वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w98 ५/१ पृ. ३२
  • त्यांच्यासोबत असण्यास काही हरकत?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • त्यांच्यासोबत असण्यास काही हरकत?
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
w98 ५/१ पृ. ३२

त्यांच्यासोबत असण्यास काही हरकत?

न्जाऊकूआ उलिंबा, हे ७३ वर्षांचे आहेत; गेल्या वर्षी सुमारे ४५० किलोमीटरच्या प्रवासाला ते गेले होते. हा पायी प्रवास करायला त्यांना १६ दिवस लागले.

यहोवाच्या साक्षीदारांच्या वार्षिक अधिवेशनाला उपस्थित राहण्याकरता या वयोवृद्ध गृहस्थांनी इतका लांबचा प्रवास केला होता. अधिवेशनानंतर, अत्यानंदाने व आध्यात्मिकरीत्या बळ मिळाल्यानंतर त्यांनी पुन्हा तोच १६ दिवसांचा परतीचा प्रवास पायीच केला. याचा काही फायदा झाला का? होय, अर्थातच! न्जाऊकूआ उलिंबा, गेल्या काही वर्षांपासून दर वर्षी असा प्रवास करीत आहेत.

हे आफ्रिकन गृहस्थ, गेल्या वर्षी झालेल्या यहोवाच्या साक्षीदारांच्या अधिवेशनांसाठी २३० देशांतून आलेल्या दीड कोटीपेक्षा अधिक लोकांपैकी एक होते. अर्थातच, अधिवेशनाला येण्यासाठी त्यांतील बहुतेकांना पायी यावे लागले नाही. पुष्कळजण कारने, बसने, ट्रेनने किंवा विमानाने आले होते. तुम्हीही त्यांच्यापैकी होता का?

सन १९९८ मध्ये, पुन्हा एकदा जगभरात, बहुधा उन्हाळ्यात अशीच अधिवेशने होणार आहेत. न्जाऊकूआ उलिंबा यांच्या प्रकृतीने साथ दिल्यास, तेही कदाचित उपस्थित राहण्याकरता तोच लांबचा पायी प्रवास करून येतील. ते आणि इतर कोट्यवधी लोक व्यावहारिक, विश्‍वास बळकट करणारा व प्रेरणादायक कार्यक्रम ऐकतील. उपस्थितांसाठी ते अधिवेशन, वर्षाचे एक वैशिष्ट्य ठरेल. तुम्हालाही उपस्थित राहण्याकरता प्रेमळ आमंत्रण दिले जाते. तुमच्या भागातील यहोवाच्या साक्षीदारांना, तुम्हाला जवळ पडणाऱ्‍या अधिवेशनाचे ठिकाण सांगावयास आनंद वाटेल.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा