सेवक या नात्याने आमच्या कार्यक्षमतेत सुधारणा करणे
१ राज्याचे हितसंबंध आमच्या जीवनात प्रथम स्थानी आहेत म्हणून आम्ही निवडलेले जीवन ध्येय म्हणजे आमचे सेवकपण यात नेहमी अग्रेसर असण्याची आम्ही प्रवृत्ती ठेवावी. (मार्क १३:१०) आम्ही कितीही वर्षांपासून प्रचार कार्य करीत असलो तरी सेवक म्हणून आमच्या कार्यक्षमतेत सुधारणा करण्याची आवड आम्हाठायी असावी. ही सुधारणा आम्ही कशी करू शकतो?
२ आपापल्या धंदेवाईक क्षेत्रात यशप्राप्ती करणारे लोक सतत आपले ज्ञान व कौशल्य अद्ययावत ठेवण्याचा यत्न करतात. कदाचित त्यांचा चरितार्थ त्यावरच अवलंबून असेल. तद्वत, एक दक्ष सेवक असता, आम्हीही इतरांना देवराज्याबद्दलचे शिक्षण देण्यात व शिष्य बनविण्यात कुशलतेत सुधारणा करीत राहण्यात उत्सुक असले पाहिजे. सर्व प्रकारच्या लोकांना आग्रहक ठरतील असे नवे व ताजे भेटसंपर्क आम्ही सतत शोधीत असावे.—मत्तय २८:१९, २०.
आव्हानास सामोरे जाणे
३ आता, मेंढरासमाने लोकांना एकत्रित करण्याचे काम यहोवाने अधिक गतीमान केले असल्यामुळे आम्ही आमच्या शेजाऱ्यांची अधिक वेळा भेट घेत आहोत. अधिक प्रचारक व पायनियर्स यांच्या वाढत्या साक्षीकार्य हालचालीमुळे जागतिक क्षेत्रभाग चेतावला जात आहे. आमच्या हालचालीत वाढ झाल्यामुळे, ज्या सादरता गतकाळात कदाचित परिणामकारक झाल्या असतील त्या आता, ज्यांची आम्ही भेट घेतो त्यांच्यासाठी तितक्या प्रभावी नसतील. यास्तव आमच्या सवेकपणाच्या दर्जात काहीशी सुधारणा करण्याची गरज आहे.
४ आमच्या सेवेत, खरोखरीचे कुशल असण्यात, लोकांबरोबरच्या संभाषणात व्यावहारिकता टिकविण्याची अत्यंत गरज आहे. जुलै १५, १९८८च्या अंकात द वॉचटावरने दिलेल्या व्यावहारिक सूचनांचा उपयोग करणे हे आमच्या फायद्याचे ठरेल. उदाहरणार्थ, पृष्ठ १६, परिच्छेद ६ मध्ये ज्या क्षेत्र भागात आपण दर आठवडी कार्य करतो व ज्यामुळे तेथील रहिवाशी आपल्याशी चांगले परिचित झालेले असतात अशा भागात स्वतःचा परिचय देण्यात सुखद व विधायक कसे असावे त्याची चर्चा तेथे केली आहे. गेल्या आठवडी ज्या माणसाने, “मी माझ्या चर्चशी संबंधीत आहे व ते माझ्या सर्व आध्यात्मिक गरजांची काळजी करते” असे म्हटले होते, तर त्याची भेट कशी घ्यावी याची माहिती पान १६, परिच्छेद ५ मध्ये मिळेल.
५ तुम्ही तुमच्या क्षेत्रभागातील लोकांना सरळपणे मोफत घरगुती पवित्र शास्त्राभ्यासाचा प्रस्ताव मांडला आहे का? मंडळीच्या क्षेत्रभागात जी व्यापारी पेठ आहे तेथे तुम्ही काम करता का? उचित व फलदायी तासांमध्ये तुम्ही रस्त्यावरील साक्षीकार्य करता का? सर्वतोपरी, जुलै १५, १९८८ च्या द वॉचटावर मध्ये दिलेल्या सूचनांची एकवार उजळणी करा. या सूचना अनुसरणे हे आमच्या सेवकपणास अधिक कार्यक्षम बनविण्यात साहाय्यक ठरेल.
६ कार्यक्षम असण्यात कामाचा निश्चयाने शेवट करणे हेही समाविष्ट आहे. (इफिस. ६:१३) कोठे एकाच घरी दोन कुटुंबे राहतात का हे पाहण्यात लक्ष ठेवा. काही लोक माळ्यावर, तर काही गॅरेजमध्ये तर काही पडवीत राहतात, किंवा असा भाग घेतात जेथे समोरच्या दाराने जाता येत नाही. कुटुंबातील वेगवेगळ्या सदस्यांची विचारणा करा—कदाचित घरातील वृद्ध दाराशी आलेले नसतील किंवा पूर्वी भेट घेतली तेव्हा कोणी कामात होते. कदाचित दुसऱ्या वेळी भेट दिल्यास कुटुंबातील इतरांची भेट होऊ शकेल. सायंकाळची सेवा या संधींना उपलब्ध करील.
आपले ध्येय बनवा
७ सेवकपणातल आपली कार्यक्षमता सुधारत राहाणे हे एक असे ध्येय आहे जे आम्हातील अनेक गाठू शकतील. त्याकरता मनःपूर्वक प्रार्थना व पूर्वतयारीची गरज आहे. जसजसा आमचा क्षेत्रसेवेत प्रभाव वाढत असेल तर त्याचप्रकारची प्रगति करीत राहण्यात आम्ही इतरांचेही साहाय्य करण्यात हातभार लावू शकू.—गलती. ६:६.
८ हे ध्यानात ठेवा की, आमचे शिक्षणकाम “मोठे संकट” सोबत संपणारे नाही. (मत्तय २४:२१) पुनरुत्थान होणाऱ्यांना यहोवाचे मार्ग शिकविण्यात जो कालावधी जाणार त्याचीही आम्ही अपेक्षा बाळगून आहोत. हजार वर्षांच्या काळात आम्ही ज्यांना शिकविले ते निष्ठावंतपणे ख्रिस्ताच्या अधिपत्याच्या अधीन होत आहेत हे पाहून आमचा आनंद नक्कीच द्विगुणित होईल. याकरताच, प्रचारकार्य व शिक्षण देण्याच्या कामात सुधारणा केल्यास आम्ही आमच्या सेवकपणात यहोवाचा आदर व गौरव करण्यामध्ये पुष्कळ सिद्धीस नेऊ शकू.