मनुष्य देवाच्या प्रतिरूपाचा कसा असू शकतो?
प्रेरित अहवाल म्हणतो की, “देवाने आपल्या प्रतिरुपाचा मनुष्य निर्माण केला; देवाचे प्रतिरूप असा तो निर्माण केला; नर व नारी अशी ती निर्माण केली.” परंतु याचा काय अर्थ होतो? पहिल्या पुरूष व स्त्रीला देवाच्या प्रतिरूपाचे कशाप्रकारे निर्माण केले होते?—उत्पत्ती १:२७.
ते शारीरिकरित्या देवासारखे होते का? नाही, ते अशक्य आहे. मनुष्य, मानव, दैहिक असून त्याला पृथ्वीवर राहण्याकरता बनवले. देव आत्मा आहे, व कोणीही मानव त्याच्या जवळ जाऊ शकणार नाही अशा कल्पनातीत स्वर्गीय महिमेत राहतो. (निर्गम ३३:१८-२०; १ करिंथकर १५:५०) तर मग, मनुष्याला देवाच्या प्रतिरूपाचे कशाप्रकारे निर्माण केले? त्यात मनुष्याला देवाचे उल्लेखनीय गुण—प्रीती, न्याय, बुद्धी, आणि सामर्थ्य—तसेच इतर गुण प्रकट करण्याची क्षमता देण्यात आली.
यहोवाचे गुण
यहोवा देवाचे गुण त्याच्या सर्व निर्मितीत प्रदर्शित होतात, परंतु ते, पहिल्या मानवी जोडप्यासोबत, आदाम आणि हव्वेसोबत व्यवहार करताना नाट्यमयरित्या दिसले. (रोमकर १:२०) त्याने अगदी उचितपणे पृथ्वीची निर्मिती, मनुष्य तिजवर राहण्याकरता करून त्याद्वारे त्याचे प्रेम प्रगट केले. यहोवाने पुरूषासाठी त्याची सहचरी व त्याच्या मुलांची माता होण्यासाठी परिपूर्ण पत्नीची निर्मिती केली. त्याने या दोघांना सुंदर बागेत ठेवले आणि कायम जिवंत व आनंदाने राहण्यासाठी त्यांना लागणाऱ्या आवश्यक गोष्टी भरपूर दिल्या. सर्वाधिक आश्चर्याचे म्हणजे, देवाने त्यांना अनंतकाळ जिवंत राहण्याची संधी दिली.—उत्पत्ती २:७-९, १५-२४.
पहिल्या मानवी जोडप्याची परीक्षा घेताना देवाची बुद्धी दिसून आली. त्यांना यहोवाच्या सार्वत्रिक कुटुंबातील सदस्य रहावयाचे असल्यास व मानवजातीचे पालक या नात्याने त्यांना अनंतकाळ जगावयाचे असल्यास, विश्वासूपणा व खऱ्या उपासनेत त्यांनी उदाहरणशील असण्याची आवश्यकता होती. या कारणास्तव, या उचित परीक्षेद्वारे यहोवाने त्यांच्या हृदयाची स्थिती प्रदर्शित करण्याची संधी त्यांना दिली—त्यांनी बऱ्या वाईटाचे ज्ञान करून देणाऱ्या झाडाचे फळ खायचे नव्हते. मानवांसाठी यहोवाच्या मनात असलेला अद्भुत विशेषाधिकार त्यांना देण्याआधी, त्यांची आज्ञाधारकता व त्याच्यावर असलेले प्रेम शाबीत करण्यासाठी संधी देणे, त्याच्यावतीने किती सुज्ञतेचे होते बरे!
देवाचा न्याय, त्याच्या निर्मितींवर त्याचे उच्च दर्जे पाळण्यासंबंधाने त्याने केलेला आग्रह तसेच त्या दर्जांची हातमिळवणी न करण्यामध्ये दिसून आला. ही गोष्ट, जे बरोबर आहे ते करण्यासाठी आदाम आणि हव्वेला प्रत्येक संधी देण्याकरवी दिसून आली. असे करण्यात ते अपयशी झाले तेव्हा, बंडखोरासाठी दिलेली शिक्षा भोगण्याची अंमलबजावणी करताना त्याचा न्याय दिसून आला.
यहोवाचे सामर्थ्य, त्याने बजावलेल्या शिक्षेला अंमलात आणण्याद्वारे दिसून आले. मोठा बंडखोर, सैतानाने यहोवा लबाड असल्याचे दर्शवले होते, व हव्वेने देवाची आज्ञा मोडली तर तिला मोठ्या गोष्टी त्याने देऊ केल्या होत्या. (उत्पत्ती ३:१-७) परंतु सैतान त्या पुरवू शकला नाही. आदाम आणि हव्वेला एदेन बागेतून काढण्यास तो यहोवाला रोखू शकला नाही, तसेच देवाने आदामाला म्हटलेल्या शब्दांच्या पूर्णतेला देखील त्याला टाळता आले नाही: “तू माती आहेस आणि मातीला परत जाऊन मिळशील.” (उत्पत्ती ३:१९) परंतु, यहोवाने लगेच मृत्युची शिक्षा दिली नाही, याबाबतीत पुढे त्याने त्याचे प्रेम प्रदर्शित केले. त्याने आदाम आणि हव्वेला मुले प्रसवण्यास परवानगी दिली, जेणेकडून मानवजातीसाठी असलेल्या त्याच्या मुळ उद्देशाची पूर्तता होऊ शकेल.—उत्पत्ती १:२८.
शेवटी, यहोवा देवाचा न्याय, प्रीती, सामर्थ्य, आणि बुद्धी, सैतानाच्या कामाचा नाश तसेच, पहिल्या बंडखोरामुळे ईश्वरी सार्वभौमत्त्वाविरूद्ध आलेल्या वाईट परिणामांना काढून टाकणाऱ्या संतानाला पुरवण्याच्या अभिवचनात प्रगट झाला. (उत्पत्ती ३:१५) खरोखर, आमचा किती अद्भुत निर्माणकर्ता आहे!
देवाचे अनुकरण करण्याचे प्रयत्न
मानव, परिपूर्ण नसताना देखील देवाच्या गुणांना प्रदर्शित करू शकतात. यास्तव, पौलाने त्याच्या काळातील ख्रिश्चनांना उत्तेजन दिले: “देवाची प्रिय मुले या नात्याने तुम्ही त्याचे अनुकरण करणारे व्हा.” (इफिसकर ५:१) तथापि, संपूर्ण इतिहासभरात, अनेकांनी देवाच्या गुणांना अत्यंत अनादर दाखवला आहे. नोहाच्या काळापर्यंत लोक इतके भ्रष्ट होते की, देवाने नोहा आणि त्याच्या कुटुंबाव्यतिरिक्त सर्व मानवजातीचा नाश करण्याचे ठरवले. नोहा “आपल्या काळच्या लोकांमध्ये नीतिमान [न्यायी] व सात्विक मनुष्य होता” व देवाच्या आज्ञांचे पालन करण्याद्वारे त्याने त्याच्यावरील प्रेम प्रदर्शित केले.a “नोहाने तसे केले; देवाने त्याला जे सांगितले ते त्याने केले.” (उत्पत्ती ६:९, २२) नोहाने “नीतिमत्त्वाचा उपदेशक” असण्याद्वारे सहमानवांसाठी त्याचे प्रेम व न्यायासोबत त्याचा जिव्हाळा प्रदर्शित केला. (२ पेत्र २:५) त्याने त्याची बुद्धी प्रदर्शित केली व देवाच्या निर्देशनाप्रमाणे मोठे तारू बांधण्यास, त्यात अन्नसामुग्री साठवण्यास, प्राण्यांना गोळा करण्यास, आणि यहोवाच्या आज्ञेनुसार जहाजात जाण्याकरवी त्याच्या शारीरिक सामर्थ्याचा योग्यपणे वापर केला. त्याच्या दुष्ट शेजाऱ्यांनी त्याला भ्रष्ट करू न देण्याकरवी त्याने नीतिमत्तासाठी प्रीती प्रदर्शित केली.
पवित्र शास्त्र, इतर अनेकांनी अशाचप्रकारे प्रदर्शित केलेल्या ईश्वरी गुणांचे वर्णन करते. देवाच्या पूर्णपणे प्रतिरुपात असलेला, येशू ख्रिस्त सर्वात प्रमुख होता व यामुळे तो म्हणू शकला: “ज्याने मला पाहिले आहे त्याने पित्याला पाहिले आहे.” (योहान १४:९) येशूने दाखवलेल्या गुणांपैकी, त्याचे प्रेम हा उल्लेखनीय गुण होता. पिता व मानवांसाठी असलेल्या त्याच्या प्रेमामुळे त्याने त्याचे स्वर्गीय घर सोडले व मनुष्य या नात्याने तो पृथ्वीवर राहिला. त्यामुळे त्याला नीतिमान वर्तणूकीद्वारे पित्याची महिमा करण्यास व मानवजातीतील तारणाच्या सुवार्तेचा प्रचार करण्यास प्रवृत्त केले. (मत्तय ४:२३; योहान १३:३१) मग, प्रीती या गुणानेच मानवजातीच्या तारणासाठी येशूला त्याचे परिपूर्ण जीवन अर्पण करण्यास व अधिक महत्त्वाचे म्हणजे, यहोवा देवाच्या नावाचे पवित्रीकरण करण्यासाठी प्रवृत्त केले. (योहान १३:१) देवाचे अनुकरण करण्याचा यत्न करताना, अनुकरण करण्यासाठी येशू ख्रिस्तापेक्षा अधिक चांगले कोणाचे उदाहरण आहे का?—१ पेत्र २:२१.
आज आम्ही देवासारखे कसे होऊ शकतो?
आज आम्ही देवाच्या गुणांना प्रदर्शित करून देवाच्या प्रतिरुपाचे कसे होऊ शकतो? तर मग प्रथम प्रीती या गुणाचा विचार करा. येशूने म्हटले: “तू आपला देव परमेश्वर [यहोवा, NW] ह्याच्यावर पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण जिवाने व पूर्ण मनाने प्रीती कर.” आम्ही देवाबद्दल प्रीती कशी दाखवतो? प्रेषित योहान उत्तर देतो: “देवावर प्रीती करणे म्हणजे, त्याच्या आज्ञा पाळणे होय; आणि त्याच्या आज्ञा कठीण नाहीत.”—मत्तय २२:३७; १ योहान ५:३.
यहोवाच्या आज्ञांचे पालन करण्यासाठी निश्चितच, त्या आम्हाला माहीत असल्या पाहिजे. असे करण्यात देवाचे वचन, पवित्र शास्त्र आणि पवित्र शास्त्रीय प्रकाशनांचे वाचन, अभ्यास, आणि त्यावर मनन करण्याचा समावेश होतो. स्तोत्रकर्त्याप्रमाणे आम्हाला म्हणता आले पाहिजे: “अहाहा, तुझे नियमशास्र मला किती प्रिय आहे! दिवसभर मी त्याचे मनन करतो.” (स्तोत्रसंहिता ११९:९७) देवाच्या वचनाची अधिकाधिक समज आम्हाला मिळत जाईल तसे, देव ज्या प्रकारे विचार करतो तसा करण्यास आम्हाला प्रेरणा मिळेल. आम्ही नीतिमत्तेची आवड व दुष्टाईचा द्वेष करू लागतो. (स्तोत्रसंहिता ४५:७) याच बाबतीत आदामाने चूक केली. त्याला यहोवाचे नियम माहीत होते, परंतु त्यांना जडून राहण्याइतके प्रेम केले नाही. देवाचे वचन वाचताना आम्ही सतत स्वतःला विचारले पाहिजे, ‘ते मला कसे लागू होते? माझी वर्तणूक देवाच्या गुणांच्या एकवाक्यतेत आणण्यासाठी मी काय करू शकतो?’
येशूने असे देखील म्हटले: “तू आपल्या शेजाऱ्यावर स्वतःसारखी प्रीती कर.” (मत्तय २२:३९) प्रत्येक सुदृढ व्यक्ती स्वतःवर प्रीती करतो व स्वतःसाठी चांगले ते त्याला हवे असते. ते चुकीचे नाही. परंतु त्याच तोडीचे प्रेम आम्ही शेजाऱ्यांच्या बाबतीत दाखवतो का? आम्ही: “एखाद्याचे बरे करणे उचित असून ते करण्याचे तुझ्या अंगी सामर्थ्य असल्यास ते करण्यास माघार घेऊ नको,” या पवित्र शास्त्रीय आज्ञेचे अनुकरण करतो का?—नीतीसूत्रे ३:२७; गलतीकर ६:१०.
बुद्धी या गुणाबद्दल काय? पवित्र शास्त्र, ईश्वरी बुद्धीचे भांडार असल्यामुळे, हा गुण प्रदर्शित करण्याचा आमचा शोध पवित्र शास्त्राचा अभ्यास करण्याकडे निरवतो. स्तोत्रसंहिता ११९:९८-१०० असे वाचले जाते: “तुझ्या आज्ञा मला आपल्या वैऱ्यांपेक्षा अधिक सूज्ञ करतात, कारण त्या सदोदित माझ्या जवळच आहेत. माझ्या सर्व शिक्षकांपेक्षा मी अधिक समंजस आहे. कारण मी तुझ्या निर्बंधांचे मनन करतो. वयोवृद्धांपेक्षा मला अधिक कळते, कारण मी तुझे विधी पाळतो.” नीतीसूत्रे ३:१८ मध्ये बुद्धीचे वर्णन “जीवनवृक्षा”सारखे केले आहे. आम्ही बुद्धी प्राप्त करून तिचा वापर केल्यास, आम्हाला देवाची संमती व अनंतकाळच्या जीवनाचे प्रतिफळ मिळेल.—उपदेशक ७:१२.
आता न्याय या गुणाविषयी काय? या दुष्ट जगात, देवाला खूष करण्याची इच्छा असलेल्यांसाठी न्याय हा गुण अत्यावश्यक आहे. येशूला नीतिमत्तेची (न्यायाची) चाड आणि स्वैराचाराचा वीट होता. (इब्रीयांस १:९) ख्रिस्ती देखील आज असेच करतात. न्याय त्यांना चांगल्या गुणांची गुणग्राहकता बाळगण्यास प्रेरणा देतो. ते या जगाच्या अन्यायी मार्गांना टाळतात आणि देवाची इच्छा करण्याला त्यांच्या जीवनात प्रथम स्थानी ठेवतात.—१ योहान २:१५-१७.
सामर्थ्याचा विचार करताना, आम्हा सर्वांजवळ ते काही प्रमाणात असते. स्वाभाविकपणे, आम्हाजवळ शारीरिक आणि बौद्धिक सामर्थ्य आहे, ख्रिस्ती या नात्याने वाढत असताना, आध्यात्मिक अर्थाने आम्ही सामर्थ्यात वाढ करतो. यहोवा त्याच्या पवित्र आत्म्याद्वारे आमच्या सामर्थ्यात एवढी भर टाकतो की, आम्ही कमजोर असतानाही त्याची इच्छा पूर्ण करू शकतो. पौलाने म्हटले: “मला जो सामर्थ्य देतो त्याच्याकडून मी सर्व काही करावयास शक्तीमान आहे.” (फिलिप्पैकर ४:१३) यहोवाच्या आत्म्यासाठी प्रार्थना केल्यास तेच बळ आम्हाला देखील मिळू शकेल.
सुवार्तेचा प्रचार करणे
देवाच्या या चार प्रमुख गुणांचे प्रदर्शन, आज्ञेचे पालन करण्यात चांगल्या प्रकारे दिसते: “तेव्हा तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रांतील लोकांस शिष्य करा, त्यांस पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या; जे काही मी तुम्हाला आज्ञापिले ते सर्व त्यांस पाळावयास शिकवा. आणि पाहा! युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्याबरोबर आहे.” (मत्तय २८:१९, २०) अशाप्रकारच्या शैक्षणिक कार्याला प्रतिसाद देणाऱ्यांना जीवन देते. बहुतकरून सुरवातीला आम्हाला अगदीच अनोळखी असणाऱ्यांसाठी प्रीतीचे हे किती उत्कृष्ट प्रदर्शन!
शिवाय, असे शिक्षण बुद्धीचा मार्ग आहे. ते धीराने टिकणारे फळ देते. आणखी कोणत्या कार्याच्याबाबतीत असे म्हटले जाऊ शकते की: “असे केल्याने तू स्वतःचे व तुझे ऐकणाऱ्यांचेही तारण साधशील”? (१ तीमथ्य ४:१६) शिष्य बनविण्याच्या कार्यात, कोणी काही गमावणार नाही. ऐकणाऱ्या आणि शिकवणाऱ्या दोघांनाही सार्वकालिक आशीर्वाद मिळतात.
न्यायाविषयी बोलायचे झाले तर, ख्रिस्ती लोक त्यांच्या पवित्र शास्त्र विद्यार्थ्यांना न्याय्य आणि नीतिमान तत्त्वे शिकवतात. आम्ही त्यांना “न्यायी देव” यहोवाची सेवा करण्यास मदत करत आहोत. (मलाखी २:१७) यहोवाची सेवा करण्यासाठी जे स्वतःच्या जीवनाचे त्याला समर्पण करून विश्वासूपणात अनुकरण करत आहेत त्यांना नीतिमान, समर्थन केलेले, त्यांच्या बचावाला आर्मगिदोनाप्रत निरवणारे, असे घोषित केले जाते.—रोमकर ३:२४; याकोब २:२४-२६.
संपूर्ण जगभरात सुवार्तेचा प्रचार करणे व शिक्षण देणे हे सामर्थ्याचे किती मोठे प्रदर्शन आहे! (मत्तय २४:१४) बहुतेक लोकांची ऐकण्याची इच्छा नसते अशा क्षेत्रात, सतत प्रचार करत राहण्यासाठी धैर्य लागते. परंतु यहोवा त्याच्या आत्म्याद्वारे, धीराने शेवटपर्यंत टिकून रहाण्यासाठी आवश्यक ते बळ देतो.—यशया ४०:३०, ३१; मत्तय २४:१३; लूक ११:१३.
आदामाची अपरिपूर्ण संतती असताना, या गुणांना आम्ही पूर्णपणे कृतीत उतरवू शकत नाही हे खरे आहे. तरीसुद्धा, याची आठवण करा की, मनुष्याला देवाच्या प्रतिरूपाचा निर्माण केले होते आणि आम्ही अधिकाधिक देवासारखे होण्याचा कसून प्रयत्न केल्यास, आमच्या अस्तित्त्वाच्या कारणाला काही अंशी आम्ही पूर्ण करीत आहोत. (उपदेशक १२:१३) आम्ही उत्तम ते करण्यासाठी आमच्या वतीने कसून प्रयत्न केला व चुका झाल्यास त्याची क्षमा मागितली, तर मग आम्ही देवाच्या नीतिमान नवीन जगात बचावण्याची आशा करू शकतो जेथे आम्हाला शेवटी परिपूर्णता प्राप्त होऊ शकेल. मग, यहोवा देवाच्या गुणांच्या पूर्णतेत प्रदर्शन करणाऱ्या, सर्व परिपूर्ण मानवांनी वस्ती केलेल्या नंदनवनमय पृथ्वीवर आपण राहू. केवढा तो आनंद! शेवटी, अभिव्यक्तीच्या पूर्ण अर्थाने, मानव देवाच्या प्रतिरुपाचे असतील.
[तळटीपा]
a “नीतिमान” व “न्यायी” यांचा जवळचा संबंध आहे. ग्रीक शास्त्रवचनात, डीʹकाय·ओस हा एकच शब्द त्यांना चित्रित करतो.
[२५ पानांवरील चित्रं]
येशूने, यहोवाच्या ईश्वरी गुणांना कसे विकसित करावे हे आम्हाला दाखवले
[२६ पानांवरील चित्रं]
शेवटी, मानव संपूर्ण अर्थाने देवाच्या प्रतिरुपाचे होतील