पवित्र शास्त्रीय प्रकाशने देण्यात दक्ष असा
१ यहोवा त्याच्या संस्थेकरवी नियमितपणे पवित्र शास्त्रीय प्रकाशने आपल्याला पुरवीत आहे याबद्दल आम्ही केवढे कृतज्ञ आहोत! आम्ही या आध्यात्मिक अन्नास अत्यंत बहुमोल मानतो. एखादे नवे प्रकाशन हाती पडताच आम्ही ते चाळून पाहतो. मग लक्षपूर्वक वाचताना आम्हास त्याची समज होते. याद्वारे यहोवा व त्याच्या उद्देशांविषयी आम्हाठायीची आवड वाढते.
२ जे सर्व व्यक्तीगत फायदे आम्ही मिळवतो ते आम्हास आम्ही शिकलेल्या चांगल्या गोष्टीची भागीदारी इतरांसोबत करण्याचे उत्तेजन देते. (मत्तय २४:१४) संस्थेची प्रकाशने अधिकाधिक लोकांच्या हाती पडावीत हीच आतुरता आम्ही बाळगून आहोत. यामुळे या सूचनात्मक पवित्र शास्त्रीय प्रकाशनात जी सत्ये प्रतिपादित आहेत ती शिकण्याची त्यांना संधि मिळते. आम्ही उत्तम पूर्वतयारीत असलो व प्रचलित प्रकाशनाना सादर करण्यात स्वतः होऊन पुढाकार घेण्यात दक्ष असलो तर प्रांजळ मनाचे अनेक जन यहोवाकडे वळतील व त्याच्या सेवेत आम्हाशी सहकार्य करतील.
घरोघर
३ फेब्रुवारी व मार्चमध्ये आम्ही १९२ पानाची विविध विषयांवरील पुस्तके इंग्रजीमध्ये रु. १०ला दोन तर स्थानिक भाषेतील रु. ५ला एक सादर करू. वेगवेगळ्या भाषेतील जी पुस्तके वितरणासाठी उपयोगात आणावयाची आहेत त्यांची यादी फेब्रुवारी १९८८ च्या आमची राज्य सेवा अंकातील “घोषणा” या सदरात दिलेली आहे.
४ काही वेळा आमच्या भेटीच्या वेळी लोक खरोखरी कामात असतात. अशा वेळी रिझनिंग पुस्तकाच्या पान २० वर दिलेल्या सूचनेनुसार तुम्हास पटकन पुस्तक दाखवावेसे वाटेल. किंवा त्याच पानावर दिलेल्या तिसऱ्या उदाहरणानुसार आपल्या स्व-शब्दात घरमालकाच्या परिस्थितीबद्दल सहानुभूती व्यक्त करून कदाचित समंजसपणे असे म्हणू शकूः “आता आपणाला बोलणी करायला वेळ नाही, तर आम्ही आपणास सुचवितो की, आपण ही दोन मासिके चार रुपयांना घेऊन ठेवावीत आणि आपणास वेळ मिळेल तसतशी वाचावीत. देव आम्हा सर्वांना जे काही नवीन देणार आहे ते अभिवचन शिकून घेण्यास आपणाला आनंद वाटेल.” याप्रकारची जवळीक घरमालकाच्या परिस्थितीबद्दल सहानुभूती व्यक्त करते व सोबतच प्रकाशनही दिले जाते.
५ कोणा व्यक्तीकडे आमचे तेच प्रकाशन आधीच असले तर काय करणार? अशा वेळी १ करिंथकर ३:६-९ मधील तत्वप्रणाली का अनुसरू नये? बी तर आधीच पेरलेले आहे. जर आता त्याला पाणी घालण्याची संधि आहे तर त्या व्यक्तीला अधिक साक्ष देण्याची संधि साधावी. किंवा आपण असे काही म्हणू शकतोः “मला खराच आनंद वाटला की या प्रकाशनाची आपणापाशी एक प्रत आधीच आहे. ते वाचून आपणास आनंद मिळाला असेल यात काही शंका नाही. जर आपणास थोडा वेळ असल्यास या प्रकाशनाचा आपण अधिक फायदा कसा मिळवू शकता याचे स्पष्टीकरण मी करू इच्छितो. यात तितका वेळ लागणार नाही.” मग याचे प्रदर्शन करा की, या प्रकाशनाआधारे आम्ही पवित्र शास्त्राचा कसा अभ्यास करू शकतो. घरमालकापाशी आमचे प्रकाशन आधीच आहे म्हणून काही आमच्या उद्दिष्ठात बदल होत नाही. हे आठवणीत असू द्या की, “शिष्य बनविणे” हे आमचे प्रधान उद्दिष्ठ आहे.—मत्तय २८:१९.
अनौपचारिक साक्षीकार्य
६ आम्ही, अनौपचारिकपणे जे अनेक योग आम्हासमोर येतात त्यात अनौपचारिक साक्षीसह प्रकाशन सादरतेत दक्ष असावे. येणाऱ्या, भेटणाऱ्या पाहुण्यांना, आप्तजनांना, कामगार सोबती, शाळेतील सोबती, व इतरांनाही जेथे कोठे, बाजारात, क्षेत्रकार्यात घरांचे मध्ये, किंवा दाराच्या बाजूला जे लोक भेटतील, साक्ष द्यावी. आधीच योजना करा व जेथे शक्य आहे तेथे सादर करण्यास आपणापाशी प्रकाशने बाळगून असा. आम्हापाशी एक किंवा दोन छोटी प्रकाशने नेहमी बाळगणे तितकेसे अवघड नसते. अनौपचारिक साक्षीकार्याने बरेचसे साध्य होऊ शकते.—१ पेत्र ३:१५.
७ यहोवाची संस्था, आम्हाला आध्यात्मिकतेत सबळ व सुवार्ता प्रचारात साहाय्य व्हावे म्हणून केवढ्या औदार्याने सतत प्रकाशने पुरवीत आहे. पवित्र शास्त्रीय प्रकाशने सादरतेची प्रत्येक संधि साध्य करण्यात दक्ष राहिल्यास ते यहोवाचे नाम गौरविण्यात आमचे साहाय्य करते.—स्तोत्र. ३४:३.