“ह्या गोष्टी केव्हा होतील ते आम्हास सांगा”
“नव्या गोष्टी मी विदित करतो. त्यास आरंभ होण्यापूर्वी, त्या तुम्हास ऐकवतो.”—यशया ४२:९.
१, २. (अ) येशूच्या प्रेषितांनी भविष्याबद्दल त्याला काय विचारले? (ब) संयुक्त चिन्हाच्या, येशूने दिलेल्या प्रत्युत्तरात कशी पूर्णता मिळते?
ईश्वरी शिक्षणाचा उगम यहोवा देव आहे व ते त्याच्यापासून येते, जो “आरंभीच शेवट कळवितो.” (यशया ४६:१०) मागील लेखाने दाखवल्यानुसार, प्रेषितांनी असे शिक्षण येशूकडून प्राप्त करण्याचे प्रयत्न करताना त्यांनी विचारले: “ह्या गोष्टी कधी घडतील? आणि ह्या सर्व गोष्टी पूर्ण होण्याच्या सुमारास आल्या म्हणजे काय चिन्ह होईल हे आम्हास सांगा?”—मार्क १३:४.
२ उत्तर देताना, येशूने अशा घटनांचे मिळून बनलेल्या एका संयुक्त “चिन्हा”चे वर्णन दिले जे, यहूदी व्यवस्थेचा लवकरच अंत होणार याचा पुरावा देत होते. सामान्य युग ७० मध्ये यरुशलेमेचा नाश झाल्याने याची पूर्णता झाली. परंतु येशूच्या भविष्यवाणीची मोठी पूर्णता भवितव्यात काळाच्या ओघात अनेक वर्षांनंतर होणार होती. “परराष्ट्रीयांची सद्दी” एकदाची १९१४ मध्ये समाप्त झाल्यावर एक चिन्ह विस्तीर्ण प्रमाणात प्रकट होणार होते, व ते दाखवून देणार होते की, लवकरात लवकर सध्याचे दुष्ट व्यवस्थिकरण “मोठे संकट” यात समाप्त होईल.a (लूक २१:२४) आज जिवंत असलेले लक्षावधी लोक, या चिन्हाची महायुद्धांमध्ये आणि २०व्या शतकातील इतर भयानक घटनांमध्ये पूर्णता झाल्याची साक्ष देऊ शकतील. ह्या घटना येशूच्या भविष्यवाणीच्या मोठ्या पूर्णतेला देखील चिन्हित करतात आणि ही आधुनिक पूर्णता सामान्य युग ३३ ते ७० मध्ये जे काही घडले त्याचा नमुना आहे.
३. दुसरे चिन्ह सांगताना, येशूने कोणत्या विस्तारीत वाढीबद्दल भाकीत केले?
३ लूकच्या शुभवर्तमानाने परराष्ट्रीयांच्या सद्दीचा उल्लेख केल्यानंतर, मत्तय, मार्क आणि लूकमधील समांतर अहवाल पुढील घडामोडींच्या मालिकेचे वर्णन करतात, ज्यामध्ये ‘ह्या युगाच्या समाप्तीचे चिन्ह’ या संयुक्त चिन्हामध्ये आणखी चिन्ह समाविष्ट आहे. (मत्तय २४:३) (१५ व्या पृष्ठावर या मुद्याला दुहेरी ठिपक्यांच्या रेषेने रेखांकित केले आहे.) मत्तय म्हणतो: “त्या दिवसांतील संकटा नंतर लागलेच सूर्य अंधकारमय होईल, चंद्र प्रकाश देणार नाही, तारे आकाशातून पडतील व आकाशाची बळे डळमळतील. तेव्हा मनुष्याच्या पुत्राचे चिन्ह आकाशात प्रकट होईल, मग पृथ्वीवरील सर्व जातीचे लोक शोक करतील, आणि ते मनुष्याच्या पुत्राला आकाशातल्या मेघांवर आरुढ होऊन पराक्रमाने व मोठ्या वैभवाने येताना पाहतील. कर्ण्याच्या महानादाबरोबर तो आपल्या दूतांस पाठवील, आणि ते आकाशाच्या एका सीमेपासून दुसऱ्या सीमेपर्यंत त्याच्या निवडलेल्यांस चाऱ्ही दिशांकडून जमा करतील.”—मत्तय २४:२९-३१.
संकट आणि भव्य अपूर्व घटना
४. येशूने उद्धृत केलेल्या भव्य अपूर्व घटनांविषयी कोणते प्रश्न उपस्थित होतात?
४ त्याची पूर्णता केव्हा होणार होती? आम्ही ज्यांना भव्य अशा अपूर्व घटना म्हणतो त्या सूर्य आणि चंद्राचे अंधकारमय होणे आणि आकाशातून ताऱ्यांचे पडणे यांचा उल्लेख तिन्ही शुभवर्तमाने करतात. येशूने म्हटले की या गोष्टी “संकटा” नंतर घडतील. यामुळे एक प्रश्न उभा राहतो: सामान्य युग ७० मध्ये जो संकटाचा कळस गाठला गेला तो येशूच्या ध्यानात होता, किंवा आमच्या आधुनिक दिवसातील भवितव्यात असलेल्या मोठ्या संकटाबद्दल तो येथे बोलत होता का?—मत्तय २४:२९; मार्क १३:२४.
५. आधुनिक दिवसातील संकटाबद्दल कोणता दृष्टिकोन पूर्वी होता?
५ परराष्ट्रीयांची सद्दी १९१४ मध्ये संपल्यापासून, देवाचे लोक “मोठ्या संकटा”च्या बाबतीत फार उत्सुक होते. (प्रकटीकरण ७:१४) अनेक वर्षांपर्यंत त्यांना वाटत होते की, आधुनिक-दिवसाच्या मोठ्या संकटाचा पहिल्या महायुद्धाच्या काळाला सूचित करणारा उघड भाग असेल, मग अडथळ्याचा मधला काळ, आणि शेवटी समाप्तीचा भाग, ‘सर्वसमर्थ देवाची त्या मोठ्या दिवसाची लढाई.’ असे असल्यास, “युगाची समाप्ती”च्या मध्यंतराच्या दशकांदरम्यान काय होईल?—प्रकटीकरण १६:१४; मत्तय १३:३९; २४:३; २८:२०.
६. भव्य अपूर्व घटनांविषयी येशूच्या भविष्यवाणीची पूर्णता होण्याबद्दल काय विचार केला जात होता?
६ मध्यंतराच्या काळात संयुक्त चिन्ह तसेच देवाच्या एकत्रित लोकांचे कार्य झालेले दिसेल असे वाटले होते. भाकित केलेल्या भव्य अपूर्व घटना १९१४-१८ च्या सुरवातीच्या टप्प्यांत घडण्याची अपेक्षा केली गेली. (मत्तय २४:२९; मार्क १३:२४, २५; लूक २१:२५) आकाशातील अक्षरार्थ गोष्टींवर—अंतरिक्षातून परत माहिती पाठविणारी साधने, रॉकेटस्, अंतरिक्षातून पृथ्वीकडे येणारे शक्तीचे किरण किंवा अतिलघू लहरींची किरणे, व चंद्रावर उतरणे यावर लक्ष केंद्रित केले गेले.
७. मोठ्या संकटाबद्दल कोणती अद्ययावत समज पुरवली गेली?
७ तथापि, जानेवारी १५, १९७० च्या वॉचटावरने येशूच्या भविष्यवाणीचे व खासपणे येणाऱ्या महासंकटाबद्दल पुन्हा परीक्षण केले. त्याने दाखवले की, पहिल्या शतकात जे काही घडले त्याच्या अनुषंगाने पाहता, दशकभराच्या मध्यंतराचा व नंतर पुनरारंभास, आधुनिक संकटाचा १९१४-१८ मध्ये उघडपणे भाग असू शकत नाही. त्या मासिकाने असा समारोप केला: “पुन्हा कधीही येणार नाही असे ‘मोठे संकट’ पुढे ठेपलेले आहे, कारण सर्व खोट्या धर्मसाम्राज्याच्या (ख्रिस्ती धर्मराज्यासहित) नाशानंतर हर्मगिदोनात, ‘सर्वसमर्थ देवाच्या त्या मोठ्या दिवसाची लढाई’ असा याचा अर्थ होतो.
८. आधुनिक संकटाच्या अद्ययावत दृष्टिकोनानुसार, मत्तय २४:२९ ची स्पष्टता कशी दिली?
८ परंतु मत्तय २४:२९ म्हणते की भव्य अशा अपूर्व घटना “संकटानंतर लागलेच” येतात. ते कसे असू शकते? मे १, १९७५ च्या द वॉचटावरने सुचविले की येथे म्हटलेले “संकट” याचा अर्थ, सामान्य युग ७० मध्ये ज्या संकटाचा कळस गाठला गेला तो आहे. परंतु कोणत्या अर्थाने असे म्हटले जाऊ शकत होते की भव्य अशा अपूर्व घटना आमच्या काळात सामान्य युग ७० मधील घटनेनंतर “लागलेच” घडल्या गेल्या? असा विवाद प्रस्तुत करण्यात आला होता की, देवाच्या दृष्टीत मधली शतके संक्षिप्त असतील. (रोमकर १६:२०; २ पेत्र ३:८) तथापि, ह्या भविष्यवाणीचे व विशेषकरून मत्तय २४:२९-३१ वचनातील भविष्यवाणीचे खोलवर परिक्षण एका वेगळ्याच स्पष्टीकरणाकडे निर्देश करते. याद्वारे, प्रकाश “मध्यान्हापर्यंत उत्तरोत्तर वाढणाऱ्या उदयप्रकाशासारखा कसा आहे” याची स्पष्टता मिळते. (नीतीसूत्रे ४:१८)b नवे किंवा बदल झालेले स्पष्टीकरण उचित का आहे, त्याचा आपण विचार करू या.
९. आकाशातील घडामोडींबद्दल येशूच्या शब्दांना इब्री शास्त्रवचने कशी पार्श्वभूमी पुरवितात?
९ येशूने त्याच्या चार शिष्यांना, ‘सूर्याचे अंधकारमय होणे, चंद्र प्रकाश देणार नाही आणि आकाशातून ताऱ्यांच्या गळून पडण्याचे’ भविष्य कथन केले होते. यहूद्यांना ही भाषा इब्री शास्त्रवचनातील लिखाणामुळे ओळखता येऊ शकत होती, उदाहरणासाठी सफन्या १:१५ मध्ये देवाच्या न्यायाच्या दिवसाला ‘विध्वंसाचा व उजाडीचा दिवस, अंधकाराचा व उदासीनतेचा दिवस, अभ्रांचा व निबिड अंधकाराचा दिवस’ असे म्हटले आहे. अनेक इब्री संदेष्ट्यांनी देखील सूर्याचे अंधकारमय होणे, चंद्राचे प्रकाश न देणे, आणि ताऱ्यांचे प्रकाश न देणे यासारखेच वर्णन केले आहे. बाबेल, एदोम, इजिप्त (मिसर) आणि इस्राएलच्या उत्तरेकडच्या राज्याविरुद्ध दिलेल्या ईश्वरी संदेशामध्ये तुम्हाला अशा प्रकारची भाषा आढळून येईल.—यशया १३:९, १०; ३४:४, ५; यिर्मया ४:२८; यहेज्केल ३२:२, ६-८; आमोस ५:२०; ८:२, ९.
१०, ११. (अ) आकाशातील गोष्टींबद्दल योएलची भविष्यवाणी काय होती? (ब) सामान्य युग ३३ मध्ये योएलच्या भविष्यवाणीतील कोणत्या गोष्टींची पूर्णता झाली होती, आणि कोणत्या गोष्टींची झाली नव्हती?
१० येशूने जे काही सांगितले ते ऐकल्यावर, पेत्र आणि इतर तीन जणांना योएल २:२८-३१ आणि ३:१५ मध्ये दिलेली योएलची भविष्यवाणी आठवली असावी: “मी मनुष्यमात्रावर आपल्या आत्म्याचा वर्षाव करीन. तेव्हा तुमचे पुत्र व तुमच्या कन्या संदेश देतील . . . मी आकाशात व पृथ्वीवर रक्त, अग्नि व धुराचे लोळ अशी चिन्हे दाखवीन. यहोवाचा महान व भयंकर दिवस येण्यापूर्वी सूर्य अंधकारमय व चंद्र रक्तमय होईल.” “सूर्य आणि चंद्र काळे पडले आहेत, तारे प्रकाशावयाचे थांबतात.”
११ प्रे. कृत्ये २:१-४ आणि १४-२१ मध्ये उद्धृत केल्यानुसार, सामान्य युग ३३ पेंटेकॉस्टच्या दिवशी, देवाने त्याचा पवित्र आत्मा दोन्ही स्री आणि पुरुष अशा १२० शिष्यांवर ओतला. तेथे प्रेषित पेत्राने हे दाखवून दिले की हे योएलने भाकीत केल्याप्रमाणे घडले. परंतु सूर्य आणि चंद्र काळे पडले आहेत, तारे प्रकाश देण्यापासून थांबले या योएलच्या शब्दांविषयी काय? सामान्य युग ३३ मध्ये किंवा यहूदी व्यवस्थेचा अंत झाल्याच्या ३० वर्षाच्या कालावधीत हे पूर्ण झाले याबद्दलचा कोणताही संकेत मिळत नाही.
१२, १३. योएलने भाकीत केलेल्या कोणत्या भव्य अपूर्व घटनांची पूर्णता झाली?
१२ स्पष्टपणे, योएलच्या भविष्यवाणीचा हा शेवटला भाग “यहोवाचा महान व भयंकर दिवस”—यरुशलेमेचा नाश याजशी अगदी जवळून संबंधीत आहे. नोव्हेंबर १५, १९६६ च्या द वॉचटावरने, सामान्य युग ७० मध्ये यरुशलेमावर जे संकट आले त्याबद्दल म्हटले: “यरुशलेम आणि तिच्या लेकरांच्या संदर्भाने तो खरोखरी ‘यहोवाचा महान दिवस’ होता. त्या दिवसाच्या संबंधात खूप प्रमाणात ‘रक्त, अग्नि व धुराचे लोळ’ होते, दिवसाला सूर्याने त्या विध्वंसीत शहरात प्रकाश दिला नाही व चंद्र रात्री चांदीसारखा चंद्रप्रकाश न देणारा, शांतीपूर्ण नसून रक्त सांडणारा काळवंडलेला झाला.”c
१३ होय, इतर भविष्यवाणींचे आम्ही परिक्षण केल्याप्रमाणे, योएलने भाकीत केलेल्या भव्य अपूर्व घटना, यहोवाने न्यायदंड बजावल्यावर पूर्ण होणार होत्या. यहूदी व्यवस्थेचा अंत होण्यासाठी जो वेळ लागला त्या संपूर्ण वेळेवर त्याचा प्रभाव पाडण्याऐवजी, यरुशलेमेविरुद्ध जेव्हा अंमलबजावणीसाठी सेना आली तेव्हा सूर्य, चंद्र आणि तारे अंधकारमय झाले. तर्कशुद्धतेत, योएलच्या भविष्यवाणीच्या मोठ्या प्रमाणात पूर्णतेची आपण त्यावेळी अपेक्षा करू शकतो जेव्हा सध्याच्या व्यवस्थीकरणावर यहोवाची अंमलबजावणी चालू होईल.
भव्य अपूर्व घटनांआधी कोणते संकट?
१४, १५. मत्तय २४:२९च्या असलेल्या आमच्या समजशक्तीवर योएलच्या भविष्यवाणीचा काय परिणाम होतो?
१४ योएलच्या भविष्यवाणीची पूर्णता (समांतर भाषा वापरणाऱ्या इतर भविष्यवाणींच्या अनुषंगाने) मत्तय २४:२९ येथील शब्द समजण्यास आम्हाला मदत करते. स्पष्टत:, सूर्याचे अंधकारमय होणे, चंद्राचे प्रकाश न देणे, आणि ताऱ्यांच्या पडण्याबद्दल येशूने जे म्हटले ते सद्य व्यवस्थीकरणाच्या अंताच्या अनेक दशकांच्या दरम्यान अतंरिक्षात अग्निबाण सोडणे, चंद्रावर उतरणे आणि त्याचप्रकारच्या इतर गोष्टींना सूचित होत नाही. तर, ‘यहोवाचा महान आणि भयंकर दिवस’ याच्याशी संबंधित असणारा जो नाश अजून यायचा आहे त्याच्याशी या गोष्टी संबंधित असल्याचे तो निर्देश करत होता.
१५ हे, त्या भव्य अपूर्व घटना “संकटानंतर लागलेच” कशा येतील हे समजण्यासाठी आम्हाला मदत देते. येशू, सामान्य युग ७० मध्ये कळसाला पोंहचलेल्या संकटाचा उल्लेख करत नव्हता. उलटपक्षी, भवितव्यामध्ये जगीक व्यवस्थेवर येणाऱ्या त्याच्या वचनयुक्त “उपस्थिती”चा कळस गाठणाऱ्या मोठ्या संकटाच्या सुरवातीकडे तो अंगुली दर्शवित होता. (मत्तय २४:३) ते संकट आता आमच्या समोर आहे.
१६. मार्क १३:२४ कोणत्या संकटाबद्दल निर्देश करते, व असे का?
१६ आता मार्क १३:२४ मधील शब्दांबद्दल काय की: “ही संकटे येऊन गेल्यावर त्या दिवसात सूर्य अंधकारमय होईल आणि चंद्र प्रकाश देणार नाही”? येथे “ही” आणि “त्या” हे दोन्ही शब्द ए․कीʹनोस या ग्रीक शब्दाचे वर्णनात्मक सर्वनाम आहे, जे पुढील काळात होणाऱ्या गोष्टींना सुचवते. ए․कीʹनोसचा वापर काहीतरी होऊन गेले (किंवा त्याचा उल्लेख आधी केला गेला) हे सूचित करण्यासाठी किंवा दूरवरच्या भवितव्यात कशासाठी तरी त्याचा उपयोग केला जाऊ शकतो. (मत्तय ३:१; ७:२२; १०:१९; २४:३८; मार्क १३:११, १७, ३२; १४:२५; लूक १०:१२; २ थेस्सलनीकाकर १:१०) यारितीने, मार्क १३:२४ ने “ही संकटे” दर्शवले तेव्हा ती रोमी सैन्यामुळे चेतविलेल्या संकटाला सूचित होत नाही तर सध्याच्या व्यवस्थीकरणाच्या शेवटी यहोवाच्या सामर्थ्यवान कृत्याला ते सूचित करते.
१७, १८. मोठ्या संकटात वाढ कशी होईल याविषयी प्रकटीकरण कोणता प्रकाश टाकते?
१७ मत्तय २४:२९-३१, मार्क १३:२४-२७, व लूक २१:२५-२८ मधील ही अद्ययावत समज प्रकटीकरणाच्या १७ ते १९ अध्यायांबरोबर यथार्थ आणि जुळणारी आहे. कोणत्या अर्थाने? शुभवर्तमाने दाखवतात की मोठ्या संकटाची सुरवात आणि अंत एकाचवेळी होणार नाही. मोठे संकट चालू झाल्यावर मानवजातीतील काही आज्ञाभंजक लोक “मनुष्याच्या पुत्राचे” चिन्ह पाहण्यासाठी, व त्याबद्दल प्रतिक्रिया दाखविण्यासाठी—शोक करण्यासाठी व लूक २१:२६ मध्ये दाखवल्याप्रमाणे “भयाने व जगावर कोसळणाऱ्या अरिष्टांची धास्ती” घेण्यासाठी जिवंत असतील. हे मोठे भय त्यांनी त्यांचा होणारा त्वरित नाश “ते चिन्ह” पाहिल्यामुळे असेल.
१८ प्रकटीकरणातील अहवाल दाखवितो की आंतरराष्ट्रीय “श्वापदाची” लष्करी “शिंगे,” मोठी बाबेल, “मोठी कलावंतीण” हिच्यावर उठतील व तिचा नाश करतील तेव्हा भवितव्यातील मोठ्या संकटाला, सुरवात होईल.d (प्रकटीकरण १७:१, १०-१६) परंतु अनेक लोक वाचतील, कारण खोट्या धर्माचा नाश झाल्यावर राजे, व्यापारी, तांडेल व इतर लोक शोक करतील. निसंशये, अनेक लोकांना, त्यांच्यावर पुढे न्यायदंड बजावला जाईल हे कळून येईल.—प्रकटीकरण १८:९-१९.
काय घडणार आहे?
१९. मोठे संकट सुरू होते तेव्हा आम्ही कशाची अपेक्षा करू शकतो?
१९ मत्तय, मार्क व लूक या शुभवर्तमानातील भाग व प्रकटीकरण १७-१९ अध्याय, हे सर्व मिळून जे लवकरच घडणार आहे त्यावर मोठा प्रकाश टाकतात. देवाच्या नियुक्त समयी, खोट्या धर्माचे जागतिक साम्राज्य, (मोठी बाबेल) याजविरुद्ध एका हल्ल्याने मोठ्या संकटाची सुरवात होईल. हा हल्ला विशेषकरून अविश्वासू यरुशलेमेशी जुळणाऱ्या ख्रिस्ती धर्मजगताविरुद्ध तीव्र असेल. संकटाची ही गोष्ट घडल्यावर “लागलेच नंतर” “सूर्य, चंद्र व तारे यात चिन्हे घडून येतील, आणि पृथ्वीवरील राष्ट्री [अभूतपूर्व रीतीने] घाबरी होऊन पेचात पडतील.”—मत्तय २४:२९; लूक २१:२५.
२०. कोणत्या भव्य अपूर्व घटनांची आम्ही आता अपेक्षा करू शकतो?
२० मग, कोणत्या अर्थाने ‘सूर्य अंधकारमय होईल, चंद्र प्रकाश द्यायचा नाही, आकाशातील तारे पडतील आणि आकाशातील बळे डळमळतील’? निसंशये, मोठ्या संकटाच्या सुरवातीस, धार्मिक जगात “ज्योती”प्रमाणे असलेल्या विख्यात पाळकवर्गाला प्रकटीकरण १७:१६ मध्ये नमूद केलेली “दहा शिंगे” उघड करुन दूर करतील. यात कोणताही संशय नाही की राजकीय शक्तीदेखील डळमळेल. अशा वेळी, स्वाभाविक आकाशातसुद्धा, घाबरुन टाकणाऱ्या घटना होतील का? कदाचित होय, व यहुदी व्यवस्थीकरणाच्या अंताच्या समीप घडलेल्या गोष्टींचे जोसेफस यांनी वर्णिलेल्या घटनांपेक्षा अधिक अद्भुत असतील. प्राचीन समयात देवाने संकटाचे परिणाम घडवण्यासाठी त्याची शक्ती दाखवली याची आम्हाला आठवण आहे. तो पुन्हा ते करु शकतो.—निर्गम १०:२१-२३; यहोशवा १०:१२-१४; शास्ते ५:२०; लूक २३:४४, ४५.
२१. भविष्यातील “चिन्ह” कसे घडून येईल?
२१ या प्रसंगी पुढे होणाऱ्या घडामोडींची ओळख देण्यासाठी तिन्ही शुभवर्तमानाचे लेखक टोʹटे (तेव्हा) या ग्रीक शब्दाचा उपयोग करतात. “नंतर मनुष्याच्या पुत्राचे चिन्ह आकाशात प्रकट होईल.” (मत्तय २४:३०; मार्क १३:२६; लूक २१:२७) पहिल्या महायुद्धापासून येशू ख्रिस्ताच्या खऱ्या शिष्यांनी त्याच्या अदृश्य उपस्थितीच्या संयुक्त चिन्हाला ओळखले आहे, परंतु अनेक लोकांनी ओळखले नाही. तथापि, मत्तय २४:३० पुढे प्रकट होणाऱ्या ‘चिन्हा’कडे म्हणजे मनुष्याच्या पुत्राचे “चिन्ह” याकडे अंगुली दर्शवते, आणि सर्व राष्ट्रांना याची नोंद घेण्यास भाग पाडले जाईल. येशू अदृश्य रुपाने मेघासहित येतो तेव्हा, त्याच्या राजेशाही अधिकाराच्या अद्भुत प्रदर्शनामुळे त्याच्या “येण्याला” (ग्रीक, एरʹखो․माय) जगभरातील विरोध करणाऱ्या सर्व मानवांना ओळखावे लागेल.—प्रकटीकरण १:७.
२२. मत्तय २४:३० मधील “चिन्ह” पाहण्याचा परिणाम काय होईल?
२२ मत्तय २४:३०, पुन्हा एकदा टोʹटे हा शब्द पुढे काय होणार आहे त्याची ओळख करुन देण्यासाठी वापरते. त्यांच्या परिस्थितीच्या परिणामाची समज घडल्यावर रा स्वतःला मारतील व शोक करतील. कदाचित त्यांचा नाश जवळ येऊन ठेपला आहे हे ते ओळखतील. पण, देवाच्या सेवकांची परिस्थिती किती भिन्न असेल, तेव्हा आम्ही आपली डोकी वर करु शकू कारण आपला मुक्तीसमय जवळ आलेला असेल! (लूक २१:२८) स्वर्गात आणि पृथ्वीवर खरे उपासक मोठ्या कलावंतिणीच्या नाशाबद्दल आनंद करतील असे प्रकटीकरण १९:१-६ दाखवते.
२३. (अ) निवडलेल्या जणांसाठी येशू कोणते कार्य करील? (ब) अभिषिक्तांना स्वर्गात घेतले जाण्याबद्दल काय म्हटले जाऊ शकते?
२३ मार्क १३:२७ मध्ये दाखविल्याप्रमाणे येशूची भविष्यवाणी पुढे म्हणते: “त्यावेळेस [टोʹटे] तो देवदूतांना पाठवून चार दिशांकडून अर्थात पृथ्वीच्या सीमेपासून आकाशाच्या सीमेपर्यंत आपल्या निवडलेल्या लोकास एकत्र करील.” येथे येशू पृथ्वीवर अजून हयात असलेल्या “निवडलेल्या” १,४४,००० मधील शेषांवर लक्ष केंद्रित करतो. ह्या व्यवस्थीकरणाच्या समाप्तीच्या आरंभाला येशूच्या अभिषिक्त शिष्यांना ईश्वरशासित ऐक्यतेमध्ये आणले होते. तथापि, येथे उपयोगात आणलेल्या क्रमानुसार मार्क १३:२७ व मत्तय २४:३१ आणखी कशाचे तरी वर्णन करतात. “कर्ण्याच्या महानादाबरोबर” ‘निवडलेल्यामधील’ उरलेल्या जणांना पृथ्वीच्या टोकापासून एकत्रित केले जाईल. त्यांना कशारितीने एकत्र केले जाईल? निःसंशये, शेवटी त्यांना “शिक्कामोर्तब” केले जाईल व यहोवाचे “बोलावलेले व निवडलेले व विश्वासू” जणांचा एक भाग अशी स्पष्टपणे ओळख दिली जाईल. आणि देवाच्या नियुक्त वेळी, त्यांना स्वर्गात राजे आणि याजक होण्यासाठी एकत्रित केले जाईल.e यामुळे त्यांना व त्यांच्या विश्वासू सोबत्यांना, “मोठ्या लोकसमुदायाला” आनंद होईल, “मोठ्या संकटातून” पार होऊन पृथ्वीवरील नंदनवनात अनंतकालिक आशीर्वादांचा आनंद उपभोगण्यासाठी त्यांच्यावर देखील चिन्ह केले जाईल.—मत्तय २४:२२; प्रकटीकरण ७:३, ४, ९-१७; १७:१४; २०:६; यहेज्केल ९:४, ६.
२४. घडणाऱ्या घटनांच्या बाबतीत मत्तय २४:२९-३१ कोणत्या क्रमाला प्रकट करते?
२४ प्रेषितांनी जेव्हा म्हटले, “आम्हास सांगा,” तेव्हा येशूचे प्रत्त्युतर, ते ग्रहण करु शकत होते त्याच्याही पलिकडे होते. तरीसुद्धा, त्यांच्या जीवनकालात, त्याच्या भविष्यवाणीची नमुनेदार पूर्णता पाहण्यासाठी त्यांना आनंद वाटला. नजिकच्या भवितव्यात पूर्ण होणाऱ्या त्याच्या भविष्यवाणीच्या भागावर त्याने दिलेल्या उत्तरावर आमच्या अभ्यासाने प्रकाशझोत टाकला आहे. (मत्तय २४:२९-३१; मार्क १३:२४-२७; लूक २१:२५-२८) आमचा मुक्तीसमय जवळ येत आहे हे आम्ही आधीच पाहू शकतो. मोठ्या संकटाच्या सुरवातीकडे आम्ही लक्ष लावू शकतो मग मनुष्याच्या पुत्राचे चिन्ह आणि पुढे निवडलेल्यांचे देवाचे एकत्रीकरण हेही दिसेल. शेवटी, आमचा योद्धा राजा, सिंहासनाधिष्ट येशू, हर्मगिदोनामध्ये यहोवाचा दंडाधिकारी म्हणून ‘विजय मिळवण्याचे पूर्ण करील.’ (प्रकटीकरण ६:२) तो न्यायदंड बजावतो तेव्हा यहोवाचा दिवस ज्याला १९१४ पासून प्रभू येशूचा दिवस असे चिन्हांकित केले आहे, तो “युगाची समाप्ती” यासाठी महान शेवट या प्रमाणे असेल.
२५. आम्ही लूक २१:२८ च्या येत असलेल्या भवितव्याच्या पूर्णतेत कसे सहभागी होऊ शकतो?
२५ अद्याप भविष्यात पूर्ण होणाऱ्या येशूच्या या शब्दांना प्रतिसाद देण्यासाठी ईश्वरी शिक्षणापासून तुम्ही सर्वजण फायदा मिळवत राहा: “ह्या गोष्टीस आरंभ होऊ लागेल तेव्हा सरळ उभे राहा आणि आपली डोकी वर करा, कारण तुमचा मुक्तीसमय जवळ आला आहे.” (लूक २१:२८) यहोवा त्याच्या पवित्र नावाचे पवित्रीकरण करत असता निवडलेल्यांपुढे आणि मोठ्या लोकसमुदायापुढे किती महान भवितव्य ठेवलेले आहे!
[तळटीपा]
a आमच्या दिवसातील स्वाभाविक वस्तुस्थिती पवित्र शास्त्राच्या भविष्यवाणीला कशी पूर्ण करते याचा पुरावा देण्यासाठी यहोवाचे साक्षीदार आनंदी आहेत.
b अधिक माहितीसाठी द वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट् सोसायटीने प्रकाशित केलेल्या गॉडस् किंगडम् ऑफ अ थाऊजण्ड इअर्स् हॅज अप्रोच्ड, या पुस्तकातील पृष्ठे २९६-३२३ तसेच सप्टेंबर १५, १९८२ च्या द वॉचटावर मधील पृष्ठे १७-२२ पाहा.
c जोसेफस, यरुशलेमावर रोमी सैन्याने केलेला प्रथम हल्ला (सामान्य युग ६६) व त्याचा नाश यामधील घटनांबद्दल असे लिहितात: “रात्रीच्या वेळी विध्वंस करणारे वादळ; चक्री-वादळ सुटले, मुसळधार पाऊस झाला, विजा निरंतर चमकू लागल्या, मेघगर्जना अतिभयंकर होत्या, कानठळ्या बसतील इतक्या जोरात भूमिकंप झाला. या संपूर्ण गोष्टींच्या रचनेच्या कोसळण्यावरून अशी आगाऊ स्पष्टता झाली की मानवजातीवर मोठा अनर्थ आला आहे, व हे असंमातर स्वरूपाचे महासंकट असल्याचे शकून सुचवतो याबद्दल कोणीही शंका घेऊ शकत नव्हता.”
d न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन बायबलनुसार, येशूने सांगितलेले “ते महासंकट” आणि “संकट” त्याचा पहिला अवलंब यहुदी व्यवस्थेचा नाश हा होता. परंतु केवळ आमच्या दिवसात लागू होणाऱ्या वचनांत, त्याने “द ट्रिब्युलेशन” (ते संकट) असे सांगत “द” हे निश्चित उपपद वापरले. (मत्तय २४:२१, २९; मार्क १३:१९, २४) प्रकटीकरण ७:१४, या भविष्यातील घटनेला “महासंकट,” शब्दशः “द ट्रिब्युलेशन द ग्रेट” (ते मोठे संकट) असे संबोधते.
e ऑगस्ट १५, १९९० च्या द वॉचटावर मधील “वाचकांचे प्रश्न पहा.”
तुम्हाला आठवते का?
▫ योएल २:२८-३१ आणि ३:१५ मधील गोष्टींची पूर्णता पहिल्या शतकात कशी झाली?
▫ मत्तय २४:२९ कोणत्या संकटाचा उल्लेख करते, आणि आम्ही असा निष्कर्ष का काढतो?
▫ मत्तय २४:२९ कोणत्या भव्य अपूर्व घटनांकडे निर्देश करते, आणि कशाप्रकारे त्या मोठ्या संकटानंतर लगेचच असतील?
▫ लूक २१:२६, २८ ची पूर्णता भविष्यात कशी होईल?
[२६, २७ पानांवरील चित्रं]
मंदिराचे क्षेत्र