वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w98 ५/१ पृ. ३०-३१
  • ईयोबाला त्याच्या सचोटीचे प्रतिफळ मिळते

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ईयोबाला त्याच्या सचोटीचे प्रतिफळ मिळते
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • दोषमुक्‍ती आणि पुनर्स्थापना
  • आपल्यासाठी धडे
  • दुसऱ्‍यांसाठी प्रार्थना केल्याने यहोवाला आनंद होतो
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१६
  • इयोबाची सचोटी—एवढी अप्रतिम का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८६
  • ईयोबाने सहन केले—आपणही करू शकतो!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
  • समस्या कशा हाताळाव्यात याविषयीचा धडा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
w98 ५/१ पृ. ३०-३१

त्यांनी यहोवाच्या इच्छेप्रमाणे केले

ईयोबाला त्याच्या सचोटीचे प्रतिफळ मिळते

ईयोब एक कनवाळू मनुष्य होता; तो विधवांचा, अनाथांचा आणि पीडितांचा कैवारी होता. (ईयोब २९: १२-१७; ३१:१६-२१) पण अचानक त्याच्यावर आभाळच कोसळलं; त्याने त्याची सर्व संपत्ती, त्याची मुलं गमावली आणि त्याचं आरोग्य बिघडलं. दुःखाची गोष्ट म्हणजे, एकेकाळी पीडितांचा आधारस्तंभ असलेल्या ह्‍या अभिजात मनुष्याकडे त्याला हव्या असलेल्या त्या मदतीच्या नाजूक समयी सर्वांनीच पाठ फिरवली. त्याची अर्धांगिणी त्याला म्हणाली: “देवाचे नाव सोडून द्या आणि मरून जा!” अलीफज, बिल्दद आणि सोफर या त्याच्या तीन मित्रांनी त्याला सांत्वन देणं तर दूरच राहिलं उलट, अगदी कडवटपणे व अप्रत्यक्षपणे सुचवले, की ईयोबाने पाप केल्यामुळेच त्याला हे सर्व भोगावं लागत आहे.—ईयोब २:९; ४:७, ८; ८:५, ६; ११:१३-१५.

अशातही ईयोब विश्‍वासू राहिला. यामुळे यहोवाने नंतर त्याच्यावर दया दाखवली आणि त्याला आशीर्वाद दिला. हे त्याने कसे केले त्याचा अहवाल, सर्व सचोटी राखणाऱ्‍या देवाच्या सेवकांना आश्‍वासन देतो, की उचित समयी त्यांनाही प्रतिफळ मिळेल.

दोषमुक्‍ती आणि पुनर्स्थापना

सर्वप्रथम यहोवाने अलीफज, बिल्दद आणि सोफर यांचे कान उघडले. सर्वात वडील असलेल्या अलीफजला उद्देशून तो म्हणाला: “तुजवर आणि तुझ्या दोन्ही मित्रांवर मी संतप्त झालो आहे, कारण मजविषयी माझा सेवक ईयोब जसे यथार्थ बोलला, तसे तुम्ही बोलला नाही. तर आता तुम्ही सात बैल व सात एडके घेऊन माझा सेवक ईयोब याजकडे जा व आपल्यासाठी होमबलि अर्पण करा; मग माझा सेवक ईयोब तुम्हासाठी प्रार्थना करील.” (ईयोब ४२:७, ८) याचा काय अर्थ होतो त्याचा विचार करा!

अलीफज, बिल्दद आणि सोफर यांनी केलेले पाप किती गंभीर होते याची जाणीव करून देण्यासाठी यहोवाने प्रत्येकांकडून चांगलेच अर्पण अपेक्षिले. कारण, जाणूनबुजून किंवा अजाणतेने तरी त्यांनी, “तो तर आपल्या सेवकांचाहि भरंवसा धरीत नाही,” व ईयोब विश्‍वासू होता की नव्हता यात त्याला काही सुख नव्हते असे म्हणून देवाची निंदा केली होती. इतकेच नव्हे तर अलीफज असेही म्हणाला की ईयोबाची किंमत पतंगापेक्षा काही जास्त नव्हती! (ईयोब ४:१८, १९; २२:२, ३) म्हणूनच यहोवा म्हणाला: ‘मजविषयी तुम्ही यथार्थ बोलला नाहीत.’

एवढ्यावरच हा विषय थांबला नाही. ईयोबानेच काहीतरी पाप केले असल्यामुळे त्याच्यावर इतकी संकटे ओढवली आहेत असे म्हणण्याद्वारे देखील अलीफज, बिल्दद आणि सोफरने ईयोबाविरुद्ध पाप केले होते. त्यांच्या निराधार आरोपांमुळे व सहानुभूतीच्या निव्वळ उणीवेमुळे ईयोबाच्या मनात कटू भावना जागृत झाल्या, तो खिन्‍न झाला व त्रासून असे म्हणाला: “तुम्ही कोठवर माझ्या जिवास दुःख देणार? कोठवर आपल्या शब्दांनी माझा चुराडा करणार?” (ईयोब १०:१; १९:२) आपल्या पापांसाठी आता या तिघांना ईयोबाकडून अर्पणे सादर करायची असल्यामुळे त्यांना किती मेल्याहून मेल्यासारखे वाटले असेल याची जरा कल्पना करा!

परंतु, त्यांना मिळालेल्या शिक्षेवर ईयोबाला वाईट आनंद करायचा नव्हता. उलट, आरोप करणाऱ्‍यांच्यावतीने त्याने प्रार्थना करावी असे यहोवाने त्याला म्हटले. आणि ईयोबाने त्याला सांगितल्याप्रमाणे केल्यामुळे आशीर्वाद प्राप्त केले. पहिले, यहोवाने त्याला त्याच्या भयंकर आजारापासून मुक्‍त केले. मग, ईयोबाचे भाऊ, बहिणी आणि पूर्वीचे मित्र त्याचे सांत्वन करण्यासाठी आले; “प्रत्येकाने त्याला एक कसीता व सोन्याची एक आंगठी दिली.”a याशिवाय, “चौदा हजार मेंढरे, सहा हजार उंट, बैलांच्या हजार जोड्या आणि हजार गाढवी इतक्यांचा तो धनी झाला.”b ईयोबाच्या अर्धांगिणीने देखील त्याच्याबरोबर समेट घडवून आणला. कालांतराने, ईयोबाला सात पुत्र आणि तीन मुली झाल्या व तो त्याच्या मुलांच्या चार पिढ्या पाहू शकला.—ईयोब ४२:१०-१७.

आपल्यासाठी धडे

देवाच्या आधुनिक सेवकांकरिता ईयोबाने एक उत्तम उदाहरण मांडले. तो “सात्विक, सरळ” होता; त्याला “माझा सेवक” असे म्हणायला यहोवाला अभिमान वाटत होता. (ईयोब १:८; ४२:७, ८) म्हणजे ईयोब परिपूर्ण होता असे नव्हे. त्याच्यावर आलेल्या परीक्षेच्यावेळी एकदा, त्याने चुकीने असे गृहीत धरले की कदाचित त्याच्यावर आलेली संकटे देवाकडूनच आली असावीत. देव मनुष्याबरोबर जसा व्यवहार करतो त्याबद्दल त्याने टीका केली. (ईयोब २७:२; ३०:२०, २१) देवापेक्षा त्याने स्वतःलाच धार्मिक ठरवण्याचा प्रयत्न केला. (ईयोब ३२:२) एवढे मात्र खरे, की ईयोबाने निर्माणकर्त्याकडे कधीही पाठ फिरवली नाही, उलट नम्रपणे त्याच्याकडून सुधारणूक स्वीकारली. त्याने कबूल केले, “मला समजत नाही ते मी बोललो . . . म्हणून मी माघार घेऊन धूळराखेत बसून पश्‍चात्ताप करीत आहे.”—ईयोब ४२:३, ६.

परीक्षेत असताना कदाचित आपल्या मनातही असाच अयोग्य विचार येऊ शकतो, आपण अयोग्य बोलू शकतो किंवा वागू शकतो. (पडताळा उपदेशक ७:७.) पण, यहोवावर आपले गाढ प्रेम असल्यास आपण त्याच्याविरुद्ध बंड पुकारणार नाही किंवा तो आपल्याला कष्ट सोसू देतो म्हणून त्याच्याबद्दल आपल्या मनात कटू भावना जागृत करणार नाही. त्याऐवजी, आपण सचोटी राखू आणि शेवटी मोठा आशीर्वाद मिळवू. स्तोत्रकर्त्याने यहोवाबद्दल म्हटले: “एकनिष्ठ जनाबरोबर तू एकनिष्ठेने वागतोस.”—स्तोत्र १८:२५, NW.

ईयोबाची तब्येत सुधारण्याआधी, त्याच्याविरुद्ध पाप करणाऱ्‍यांच्यावतीने त्याने प्रार्थना करावी अशी यहोवाने त्याच्याकडून अपेक्षा केली. आपल्यासाठी किती छान उदाहरण! आपली पातके क्षमा होण्याआधी आपण इतरांची पातके क्षमा करावीत अशी यहोवा आपल्याकडून अपेक्षा करतो. (मत्तय ६:१२; इफिसकर ४:३२) सबळ कारण असताना देखील जर आपण इतरांना क्षमा करण्यास तयार नसलो तर यहोवाने आपल्यावर दया करावी अशी आपण उचितपणे अपेक्षा करू शकतो का?—मत्तय १८:२१-३५.

आपणा सर्वांना केव्हा ना केव्हा तरी परीक्षांचा सामना करावा लागतो. (२ तीमथ्य ३:१२) पण, ईयोबाप्रमाणे आपण सचोटी राखू शकतो. असे केल्याने आपल्याला मोठे प्रतिफळ मिळेल. याकोबाने असे लिहिले: “पाहा, ज्यांनी सहन केले त्यांना आपण धन्य म्हणतो, तुम्ही ईयोबाच्या धीराविषयी ऐकले आहे, आणि त्याच्याविषयीचा प्रभूचा जो हेतु होता तो तुम्ही पाहिला आहे ह्‍यावरून, प्रभु फार कनवाळू व दयाळू आहे हे तुम्हास दिसून आले.”—याकोब ५:११.

[तळटीपा]

a “एक कसीता” (हिब्रूत, केसीताह) याची किंमत किती असेल हे निश्‍चितपणे सांगता येणार नाही. पण याकोबाच्या दिवसांत, ‘शंभर कसीत्यात’ मोठी जमीन विकत घेता येत होती. (यहोशवा २४:३२) तेव्हा, प्रत्येकाकडून “एक कसीता” काही साधे बक्षीस नव्हते.

b येथे गाढवींचा उल्लेख कदाचित ह्‍यासाठी केला आहे कारण प्रजोत्पादनासाठी त्यांना किंमत होती.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा