वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w94 १२/१५ पृ. १९-२२
  • तुमची आरोग्य चाचणी

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • तुमची आरोग्य चाचणी
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • आरोग्य—कोणत्या किंमतीवर?
  • कोणत्या शक्‍तींचा समावेश आहे?
  • सावधान!
  • आरोग्याची निगा राखा, पण बायबलमधील तत्त्वांच्या चाकोरीत राहून
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००८
  • “आपली प्रतीति पाहा”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००५
  • पवित्र शास्त्र सत्य भूतविद्येपासून मुक्‍तता देते
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८८
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
w94 १२/१५ पृ. १९-२२

तुमची आरोग्य चाचणी

वॉचटावर सोसायटी वैयक्‍तिकांसाठी त्यांच्या वैद्यकीय आणि रोगनिदानाच्या चाचण्यांबद्दल शिफारस करत नाही किंवा निर्णय देत नाही. तथापि, विशिष्ट उपचारपद्धतींची बायबलच्या प्रकाशात प्रश्‍नार्थक बाजू असल्यास, याकडे लक्ष आकर्षित केले जाऊ शकते. मग प्रत्येकाने यात काय समाविष्ट आहे यावर काळजीपूर्वक विचार करावा आणि काय करावे याचा निर्णय घ्यावा.

प्रिय बांधवांनो: मला तुमचे मत हवे होते. [एका वैद्याला] खूप यश मिळत आहे परंतु ती ज्या पद्धतीने लोकांना बरे करते त्याविषयी मला जरा शंका वाटते. . . . व्यक्‍तीचे परीक्षण करून कोणता आजार आहे हे ती सांगते. त्यानंतर त्या व्यक्‍तीला कोणते औषध द्यावे व ते किती प्रमाणात द्यावे हे पाहण्यासाठी, ती एक औषधाची बाटली एखाद्या गाठीजवळ किंवा एखाद्या अवयवाजवळ ठेवते. त्यानंतर ती रूग्णाचा वर केलेला हात खाली ओढण्याचा प्रयत्न करते. तो हात खाली ओढण्यासाठी तिला जितका जोर लागला त्यावर औषधाचा प्रकार किंवा त्याची मात्रा ठरवली जाते. इलेक्ट्रॉन्स्‌ प्रवाहाप्रमाणे औषधाच्या बाटलीच्या धातुच्या झाकणातून जाऊन अवयवाला मजबूत करतो असा सिद्धांत आहे. ही पद्धत भूमिगत जल कोठे आहे यासारखेच आहे का?

अमेरिकाच्या ऑरिगन येथील पत्रात, सकसपणाच्या गरजा, भावनात्मक विषयांवर काळजीपूर्वक विचार करणे, स्मरणशक्‍ती ठरविणे तसेच दैनंदिन जीवनातील प्रश्‍ने सोडविण्याच्या पद्धतीचा उल्लेख केला आहे. हा उपचार कितीही सामान्य असला तरी पत्र लिहिणाऱ्‍याच्या शंकेचे निरसन झाले का?

आरोग्य—कोणत्या किंमतीवर?

लोकांनी प्राचीन काळापासून आपण आजारी का पडतो व बरे कसे होऊ शकतो हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. इस्राएली लोकांना हा फायदा होता कारण ते स्वतः पापी असल्याचे त्यांना माहीत होते तसेच त्यांच्याकडे देवाकडील नियम असल्यामुळे आजाराची लागण अथवा फैलाव होऊ नये यासाठी त्यांना मदत मिळत होती. (लेवीय ५:२; ११:३९, ४०; १३:१-४; १५:४-१२; अनुवाद २३:१२-१४) असे असले तरी, देवाच्या लोकांनी त्या दिवसातील निपुण वैद्यांकडून मदत घेतली.—यशया १:६; ३८:२१; मार्क २:१७; ५:२५, २६; लूक १०:३४; कलस्सैकर ४:१४.

प्राचीन काळातील बॅबिलॉन आणि इजिप्त येथील लोकांपेक्षा हे किती उलट होते! त्यांच्या “वैद्यांकडे” नैसर्गिक घटकांवर आधारित काही उपाय होते. तरी देखील, त्यांच्या अनेक “उपचारांचे” आता ढोंगी उपचार असे वर्णन केले जाईल. इजिप्तच्या चित्रलिपीत लिहिलेला भाग, अंधत्वावर डुकराच्या डोळ्यांचे अधम मिश्रण, सुरमा, लोखडांचे खनिज, आणि मध यांनी उपचार करणाऱ्‍या वैद्याबद्दल सांगतो. हे मिश्रण आजारी व्यक्‍तीच्या कानात टाकण्यात येत असे! असा उपचार “खरोखर उत्तम” असल्याचा दावा एक प्राचीन शिफारसपत्र करते. या विचित्रपणाने किंवा रहस्याने त्याची अपीलकारकता वाढवली असेल.

बॅबिलॉन आणि इजिप्त मधील लोकांनी गूढ शक्‍तीचे आवाहन अनेकदा केले होते.a एखादा याजक/वैद्य रुग्णाला कदाचित मेंढीच्या नाकपुड्यात श्‍वास फुंकण्यास सांगू शकतो. त्यामागे असा विश्‍वास असतो की एखादी शक्‍ती, किंवा उर्जा रुग्णातून प्राण्यात जाऊ शकते आणि त्याचा परिणाम होऊ शकतो. मेंढीला मारले जाई आणि असे गृहीत धरले जात असे की तिचे यकृत रुग्णाचे आजारपण किंवा त्याचे भविष्य प्रकट करु शकते.—यशया ४७:१, ९-१३; यहेज्केल २१:२१.

अर्थातच, प्राचीन इस्राएलातील देवभिरू वैद्यांनी दुरात्मिक उपचार पद्धतीचा वापर केला नसावा. सुज्ञतेने देवाने त्यांना आज्ञा दिली: “चेटूक करणारा, शकुनमुहूर्त पाहणारा, मंत्रतंत्र करणारा, जादूगार . . . असा तुमच्यापैकी कोणी नसावा . . . जो कोणी असली कृत्ये करितो त्याचा परमेश्‍वराला [यहोवा, NW] वीट आहे.” (अनुवाद १८:१०-१२; लेवीय १९:२६; २०:२७) आज देवाच्या ख्रिस्ती सेवकांना देखील हेच लागू होते. खबरदारी उचित आहे.

अलिकडील वर्षांमध्ये अनेक लोकांनी त्यांचे लक्ष “पर्यायी” वैद्यकीय निदान पद्धती आणि उपचारांकडे लावले आहे. हे खासपणे वैयक्‍तिक निर्णय घेण्याचे एक क्षेत्र आहे. (मत्तय ७:१; पडताळा रोमकर १४:३, ४.) परंतु एखादा ख्रिस्ती, सेवेला म्हणजेच जीवन वाचवण्याच्या एकमेव खात्रीच्या मार्गाला पूर्णपणे झाकून टाकणाऱ्‍या विवाद्य आरोग्य विषयांमध्ये गुंतलेला असेल तर ते निश्‍चितच किती दुःखदायक असेल. (१ तीमथ्य ४:१६) नवीन जगात वैद्यकीय प्रगती, औषधी वनस्पती, खाण्यापिण्यातील पथ्य, किंवा पथ्यापथ्य नियमाचे पालन केल्याने आजारपण बरे होऊन परिपूर्ण आरोग्य प्राप्त केले जाईल असे बायबल सांगत नाही. वास्तविकपणे, येशूच्या खंडणी यज्ञार्पणाच्या आधारावर पापाची क्षमा केल्यानेच पूर्णपणे बरे करण्यात येईल.—यशया ३३:२४; प्रकटीकरण २२:१, २.

कोणत्या शक्‍तींचा समावेश आहे?

सुरवातीच्या पत्रात सांगितल्याप्रमाणे, एखादा ख्रिस्ती स्नायू चाचणीच्या उपचाराबद्दल स्वतःचा निर्णय घेताना कशाचा विचार करील?

ताकद किंवा स्नायुंची प्रतिक्रिया पाहण्याची विशिष्ट पद्धत हे रुढीबद्ध औषध आहे आणि केवळ काही त्याच्या सबळतेबद्दल शंका करतील. उदाहरणार्थ, पोलियो स्नायुंना कमजोर करु शकतो आणि यात किनेसियोलॉजी म्हटलेल्या—म्हणजे “स्नायू व स्नायुंच्या हालचालींचा अभ्यास” असू शकतो. अशा किनेसियोलॉजीचा वापर, झटके येणाऱ्‍या रुग्णांवर पूर्वस्थिती उपचार पद्धतीत देखील केला जातो. पुष्कळ लोक अशा उपचारात समंजसपणा पाहतील.

पण या लेखातील सुरवातीच्या पत्रात वर्णिलेल्या स्नायू चाचणीबद्दल काय? अशा प्रकारच्या “किनेसियोलॉजीचा” वापर, एखाद्या व्यक्‍तीला विशिष्ट आहार, औषधी वनस्पती, किंवा जीवनसत्व मदत करील की हानी करील हे शोधण्यासाठी करण्यात येतो. अनेकदा काय केले जाते त्याचे वर्णन पुढे केले आहे, ती व्यक्‍ती आपला हात लांबवते आणि स्नायुंची शक्‍ती पाहण्यासाठी उपचार देणारा तो हात खाली दाबतो. नंतर वश झालेली व्यक्‍ती स्वतःच्या तोंडात किंवा पोटावर किंवा हातात पौष्टिक अथवा इतर कोणताही पदार्थ ठेवते. पुन्हा एकदा स्नायुंची चाचणी घेतली जाते. असा दावा केला जातो की, त्या व्यक्‍तीला तो पौष्टिक पदार्थ हवा असल्यास, त्याचा हात मजबूत सिद्ध होईल; ते त्याच्यासाठी अपायकारक असल्यास, स्नायू कमजोर होतील.b

ज्या लोकांनी असे करण्याचा प्रयत्न केला त्यांना वाटते की ही पद्धत उपयोगी आहे आणि याचा प्रभाव शरीरातील शक्‍तीवर आधारित असतो. ते तर्क करतात की, अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांना आधुनिक विज्ञान स्पष्ट करु शकत नाही पण त्या घडतात किंवा त्यांचे निरीक्षण केले जाऊ शकते. यास्तव, वैद्यांना अद्याप उलगडा झालेला नसला किंवा त्यांनी स्वीकारले नसले तरी ते दावा करतात की, शक्‍ती आणि पदार्थांमध्ये उर्जेचे काही माध्यम किंवा परस्परांवरील क्रिया होत असेल.

दुसऱ्‍या बाजूला पाहता, अप्लाईड किनेसियोलॉजी हे पुस्तक सांगते: “पोषक पदार्थांसारख्या रासायनिक पदार्थाला हातात धरुन स्नायुंची चाचणी करण्याद्वारे त्याचे मूल्य ठरवले जाते, असे कधीकधी [पुस्तके] शिकवतात. या प्रकारची चाचणी किती खात्रीलायक आहे याबद्दल काही पुरावा नाही. . . . तत्त्वज्ञानी मनोवृत्ती इतकी प्रबळ असू शकते की चाचणीदरम्यान अचूक माहिती प्राप्त करण्यात उपचार करणाऱ्‍याचा पूर्वग्रह अडथळा आणू शकतो.” “हाताने स्नायुची चाचणी घेण्यात हातखंड असणारा परीक्षक स्वतःच्या इच्छेनुसार चाचणीत थोडासा . . . बदल करुन रुग्णाचा स्नायू सहजपणे कमजोर अथवा मजबूत असल्याचे भासवू शकतो.”

सावधान!

तथापि, स्नायुंची चाचणी घेण्यातील काही गोष्टी याच्याही पुढे जातात. “बदली चाचणी” असे नाव असलेल्या पद्धतीचा जरा विचार करा. ही चाचणी कदाचित खूपच अशक्‍त असलेल्या वयस्कर व्यक्‍तीची अथवा लहान बाळाची घेतली जाते. बदली व्यक्‍ती बाळाला स्पर्श करते तेव्हा, उपचार करणारा बदली व्यक्‍तीच्या हाताची चाचणी घेतो. हीच गोष्ट पाळीव प्राण्यांना देखील लागू केली आहे; आपला हात मेंढपाळ कुत्रा, जर्मन शेफर्ड, किंवा कोणत्याही दुसऱ्‍या आजारी पाळीव प्राण्यावर ठेवलेला असताना बदली व्यक्‍तीच्या हाताची चाचणी घेतली जाते.

अशा कृतींबद्दल आपण मत मांडू शकत नाही, पण तुम्ही कदाचित विचाराल, ‘या परिणामांच्या मागे शरीरातील शक्‍ती आहे का?’ शास्त्रज्ञांनी कॉसमिक किरणे, सुक्ष्मतरंग, आणि विविध प्रकारचे विद्युतचुंबकीय प्रवर्तन यांचे अस्तित्व सिद्ध केले आहे. तरीही, बालक आणि घरातील पाळीव प्राणी यासोबत सर्व प्राणीमात्रांमध्ये प्रवाहीत होऊन दुसऱ्‍या व्यक्‍तीवर चांगला परिणाम घडवण्याची शक्‍ती आहे का? शक्‍ती बाहेर जाऊ शकते आणि मेंढीवर परिणाम करु शकते असा विचार बॅबिलॉन येथील लोक करीत होते. तुम्ही कदाचित स्वतःला विचारु शकता, ‘मानवांसोबत किंवा प्राण्यांसोबत आज अशाचप्रकारे काही घडू शकते असा विश्‍वास मी करतो का? किंवा या परिणामांसाठी इतर स्पष्टीकरण असू शकते का?’

रोग बरा करणाऱ्‍या काहींनी, एखाद्या व्यक्‍तीच्या “शक्‍तीचे” मोजमाप धातुने बनवलेले नागमोडी साधन किंवा लंबकाने घेतल्याचा दावा करतात. बरे करणाऱ्‍याचे “ऊर्जा क्षेत्र” रुग्णाच्या ऊर्जा क्षेत्रावर परस्पर क्रिया करते तेव्हा ते हलतात असे गृहीत धरले जाते. एके काळी संशोधक शास्त्रज्ञ असलेली या क्षेत्रातील वैद्य आणि लेखिका, कधीकधी लंबकाच्या साहाय्याने निदान करते. “मानवी ऊर्जा क्षेत्र” किंवा मनुष्यासभोवतालचे तेजोमंडल ती पाहू शकते असे देखील ती प्रतिपादन करते. ती शरीरातील गाठी, रक्‍तपेशी किंवा सूक्ष्म जंतू आणि गतकाळातील गोष्टींना पाहण्यासाठी “आंतरिक दृष्टीचा” उपयोग करण्याचा दावा करते.c

आधी नोंद केल्याप्रमाणे, हातबलाद्वारे भावना तपासण्यासाठी मापक शक्‍ती वापरली जाते. विस्तृतप्रमाणावर खपलेल्या एका पुस्तकाने म्हटले: “त्याचवेळी तुम्हाला थोडीशी भावनिक चाचणी करण्याची इच्छा झाली तर ऐकू येईल अशाप्रकारे स्वतःला विचारा ‘तुम्हाला काही समस्या आहे का?’ आणि पुनर्चाचणी करा. पौष्टिक पदार्थ फायदेकारक नसल्यावर हात अधूनमधून दुर्बळ होतो.” काही जण ह्‍या चाचणीचा उपयोग “एखादी शारीरिक, भावनिक किंवा आध्यात्मिक दुर्घटना घडली तेव्हा रूग्णाचे वय काय होते हे पाहण्यासाठी करतात.” दैनंदिन बाबींबद्दल ‘हो की नाही’ हा निर्णय घेण्यास देखील या पद्धतीचा उपयोग केला जातो.

बहुधा, अशाप्रकारची स्नायुंची चाचणी (किनेसियोलॉजी) करणारे अनेक म्हणतील की त्यांची पद्धत आता वर्णिलेल्या गोष्टीपासून वेगळी आहे, त्यामध्ये भुताटकीचा समावेश नाही किंवा ते भावनिक चाचणी देखील करत नाहीत. तरी देखील, ते वापर करत असलेली पद्धत अजूनही, खास शक्‍ती असण्याचा दावा करणाऱ्‍यांद्वारेच प्रत्येक मानवातील शक्‍तीची चाचणी केली जाऊ शकते किंवा ते पाहता येऊ शकते या विश्‍वासावर आधारित आहे का?

ख्रिस्ती जन अशा गोष्टींना कमी महत्त्वाचे समजत नाहीत. देवाने इस्राएल राष्ट्राला सल्ला दिला: “चंद्रदर्शन, शब्बाथ व मेळे भरवणे—सणाच्या मेळ्यात वापरली जाणारी गूढ शक्‍ती मला खपत नाही.” (यशया १:१३, NW) ते राष्ट्र धर्मत्यागी बनले तेव्हा, ‘ते शकुनमूहूर्त पाहत होते व जादूटोणा करत होते.’ (२ राजे १७:१७; २ इतिहास ३३:१-६) पुराव्यानिशी हे शाबीत झाले की त्यांनी खास विधींद्वारे माहिती मिळवली, आणि मग ते ‘गूढ गोष्टी बोलले.’—जखऱ्‍या १०:२, NW.

स्नायुंच्या काही चाचण्या निरूपद्रवी असू शकतात, त्यामध्ये रुग्णाला किंवा उपचार करणाऱ्‍याला काहीच हानी होणार नाही. तरीसुद्धा काहींमध्ये गूढ किंवा अलौकिक पैलू, जसे की आंतरिक दृष्टांत, रहस्यमय वातावरण व लंबकाचा उपयोग यांचा समावेश असू शकतो. ख्रिश्‍चनांनी कोणत्याही गूढ शक्‍तींचा वापर करू नये. त्यांनी अशांचा प्रयोगही करून पाहू नये कारण ते सैतानाच्या गहन म्हटलेल्या गोष्टींविषयी उत्सुक नाहीत. (प्रकटीकरण २:२४) उलट, देवाचे वचन धिक्कारत असलेल्या भुताटकीच्या कोणत्याही प्रकाराशी संबंधित असल्याचे दिसून आल्यास खबरदारी बाळगण्यास योग्य कारण आहे.—गलतीकर ५:१९-२१.

एखादा वैद्य जे काही करतो ती त्याची जबाबदारी आहे, आणि प्रत्येकाच्या दाव्यांची किंवा पद्धतींची उजळणी करण्याचा व ते बरोबर आहे की चूक आहे हे ठरवण्याचा आपला उद्देश नाही. याप्रकारच्या काही पद्धतींमध्ये गूढ शक्‍तींचा समावेश आहे असे तुम्हाला वाटत असले तरी ज्यांनी त्या पद्धतीचा वापर केला त्या सर्वांनी तो अजाणतेत केला असेल व त्यामध्ये भुताटकीचा समावेश आहे असा विचार त्यांच्या मनाला चाटून देखील गेला नसेल हे स्पष्टच आहे. त्यांना सुदृढ आरोग्याची तीव्र इच्छा होती हेच यावरून सूचित होत असेल. तरीही, कोणताही संभाव्य शारीरिक लाभ, आध्यात्मिक जोखीमेच्या योग्यतेचा नव्हता असा या पद्धतींमध्ये गोवलेल्या काहींनी नंतर निर्णय घेतला.

पुन्हा, अशाप्रकारच्या व्यक्‍तिगत बाबींबद्दल काय केले जावे याबद्दल प्रत्येक व्यक्‍तीने ठरवावे. तरीही ख्रिश्‍चनांनी देवाचा सल्ला ध्यानात ठेवावा: “भोळा प्रत्येक शब्दावर विश्‍वास ठेवितो; शहाणा नीट पाहून पाऊल टाकितो.” (नीतीसूत्रे १४:१५) हेच विशिष्ट आरोग्य पद्धतींच्या दाव्यांनाही लागू होते.

देवाच्या सेवकांचे मन खऱ्‍या भक्‍तीपासून विचलित करण्यास सैतान अतिशय उत्सुक आहे. ख्रिश्‍चनांना इतर आवडीच्या गोष्टींकडे आकर्षित करून दियाबलाने तसे केल्यास त्याला अतिशय आनंद होईल. ख्रिश्‍चनांना भूतविद्येमध्ये गोवणाऱ्‍या गूढ किंवा तशा वाटणाऱ्‍या पद्धतींकडे तो आकर्षित करण्यात यशस्वी झाला तर त्याला अधिकच आनंद होईल.—१ पेत्र ५:८.

ख्रिस्ती मोशेच्या नियमशास्त्राधीन नसले, तरी गूढ पद्धतींविषयी यहोवा देवाच्या मनोवृत्तीत बदल झालेला नाही. आधी उल्लेखिल्याप्रमाणे देवाने इस्राएलांना आज्ञा दिली होती, की “चेटूक करणारा, शकुनमुहूर्त पाहणारा, मंत्रतंत्र करणारा, जादूगार, वशीकरण करणारा” असा त्यांच्यापैकी कोणी नसावा. “जो कोणी असली कृत्ये करितो त्याचा परमेश्‍वराला [यहोवा, NW] वीट आहे . . . तू आपला देव परमेश्‍वर [यहोवा] ह्‍याच्याशी सात्विकतेने वाग.”—अनुवाद १८:१०-१३.

यास्तव ख्रिश्‍चनांनी आज ‘देवाची शस्रसामग्री धारण करणे’ किती सुज्ञतेचे आहे “कारण आपले झगडणे . . . आकाशातल्या दुरात्म्यांबरोबर आहे”!—इफिसकर ६:११, १२.

[तळटीपा]

a अनेक वैद्य अजूनही शामन, मांत्रिक किंवा अशाचप्रकारे बरे करणाऱ्‍यांचा सल्ला घेतात. शामन हा “आजाऱ्‍यांना बरे करण्यास, गुप्त गोष्टीचे भविष्य सांगण्यास, व घटनांवर नियंत्रण ठेवण्यास जादूटोण्याचा वापर करणारा याजक असतो.” मांत्रिक किंवा शामन औषधी वनस्पती आणि दुरात्मिक प्रकार (गूढ शक्‍तीला प्रवृत्त करणारे) एकत्र मिसळू शकतात. अशाप्रकारची ही भूतविद्या बरी करणारी असली तरी निष्ठावान ख्रिस्ती त्यात भागी होण्याचे काळजीपूर्वक टाळतील.—२ करिंथकर २:११; प्रकटीकरण २:२४; २१:८; २२:१५.

b हे एक सर्वसाधारण वर्णन आहे, पण चाचणी घेण्याच्या पद्धती विविध असू शकतात. उदाहरणार्थ, वश झालेल्यास स्वतःचा अंगठा आणि तर्जनी एकत्र दाबण्यास सांगितले जाते आणि उपचार करणारा त्यांना वेगळे करण्याचा प्रयत्न करतो.

c ती लिहिते: “या चमत्कारिक वाटणाऱ्‍या घटना कशा घडतात? . . . मी वापरत असलेल्या पद्धतीला हात ठेवणे, विश्‍वासाने बरे करणे किंवा आध्यात्मिक बरे करणे असे म्हटले जाते. ही गूढ पद्धत मुळीच नाही, पण सरळ आहे . . . प्रत्येकाचे ऊर्जा क्षेत्र किंवा शारीरिक देहा-सभोवतालचे तेजोमंडल असते आणि हे तेजोमंडल शरीरात शिरते. हे ऊर्जा क्षेत्र आरोग्याशी अगदी जवळून संबंधित आहे. . . . उच्च आकलन एक प्रकारचे ‘पाहणे’ आहे व त्यात तुमच्या सामान्य दृष्टीचा वापर न करता तुम्ही मनामध्ये एक चित्र उभे करता. ही केवळ कल्पना नव्हे. कधीकधी याचा उल्लेख दृष्टिआड असणाऱ्‍या गोष्टी पाहण्याची दिव्य दृष्टी असा केला जातो.”

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा