देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | ईयोब ३८-४२
दुसऱ्यांसाठी प्रार्थना केल्याने यहोवाला आनंद होतो
ईयोबने अलीफज, बिल्दद आणि सोफर यांच्यासाठी प्रार्थना करावी अशी यहोवाची अपेक्षा होती
यहोवाने अलीफज, बिल्दद आणि सोफर यांना ईयोबकडे पाठवले आणि होमबली अर्पण करण्यास सांगितले
ईयोबने त्यांच्यासाठी प्रार्थना करावी अशी यहोवाची इच्छा होती
ईयोबने त्यांच्यासाठी प्रार्थना केल्यानंतर त्याला यहोवाकडून आशीर्वाद मिळाले
यहोवाने ईयोबला त्याचा विश्वास आणि धीर यासाठी अनेक आशीर्वाद दिले
यहोवाने ईयोबला चांगले आरोग्य देऊन त्याच्यावरील संकट दूर केले
ईयोबने जे कष्ट सहन केले त्याबद्दल त्याला त्याच्या मित्रांकडून आणि नातेवाइकांकडून खरे सांत्वन मिळाले
ईयोबने जितके गमावले होते त्याच्या दुप्पट यहोवाने त्याला दिले
ईयोब आणि त्याच्या पत्नीला आणखी दहा मुलं झाली
ईयोब आणखी १४० वर्षं जगला आणि आपल्या पुढच्या चार पिढ्या पाहण्याचा आनंद त्याला मिळाला