वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w96 ७/१५ पृ. २४-२५
  • सेवानिवृत्ती ईश्‍वरशासित कार्यासाठी खुले द्वार?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • सेवानिवृत्ती ईश्‍वरशासित कार्यासाठी खुले द्वार?
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
  • मिळती जुळती माहिती
  • सेवानिवृत्ती—कार्य साधण्याजोगे द्वार?
    आमची राज्य सेवा—२००३
  • ‘मोठ्या व कार्य साधण्याजोग्या द्वारातून’ तुम्ही प्रवेश करणार का?
    आमची राज्य सेवा—२००७
  • “तू एक चांगला पायनियर बनशील!”
    आमची राज्य सेवा—२०१०
  • पायनियर सेवेचे वरदान
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
w96 ७/१५ पृ. २४-२५

सेवानिवृत्ती ईश्‍वरशासित कार्यासाठी खुले द्वार?

सेवानिवृत्ती—अनेकांना तर ती दीर्घकाळापासून असलेल्या तणाव व त्रासाचे द्वार बंद करते. कंटाळवाण्या किंवा पिसाट नित्यक्रमात जखडल्यानंतर, पुष्कळ जण सेवानिवृत्तीची, आराम व व्यक्‍तिगत स्वातंत्र्य देणाऱ्‍या संधीची वाट पाहत असतात. परंतु बहुधा सेवानिवृत्तीमुळे कंटाळा व निरुत्साहाचे द्वार खुले होते. कामामुळे आत्म-मोलाचे जे समाधान मिळते ते मनोरंजन व छंद यामुळे मिळत नाही.

यहोवाच्या साक्षीदारांपुढे सेवानिवृत्ती “कार्य साधण्याजोगे द्वार” खुले करू शकते. (१ करिंथकर १६:९) उतारवयात समस्या आणि मर्यादा असल्या तरी, काही वृद्ध जनांना आढळून आले, की यहोवाच्या मदतीने ते त्याची सेवा अधिक करू शकतात. नेदरलंडमधील काही वृद्ध ख्रिश्‍चनांच्या अनुभवाचा विचार करा. १९९५ च्या सेवा वर्षादरम्यान, १,२२३ पेक्षा अधिक पायनियरांमध्ये (पूर्ण वेळेचे राज्य उद्‌घोषक) २६९ जण ५० किंवा त्याहून अधिक वर्षांचे होते. यातील ८१ जण ६५ किंवा त्यापेक्षा अधिक वयोमानाचे होते.

काही जणांनी, ते नोकरी करत असताना जी व्यग्र गती ठरवली होती तिलाच कायम राखल्यामुळे त्यांना पायनियरींग करणे शक्य होते. (पडताळा फिलिप्पैकर ३:१६.) कॅरल नामक एका निवृत्त ख्रिश्‍चनाने असे आठवून सांगितले: “लौकिक काम करत असताना मी माझ्या कामाला सकाळी ७:३० वाजता सुरवात करत असे. मला पेन्शन मिळू लागल्यावरही मी तोच नित्यक्रम ठेवण्याचा निर्णय केला. मी माझ्या दिवसाची सुरवात, दररोज सकाळी सात वाजता रेलरोड स्थानकासमोर उभे राहून रस्त्यावरील नियतकालिक साक्षकार्याने करीत होतो.”

काळजीपूर्वक योजना करणे, ही देखील यशाची गुरुकिल्ली आहे. (नीतिसूत्रे २१:५) उदाहरणार्थ, काही जण क्षेत्रसेवेमध्ये स्वतःला आधार देऊ शकतील तितके पुरेसे भांडवल जमा करू शकले आहेत. इतर काहींनी व्यक्‍तिगत खर्च कमी करून अर्ध-वेळेची नोकरी मिळवली आहे. टेओडोर व ऑन यांचेच पहा. त्यांनी त्यांच्या वैवाहिक जीवनाची सुरवात पायनियर या नात्याने केली परंतु काही कौटुंबिक जबाबदाऱ्‍यांस्तव त्यांना पायनियरींग सोडावी लागली. परंतु त्यांच्यातील पायनियर आत्मा जिवंत राहिला! त्यांच्या मुली जसजशा मोठ्या झाल्या तसतसे त्यांना सतत पायनियरींग करण्याचे उत्तेजन देण्यात आले. अधिक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, वेळोवेळी सहायक पायनियर या नात्याने कार्य करून टेओडोर आणि ऑननेच त्यांच्यासमोर चांगले उदाहरण मांडले. टेओडोर व ऑन यांच्या मुली मोठ्या झाल्यावर, क्षेत्र सेवेसाठी अधिक वेळ मिळावा म्हणून लौकिक कार्यात कपात करू लागले.

त्यांच्या मुलींनी पूर्ण-वेळेच्या क्षेत्रसेवेत प्रवेश करून घर सोडल्यावर ऑनने पायनियरींग चालू केली. एके दिवशी तिने टेओडोरला त्याची नोकरी सोडण्याचे उत्तेजन दिले. “आपण दोघेही पायनियर होऊ शकतो,” असे तिने त्याला सुचवले. टेओडोरने आपले मनोगत मालकाला सांगितले. आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे, त्याच्या मालकाने असे म्हणून त्याला अर्ध-वेळेची नोकरी देऊन मदत करण्याची इच्छा दर्शवली, की “मला वाटतं, तुम्हाला तुमच्या वरच्या [स्वर्गातल्या] मालकासाठी पूर्ण वेळ काम करायचे आहे.” टेओडोर व ऑन, दोघेही आता पायनियरींगचा आनंद लुटत आहेत.

काही जण त्यांच्या जीवनात उद्‌भवलेल्या परिस्थितींमुळे पायनियरींग करू लागले. एक वृद्ध दांपत्य, त्यांच्या मुलीच्या व नातीच्या दुःखद मृत्यूमुळे, ते आपले उरलेले आयुष्य ज्याप्रकारे घालवत आहेत त्याचा गंभीरपणे विचार करू लागले. (उपदेशक ७:२) दुःखामध्ये पूर्णपणे बुडून जाण्यापेक्षा त्यांनी पूर्णवेळेच्या सेवेस सुरवात केली आणि आता आठ वर्षांपासून ते त्याचा आनंद लुटत आहेत!

पूर्ण-वेळेच्या सेवेमध्ये टिकून राहण्यासाठी खरोखरच्या दृढनिश्‍चयाची आवश्‍यकता आहे हे कबूल केले पाहिजे. उदाहरणार्थ, अर्नस्ट आणि त्याची पत्नी रीक या दोघांनी, त्यांच्या मुलांनी घर सोडल्यानंतर लगेचच पायनियरींगला सुरवात केली. काही अल्प समयातच, एका माजी व्यापारी सहकार्याने अर्नस्टसमोर एक किफायतीशीर नोकरीचा प्रस्ताव मांडला. अर्नस्टने उत्तर दिले: “आमचा मालक सर्वात उत्तम आहे, आणि आम्ही त्याला सोडू इच्छित नाही!” अर्नस्ट आणि त्याची पत्नी यहोवाच्या ‘नोकरीत’ राहिल्यामुळे, त्यांच्यासाठी सेवेचे इतर सुहक्क मिळू लागले. त्यांनी २० वर्षे विभागीय कार्यात सेवा केली व आजपर्यंत ते पायनियर या नात्याने कार्य करीत आहेत. त्यांच्या या आत्म-बलिदानी मार्गाक्रमणामुळे त्यांना पस्तावा होतो का? काही काळाआधी या दांपत्याने लिहिले: “यहोवाची इच्छा असेल तर, तीन महिन्यांनंतर आम्ही आमच्या विवाहाचे ५० वे वर्ष, ज्याला बहुधा सुवर्ण महोत्सव म्हणतात तो साजरा करण्याची अपेक्षा करत आहोत. पण आमच्या खरोखरच्या सुवर्ण वर्षांची सुरवात तर आम्ही पायनियरींग करण्यास आरंभ केला तेव्हा झाली असे आम्ही ठामपणे म्हणतो.”

वाढत्या कार्याचे द्वार खुले झाल्यामुळे आनंदही वाढतो असे अनेकांना आढळले आहे! वयाचे ६५ वे वर्ष गाठल्याच्या दोन आठवड्यांनंतर पायनियरींग सुरु करणारा एक बांधव म्हणतो: “गत दहा वर्षांतील पायनियरींगच्या काळाप्रमाणे माझे जीवन इतक्या आशीर्वादांनी समृद्धपणे भरण्याचा अनुभव मी कधीच घेतला नव्हता, हे मी सांगितलेच पाहिजे.” सात पेक्षा अधिक वर्षांसाठी पायनियरींग केलेले एक विवाहित जोडपे म्हणते: “आमच्या वयाच्या व परिस्थितीच्या जोडप्याने आणखी काय करायला पाहिजे? आमच्या सारख्या परिस्थितीत असणाऱ्‍या बहुतेक लोकांना—घरामध्ये आराम करत असलेले, लठ्ठ, वृद्ध व ताठर होत असलेले आम्ही पाहतो. सेवा आम्हाला मानसिकरीत्या व शारीरिकरीत्या निरोगी ठेवते. आम्ही नेहमी एकत्र असतो. आम्ही खूप खूप हसतो व जीवनाचा पुरेपूर आनंद लुटतो.”

अर्थात, सर्वच वृद्ध जनांची परिस्थिती त्यांना पायनियरींग करण्याची परवानगी देत नाही. अशा ख्रिश्‍चनांना ही हमी दिली जाते की यहोवाच्या सेवेमध्ये ते त्यांच्या परीने जितका प्रयत्न करतात त्याची तो कदर करतो. (पडताळा मार्क १२:४१-४४.) उदाहरणार्थ, एका अपंग भगिनीला एका शुश्रूषा गृहात ठेवण्यात आले आहे. परंतु तिच्यासमोर कार्याचे द्वारे अजूनही खुले आहे! एका डॉक्टरांनी तिला, ती तिचा वेळ कसा घालवते याबद्दल विचारले. ती म्हणते: “मी त्यांना म्हणाले, की मला नेहमी वेळ अपुरा पडतो. हे ऐकून ते बुचकळ्यात पडले. मी त्यांना सांगितले, की माझे दिवस समाधानकारक कार्यांनी भरलेले असल्यामुळे मला वेळ अपुरा पडतो. मी एकाकी नाही, परंतु एकाकी असलेल्या लोकांना मी शोधून काढते व मानवजातीसाठी देवाने काय राखून ठेवले आहे ते त्यांना सांगते.” पुढे ती थोडक्यात सांगते: “जवळजवळ ८० वर्षांच्या व्यक्‍तीकडून आपण जास्त गोष्टींची अपेक्षा करू शकत नाही. माझ्यासाठी प्रार्थना करा जेणेकरून मी आणखी पुष्कळांना यहोवाकडे आणू शकेन.”

तुमची सेवानिवृत्ती जवळ आली आहे का? आराम करण्याची संधी बरीच मोहक असू शकेल, परंतु ती आध्यात्मिक आशीर्वाद मिळवण्याची संधी देणार नाही. तुमच्या परिस्थितीविषयी प्रार्थनापूर्वक विचार करा. कदाचित, यहोवाच्या सेवेत असणाऱ्‍या मोठ्या कार्याकडे नेणाऱ्‍या द्वाराकडे तुम्ही जाऊ शकता.

[२५ पानांवरील चित्रं]

सेवानिवृत्तीमुळे सेवेमध्ये अधिक कार्य करण्याची संधी मिळू शकते

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा