शिष्य बनविण्यास आम्हास साहाय्य करणाऱ्या सभा
फेब्रुवारी ५ ने सुरु होणारा सप्ताह
गीत २५ (११९)
१० मि: स्थानिक घोषणा. तसेच घोषणा सदरमधील फेब्रुवारी सादरतेचे काही ठळक मुद्दे. स्थानिक साठ्यात असलेल्या जुन्या प्रकाशनांची नावे जाहीर करा. सध्याच्या संभाषणाच्या विषयास अनुलक्षून कोणत्या प्रस्तावना वापरता येतील ते थोडक्यात विचारात घ्या.
२५ मि: “ईश्वरी भक्ती” प्रांतिय अधिवेशनातील ठळक मुद्यांचे समालोचन.
१० मि: “प्रामाणिक असणे याचा अर्थ काय?” या फेब्रुवारी १५, १९८८ च्या वॉचटावरमधील लेखावर वडील चर्चा करतील. (प्रांतिय भाषेतः मार्च १९८९ टेहळणी बुरुज)
गीत २४ (११२) व समाप्तीची प्रार्थना.
फेब्रुवारी १२ ने सुरु होणारा सप्ताह
गीत ५४ (८)
५ मिः स्थानिक घोषणा व आमची राज्य सेवा यामधून निवडक घोषणा. सप्ताहाच्या शेवटाला होणाऱ्या क्षेत्रकार्याच्या योजनांची घोषणा करा.
२५ मिः मेडिकल डॉक्युमेंट ॲण्ड आयडेंटिटी कार्ड. मंडळीचे सचिव कार्डांचे वाटप करतील व बाप्तिस्मा घेतलेल्या प्रचारकांकरता मेडिकल डॉक्युमेंट आणि बाप्तिस्मा न झालेल्या साक्षीदारांच्या मुलांसाठी असणारे ओळखपत्र याविषयी जानेवारी १, १९९० च्या पत्रावर बारकाईने चर्चा करतील. उपस्थितांसोबत याबद्दलचा विचारविनिमय करा की, या कार्डचा आमच्या संरक्षणार्थ प्रभावीपणे उपयोग व्हावा यासाठी त्यावर दिलेल्या सूचना लक्षपूर्वक वाचून, पाळण्यात कोणते फायदे आहेत.
१५ मिः “पवित्र शास्त्र प्रकाशने देण्यात दक्ष असा” या लेखाची प्रश्नोत्तराने चर्चा. परिच्छेद ५ वर चर्चा चालू असता, प्रात्यक्षिकाद्वारे हे दाखवा की, एक प्रचारक, जेथे आधीच प्रकाशन दिले आहे तेथे घरमालकासोबत शास्त्राभ्यास सुरु करण्याची विचारणा करतो. शिवाय ज्या प्रचारकांना प्रकाशने देण्यात व अभ्यास सुरु करण्यात यशप्राप्ती झाली अशांची मुलाखत.
गीत ६३ (३२) व समाप्तीची प्रार्थना
फेब्रुवारी १९ ने सुरु होणारा सप्ताह
गीत ४ (१९)
१० मिः स्थानिक घोषणा, जमाखर्च अहवाल. तसेच संस्थेकरवी मंडळीस कोणाही देणगीचे पोचपत्र मिळाले असेल तर जानेवारीच्या स्टेटमेंट पत्रकात दिल्याप्रमाणे रकमेचा स्वीकार कळवावा. मंडळीने राज्यकार्यासाठी स्थानिक किंवा जागतिक स्तरावर आर्थिक साहाय्य केले असल्यास त्याविषयी प्रशंसा करा.
२० मिः “सुवार्ता सादरता—हस्तपत्रिकांचा प्रभावीपणे उपयोग करण्याद्वारे.” प्रश्नोत्तराद्वारे चर्चा. ५ व ६ परिच्छेद विचाराधीन असता दोन प्रात्यक्षिके सादर कराः (१) लाईफ इन अ पीसफूल न्यू वर्ल्ड आणि (२) तुम्ही पवित्र शास्त्रावर का भाव ठेवू शकता या दोन पत्रिकांच्या प्रस्तावना दाखवा. सबंध प्रवचन देण्याची गरज नाही तर संभाषणाच्या विषयाकडे प्रास्ताविकतेकडून कसे प्रगमन करावे एवढेच दाखवा. प्रत्येक संधीला हस्तपत्रिका वाटप करण्यात पुढाकार घेण्याचे महत्त्व सांगा. मंडळीच्या क्षेत्रकार्याची घोषणा करा व सर्वांना आमंत्रण द्या.
१५ मिः “हाव कॅन आय कोप वीथ पिअर प्रेशर?” या यंग पीपल आस्क पुस्तकाच्या ९ अध्यायावर आधारीत चर्चा, दोन उदाहरणीय युवकांसोबत लायक वडील करतात. महशूर असणे तसेच बरोबरीच्या मित्रांनी आपल्याला स्विकारणीय मानणे याचा दबाव केवढा शक्तीमान असतो ते थोडक्यात कळवा. काही वेळा या दबावाचा परिणाम प्रौढांवरही होतो. मग, याला तोंड देणे तरुणांसाठी सोपे असेल का? तरी यात ते कसे यशस्वी झाले? पान ८० वरील “चर्चेकरिता प्रश्न” यांचा वापर करून तरुणांना उत्तरे देण्यास सांगा व हे दाखवा की, दबावास टाळण्यात कशी शक्ती मिळवता येते. मंडळीतील युवकांचे याबद्दल असणाऱ्या उत्तम उदाहरणाविषयी प्रशंसा करा. त्यांच्या चांगल्या वागणुकीमुळे यहोवाला संतोष होत आहे व त्याचा आदर होतो.—नीती. २७:११.
गीत १८८ (७०) व समाप्तीची प्रार्थना.
फेब्रुवारी २६ ने सुरु होणारा सप्ताह
गीत १७१ (१६)
८ मिः स्थानिक घोषणा, मंडळीचा सप्ताहाभरातील क्षेत्रसेवेच्या कार्यक्रमाचे समालोचन. सप्ताहाच्या समाप्तीला क्षेत्रकार्य करण्याची योजना करणाऱ्यांना प्रोत्साहन द्या.
१२ मिः क्वचित उरकलेले क्षेत्र. स्थानिक मंडळीचा असा काही क्षेत्रभाग आहे जेथे क्वचित काम केले जाते, तर तेथे अधिक वेळा काम करण्याचे उत्तेजन द्या. स्थानिक गोष्टींना लागू करा.
१५ मिः “सेवक या नात्याने आमच्या कार्यक्षमतेत सुधारणा करणे” प्रश्नोत्तरोन चर्चा. परिच्छेद ४ वर चर्चा करीत असता, जुलै १५, १९८८ च्या द वॉचटावरमध्ये पान १६ वरील परि. ५ व ६ मध्ये दिलेल्या प्रस्तावनांवर आधारित दोन संक्षिप्त प्रात्यक्षिके. ही दृश्ये प्रांजळ व व्यावहारिकतेत दाखवावी. (प्रांतिय भाषेतः रिझनिंग पुस्तक पान १५ वरील ‘इन टेरेट्री ऑफन नॉट वर्क्ड्’ यातील माहिती उपयोगात आणा.)
१० मिः स्थानिक गरजा किंवा “व्हॉट इट मिन्स टू बी अ ख्रिश्चन” या विषयावर इनसाइट खंड १ पान ४४०-१ मधील साहित्यावर आधारीत भाषण. प्रीती आणि स्व-त्यागाच्या बाबतीत येशूने मांडलेल्या उदाहरणावर जोर द्या. (प्रांतिय भाषेतः “देव पक्षपाती नाही”, टे.बु. मे १९८९.)
गीत १६८ (८४) व समाप्तीची प्रार्थना.
मार्च ५ ने सुरु होणारा सप्ताह
गीत १३५ (७२)
१० मिः स्थानिक घोषणा, ईश्वरशासित वृत्त. “राज्यसभागृहाची ओळख” स्थानिक गोष्टींना लागू करा.
१५ मिः १९९० च्या वार्षिक अहवाल पुस्तकाची ठळक वैशिष्ट्ये. वार्षिक पुस्तकाच्या प्रस्तावनेत जे सुविचार दिले आहेत त्यावर आधारीत चांगले तयारीचे भाषण. या विचारात, यहोवाच्या लोकांनी जी ईर्ष्येने सेवा केली, तिजमधील उल्लेखनीय साध्यतेकरवी यहोवाने त्यांना कसे आशीर्वादित केले ते स्पष्ट करा. वेळेप्रमाणे तेथे नमूद असणारे उभारणीकारक अनुभव सांगावेत. बंधूजनांकडून मिळणाऱ्या जागतिक स्वरुपाच्या अहवालाने आम्हाला यहोवाच्या सेवेत अधिक ते करण्याची चालना द्यावी. वार्षिक अहवाल पुस्तक वाचून सर्वांनी फायदा मिळवावा असे उत्तेजन द्या. (प्रांतिय भाषेतः “यहोवाचा हात त्यांच्याबरोबर होता” हा जून १९८९ टेहळणी बुरुजमधील लेख.)
२० मिः “प्रभावी प्रस्तावना.” प्रश्नोत्तराने चर्चा. परिच्छेद ५ मधील प्रात्यक्षिक सादर करा. तसेच रिझनिंग पुस्तकातील (९-१५ पानांवर) सुचविण्यात आलेल्या प्रस्तावनांपैकी, तुमच्या क्षेत्राला सुयोग्य असणाऱ्या एकाचे प्रात्यक्षिक दाखवा. क्षेत्रकार्याला जाताना रिझनिंग पुस्तक जवळ बाळगावे व प्रश्नांची उत्तरे देताना त्याचप्रमाणे आक्षेपांवर मात करण्यात त्याचा उपयोग करण्याचे बंधुजनांना उत्तेजन द्या. (प्रांतिय भाषेतः रा.से. १२/८८; रा.से. १/८८; व रा.से. ५/८८ तपासा.) या आठवड्याच्या शेवटाला सर्वांना क्षेत्रकार्यात सहभागी होण्याचे उत्तेजन द्या.
गीत १०८ (९५) व समाप्तीची प्रार्थना.