वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w97 १०/१५ पृ. १८-२३
  • पायनियर सेवेचे वरदान

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • पायनियर सेवेचे वरदान
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • समाधानाच्या व आनंदाच्या खोल भावना
  • यहोवाच्या काळजीचा पुरावा
  • “यहोवाच्या समीप जाण्याचा सर्वोत्तम मार्ग”
  • तुमच्या अंतःकरणाला अधिक करण्याची उत्कंठा आहे का?
  • सर्वजण पायनियर आत्मा दाखवू शकतात!
  • पायनियर सेवेची प्रतिफळे
    आमची राज्य सेवा—२००३
  • पायनियरिंगमुळे देवासोबतचा आपला नातेसंबंध मजबूत होतो
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१३
  • पायनियरांना आधार देणे
    आमची राज्य सेवा—१९९२
  • पायनियर सेवा—तुम्हाला ती जमेल का?
    आमची राज्य सेवा—१९९८
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
w97 १०/१५ पृ. १८-२३

पायनियर सेवेचे वरदान

“परमेश्‍वराचा आशीर्वाद समृद्धि देतो, तिच्याबरोबर तो आणखी कष्ट देत नाही.”—नीतिसूत्रे १०:२२.

१, २. (अ) पूर्ण वेळेच्या सेवेविषयी एका पायनियरने आपले मनोगत कसे व्यक्‍त केले? (ब) शिष्य बनवण्यात मिळणारा आनंद पायनियर पूर्णपणे उपभोगू शकतात असे का?

“तुम्ही ज्याच्याबरोबर अभ्यास केला त्याला यहोवाचा कार्यशील स्तुतीकर्ता होताना पाहून मिळणाऱ्‍या आनंदासारखा दुसरा आनंद असू शकतो का? देवाचे वचन, यहोवाला संतुष्टी आणण्याकरता आपल्या जीवनात परिवर्तन करण्यास लोकांना प्रवृत्त करण्यात किती शक्‍तिशाली आहे हे पाहणे किती मनोरंजक व विश्‍वास बळकट करणारे आहे,” असे ३२ पेक्षा अधिक वर्षांपासून पूर्ण वेळेच्या सेवेत असलेल्या कॅनडातील एका पायनियरने लिहिले. त्यांच्या पायनियर सेवेविषयी ते म्हणतात: “मी दुसरे काहीही करण्याची कल्पना करू शकत नाही. खरंच, दुसऱ्‍या कशानेही मला असाच आनंद मिळेल अशी मला कल्पनासुद्धा करवत नाही.”

२ एखाद्याला जीवनमार्गावर आणण्यात आनंद आहे याजशी तुम्ही सहमत आहात का? अर्थातच, अशा प्रकारचा आनंद केवळ पायनियरांनाच होतो असे नाही. यहोवाच्या सर्व सेवकांवर ‘लोकांना शिष्य बनवण्याची’ कामगिरी सोपण्यात आली आहे व ते मोठ्या परिश्रमाने ही कामगिरी पार पाडत आहेत. (मत्तय २८:१९) पायनियरांना क्षेत्र सेवेत अधिक तास खर्च करणे शक्य होत असल्यामुळे बहुधा त्यांना शिष्य बनवण्याचा आनंद अधिक पूर्णपणे उपभोगता येतो. परंतु, पायनियरींगमुळे इतरही प्रतिफळे मिळतात. पायनियरांना विचारा आणि ते तुम्हाला सांगतील, की पायनियरींग, ‘समृद्धी देणारा यहोवाचा आशीर्वाद’ उपभोगण्याचा अति उत्तम मार्ग आहे.—नीतिसूत्रे १०:२२.

३. यहोवाची सेवा करत असताना कोणती गोष्ट प्रोत्साहन देणारी ठरू शकेल?

३ अलीकडेच, जगाच्या विविध भागांतील पायनियरांना, पूर्ण वेळेच्या सेवेत त्यांनी अनुभवलेल्या आशीर्वादांचे वर्णन करण्यास सांगितले होते. त्यांनी काय म्हटले ते आपण पाहू या. पण, प्रकृती चांगली नसल्यामुळे, वाढत्या वयामुळे किंवा इतर परिस्थितींमुळे जर तुमची सेवा मर्यादित असेल तर निराश होऊ नका. लक्षात असू द्या, की परिस्थिती कोणतीही असो, जिवाभावाने यहोवाची सेवा करणे हा महत्त्वाचा मुद्दा आहे. तरीसुद्धा, काही पायनियरांची विवेचने ऐकल्यावर शक्य असल्यास तुम्हाला हे प्रतिफळदायी कार्य सुरू करावेसे वाटेल.

समाधानाच्या व आनंदाच्या खोल भावना

४, ५. (अ) इतरांना सुवार्ता सांगण्याचा अनुभव प्रतिफलदायी का आहे? (ब) पूर्ण वेळ सेवेत भाग घेण्याविषयी पायनियरांना कसे वाटते?

४ येशूने म्हटले: “घेण्यापेक्षा देणे ह्‍यात जास्त धन्यता आहे.” (प्रेषितांची कृत्ये २०:३५) होय, निःस्वार्थीपणे दिल्याने प्रतिफळ मिळते. (नीतिसूत्रे ११:२५) इतरांना सुवार्ता सांगण्याबाबत हे खासकरून खरे आहे. खरेच, सार्वकालिक जीवनाप्रत नेणारे देवाचे ज्ञान प्राप्त करण्यास एखाद्या सहमानवाला मदत करण्यासारखी दुसरी कोणतीही महान देणगी असू शकेल का?—योहान १७:३.

५ म्हणूनच, पूर्ण वेळेच्या सेवेत भाग घेणारे नेहमी, त्यांच्या सेवेतून त्यांना मिळणाऱ्‍या आनंदाबद्दल व पूर्ण समाधानाबद्दल बोलत असतात. ब्रिटनमधील ६४ वर्षांचे पायनियर म्हणतात: “इतरांना सत्य सांगितल्यामुळे मला मिळालेले समाधान इतर कोणत्याही कामाद्वारे मला मिळाले नसते हे मी जाणून आहे.” झायरेमधील एका विधवा भगिनीने पायनियरींग म्हणजे काय याविषयी आपले मत अशाप्रकारे व्यक्‍त केले: “माझ्या प्रिय पतीचे निधन झाले तेव्हा पायनियर सेवेमुळे मला खरं सांत्वन मिळालं. इतरांना मदत करण्याकरता मी जितका वेळ सेवेसाठी बाहेर जाते तितकंच माझं दुःख कमी होतं. मी यहोवाच्या अभिवचनांवर पूर्ण विश्‍वास करते व मी ज्या लोकांसोबत अभ्यास करीत आहे त्यांना त्यांच्या जीवनात परिवर्तन करता यावं म्हणून माझ्याकडून त्यांना कशी मदत मिळू शकेल याचाच मी जास्त विचार करते. प्रत्येक दिवसाच्या शेवटी मला शांत झोप लागते व माझं मन आनंदानं भरलेलं असतं.”

६. काही पायनियरांनी कोणता विशेष आनंद उपभोगला?

६ अनेक दशकांपासून पायनियरींग करणाऱ्‍यांना, दूरवरच्या क्षेत्रांमध्ये सेवा करण्याचा तसेच इतक्या नवीन मंडळ्या स्थापन करण्याचा विशेष आनंद मिळाला आहे ज्यांचे भविष्यात विभाग तयार झाले आहेत. जसे की, (जपानचे उत्तरेकडील बेट) होक्कायडो, अबाशिरी येथे ३३ वर्षांपासून पायनियरींग करणारी एक भगिनी आहे. ती आठवून सांगते, की ती पहिल्यांदा जेव्हा विभागीय संमेलनात उपस्थित राहिली तेव्हा अख्ख्या होक्कायडोतून केवळ ७० लोक उपस्थित होते. आणि आता? त्या बेटावर आता १२ विभाग आहेत ज्यात एकूण १२,००० पेक्षा अधिक प्रचारक आहेत. कल्पना करा, ती जेव्हा त्या बेटावर सहराज्यघोषकांच्या समूहासोबत संमेलनांना व अधिवेशनांना उपस्थित राहते तेव्हा तिचे अंतःकरण हर्षाने किती ओसंडून वाहत असेल!

७, ८. बहुतेक जुन्या पायनियरांनी कोणता आनंद उपभोगला आहे?

७ इतर जुन्या पायनियरांना, त्यांचे बायबल विद्यार्थी बाप्तिस्मा घेऊन सेवेतील मोठे विशेषाधिकार प्राप्त करत असल्याचे पाहण्याचा आनंद मिळाला आहे. जपानमध्ये १९५७ पासून नऊ वेगवेगळ्या पायनियर नेमणुकीत सेवा केलेल्या एका बहिणीला बँकेत काम करणाऱ्‍या एका तरुणीला सावध राहा! नियतकालिक दिल्याचे आठवते. नऊ महिन्यांच्या आत त्या तरुणीने बाप्तिस्मा घेतला. नंतर तिचे लग्न झाले आणि दोघे पतीपत्नी खास पायनियर बनले. ती पायनियर भगिनी तिच्या तिसऱ्‍या नेमणुकीत कार्य करत असताना एका नवीन विभागीय पर्यवेक्षक आणि त्यांच्या पत्नीने—म्हणजेच तिच्या पूर्वीच्या बायबल विद्यार्थीनीने—तिच्या मंडळीला भेट दिली. त्यांना पाहून तिला झालेला आनंद अविर्णनीय होता!

८ यात काही आश्‍चर्य नाही, की पायनियर सेवेला आपला जीवनमार्ग बनवणारे या सेवेला, २२ वर्षे पायनियरींग केलेल्या बांधवाने व्यक्‍त केल्याप्रमाणे, “जपून ठेवण्याजोगा मौल्यवान विशेषाधिकार” समजतात!

यहोवाच्या काळजीचा पुरावा

९. महान पोशिंदा या नात्याने, यहोवा आपल्या सेवकांना काय अभिवचन देतो आणि याचा आपल्यासाठी काय अर्थ होतो?

९ महान पोशिंदा यहोवा त्याच्या सेवकांना, त्यांची आध्यात्मिकरीत्या व भौतिकरीत्या काळजी घेण्याचे अभिवचन देतो. म्हणूनच अगदी उचितपणे राजा दावीद म्हणू शकला: “मी तरुण होतो आणि आता म्हातारा झालो, तरी नीतिमान्‌ निराश्रित झालेला किंवा त्याची संतति भिकेस लागलेली मी पाहिली नाही.” (स्तोत्र ३७:२५) परंतु ही ईश्‍वरी हमी आपल्याला, आपल्या कुटुंबाचे आर्थिकरीत्या पोषण करण्याच्या आपल्या जबाबदारीतून मुक्‍त करत नाही किंवा आपल्या ख्रिस्ती बंधुंची उदारता गृहीत धरण्याचा परवाना देत नाही. (१ थेस्सलनीकाकर ४:११, १२; १ तीमथ्य ५:८) यहोवाची अधिक सेवा करण्याकरता आपण आपल्या जीवनात स्वेच्छेने त्याग केल्यास तो आपल्याला वाऱ्‍यावर सोडणार नाही.—मत्तय ६:३३.

१०, ११. अनेक पायनियरांना अनुभवानिशी यहोवाच्या तरतूद करण्याच्या क्षमतेविषयी काय माहीत होते?

१० विश्‍वातील सर्व पायनियरांना अनुभवानिशी माहीत आहे, की स्वतःला यहोवाच्या काळजी वाहणाऱ्‍या हाती सोपवणाऱ्‍यांची तो जरूर तरतूद करतो. राज्य प्रचारकांची जास्त आवश्‍यकता असलेल्या एका लहानशा गावी राहावयास गेलेल्या एका पायनियर जोडप्याच्या बाबतीत असेच घडले. काही महिन्यानंतर तेथे लौकिक नोकरी मिळणे कठीण झाले; शिवाय त्यांच्याकडचा जमवलेला पैसाअडका पण संपला. त्यातच त्यांना ८१ डॉलर्सचे कार विम्याचे बिल आले. बंधू म्हणतात: “ते बिल चुकते करण्याचा आमच्याकडं कोणताच मार्ग उरला नाही. त्या रात्री आम्ही कळकळून प्रार्थना केली.” दुसऱ्‍या दिवशी त्यांना, अशा एका कुटुंबाकडून एक लिफाफा मिळाला ज्यांची तंगी चालली होती. त्या कार्डावर सांगितल्याप्रमाणे त्या कुटुंबाला टॅक्स रिफंड मिळाले होते आणि ही रक्कम त्यांनी अपेक्षा केली त्यापेक्षा जास्त असल्यामुळे त्यांनी त्यातील काही पैसे पायनियर जोडप्याला देण्याचे ठरवले. लिफाफ्यामध्ये नेमका ८१ डॉलर्सचा चेक होता! ते पायनियर बंधू म्हणतात: “मी केव्हाही तो दिवस विसरणार नाही, माझ्या अंगावर अक्षरशः शहारे उठले! आम्ही त्या कुटुंबाच्या उदारतेचे आभार मानले.” यहोवाही अशा दयाळूपणाची प्रशंसा करतो; कारण आपल्या सेवकांना असाच उदारतेचा आत्मा दाखवण्याचे तो उत्तेजन देतो.—नीतिसूत्रे १९:१७; इब्री लोकांस १३:१६.

११ अशाच प्रकारचे अनुभव पुष्कळ पायनियर सांगू शकतात. तुम्ही त्यांना फक्‍त विचारा आणि ते तुम्हाला सांगतील की त्यांना कधीही “निराश्रित” सोडण्यात आले नाही. ५५ वर्षांची आपली पूर्ण वेळेची सेवा पडताळून पाहणारे ७२ वर्षांचे पायनियर बंधू म्हणतात: “यहोवाने मला कधीच निराश केले नाही.”—इब्री लोकांस १३:५, ६.

“यहोवाच्या समीप जाण्याचा सर्वोत्तम मार्ग”

१२. सुवार्तेचा प्रचार करण्याच्या कामाला उल्लेखनीय विशेषाधिकार का म्हणता येईल?

१२ यहोवा आपल्याला त्याच्या राज्याच्या सुवार्तेची घोषणा करावयास सांगतो हाच एक विशेषाधिकार आहे. आपण अपरिपूर्ण असलो तरीदेखील तो आपल्याला या जीवन वाचवण्याच्या कार्यात त्याचे “सहकारी” समजतो. (१ करिंथकर ३:९; १ तीमथ्य ४:१६) देवाच्या राज्याचा इतरांना प्रचार करताना, दुष्टाईच्या अंताची घोषणा करताना, खंडणी देण्यात त्याच्या विलक्षण प्रीतीचे स्पष्टीकरण लोकांना देताना, त्याचे जीवित वचन उघडून त्यातील बहुमूल्य गोष्टी प्रामाणिक अंतःकरणाच्या लोकांना शिकवताना आपण आपोआपच आपल्या निर्मात्याजवळ अर्थात यहोवाच्या समीप जातो.—स्तोत्र १४५:११; योहान ३:१६; इब्री लोकांस ४:१२.

१३. पायनियर सेवेचा यहोवासोबतच्या नातेसंबंधावर परिणाम झाल्याबद्दल काही पायनियर काय म्हणतात?

१३ यहोवाबद्दल आणखी शिकण्यासाठी व शिकवण्यासाठी पायनियर प्रत्येक महिन्याला खूप वेळ खर्च करू शकतात. यामुळे देवासोबतच्या त्यांच्या नातेसंबंधावर प्रभाव पडतो याबद्दल त्यांना कसे वाटते? दहा पेक्षा अधिक वर्षांपासून पायनियर असलेले फ्रान्समधील एक वडील उत्तरले: “पायनियरींग, यहोवाच्या समीप जाण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे.” १८ वर्षांपासून पूर्ण वेळेच्या सेवेत असलेले त्याच राष्ट्रातील आणखी एक पायनियर बंधू असे म्हणतात: “पायनियर सेवेद्वारे आपण, ‘यहोवा किती चांगला आहे ह्‍याचा अनुभव’ घेऊ शकतो व दिवसेंदिवस निर्माणकर्त्यासोबत अधिकाधिक घनिष्ठ नातेसंबंध जोडत जातो.” (स्तोत्र ३४:८) ब्रिटनमध्ये ३० वर्षांपासून पायनियर असलेल्या एका भगिनीला देखील असेच वाटते. ती म्हणते: “माझ्या सेवेत मार्गदर्शनासाठी यहोवाच्या आत्म्याची मदत घ्यावी लागत असल्यामुळे मी त्याच्या समीप येते. यहोवाच्या आत्म्याने पुष्कळ वेळा मला उचित समयी एखाद्या विशिष्ट घरी जाण्याचे मार्गदर्शन दिल्याचे मला खरंच जाणवले आहे.”—पडताळा प्रेषितांची कृत्ये १६:६-१०.

१४. इतरांना शिकवण्यासाठी बायबल आणि बायबल आधारित प्रकाशनांचा रोज उपयोग केल्यामुळे पायनियरांना कसा लाभ होतो?

१४ अनेक पायनियरांच्या हे प्रत्ययास आले आहे, की शास्त्रवचनातील सत्याचे स्पष्टीकरण देण्यासाठी व शिकवण्यासाठी बायबल आणि बायबल आधारित प्रकाशनांचा रोजच उपयोग केल्याने देव वचनाविषयी त्यांना असलेल्या ज्ञानात वृद्धी होते. स्पेनमधील ८५ वर्षांचे बंधू जे ३१ वर्षांपासून पायनियर आहेत असे म्हणतात: “पायनियरींगमुळे मी बायबलचे सखोल ज्ञान घेऊ शकलो आणि अनेक लोकांना यहोवा आणि त्याच्या उद्देशांची ओळख करून देण्यासाठी मी याच ज्ञानाचा उपयोग केला आहे.” २३ वर्षांपासून पायनियरींग करणाऱ्‍या ब्रिटनच्या एका भगिनीचे म्हणणे आहे की, “पूर्ण वेळेच्या सेवेमुळे मी आध्यात्मिक अन्‍नाची भूक वाढवू शकले.” ‘आपल्याठायी असलेल्या आशेचे’ स्पष्टीकरण इतरांना दिल्यामुळे आपल्याला प्रिय असलेल्या विश्‍वासांची खात्री आणखी बळकट होऊ शकते. (१ पेत्र ३:१५) ऑस्ट्रेलियाचे एक पायनियर म्हणतात: “पायनियरींगमुळे माझा विश्‍वास वाढतो कारण मी स्वतःला लोकांसमोर व्यक्‍त करतो.”

१५. पायनियर सेवेत प्रवेश करून त्यात टिकून राहण्याकरता अनेक जण काय करावयास तयार आहेत व का?

१५ यहोवाकडून अगणित आशीर्वाद देणारी सेवा आपण निवडल्याची खात्री या पायनियर सेवकांना पटलेली असते हे स्पष्ट आहे. म्हणूनच तर पुष्कळ जण आपल्या जीवनात तडजोड करण्यास, पायनियर सेवेत प्रवेश करून त्यात टिकून राहण्याकरता लौकिक जीवनमार्ग व भौतिक मालमत्तेचा देखील त्याग करण्यास तयार आहेत!—नीतिसूत्रे २८:२०.

तुमच्या अंतःकरणाला अधिक करण्याची उत्कंठा आहे का?

१६, १७. (अ) तुम्ही पायनियरींग करू शकाल असे जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही काय करू शकता? (ब) काहींना पायनियरींग करता येत नाही तेव्हा त्यांना कसे वाटते?

१६ पायनियर सेवेत मिळणाऱ्‍या आशीर्वादांबद्दल स्वतः पायनियरांच्या तोंडून ऐकल्यावर कदाचित तुम्हीही, पायनियरींग करता येईल का असा विचार करत असाल. असल्यास, पूर्ण वेळेच्या सेवेत यश प्राप्त केलेल्या एखाद्या पायनियरशी बोलण्यास काय हरकत आहे का? तुमच्याबद्दल माहीत असलेल्या—तुमच्या आरोग्याची, तुमच्या मर्यादांची आणि तुमच्या कौटुंबिक जबाबदाऱ्‍यांची माहिती असलेल्या तुमच्या मंडळीतील वडिलांशीही बोलल्यास बरे राहील. (नीतिसूत्रे १५:२२) इतरांकडची वास्तविक विवेचने, तुम्ही खरोखरच पायनियरींग करू शकाल की नाही याचा काळजीपूर्वक अंदाज लावण्यास मदत करू शकतील. (पडताळा लूक १४:२८.) तुम्ही पायनियरींग करू शकला तर तुम्हाला खरोखरच पुष्कळ आशीर्वाद मिळतील.—मलाखी ३:१०.

१७ परंतु, सेवेमध्ये अधिक करू इच्छिणाऱ्‍या पण पायनियरींग करण्याच्या स्थितीत नसलेल्या अनेक विश्‍वासू राज्य प्रचारकांबद्दल काय? उदाहरणार्थ, चार मुलांचे एकटीला संगोपन कराव्या लागणाऱ्‍या आपल्या एका ख्रिस्ती बहिणीला काय वाटते ते पाहा. ती म्हणते, “मला अतिशय वाईट वाटते, कारण एकेकाळी मी स्वतः एक नियमित पायनियर होते आणि आता माझी परिस्थिती अशी झाली आहे की मी पूर्वी ज्याप्रमाणे करू शकत होते त्याप्रमाणे क्षेत्र सेवेत जाऊ शकत नाही.” या बहिणीचे आपल्या मुलांवर जिवापाड प्रेम असल्यामुळे त्यांची चांगली निगा घेण्याची तिची इच्छा आहे. यासोबतच तिला प्रचार कार्यातही अधिक भाग घ्यावासा वाटतो. ती म्हणते: “मला क्षेत्रसेवा अतिशय आवडते.” असेच विचार इतर भक्‍तिमान ख्रिश्‍चनांकडून ऐकायला मिळतात ज्यांना देवाबद्दल असलेली प्रीती यहोवाची सेवा “जिवेभावे” करण्यास प्रवृत्त करते.—स्तोत्र ८६:१२.

१८. (अ) यहोवा आपल्याकडून काय अपेक्षितो? (ब) आपल्या परिस्थितींमुळे आपल्यावर मर्यादा येतात तेव्हा आपण निरुत्साहित का होऊ नये?

१८ लक्षात असू द्या, की यहोवा आपल्याकडून जिवाभावाने केलेली सेवा अपेक्षितो. आणि प्रत्येकाच्या सेवेत फरक असू शकतो. काहींना, नियमित पायनियर म्हणून कार्य करता यावे म्हणून त्यांच्या कामात तडजोड करणे शक्य होते. असे अनेक जण आहेत जे कधी कधी किंवा लागोपाठ प्रत्येक महिन्याला ६० तास खर्च करून सहायक पायनियर म्हणून कार्य करतात. परंतु, यहोवाच्या लोकांतील बहुसंख्य लोक मंडळीत प्रचारक या नात्याने प्रचार व शिकवण्याच्या कार्यात जिवाभावाने सेवा करतात. तेव्हा, प्रकृती चांगली नसल्यामुळे, वाढत्या वयामुळे, कौटुंबिक जबाबदाऱ्‍यांमुळे किंवा इतर परिस्थितींमुळे जर तुमची सेवा खरोखरच मर्यादित आहे तर निराश होऊ नका. जोपर्यंत तुम्ही सर्वोत्तम देता तोपर्यंत देवाच्या नजरेत तुमची सेवा मौल्यवान राहील, जशी पूर्ण वेळेच्या सेवेत असलेल्यांची असते!

सर्वजण पायनियर आत्मा दाखवू शकतात!

१९. पायनियर आत्मा म्हणजे काय?

१९ तुम्ही पायनियरींग करू शकला नाही तर निदान पायनियर आत्मा तरी दाखवू शकता. पायनियर आत्मा म्हणजे काय? “प्रचार व शिष्य बनवण्याच्या आज्ञेप्रती सकारात्मक मनोवृत्ती बाळगणे, लोकांबद्दल प्रेम व काळजी व्यक्‍त करण्यासाठी स्वतःला पूर्णपणे वाहून घेणे, आत्म-त्यागी असणे, धन्याचे जवळून अनुकरण करण्यात आनंद मिळवणे व भौतिक नव्हे तर आध्यात्मिक गोष्टींत आवड घेणे, अशी त्याची व्याख्या करता येईल,” असे जुलै १९८८ [इंग्रजी] ची आमची राज्य सेवा म्हणते. तुम्ही पायनियर आत्मा कसा प्रदर्शित करू शकाल?

२०. पालक पायनियर आत्मा कसा प्रदर्शित करू शकतात?

२० तुम्हाला लहान मुले असल्यास तुम्ही त्यांना पायनियरींग आपला जीवनमार्ग बनवण्याची मनापासून शिफारस करू शकता. सेवेविषयीची तुमची सकारात्मक मनोवृत्ती, यहोवाच्या सेवेला आपल्या जीवनात सर्वात महत्त्वाचे स्थान देण्याची गरज आहे अशी छाप त्यांच्यावर पडू शकते. तुम्ही पायनियर आणि प्रवासी पर्यवेक्षक व त्यांच्या पत्नींना घरी आमंत्रित करू शकता ज्यामुळे तुमच्या मुलांना पूर्ण वेळेच्या सेवेत आनंद प्राप्त केलेल्यांच्या उदाहरणातून लाभ होऊ शकतो. (पडताळा इब्री लोकांस १३:७.) धर्माबाबत विभक्‍त घरांमध्येसुद्धा, सत्यात असलेले पालक बोलण्या-चालण्याद्वारे आपल्या मुलांना पूर्ण वेळेच्या सेवेचे ध्येय ठेवण्यास मदत करू शकतात.—२ तीमथ्य १:५; ३:१५.

२१. (अ) पायनियरींग करणाऱ्‍यांना आपण सर्वजण पाठिंबा कसा देऊ शकतो? (ब) पायनियरांना उत्तेजन देण्याकरता वडील काय करू शकतात?

२१ मंडळीमध्ये, आपण सर्वजण पायनियरींग करू शकणाऱ्‍यांना मनापासून सहकार्य देऊ शकतो. जसे की, एखाद्या पायनियरबरोबर जाण्याचा तुम्ही विशेष प्रयत्न करू शकाल का, आणि खासकरून ती किंवा तो जर एकटाच असेल तेव्हा? तुम्हाला दिसून येईल, की अशा वेळी ‘उत्तेजनाची देवाण-घेवाण’ होईल. (रोमकर १:११, १२) तुम्ही जर का एक वडील आहात, तर पायनियरांना उत्तेजन देण्यासाठी तुम्ही आणखी काही करू शकता. वडील वर्ग एकत्र येतो तेव्हा त्यांनी न विसरता पायनियरांच्या गरजांचा विचारविमर्श केला पाहिजे. एखादा पायनियर निरुत्साहित होतो किंवा त्याला काही अडचणी येतात तेव्हा पायनियरींग सोडून देण्याचा सल्ला त्याला लगेचच देऊ नका. काही बाबतीत हा सल्ला उपयुक्‍त ठरत असला तरी पायनियरींग हा असा एक विशेषाधिकार आहे जो कोणत्याही पूर्ण वेळेच्या सेवकाला प्रिय असतो हे मात्र विसरता कामा नये. त्याला जरासे उत्तेजन व काही व्यावहारिक सल्ला देणेच आवश्‍यक असेल. स्पेनमधील संस्थेचे शाखा दप्तर असे लिहिते: “वडीलजन पायनियरींग करण्यास उत्तेजन देतात, पायनियरांना क्षेत्र सेवेत पाठिंबा देतात व नियमितरीत्या त्यांना मेंढपाळकत्वाच्या भेटी देतात तेव्हा पायनियरांना जास्त आनंद वाटतो, उपयुक्‍त असल्यासारखे वाटते आणि अडथळे आले तरी पायनियरींग चालू ठेवावेसे वाटते.”

२२. मानवी इतिहासाच्या या कठीण काळात आपण काय करण्याचा निर्धार केला पाहिजे?

२२ आपण मानवी इतिहासाच्या कठीण काळात जगत आहोत. यहोवाने आपल्याला बचावकार्य पूर्ण करण्यासाठी दिले आहे. (रोमकर १०:१३, १४) पूर्ण वेळेसाठी पायनियर या नात्याने आपण या कार्यात भाग घेऊ शकलो किंवा घेऊ शकलो नाही तरी निदान पायनियर आत्मा दाखवू या. निकडीची जाणीव व आत्मत्यागाचा आत्मा आपण बाळगू या. यहोवा आपल्याकडून जिवाभावाच्या सेवेची अपेक्षा करतो तेव्हा तशी सेवा त्याला देण्याचा आपण निर्धार करू या. आणि आपल्याच्याने होते तेवढे आपण देतो; मग ते विधवेच्या दोन टोल्यांइतके असो किंवा मरीयेच्या महागड्या तेलाइतके असो; तेव्हा आपली सेवा जिवाभावाची असते व यहोवाला आपली जिवाभावाने केलेली सेवा प्रिय आहे!

तुम्हाला आठवते का?

◻ पूर्ण वेळेच्या सेवेमुळे समाधान व आनंद का मिळतो?

◻ यहोवामध्ये त्याच्या सेवकांची काळजी घेण्याची क्षमता आहे त्याबद्दल अनेक पायनियरांना अनुभवानिशी काय माहीत होते?

◻ पायनियरांना वाटते की त्यांच्या सेवेचा यहोवासोबतच्या त्यांच्या नातेसंबंधावर कोणता परिणाम होतो?

◻ तुम्ही पायनियर आत्मा कसा प्रदर्शित करू शकता?

[२३ पानांवरील चित्र]

शिष्य बनवण्याच्या कार्यातून पायनियरांना पुष्कळ आनंद मिळतो

पूर्ण वेळेच्या राज्य घोषकांसोबत संगती राखल्याने तुमच्या मुलांना लाभ होऊ शकतो

वडीलजन पायनियरांना क्षेत्र सेवेत उत्तेजन देऊ शकतात

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा