वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w95 ११/१ पृ. ४-८
  • देवदूतांबद्दलचे सत्य

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • देवदूतांबद्दलचे सत्य
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • सैतानाच्या भूमिकेस झाकून टाकणे
  • प्रार्थना कोणाला?
  • देवदूतांना पंथ वगैरे आहेत का?
  • “लबाडीचा बाप”
  • देवदूतांकडे अथवा भूतांकडे जाणे
  • ‘तेजस्वी देवदूत’
  • ‘अंतराळाच्या मध्यभागी उडणारा देवदूत’
  • देवदूत—“परिचारक आत्मे”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००९
  • देवदूत तुम्हाला कशी मदत करू शकतात
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
  • दिव्यदूत तुमच्या जीवनावर प्रभाव पाडतात का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८८
  • देवदूत—मानवांवर प्रभाव कसा पाडतात?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००७
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
w95 ११/१ पृ. ४-८

देवदूतांबद्दलचे सत्य

एखाद्याशी परिचित होण्यामध्ये, सामान्यतः संबंधित व्यक्‍तीच्या कुटुंबाविषयी काहीतरी जाणून घेण्याचा आतंर्भाव होतो. यहोवा देवाला ओळखणे याच प्रकारचे आहे. केवळ त्याचे नाव जाणून घेण्यापेक्षाही अधिक काही यात समाविष्ट आहे. आपल्याला त्याच्या स्वर्गातील ‘कुटुंबाविषयी’ देखील काहीतरी जाणून घेणे अगत्याचे आहे. (पडताळा इफिसकर ३:१४, १५, पंडिता रमाबाई भाषांतर.) बायबल देवदूतांना “देवपुत्र” असे संबोधते. (ईयोब १:६) बायबलमधील त्यांच्या अर्थपूर्ण भूमिकेचा विचार करता, देवाच्या उद्देशांमध्ये त्यांचे काय स्थान आहे हे समजण्यासाठी त्यांच्याविषयी अधिक जाणून घेण्याची आपली मनीषा असली पाहिजे.

नवीन उपसंस्कृतीचा विकास होत आहे. अनेक जण देवदूतांवर विश्‍वास आहे असे केवळ म्हणतच नाहीत, तर देवदूतांमुळे त्यांच्यावर कोणत्या ना कोणत्या प्रकारे परिणाम देखील झाला आहे, असे म्हणणाऱ्‍या लोकांची वाढती संख्या आहे. “तुम्ही तुमच्या जीवनामध्ये व्यक्‍तीशः देवदूतीय उपस्थितीचा अनुभव घेतला आहे का?” असे ५०० अमेरिकी लोकांना विचारण्यात आले तेव्हा त्यांपैकी एक तृतीयांश लोकांनी होकारार्थी उत्तर दिले. देवदूतांवर विश्‍वास असल्याचा दावा करणाऱ्‍या तरुणांची संख्या सुद्धा विस्मित करणारी आहे—अमेरिकेतील एका मतमोजणी नुसार त्यांचे प्रमाण पूर्ण ७६ टक्के आहे! स्पष्टतः, लोकांना देवदूतांमध्ये रूची आहे. परंतु देवदूतांबद्दल असणारी सध्याची विचारसरणी बायबल सत्याशी कितपत जुळते?

सैतानाच्या भूमिकेस झाकून टाकणे

देवदूतांविषयी बोलताना दुष्ट देवदूतांकडे आपण कानाडोळा करता कामा नये; त्यांस बायबल देवाविरुद्ध बंड केलेले स्वर्गीय प्राणी असे म्हणते. त्यांपैकी प्रमुख आहे, सैतान. तुमच्या देवदूतांना विचारा, (इंग्रजी) नामक लोकप्रिय पुस्तक सुचविते की, सैतान हा “देवाचा एक पैलू” आहे. वारंवार मोहपाश आणण्याद्वारे मानवांना त्यांचे “आध्यात्मिक स्नायू” मजबूत करण्यास तो मदत करतो. लेखक म्हणतो, सैतानाचे असे “प्रेमळ उद्देश” असतानाही अनेक शतकांपासून चुकीने त्याला दुष्ट म्हणून ओळखण्यात आले आहे. तो पुढे म्हणतो, सैतान आणि येशू “पूर्णतः एकमेकांचे पूरक नाहीत, परंतु कमीत-कमी त्यांचे लक्ष्य तरी एक आहे, जसे एका व्यक्‍तीचे अविभाज्य अवयव.” ही विस्मयकारक विधाने आहेत, परंतु बायबल काय म्हणते?

बायबल हे स्पष्ट करते की, सैतान “देवाचा एक पैलू” नसून देवाचा शत्रू आहे. (लूक १०:१८, १९; रोमकर १६:२०) तो यहोवाच्या सार्वभौमत्वाचा अवमान करतो आणि मानवांसाठी असणारे त्याचे उद्देश निश्‍चितच “प्रेमळ” नाहीत. देवाच्या पार्थिव सेवकांवर त्याचा क्रोध तो निर्दयीपणे व्यक्‍त करतो. तो देवासमक्ष रात्रंदिवस त्यांच्यावर आरोप करतो!a (प्रकटीकरण १२:१०, १२, १५-१७) कोणत्याही किंमतीवर त्यांना भ्रष्ट करणे हा सैतानाचा मानस आहे. ईयोब या धार्मिक मनुष्याचा त्याने निर्दयीपणे केलेल्या छळामुळे त्याची मानवी पीडेविषयी असणारी निष्ठुर मनोवृत्ती प्रकट झाली.—ईयोब १:१३-१९; २:७, ८.

सैतान आणि येशू “समान बाजूस” तर नाहीतच; परंतु ते एकमेकांच्या अगदी विरोधात आहेत. निःसंशये, सैतानानेच हेरोदाला प्रचंड बालहत्या करण्यास्तव हुकूमनामा काढण्यास प्रवृत्त केले—हे सर्व प्रयत्न येशू बाळाला जीवे मारण्यासाठी होते! (मत्तय २:१६-१८) सैतानाचे हे निर्दयी हल्ले येशूच्या थेट मृत्यूपर्यंत होत राहिले. (लूक ४:१-१३; योहान १३:२७) अशा प्रकारे, “एका व्यक्‍तीचे विजोड अवयव” होण्याऐवजी येशू आणि सैतान पूर्णतः एकमेकांचे विरोधक आहेत. त्यांचे वैर अपरिहार्य असल्याचे बायबल भविष्यवाणी दाखवते. (उत्पत्ति ३:१५) देवाच्या नियुक्‍त वेळी पुनरुत्थित येशू सैतानाचा नाश करील, हे यथायोग्य आहे.—प्रकटीकरण १:१८; २०:१, १०.

प्रार्थना कोणाला?

देवदूत चळवळीची वकिली करणारे काही जण, देवदूतांशी दळणवळण साधण्यासाठी मनन आणि इतर पद्धतींची शिफारस करतात. “स्वर्गीय कुटुंबातील एखाद्या सदस्याचा संपर्क साधण्याकरता केलेल्या प्रांजळ विनंतीकडे दुर्लक्ष केले जाणार नाही,” असे एक पुस्तक म्हणते. “विचारा आणि त्याचे तुम्हाला उत्तर मिळेल.” मीखाएल, गब्रीएल, युरीएल आणि रफाएल हे अशा देवदूतांपैकी आहेत ज्यांचा सल्ला घेण्याकरता हे पुस्तक शिफारस करते.b

तथापि, येशूने त्याच्या शिष्यांना देवाला प्रार्थना करण्यास शिकवले, देवदूतांना नव्हे. (मत्तय ६:९, १०) पौलाने असेच लिहिले: “सर्व गोष्टींविषयी प्रार्थना व विनंती करून आभारप्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा.” (तिरपे वळण आमचे.) (फिलिप्पैकर ४:६) यास्तव, ख्रिस्तीजन यहोवा व्यतिरिक्‍त इतर कोणालाही प्रार्थना करत नाहीत आणि या प्रार्थना ते येशू ख्रिस्ताच्या नामाने करतात.c—योहान १४:६, १३, १४.

देवदूतांना पंथ वगैरे आहेत का?

ऐंजलवॉच नेटवर्कवर अध्यक्षता करणाऱ्‍या आयलीन इलायस फ्रिमन यांच्या मते “प्रत्येक धर्म, प्रत्येक तत्त्वज्ञान आणि प्रत्येक संप्रदाय यांपेक्षा देवदूत श्रेष्ठ आहेत. वास्तविकपणे, आम्हाला ठाऊक आहे त्यानुसार, देवदूतांना कोणताही धर्म नाही.”

तथापि, बायबल हे स्पष्ट करते की, विश्‍वासू देवदूतांना एक धर्म असून ते खरा देव, यहोवा याची ज्याला इतर दैवतांशी केलेली स्पर्धा सहन होत नाही, उपासना करतात. (अनुवाद ५:६, ७; प्रकटीकरण ७:११) अशा प्रकारच्या एका देवदूताने देवाची आज्ञा पाळणाऱ्‍यांच्या “सोबतीचा दास” असे स्वतःचे वर्णन प्रेषित योहानाला दिले. (प्रकटीकरण १९:१०) बायबलमध्ये कोठेही देवदूत इतर कोणत्याही उपासनेला उंचावत असल्याचे आपण वाचत नाही. ते यहोवास सर्वस्वाची भक्‍ती देतात.—निर्गम २०:४, ५.

“लबाडीचा बाप”

अशा कित्येक तथाकथित देवदूतीय भेटींत मृतांशी दळणवळण करण्याचा समावेश असतो. अलीस नामक एक महिला म्हणते, मी ज्यास शकुन समजत होते ते प्राप्त झाल्यानंतर “माझ्या काकांनी माझ्यापर्यंत पोहंचण्यासाठी आणि ते आता आनंदी आहेत हे मला कळविण्यासाठी एक मार्ग शोधला आहे, असे मला वाटले होते.” त्याचप्रमाणे टेरी हिला देखील तिच्या मृत मित्राबद्दल आठवते. “अंत्यसंस्काराच्या एका सप्ताहानंतर,” ती म्हणते, “तो माझ्याकडे आला आणि यास मी एक स्वप्न समजत होते. मी निघून गेलो म्हणून माझ्याबद्दल दुःख करू नको, असे त्याने मला सांगितले कारण तो आनंदी आणि शांतीत होता.”

परंतु बायबल सांगते, मृतांस तर “काहीच कळत नाही.” (उपदेशक ९:५) ते असेही म्हणते की, एखाद्याचा मृत्यू होतो, “त्याच वेळी त्याच्या योजनांचा शेवट होतो.” (तिरपे वळण आमचे.) (स्तोत्र १४६:४) तथापि, सैतान “लबाडीचा बाप” आहे. (योहान ८:४४) मानवी जीव अमर राहतो, या असत्याचा तोच प्रवर्तक आहे. (पडताळा यहेज्केल १८:४.) आज अनेक लोक यावर विश्‍वास ठेवतात, हे सैतानाच्या उद्देशाबरोबर जुळते कारण यामुळे ख्रिस्ती विश्‍वासाच्या मूलभूत तत्त्वास—पुनरुत्थानावरील विश्‍वासाच्या आवश्‍यकतेस—नाकारले जाते. (योहान ५:२८, २९) म्हणून मृतांची चौकशी होत असल्याचा भास होणे किंवा त्यांच्याकडून संदेश प्राप्त करणे हा देवदूत चळवळीचा आणखी एक पैलू आहे जो देवास मान्य नाही.

देवदूतांकडे अथवा भूतांकडे जाणे

बहुतेक देवदूत चळवळी दुर्बोध गोष्टींमध्ये गुंतलेल्या आहेत. मार्सियाच्या अनुभवाचा विचार करा. ती म्हणते, “सप्टेंबर ते डिसेंबर १९८६ पर्यंत, एका ‘अलौकिक शक्‍ती’पासून मी संदेश प्राप्त करू लागले. भूते आणि अविश्‍वसनीय ‘भूतकाळातील जीवनाची’ स्वप्ने मी पाहिली. मी अशा मित्रांशी संपर्क साधला ज्यांचा मृत्यू झाला होता आणि मला अनेक अमानवी अनुभव आले ज्यांमध्ये नुकतीच भेट झालेल्या लोकांच्या गोष्टी मला समजल्या. स्वंयचलित लिखाणाचीही देण मला मिळाली आणि देहहीनांकडून आलेल्या संदेशांचे मी प्रेषण केले. ज्यांना मी त्यांच्या पार्थिव जीवनामध्ये कधी भेटले देखील नव्हते, असे काही लोक माझ्याद्वारे इतरांना संदेश पाठवत असत.”

देवदूतांबरोबर “दळणवळण” करण्यासाठी भविष्यकथन करणे असामान्य नाही. एक स्रोत त्याच्या वाचकांना जादूचे दगड, टारोट पत्ते, ई चिंग नाणी, हस्तसामुद्रिक आणि फल-ज्योतिषाचा वापर करण्याचे सरळसरळ उत्तेजन देतो. “तुम्हास, भविष्यकथन करणाऱ्‍या योग्य व्यक्‍तीकडे घेऊन जाण्यासाठी तुमच्या आंतरिक व्यक्‍तीला अनुमती द्या,” लेखक लिहितो, “तेथे तुम्हाला एक देवदूत मिळेल यावर भरवसा ठेवा.”

तथापि, बायबल नुसार, ‘तुम्हाला त्या ठिकाणी जो कोणी भेटतो’ तो निश्‍चितच देवाच्या दूतांपैकी नाही. का बरे? कारण भविष्यकथन देवाच्या स्पष्टपणे विरोधात आहे व स्वर्गातील आणि पृथ्वीवरील—खऱ्‍या उपासकांना त्याबद्दल काही कर्तव्य नाही. म्हणूनच इस्राएलमध्ये भविष्यकथन देहान्त शिक्षा होती! नियमशास्त्राने म्हटले, “जो कोणी असली कृत्ये करितो त्याचा परमेश्‍वराला [यहोवा, NW] वीट आहे.”—अनुवाद १३:१-५; १८:१०-१२.

‘तेजस्वी देवदूत’

दियाबल भविष्यकथनाला लाभदायक, शिवाय देवदूतीय असल्याचे भासवू शकतो याचे आपल्याला नवल वाटता कामा नये. बायबल सांगते की, सैतान “स्वतः तेजस्वी देवदूताचे सोंग घेतो.” (२ करिंथकर ११:१४) तो, भविष्यात होणाऱ्‍या घटनांची पूर्वयोजना आखू शकतो आणि नंतर त्यांची पूर्तीही करू शकतो, त्यामुळे हा शकुन देवाकडून आहे, असा विचार करून पाहणारे फसले जातात. (पडताळा मत्तय ७:२१-२३; २ थेस्सलनीकाकर २:९-१२.) परंतु सैतानाचे सर्व कार्य—ते कितीही सद्‌गुणी किंवा कितीही अनिष्ट भासत असले तरी—दोन उद्देशांपैकी एक उद्देश साध्य करतात: लोकांना यहोवाच्या विरोधात उठविणे अथवा त्यांची मने आंधळी करणे जेणेकरून “जो ख्रिस्त त्याच्या तेजाच्या सुवार्तेचा प्रकाश त्यांच्यावर प्रकाशू नये.” (२ करिंथकर ४:३, ४) भविष्यकथनाची ही दुसरी पद्धत अनेकदा अधिक प्रभावशाली ठरते.

पहिल्या शतकातील गुलाम मुलीच्या बायबल अहवालाचा विचार करा. तिच्या भविष्यवाण्यांमुळे तिच्या मालकांना पुष्कळ लाभ झाला. ती अनेक दिवस असे म्हणून शिष्यांच्या मागे होती: “परमपरात्पर देवाचे हे सेवक आहेत. हे तुम्हाला मुक्‍तीचा मार्ग दाखवितात.” तिचे शब्द खरे होते. तरीही, हा अहवाल आपणास सांगतो की, ती ‘भूताच्या योगे भविष्यकथन’ करत होती, देवदूताद्वारे नव्हे. अखेरीस, पौल “मागे वळून त्या भूताला म्हणाला, ‘येशू ख्रिस्ताच्या नावाने मी तुला आज्ञा करतो, हिच्यातून बाहेर निघ.’ त्याबरोबर ते भूत तिच्यातून निघून गेले.”—प्रेषितांची कृत्ये १६:१६-१८, कॉमन लँग्वेज.

पौलाने या भूताला काढून का टाकले? खरे तर, यामुळे भूतग्रस्त मुलीच्या मालकांना पुष्कळ प्राप्ती झाली होती. शेतकऱ्‍यांनी पेरणी केव्हा करावी, अविवाहितांनी विवाह केव्हा करावा आणि खाण-कामगारांनी सोन्याचा शोध कोठे घ्यावा, याविषयी तिने अलौकिक शक्‍तींद्वारे त्यांना सांगितले असेल. या भूताने शिष्यांची जाहीर रीत्या स्तुती करण्याद्वारे तिला सत्याचे काही शब्द बोलण्यासही प्रवृत्त केले!

तथापि, हे ‘भविष्यकथन भूताच्या योगे’ होते. त्यामुळे त्यास यहोवा आणि उद्धारासाठी असलेल्या त्याच्या तरतुदीची घोषणा करण्याचा कोणताही अधिकार नव्हता. त्याचे स्तुतीरूप भाष्य कदाचित गुलाम मुलीच्या भविष्यवाण्यांना मान्यता मिळवण्यासाठी करण्यात आले असेल, यामुळे प्रेक्षक येशूच्या खऱ्‍या शिष्यांपासून विकर्षित झाले. पौलाने उत्तम कारणासाठी करिंथकरांना इशारा दिला: “प्रभूच्या [यहोवाच्या] मेजावरचे व भुतांच्याहि मेजावरचे तुमच्याने खाववत नाही.” (१ करिंथकर १०:२१) पहिल्या शतकातील ख्रिश्‍चनांनी भविष्यकथनाशी संबंधित असणाऱ्‍या सर्व पुस्तकांची विल्हेवाट लावली, हे काही आश्‍चर्याचे नाही.—प्रेषितांची कृत्ये १९:१९.

‘अंतराळाच्या मध्यभागी उडणारा देवदूत’

आपण पाहिले त्यानुसार, सध्याच्या देवदूत चळवळीचा देवाचा शत्रू अर्थात दियाबल सैतानाशी निकट संबंध असल्याचे बायबल पुष्कळ काही प्रकट करते. तर मग पवित्र देवदूत मानवी बाबींमध्ये गोवलेले नाहीत, असा याचा अर्थ होतो का? याच्या विपरीत, ते आता पृथ्वीवर एक महान काम करत आहेत. ते काय आहे? त्याच्या उत्तरासाठी, आपण बायबलमधील प्रकटीकरणाचे पुस्तक पाहिले पाहिजे. बायबलच्या इतर पुस्तकांपेक्षा या पुस्तकामध्ये अधिक वेळा देवदूतांचा उल्लेख करण्यात आला आहे.

प्रकटीकरण १४:६, ७, मध्ये प्रेषित योहानाला प्राप्त झालेल्या भविष्यसूचक दृष्टान्ताचा अहवाल आपण वाचतो: “मी दुसरा एक देवदूत अंतराळाच्या मध्यभागी उडताना पाहिला; त्याच्याजवळ पृथ्वीवर राहणाऱ्‍यांस म्हणजे प्रत्येक राष्ट्र, वंश, निरनिराळ्या भाषा बोलणारे आणि लोक ह्‍यांस सांगावयास सार्वकालिक सुवार्ता होती. तो मोठ्याने म्हणाला: देवाची भीति बाळगा व त्याचे गौरव करा, कारण न्यायनिवाडा करावयाची त्याची घटिका आली आहे. ज्याने आकाश, पृथ्वी, समुद्र व पाण्याचे झरे निर्माण केले त्याला नमन करा.”

आजच्या देवदूतांच्या प्रमुख कार्यावर हे वचन जोर देते. देवदूत उच्च-प्राथमिकतेच्या नियुक्‍तीमध्ये—देव राज्याच्या सुवार्तेची घोषणा करण्यात—गोवलेले आहेत. येशूने त्याच्या शिष्यांना याच कार्याविषयी अभिवचन दिले: “युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्याबरोबर आहे.” (मत्तय २८:१८-२०) येशू त्याच्या शिष्यांसोबत कसा आहे? एक मार्ग, हे महान कार्य सिद्धीस नेण्यासाठी त्यांना देवदूतीय मदत पुरवण्याद्वारे.

यहोवाचे साक्षीदार प्रत्येक वर्षी अब्जापेक्षा अधिक तास देव राज्याच्या सुवार्तेचा प्रचार करण्यात घालवतात. हे कार्य करत असताना देवदूतीय मार्गदर्शनाची त्यांना प्रचिती येते. त्यांच्या दारोदारच्या सेवाकार्यात, अनेकदा असे झाले आहे की, ते अशा व्यक्‍तींना भेटतात ज्या व्यक्‍ती देवाचे उद्देश समजण्यास त्यांना कोणीतरी मदत करावी म्हणून नुकतीच प्रार्थना करत होत्या. साक्षीदारांचा पुढाकार आणि देवदूतीय मार्गदर्शन यांमुळे प्रत्येक वर्षी शेकडो हजारोंना यहोवाचे ज्ञान प्राप्त झाले आहे!

अंतराळाच्या मध्यभागी उडणाऱ्‍या देवदूताचे तुम्ही ऐकत आहात का? यहोवाचे साक्षीदार तुमच्याकडे येतात, तेव्हा त्यांच्यासह देवदूतीय संदेशाविषयी संपूर्ण चर्चा का करू नये?

[तळटीपा]

a “सैतान” आणि “दियाबल” या शब्दांचा अर्थ “विरोधक” आणि “निंदक” असा होतो.

b बायबलमध्ये मीखाएल आणि गब्रीएल यांचा उल्लेख आहे; परंतु रफाएल आणि युरीएल ही नावे ॲपोक्रिफल पुस्तकांमध्ये आढळतात; ही पुस्तके बायबल प्रमाणित पुस्तकांचे भाग नाहीत.

c याकडे लक्ष द्या की, प्रार्थना येशूद्वारे मार्गदर्शित होते, त्याच्याकडे नव्हे. प्रार्थना येशूच्या नामाने केली जाते, कारण त्याने सांडलेल्या रक्‍तामुळे देवाशी संधान साधण्याचा मार्ग मोकळा झाला.—इफिसकर २:१३-१९; ३:१२.

[८ पानांवरील चौकट]

देवदूत कोण आहेत?

अनेक लोक विश्‍वास ठेवतात त्याच्या अगदी विपरीत, देवदूत मृत मानवांचे भटकणारे आत्मे नाहीत. मृतांना “तर काहीच कळत नाही,” असे बायबल स्पष्टपणे सांगते. (उपदेशक ९:५) तर मग देवदूत आले तरी कोठून? बायबल हे दाखवून देते, की पृथ्वीचा पाया घालण्याआधीच देवाद्वारे त्यांची व्यक्‍तीशः निर्मिती करण्यात आली. (ईयोब ३८:४-७) देवाच्या स्वर्गीय कुटुंबाचा विस्तार शकडो लाखो कदाचित कोटीपेक्षाही अधिक असेल! सैतानाच्या बंडखोरीमध्ये काही देवदूत त्यास येऊन मिळाले.—दानीएल ७:१०; प्रकटीकरण ५:११; १२:७-९.

यहोवा हा व्यवस्थेचा देव असल्यामुळे त्याचे देवदूतीय विशाल कुटुंब सुव्यवस्थित आहे, हे आश्‍चर्याचे नाही.—१ करिंथकर १४:३३.

• सामर्थ्य व शक्‍ती या दोहोंमध्ये प्रमुख असणारा देवदूत, आद्यदेवदूत, येशू ख्रिस्त आहे, याला मीखाएल असेही म्हटले जाते. (१ थेस्सलनीकाकर ४:१६; यहूदा ९) सराफ, करूब आणि देवदूत त्याच्या अधिकाराखाली आहेत.

• देवाच्या राजासनाभोवती सराफ उपस्थित आहेत. देवाच्या पावित्र्याची घोषणा करणे आणि त्याच्या लोकांस शुद्ध ठेवणे, या गोष्टींचा त्यांच्या नियुक्‍तीमध्ये आंतर्भाव होतो.—यशया ६:१-३, ६, ७.

• करूब देखील यहोवाच्या उपस्थितीमध्ये दिसतात. देवाच्या राजासनाचे वाहक किंवा संरक्षक या नात्याने यहोवाच्या राज्यवैभवास उंचावतात.—स्तोत्र ८०:१; ९९:१; यहेज्केल १०:१, २.

• देवदूत (म्हणजे “संदेशवाहक”) यहोवाचे प्रतिनिधी किंवा प्रतिनियुक्‍त आहेत. देवाच्या लोकांची मुक्‍तता असो अगर दुष्टांचा संपूर्ण नाश असो, ते ईश्‍वरी इच्छेची अंमलबजावणी करतात.—उत्पत्ति १९:१-२६.

[७ पानांवरील चित्रं]

अंतराळाच्या मध्यभागी उडणाऱ्‍या देवदूताचे तुम्ही ऐकत आहात का?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा