“ईश्वरी भय” या प्रांतीय अधिवेशनास या
प्राचीन काळी यहोवाच्या सेवकांना मोशेच्या नियमानुसार काही विशिष्ट सणांकरता वर्षातून तीन वेळा एकत्र येणे जरूरीचे होते. हे प्रसंग आनंदाचे व आध्यात्मिकतेत उभारणीकारक होते.—अनुवाद १६:१६.
त्याचप्रमाणे आधुनिक काळात देखील यहोवाचे सेवक वर्षातून तीनदा एकत्र भेटतात: खास संमेलन दिवस, दोन दिवसांचे विभागीय संमेलन, व तीन किंवा चार-दिवसांचे प्रांतीय अधिवेशन. १९९४ च्या सेवा वर्षादरम्यान, यहोवाचे साक्षीदार “ईश्वरी भय” या प्रांतीय अधिवेशनामध्ये एकत्र भेटणार आहेत.
ईश्वरी भयाच्या महत्त्वासंबंधी देवाच्या वचनात कोणत्याही प्रकारची शंका राहात नाही. अशाप्रकारच्या भयाचा उल्लेख २०० वेळा केला आहे. ईश्वरी भय हे संरक्षण असल्याचे नीतीसूत्रे १६:६ मध्ये दिसून येते: “परमेश्वराचे [यहोवा न्यूव] भय बाळगल्याने मनुष्ये दुष्कर्मांपासून दूर राहतात.” शिवाय, आम्हाला स्तोत्रसंहिता १११:१० मध्ये सांगण्यात आले आहे की ईश्वरी भय ज्ञानाचा आरंभ आहे!
ईश्वरी भयाचे दोन पैलू आहेत असे म्हटले जाऊ शकते. एक गोष्ट म्हणजे, असे भय प्रीतीद्वारे उद्युक्त केले जाते. देवावरील आमच्या अगाध प्रीतीमुळे त्याला नाराज न करण्याचे भय आम्ही बाळगतो. (नीतीसूत्रे २७:११) तसेच, दुष्कर्म करणाऱ्या सर्वांसंबंधी देव “भस्म करणारा अग्नी आहे” हे आम्हाला माहीत असल्यामुळे सुज्ञान आमच्यापरीने आम्हामध्ये ईश्वरी भयास बिंबवण्यास साहाय्य करते.—इब्रीकरास १२:२९.
आमच्या “ईश्वरी भय” प्रांतीय अधिवेशनात, ईश्वरी भयात उन्नती होण्यासाठी पुष्कळ मार्गदर्शन व उत्तेजन आपण मिळवू. असे शिक्षण, भाषणे, प्रात्यक्षिके, व नाटक तसेच अनुभव कथन यांच्या सहभागाद्वारे दिले जाईल.
अशा मेळाव्यांना रिक्तहस्ते यावयाचे नाही हे प्राचीन इस्राएलांना आज्ञापिले होते. त्याचप्रमाणे आमचे अधिवेशन आनंदी व यशस्वी होण्याकरता आम्ही आपल्यावतीने सहयोग दिला पाहिजे. (अनुवाद १६:१७) यहोवाच्या मेजास आदर प्रदर्शित करण्याद्वारे आम्ही हे करु शकतो. कसे बरे? वेळेवर उपस्थित राहण्याद्वारे, व्यासपिठावरुन जे काही सांगितले जाते त्याकडे पूर्णपणे लक्ष देण्याद्वारे, गीतांच्या गायनामध्ये पूर्ण हृदयाने सहभाग घेण्याद्वारे. कार्यक्रमाच्या दरम्यान आपण बोलण्यात अथवा इकडेतिकडे फिरण्यात मग्न असणार नाही. आम्हाला शक्य होईल तितक्या प्रमाणात आमची सेवा स्वयंस्फूर्तीने सादर करण्याद्वारे आम्ही योगदान देऊ इच्छितो. अधिवेशन संघटनेमध्ये अनेक विभागांचा समावेश आहे ज्यामध्ये काम करण्यासाठी अनेक कामकऱ्यांची गरज आहे. यहोवाने जितक्या प्रमाणात आम्हाला आशीर्वादीत केले आहे तितक्या प्रमाणात आर्थिकरित्या देणगी देण्याचे आम्ही इच्छिले पाहिजे.
“ईश्वरी भय” प्रांतीय अधिवेशनास शुक्रवार सकाळच्या आरंभीच्या गीतापासून ते रविवारच्या दुपारच्या समारोपाच्या प्रार्थनेपर्यंत सर्व तिन्ही दिवस उपस्थित राहण्यासाठी यहोवाच्या प्रत्येक सेवकाने आताच योजना आखावी.