाटते का याविषयी विचारणा करा. जो प्रतिसाद मिळेल त्याच्या आधाराने तुम्हाला न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशनबद्दल त्याची आधुनिक भाषा तसेच त्याने सर्वत्र घातलेले मूळ ईश्वरी नाम यासहित इतर अनेक वैशिष्ट्ये दाखविता येतील. सोबत रिझनिंग पुस्तकातील २७६-८० पृष्ठांवरील एका किंवा दोन मुद्यांची माहिती देणे साहाय्यक वाटेल. आस्था व्यक्त करणाऱ्या लोकांना व्यक्तीगत पवित्र शास्त्र अभ्यास सादर करा.
५ त्रैक्य माहितीपत्रकाचा निर्देश करताना तुम्ही असे म्हणू शकताः “पुष्कळ प्रांजळ लोकांना त्रैक्याचे शिक्षण देण्यात आले आहे पण, त्याचे त्यांच्या विचारशक्तीला आकलन होऊ शकत नाही. या माहितीपत्रकात त्रैक्याचे, पवित्र शास्त्र जे म्हणते त्याच्या ऐतिहासिक दृष्टीकोणातून परिक्षण करण्यात आले आहे. तुम्हाला ते वाचावयास आवडेल का?” “पहा!” माहितीपत्रकाची सादरता करताना तुम्हाला एकतर मुखपृष्ठावरील पूर्ण चित्र दाखवून किंवा पृष्ठ १५ वर “वाईट गोष्टी—देव त्यांना का मुभा देतो?” या उपशिर्षकाकडे लक्ष वेधवून त्याची आस्था खेचून धरता येईल.
६ डिसेंबरमध्ये लोकांना पवित्र शास्त्र वाचण्याचे कसे उत्तेजन देता येईल त्याच्या सुसंध्या शोधा. आस्था दाखविणाऱ्या लोकांची पुनर्भेट घेण्यात तत्परता दाखवा. अशांना देवाच्या वचनाच्या सामर्थ्याविषयी खरी आस्था वाढविण्यामध्ये मदत द्या. आपल्या जीवनात त्यामधील तत्त्वांचे अवलंबन करण्यामुळे त्यांना आता व येणाऱ्या दिवसात दीर्घकालीन लाभ मिळू शकतील.—१ तीमथ्य ४:८.