वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w88 १२/१ पृ. ४-७
  • दिव्यदूत तुमच्या जीवनावर प्रभाव पाडतात का?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • दिव्यदूत तुमच्या जीवनावर प्रभाव पाडतात का?
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८८
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • दिव्यदूत खरेच आहेत का?
  • देवाच्या उद्देशातील दिव्यदूत
  • दिव्यदूत तुम्हावर कसा प्रभाव पाडतात?
  • तुमच्या भवितव्यातील देवदूत
  • देवदूत तुम्हाला कशी मदत करू शकतात
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
  • देवदूत—“परिचारक आत्मे”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००९
  • विश्‍वासू स्वर्गदूतांसारखं वागा!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२५
  • देवदूत
    सावध राहा!—२०१७
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८८
w88 १२/१ पृ. ४-७

दिव्यदूत तुमच्या जीवनावर प्रभाव पाडतात का?

दिव्यदूत खरेच अस्तित्वात आहेत का? किंवा ते कल्पनेचा उपज आहेत? ते अस्तित्वात आहेत तर ते तुमच्या जीवनावर प्रभाव पाडतात का?

अशा प्रश्‍नांच्या उत्तराचा विश्‍वसनीय स्त्रोत केवळ एकच आहे. तो प्रेरित अहवाल आहे जो देवाने मानवास दिला—त्याचे वचन, पवित्र शास्त्र. त्याच्यासंबंधी प्रेषित पौलाने लिहिलेः “सर्व शास्त्रवचने इश्‍वरप्रेरित व फायदेकारक असून . . . सुधारणूकीसाठी उपयुक्‍त आहेत.”—२ तीमथ्य ३:१६.

अशाप्रकारे आम्हास आत्मविश्‍वास असावा की पवित्र शास्त्र दिव्यदूतांचे अस्तित्व व आम्हावर प्रभाव पाडतात का या प्रश्‍नांची सडेतोड उत्तरे देईल. खात्रीने विश्‍वाचा निर्माता त्याच्या निर्मितीमध्ये दिव्यदूत आहेत तर त्याचे उत्तर सांगू शकतो.

दिव्यदूत खरेच आहेत का?

पवित्र शास्त्र स्पष्टपणे म्हणतेः “तो [देव] आपले देवदूत वायु करतो.” (इब्रीकर १:७) याचा अर्थ निर्माणकर्त्यास स्वर्गीय आसमंतात आत्मिक प्राणीमात्र आहेत. ते आम्हास अदृश्‍य आहेत व ते शक्‍तीमान आहेत.—स्तोत्रसंहिता १०४:४; २ पेत्र २:११.

देवाने दिव्यदूतांना केवळ व्यक्‍तीत्वहीन, निरर्थक प्राणी असावे असे योजिले होते का? तसे होते तर, पवित्र शास्त्र दिव्यदूतांना भावना आहेत असे चित्रित कसे करते बरे? उदाहरणार्थ, ते आम्हास सांगते की, पृथ्वीचा पाया घातला गेला तेव्हा सर्व देवदूतांनी “मिळून गायन केले व सर्व देवकुमारांनी [देवदूत] जयजयकार केला.”—इयोब ३८:४-७.

देवाच्या पृथ्वीवरील बुध्दीमान प्राणीमात्राप्रमाणे, आत्मिक बुद्धीमान प्राणी देवदूत यांना त्यांचे स्वतःचे व्यक्‍तीमत्व आहे असे दिसते. पवित्र शास्त्र केवळ दोन दिव्यदूतांची (मीखाएल व गाब्रिएल) नावे देते, तरी वास्तविकता ही की देवदूतांना नावे आहेत जी त्यांच्या व्यक्‍तीमत्वात भर टाकते. (लूक १:११, १९, २६; यहुदा ९) पवित्र शास्त्र देवदूतांच्या भक्‍तीला, ज्यात प्रार्थना करणे समाविष्ट आहे त्याला कडकपणे धिक्कारते. दिव्यदूतांना प्रार्थना करण्याऐवजी प्रेषित पौल आम्हाला सांगतो की, “सर्व गोष्टीविषयी प्रार्थना व विनंति करून आभारप्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा.”—फिलिप्पैकर ४:६; प्रकटीकरण १९:१०; २२:८, ९.

परंतु, देवदूत बरे व वाईट यामधील निवड करण्यास असमर्थ, यंत्रमानवाप्रमाणे व्यक्‍तीगत निवडीचे सामर्थ्य नसणारे असे योजले होते का? नाही, देवदूत, मानव आहेत त्याप्रमाणेच नैतिकपणाचे स्वातंत्र्य असणारे प्राणी आहेत. उदाहरणार्थ, विशिष्ठ देवदूतांनी नोहाच्या दिवसात देवाची आज्ञा अवमानली तेव्हा देवाने त्यांना नाकारले व त्यांना देवाच्या स्वर्गीय दालनातून बहिष्कृत केले गेले. त्यांची अवज्ञाकारी वर्तणूक देवदूतांच्या व्यक्‍तीमत्वाचे स्पष्ट प्रदर्शन करते.—उत्पत्ती ६:१, २; २ पेत्र २:४; मत्तय २५:४१.

अशाप्रकारे पवित्र शास्त्र आम्हास देवदूतांचे स्वरूप, मुळारंभ, अस्तित्व याविषयी सहाय्यक माहिती पुरविते. देवाचे वचन त्यांच्याबाबत जे काही सांगते त्यापलीकडे जाणे एखाद्याला पवित्र शास्त्र उत्तर देत नाही अशा प्रश्‍नांवर निरर्थक विचार करण्यास लावू शकते. ते अनावश्‍यक लक्ष देण्याकडे किंवा दिव्यदूतांची भक्‍ती करण्याकडे निरवू शकते. (कलस्सैकर २:१८) पवित्र शास्त्र आम्हास “अधिक महत्वपूर्ण गोष्टींची खात्री करण्या”चे व “सुवार्ता म्हणून जे अगोदरच घोषित केले आहे त्या पलिकडे” न जाण्याचे स्मरण देते.—फिलिप्पैकर १:१०; गलतीकर १:८.

देवाच्या उद्देशातील दिव्यदूत

पुष्कळजण देवदूतांचा मुळारंभ व गुणवैशिष्ट्ये यावर कदाचित सहमत होतील तरी फारच थोडके त्यांच्या अस्तित्वाबद्दल व सध्या देवदूत आमच्या जीवनावर कसा परिणाम करतात याविषयी खरे जागृत असतील.

पवित्र शास्त्रात “देवदूत” यासाठी दोन शब्द मल.’अख (इब्री) व अग’गेलॉस (ग्रीक) उपयोगात आणले आहेत. या दोन्हीचा अर्थ “संदेशवाहक” असा आहे. ते आम्हास दिव्यदूतांच्या कार्यवाहीतील एकाच्या बाबतीत काहीतरी सांगतात. देवदूत देव व मानव यामधील संदेशवाहक किंवा सेवक म्हणून काम करतात.

उदाहरणार्थ, अब्राहामाला त्याचा पुत्र इसहाक व त्याच्यामार्फत येणारे आशीर्वाद, जे आम्हाला सुध्दा प्राप्त होऊ शकतील, त्याविषयी कळविण्यास एका देवदूताला पाठविण्यात आले होते. (उत्पत्ती २२:११-१७) मोशेसोबत संभाषण करण्यास एक देवदूत पाठविण्यात आला होता. (प्रे. कृत्ये ७:३७, ३८) अलिशासाठी देवाने दूतासोबत सूचना पाठविल्या होत्या. (२ राजे १:३) तसेच, येशूचा दत्तक पिता योसेफ याच्यासमोर एक देवदूत लहान बालकासंबंधीच्या खास सूचना घेऊन प्रगट झाला.—मत्तय २:१३.

देवाच्या लोकांचे संरक्षण करण्यासाठीही देवदूत पाठविण्यात आले होते. “यहोवाचा दिव्यदूत त्याचे भय धरणाऱ्‍यांसभोवती छावणी देतो व त्यांचे रक्षण करतो.” (स्तोत्रसंहिता ३४:७) एका घटनेत एका देवदूताने प्रेषित पेत्राला बंदिखान्यातून मुक्‍त केले. (प्रे. कृत्ये १२:६-११) दोन देवदूतांनी लोट व त्याच्या मुली यांना सदोम व गमोरा यांच्या नाशातून बचावण्यासाठी त्या भागातून बाहेर येण्यात मदत दिली. लोटाची बायको मात्र देवदूतांच्या म्हणण्याप्रमाणे तंतोतंत वागली नाही म्हणून ती त्या शहरांबरोबर नाश पावली.—उत्पत्ती १९:१-२६.

पवित्र शास्त्र देवदूतांच्या मदतीचे पुष्कळ प्रसंग सांगते व ते इब्रीकर १:७ व १४ वचने जे म्हणते त्यास अधिक पुष्टी देतेः “देवदूतांविषयी तो म्हणतोः ‘तो त्याचे देवदूत वायु बनवितो व आपले सेवक अग्निज्वाला असे करतो.’ ज्यांना वारशाने तारण मिळणार आहे त्यांच्या सेवेसाठी पाठविलेले ते सर्व परिचारक आत्मे नाहीत काय?”

एका दिव्यदूताने येशूला महान समाधान पुरविले. त्याच्या मृत्युच्या आदल्या रात्री, येशूस त्याच्यापुढे काय ठाकले आहे ते माहीत होते—ते म्हणजे त्याचा विश्‍वासघात केला जाईल, मारहाण व क्रुरपणे वधिले जाणार. त्याच्या सत्वपरिक्षणाच्या कसोटीत टिकून राहण्यासाठी त्याला शक्‍तीची गरज होती. अशा कठीण समयी त्याच्यापुढे ‘त्याला शक्‍तीमान करण्यास’ देवदूत प्रकट झाला. दूताने दिलेले समाधान येशूसाठी केवढा आशीर्वाद ठरले असावे बरे! याच्या परिणामात, ‘रक्‍ताचे थेंब भूमीवर पडावे असा त्याचा घाम पडत होता’ एवढ्या यातना त्याने अनुभवल्या तरी त्याला मरणापर्यंत विश्‍वासू राहणे शक्य झाले.—लूक २२:४३, ४४.

देवाने दिव्यदूतांचा उपयोग त्याच्या लोकांच्या शत्रुंचा विनाश करण्यासाठीही केला. अश्‍शुरच्या जागतिक सत्तेने देवाच्या प्राचीन भक्‍तांना धमकाविले तेव्हा पुढील गोष्ट घडलीः “त्या रात्री असे झाले की यहोवाच्या दूताने जाऊन अश्‍शुरी गोटातले एक लक्ष पंचायशी हजार लोक मारिले. पहाटेस लोक उठून पाहतात तो प्रेतेच प्रेते!” (२ राजे १९:३५) तुम्ही देवदूतांची अचंबीत करणारी शक्‍ती पाहू शकता—देव व त्याच्या लोकांचा विरोध करणाऱ्‍या १,८५,०००चा विनाश करण्यासाठी केवळ एकच देवदूत लागला!

देवनिंदक हेरोदसुध्दा देवदूताच्या शक्‍तीपुढे हरला होता. हेरोदाने स्वतःला देवाप्रमाणे मानण्यास सुरुवात केली तेव्हा “त्याने देवाला गौरव दिले नाही, म्हणून तत्क्षणी प्रभुच्या दूताने त्याच्यावर प्रहार केला व तो किडे पडून मेला.”—प्रे. कृत्ये १२:२१-२३.

आम्हास कळविले आहे की देव ज्यावेळी या संपूर्ण सद्य दुष्ट व्यवस्थीकरणाचा नाश करील तेव्हा नाश करणारे याअर्थी दिव्यदूतांचा पुन्हा उपयोग केला जाईल. “मनुष्याचा पुत्र आपल्या दूतांना पाठवील आणि ते सर्व अडखळविणाऱ्‍यांना व अनाचार करणाऱ्‍यांना त्याच्या राज्यातून जमा करून त्यांना अग्नीच्या भट्टीत टाकतील.”—मत्तय १३:४१, ४२.

अशाप्रकारे दिव्यदूत पुष्कळजण कल्पना करतात त्याहूनही अधिक आहेत. जर्मनीमधील धार्मिक लेखक डॉ. मॅनफ्रेड बारथेल यांनी म्हटलेः “जुन्या कराराच्या लेखकांनी प्रभुच्या दूतांना जसे समजले होते त्याप्रमाणे आम्ही कल्पना करू इच्छितो तर सर्व प्रथमतः आम्हास . . . आमच्या भेटकार्डांवर सजविण्यात आलेल्या त्या गोंडस मुद्रेला विसरले पाहिजे.”—व्हॉट द बायबल रिअली सेज.

दिव्यदूत तुम्हावर कसा प्रभाव पाडतात?

तथापि, प्रश्‍न राहतोः दिव्यदूत आज काय करीत आहेत? ते आम्हावर सध्या प्रभाव पाडीत आहेत का? होय, त्यांचा प्रभाव आज खात्रीने आहे.

“व्यवस्थीकरणाची समाप्ती” याविषयीच्या भविष्यवादात येशूने जे भाकित केले होते ते आठवा. तो म्हणालाः “मनुष्याचा पुत्र आपल्या वैभवाने [राज्यसत्ता सुरु करण्यास] सर्व देवदूतांसह येईल, तेव्हा तो वैभवशाली राजासनावर बसेल. त्याच्यापुढे सर्व राष्ट्रे जमविली जातील आणि तो त्यांस . . . एकमेकांपासून वेगळे करील.”—मत्तय २४:३; २५:३१, ३२.

हे लोकांचे वेगळे करणे कसे साध्य केले जाणार? येशूने भाकित केलेः “राज्याची ही सुवार्ता सर्व राष्ट्रात साक्षीसाठी म्हणून गाजविली जाईल तेव्हा शेवट होईल.” (मत्तय २४:१४) होय, देव पृथ्वीवर त्याच्या लोकांना गोलार्धव्याप्त प्रचारकार्यासाठी उपयोगात आणतो.

देवाचे राज्य हे असे एकमेव सरकार आहे, जे मानवजातीच्या समस्यांची सोडवणूक करील. सध्या याबाबतचा संदेश तीन दशलक्षापेक्षा अधिक यहोवाचे साक्षीदार, ज्यांना दिव्यदूतांचा पाठिंबा आहे त्यांच्यामार्फत घोषित केला जात आहे. “तसे युगाच्या समाप्तीस होईल, देवदूत येऊन नीतीमानातून दुष्टांना वेगळे करतील.”—मत्तय १३:४९.

या देवदूत-मार्गदर्शित प्रचारकार्यास लोकांपासून मिश्र प्रतिक्रिया मिळतात. काहीजण ते कार्यमग्न आहेत म्हणून ऐकण्याचे नाकारतात किंवा नको म्हणतात. इतर कुचराई करतात वा अस्थिर असतात. तरीही, पुष्कळ नम्र-हृदयी जन त्यांच्या भवितव्याबाबत चिंता करतात, त्यांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे. तो कसा?

२०८ राष्ट्रात यहोवाचे साक्षीदार, जे आपल्या “आध्यात्मिक गरजांबद्दल जागृत आहेत” व जे “नीतीमत्वाचे भुकेले आहेत” अशा लाखो जनांबरोबर पवित्र शास्त्राचा अभ्यास चालवितात. (मत्तय ५:३, ६) पुष्कळ अनुभव दाखवितात की तारणाच्या संदेशाने नम्र-हृदयी लोकांसोबत संपर्कात येण्यात देवाच्या सेवकांना बहुदा दिव्यदूतांनी मार्गदर्शित केले आहे. प्रकटीकरण १४:६ लाक्षणिकपणे वर्णन देते की, एक “देवदूत अंतराळाच्या मध्यभागी उडत” आहे व त्याच्याजवळ “पृथ्वीवर राहणाऱ्‍यांस सांगावयास सार्वकालिक सुवार्ता” आहे. हे निश्‍चितपणे आता सध्या घडत आहे! हे तुमच्या भवितव्यावर कसा परिणाम घडवते?

तुमच्या भवितव्यातील देवदूत

पवित्र शास्त्र स्पष्टपणे आमच्या काळास या सद्य व्यवस्थीकरणाचे “शेवटले दिवस” म्हणून ओळख देते. (२ तीमथ्य ३:१-५) पवित्र शास्त्र आम्हास याचीही माहिती देते की सध्या दूत “पृथ्वीच्या चार कोनावर उभे राहून पृथ्वीचे चार वारे अडवून धरीत” आहेत. (प्रकटीकरण ७:१) या लाक्षणिक भाषेचा काय अर्थ होतो?

पृथ्वीच्या “कोनावर” असण्याने देवदूत नाशकारक “वारे” सर्व बाजूंनी सोडण्याच्या स्थानावर आहेत. पृथ्वीवरील कोणताही भाग बचावून राखला जाणार नाही, ज्याचा अर्थ, हे दुष्ट व्यवस्थीकरण व त्याचे पाठीराखे यांना “इजा” किंवा नाश असणार. अशाप्रकारे देवाचे दूत संकेत मिळताच कारवाई करण्यास सज्ज आहे असे वर्णिले आहे!—प्रकटीकरण ७:३; १९:११-२१.

ही नाशकारक “इजा”, जे दिव्यदूतांचा पाठिंबा असणाऱ्‍या पृथ्वीभर केल्या जात असलेल्या प्रचाराच्या संदेशास प्रतिसाद देत नाहीत अशांवर असेल. देवाचा शोध करतात व राज्य संदेश ऐकतात त्यांना ते इजा करणार नाहीत. देवाचे वचन म्हणते त्याप्रमाणे त्यांना बचावून ठेवले जाईलः “पृथ्वीवरील सर्व नम्र जनांनो, यहोवाचा धावा करा . . . धार्मिकता व नम्रता यांचे अवलंबन करा, म्हणजे कदाचित यहोवाच्या क्रोधदिनी तुम्ही दृष्टीआड व्हाल.”—सफन्या २:३.

मग, अशा पुष्कळ “नम्र जनां”च्या बाबतीत काय होणार? स्तोत्रसंहिता ३७:११ म्हणतेः “नम्र जन पृथ्वीचे वतन पावतील, ते उदंड सुखाचा उपभोग घेतील.” किती काळ? “धार्मिक पृथ्वीचे वतन पावतील; तीत ते सर्वदा वास करतील.” (स्तोत्रसंहिता ३७:२९) याचा अर्थ होतो की, सार्वकालिक जीवन पृथ्वीवर शक्य आहे. ही पृथ्वी, येशूने म्हटल्याप्रमाणे नंदनवनात परावर्तित करण्यात येईल.—लूक २३:४३.

यास्तव तुम्ही हा प्रश्‍न विचारण्याची गरज आहेः ‘माझे भवितव्य काय असणार?’ याचे उत्तर तुम्ही दिव्यदूतांच्या मार्गदर्शनास कसा प्रतिसाद देता यावर अवलंबून आहे. ते पाठिंबा देत असलेला संदेश तुम्हापुढे सादर केला जातो तेव्हा तुम्ही तो ऐकाल व योग्य तो प्रतिसाद द्याल का? तुम्ही असे केल्यास भवितव्याकडे आत्मविश्‍वासाने पाहणाऱ्‍यांतील एक असाल, ज्यांना देवाचे असे शाश्‍वत अभिवचन आहेः “जग व त्याची वासना नाहीशी होत आहे पण देवाच्या इच्छेप्रमाणे करणारा सर्वकाळ राहतो.”—१ योहान २:१७.

[७ पानांवरील चित्रं]

दिव्यदूत सध्या ‘पृथ्वीचे वारे अडवून धरीत आहेत.’ पण का?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा