“आपल्या उपस्थितीचे चिन्ह काय?”
“ह्या गोष्टी केव्हा होतील, आणि आपल्या येण्याचे [उपस्थिती, न्यूव] व ह्या युगाच्या समाप्तीचे चिन्ह काय हे आम्हास सांगा.”—मत्तय २४:३.
१, २. लोक भवितव्याबद्दल आस्थेवाईक आहेत हे कोणती गोष्ट दाखवते?
अनेक लोक भवितव्याबद्दल आस्थेवाईक आहेत. तुम्हीही आहात का? प्राध्यापक ॲलवेन टॉफलरने त्यांच्या फ्यूचर शॉक या पुस्तकात असे म्हटले आहे की, “भवितव्याच्या अभ्यासासाठी संस्थांची एकाएकी वाढ झाली आहे.” ते पुढे म्हणाले, ‘भविष्यकेंद्रित संस्थांची उत्पत्ती; इंग्लंड, फ्रान्स, इटली, जर्मनी, व अमेरिकेतील फ्युचरिस्ट मासिकांचे प्रकट होणे; भविष्य सांगण्याच्या प्रशिक्षणासाठी कोर्स देणाऱ्या विश्वविद्यालयांचा प्रसार यासर्व गोष्टी आम्ही पाहिलेल्या आहेत.’ तरीसुद्धा, टॉफलरने शेवटी असे म्हटले: “पूर्ण अर्थाने कोणासही भवितव्याबद्दलची ‘माहिती’ नाही हे मात्र नक्की आहे.”
२ साइन्स ऑफ द थींग्ज टू कम हे पुस्तक म्हणते: “आमचे भविष्य काय आहे याची कल्पना देण्यासाठी हात पाहून भविष्य सांगणे, काचेच्या गोळ्यात भविष्यकाळ पाहणे, फलज्योतिष, टॅरेट नावाच्या पत्त्यावर भविष्य पाहणे, ई जीन. यासर्व पद्धती कमीअधिक गुंतागुंतीच्या आहेत, ज्या आमच्या एखाद्या भविष्यात काय ठेवलेले आहे त्याविषयी आम्हाला थोडी कल्पना देतात.” परंतु मानवी पद्धतींकडे वळण्याऐवजी, आपण मूळ उगम—यहोवाकडे वळल्यास बरे करतो.
३. भविष्याविषयीच्या ज्ञानासाठी आम्ही देवाकडे पाहणे का उचित आहे?
३ सत्य देवाने म्हटले: “मी कल्पिले तसे होईलच; मी योजिले तसे घडेलच.” (यशया १४:२४, २७; ४२:९) होय, काय होणार आहे हे मनुष्याला सांगण्यासाठी यहोवा समर्थ आहे, अनेकदा त्याने भविष्यवादित प्रवक्त्याद्वारे हे केले. त्यातील एका संदेष्ट्याने लिहिले: “प्रभू यहोवा आपले रहस्य आपले सेवक संदेष्टे यास कळविल्याशिवाय खरोखर काहीच करीत नाही.”—आमोस ३:७, ८; २ पेत्र १:२०, २१.
४, ५. (अ) भविष्याच्या अनुषंगाने येशू आमच्यासाठी मदत का आहे? (ब) त्याच्या प्रेषितांनी कोणती संयुक्त चौकशी त्याच्याकडे केली?
४ येशू ख्रिस्त देवाचा प्रमुख संदेष्टा होता. (इब्रीयांस १:१, २) आता आपण येशूच्या एका मुख्य भविष्यवाणीवर लक्ष केंद्रित करू या. ही भविष्यवाणी देखील, सद्य दुष्ट व्यवस्थिकरणाच्या समाप्तीला काय घडेल व देव त्याच्या बदल्यात पार्थिव नंदनवन आणील याविषयी आम्हाला समजबुद्धी देते.
५ येशूने, तो संदेष्टा असल्याचे शाबीत केले होते. (मार्क ६:४; लूक १३:३३; २४:१९; योहान ४:१९; ६:१४; ९:१७) त्यामुळेच, त्याचे प्रेषित त्याच्या सोबत जैतूनाच्या डोंगरावर बसून यरूशलेमाकडे पाहत असताना, त्यांनी भविष्याबद्दल त्याला का विचारले असावे हे समजण्याजोगे आहे: “ह्या गोष्टी केव्हा होतील, आणि आपल्या येण्याचे [उपस्थिती, न्यूव] व ह्या युगाच्या समाप्तीचे चिन्ह काय हे आम्हास सांगा”—मत्तय २४:३; मार्क १३:४.
६. मत्तय २४, मार्क १३, आणि लूक २१ मध्ये काय संबंध आहे; व कोणता प्रश्न आमच्या अत्यंत आवडीचा असला पाहिजे?
६ मत्तय २४, मार्क १३, आणि लूक २१ अध्यायांमध्ये तुम्हाला त्यांचा प्रश्न व येशूचे उत्तर मिळेल.a अनेक बाबींमध्ये ते अहवाल पूरक आहेत, परंतु तंतोतंत जुळणारे नाहीत. उदाहरणार्थ, ‘जागोजागी मऱ्या येतील’ हे केवळ लूकने नमूद केले आहे. (लूक २१:१०, ११; मत्तय २४:७; मार्क १३:८) तर्कशुद्ध रीतीने, आम्ही विचारू शकतो, येशूने ज्या काही घटनांबद्दल भाकीत केले ते केवळ त्याच्या ऐकणाऱ्यांच्या जीवनकाळापुरतेच होते का, किंवा त्यात आमचा काळ व भविष्यात आमच्यासाठी काय ठेवलेले आहे याचाही समावेश होतो?
प्रेषितांना जाणून घ्यावयाचे होते
७. प्रेषितांची खासपणे कशाविषयी विचारणा केली होती, परंतु येशूच्या प्रत्युत्तरात केवढा विस्तार होता?
७ येशूच्या मारले जाण्याच्या काही दिवसांआधी, त्याने घोषित केले की देवाने यरुशलेम, यहुद्यांच्या राजधानीला धिक्कारले. ते शहर व त्याचे भव्य मंदिर नाश केले जाईल. या कारणामुळेच, त्याच्या प्रेषितांमधील काहींनी येशूच्या ‘उपस्थितीचे व युगाच्या समाप्तीचे चिन्ह’ मागितले. (मत्तय २३:३७–२४:३) निसंशये, त्यांच्या मनात प्रामुख्याने, यहुदी व्यवस्था आणि यरुशलेम असावे, कारण, पुढे काय होणार आहे याचे त्यांना पूर्ण आकलन झाले नाही. परंतु त्यांना उत्तर देतांना येशूने, तोवर झालेल्या तसेच सामान्य युग ७० मध्ये रोमी लोकांनी यरुशलेमचा नाश केला या सर्वांना समाविष्ट करून घडलेल्या सर्व गोष्टींपलिकडे पाहिले.—लूक १९:११; प्रे. कृत्ये १:६, ७.
८. येशूने कोणत्या काही घडामोडींचे भाकीत केले होते?
८ तुम्ही तीन शुभवर्तमानाच्या अहवालात वाचत असताना, येशूने राष्ट्रावर राष्ट्र आणि राज्यावर राज्य उठेल, अन्न टंचाई आणि भूमिकंप, भयप्रेरित दृष्य आणि आकाशातील चिन्हांविषयी सांगितले. येशूने ती चिन्हे देण्याच्या (सामान्य युग ३३) व यरुशलेमचा नाश (सामान्य युग ६६-७०), यांच्या दरम्यान खोटे संदेष्टे आणि खोटे ख्रिस्तही उठणार होते. ख्रिस्ताच्या संदेशाचा प्रचार करत असलेल्या ख्रिस्ती लोकांचा यहूदी छळ करणार होते.
९. येशूच्या भविष्यवाणीची सामान्य युगाच्या पहिल्या शतकात कशी पूर्णता झाली?
९ इतिहासकार फ्लेवीयस जोसेफसने ठामपणे सांगितल्यानुसार त्या चिन्हाचे भाग खरेपणाने पूर्ण झाले. त्याने लिहिले की रोमी सैन्यांनी त्यांच्यावर हल्ला करण्याआधी, खोट्या मशीहांनी बंडाळी चेतविली. यहुद्यात आणि इतर ठिकाणी भयंकर भूमिकंप झाले. रोमी साम्राज्याच्या अनेक भागात लढाया चालू झाल्या. मोठ्या प्रमाणात दुष्काळ पडला का? होय, निश्चितच. (पडताळा प्रे. कृत्ये ११:२७-३०.) राज्याच्या प्रचारकार्याबद्दल काय? सामान्य युग ६० किंवा ६१ च्या दरम्यान, कलस्सैकरांस हे पुस्तक लिहिले होते तेव्हा, देवाच्या राज्याच्या “सुवार्तेची आशा”—आफ्रिका, आशिया, आणि युरोप पर्यंत गाजविली होती.b—कलस्सैकर १:२३.
“तेव्हा” शेवट
१०. आम्ही टोʹटे या ग्रीक शब्दाकडे लक्ष का दिले पाहिजे, आणि त्याचा अर्थ काय आहे?
१० काही बाबतीत, येशूने पाठोपाठ होणाऱ्या घटना भाकीत केल्या. त्याने म्हटले: “राज्याची ही सुवार्ता . . . गाजविली जाईल तेव्हा शेवट होईल.” इंग्रजी मधील पवित्र शास्त्रे बहुतेकवेळा “तेव्हा” ज्याचा अगदी सोपा अर्थ, “याकारणास्तव” किंवा “परंतु” ह्या शब्दांचा वापर करतात. (मार्क ४:१५, १७; १३:२३) तथापि, आताच ज्याचा संदर्भ घेतला ते मत्तय २४:१४ मधील, “तेव्हा” टोʹटे हा शब्द या ग्रीक क्रिया विशेषणावर आधारित आहे.c ग्रीक तज्ज्ञ स्पष्ट करतात की टोʹटे हा शब्द “वेळ दर्शक क्रिया विशेषण” आहे, ज्याचा उपयोग “त्या काळानंतर काय होणार आहे ते दर्शविण्यासाठी” किंवा “एखादी लगेच पाठोपाठ घडणाऱ्या घटनेची ओळख करून देण्यासाठी” केला जातो. अशाप्रकारे, येशूने राज्याच्या प्रचारानंतर मग (यानंतर किंवा ‘लगेच पाठोपाठ’) “शेवट” येईल असे भविष्य वर्तले. कोणता शेवट?
११. येशूने यरूशलेमाच्या नाशाशी थेट संबंधीत असलेल्या घटना कशा स्पष्ट केल्या?
११ येशूच्या भविष्यवाणीतील एक पूर्णता यहुदी व्यवस्थेच्या नाशाप्रत नेणाऱ्या घटनांमध्ये मिळू शकते. येशूने भाकीत केले होते त्या लढाया, भूमिकंप, अन्नटंचाई, आणि इतर गोष्टी तीन दशकांमध्ये घडल्या. तरीसुद्धा, मत्तय २४:१५, मार्क १३:१४, व लूक २१:२० पासून आम्ही नाश जेव्हा जवळ येऊन ठेपलेला आहे, म्हणजे अगदी दारापाशी आलेला आहे त्या घटनांबद्दल वाचतो.—तक्त्यातील ठिपके असलेल्या एकेरी रेषेकडे लक्ष द्या.
१२. मत्तय २४:१५ च्या पूर्णतेत रोमी सैन्य कसे गोवलेले होते?
१२ सामान्य युग ६६ मध्ये, यहूद्यांच्या बंडाळीला प्रतिसाद देताना, सेस्टस गॅलसच्या नेतृत्त्वाखाली रोमी सैन्य यरुशलेमेवर चढून आले आणि यहूदी ज्याला पवित्र मानीत त्या शहराला त्यांनी वेढले. (मत्तय ५:३५) यहूद्यांनी प्रतिहल्ला करूनही, रोमी सैन्य शहरात घुसले. आणि अशारितीने मत्तय २४:१५ आणि मार्क १३:१४ मध्ये खरोखर येशूने भाकीत केल्यानुसार ते “पवित्र स्थानात उभे” राहिले. यानंतर एक आश्चर्यचकीत घटना घडली. शहराला वेढलेले असतानाही अनपेक्षितपणे, रोमी सैन्य निघून गेले. ख्रिश्चनांनी येशूच्या भविष्यवाणीची पूर्णता लगेच ओळखली, व सैन्य निघून गेल्याने त्यांना यहुदियातून यार्देन नदीच्या पलिकडील डोंगरामध्ये पळून जाता आले. इतिहास सांगतो की त्यांनी असेच केले.
१३. पळून जाण्याविषयीची येशूची सूचना ख्रिश्चन लोकांना का ऐकता आली?
१३ परंतु आता, जर रोमी सैन्य यरुशलेमेच्या भोवतालपासून निघून गेले होते, तर कोणाला तेथून उगीच पळून जाण्याची काय आवश्यकता होती? कारण येशूच्या शब्दांनी दाखवले की जे काही घडले त्यावरून ‘यरूशलेमेस ओसाड पडण्याची वेळ जवळ आली’ याचा तो पुरावा स्पष्ट आहे. (लूक २१:२०) होय, ओसाड पडणे. ‘जगाच्या प्रारंभापासून आतापर्यंत आले नाही व पुढे येणार नाही असे मोठे संकट’ येण्याबद्दल त्याने भाकीत केले. जवळजवळ साडे तीन वर्षांनंतर, सामान्य युग ७० मध्ये, रोमी सैन्यांकडून जनरल टायटसच्या निदर्शनाखाली “मोठे संकट” याचा अनुभव यरुशलेमने घेतला. (मत्तय २४:२१; मार्क १३:१९) येशूने आतापर्यंत कधीही न आलेले व येणार नाही असे मोठे संकट म्हणून त्याचे वर्णन का केले असावे बरे?
१४. यरूशलेमवर सामान्य युग ७० मध्ये जे घडले ते पूर्वी कधीही आले नव्हते व नंतरही येणार नाही असे “महासंकट” होते, असे आम्ही का म्हणू शकतो?
१४ बाबेली सैन्याने सामान्य युग पूर्व ६०७ मध्ये यरुशलेमची खूप नासधूस केली होती, आणि त्यानंतर ते शहर आमच्या सध्याच्या शतकात इतर विचित्र झगड्यांचा अनुभव घेत आले. तथापि, सामान्य युग ७० मध्ये जे घडले ते एक अतुलनीय मोठे संकट होते. पाच महिन्यांच्या मोहिमेत, टायटसच्या रोमी सैन्याने यहूद्यांना पराजित केले, जवळ जवळ ११,००,००० यहूद्यांना मारले आणि सुमारे १,००,००० जणांना दास्यत्वात नेले. शिवाय, रोमी लोकांनी यरुशलेमचा संपूर्ण नायनाट केला. याद्वारे, यहुदी व्यवस्थेने मंदिराला आधी केंद्र मान्य करुन केलेल्या भक्तीचा कायमचाच शेवट झाल्याचे शाबीत झाले. (इब्रीयांस १:२) होय, सामान्य युग ७० च्या घटनांना उचितपणे त्या शहरावर, राष्ट्रावर व व्यवस्थेवर ‘जगाच्या प्रारंभापासून आतापर्यंत आले नाही व पुढे येणार नाही असे संकट’ म्हटले जाऊ शकते.—मत्तय २४:२१.d
भविष्यवाणी केल्याप्रमाणे, अधिक काही होणार होते
१५. (अ) यरूशलेमवर आलेल्या संकटानंतर कशामध्ये वाढ होईल याचे भाकीत येशूने केले होते? (ब) मत्तय २४:२३-२८ च्या अनुषंगाने, येशूच्या भविष्यवाणीच्या पूर्णतेविषयी आम्ही काय निष्कर्ष काढला पाहिजे?
१५ तथापि, येशूने त्याचे भाकीत पहिल्या शतकाच्या संकटापर्यंतच मर्यादित ठेवले नाही. पवित्र शास्त्र दाखवते की, त्या संकटानंतर जसे मत्तय २४:२३ आणि मार्क १३:२१ मधील “तेव्हा” किंवा टोʹटे यांचा वापर केल्यानंतर सूचित होते त्याप्रमाणे आणखी पुष्कळ गोष्टी होणार होत्या. सामान्य युग ७० नंतरच्या काळात कशात वाढ होणार होती? यहूदी व्यवस्थेवरील संकटानंतर, अधिक खोटे ख्रिस्त आणि संदेष्टे दिसणार होते. (मार्क १३:६ सोबत १३:२१-२३ पडताळा.) सामान्य युग ७० मध्ये यरूशलेमाच्या झालेल्या नाशापासून असे विशिष्ठ लोक सामोरे आले याबद्दल इतिहास पुष्टी देतो, तरी, सुक्ष्म आध्यात्मिक दृष्टी असणाऱ्या, ख्रिस्ताच्या “उपस्थिती”ची खरोखरी वाट पाहून असणाऱ्यांना ते ठकवू शकले नाहीत. (मत्तय २४:२७, २८) तरीसुद्धा, सामान्य युग ७० च्या महा संकटानंतरच्या या घडामोडी एका पुराव्यावरून येशू संकटापलिकडे पाहत होता. ती केवळ एक प्राथमिक पूर्णता होती.
१६. लूक २१:२४ येशूच्या भविष्यवाणीत कोणत्या दृष्टिकोनाची भर टाकते, आणि याचा काय अर्थ असावा?
१६ जर आम्ही मत्तय २४:१५-२८ आणि मार्क १३:१४-२३ची तुलना लूक २१:२०-२४शी केली, तर आपल्याला जे येशूचे भाकीत यरुशलेमेच्या नाशाच्याही पलिकडले होते याबद्दलचा दुसरा संकेत आढळून येईल. लूकनेच केवळ मऱ्याबद्दल सांगितले होते याची आठवण करा. अशाचप्रकारे, त्यानेच हा भाग येशूच्या शब्दात समाप्त केला: “परराष्ट्रीयांची सद्दी संपेल तोपर्यंत परराष्ट्रीय यरुशलेमेस पायाखाली तुडवितील.”e (लूक २१:२४) बाबेलच्या लोकांनी यहूद्यांच्या शेवटल्या राजाला सामान्य युग पूर्व ६०७ मध्ये काढून टाकले, आणि त्यानंतर, देवाच्या राज्याचे प्रतिनिधीत्त्व करणारे यरुशलेम तुडविले गेले. (२ राजे २५:१-२६; १ इतिहास २९:२३; यहेज्केल २१:२५:२७) लूक २१:२४ मध्ये, येशूने दर्शविले की पुन्हा राज्य स्थापन करण्यासाठी देवाची वेळ येईपर्यंत ही परिस्थिती अशीच चालू राहील.
१७. येशूची भविष्यवाणी दूरच्या भविष्यात होणार असल्याचा कोणता तिसरा संकेत आमच्याजवळ आहे?
१७ येशू भविष्याकडे निर्देश करीत होता याबद्दलचा तिसरा संकेत देखील होता: शास्त्रवचनानुसार, मशीहाला मरावयाचे व पुनरुत्थित व्हावयाचे होते. त्यानंतर पिता त्याला आपल्या शत्रूंमध्ये प्रभुत्व करण्यासाठी पुढे जाऊ देईपर्यंत तो देवाच्या उजव्या बाजूला बसणार होता. (स्तोत्रसंहिता ११०:१, २) येशूने त्याच्या पित्याच्या उजवीकडे बसण्याचे ध्वनित केले. (मार्क १४:६२) प्रेषित पौलाने स्पष्ट केले आहे की पुनरुत्थित येशू, यहोवाच्या उजवीकडे होता आणि राजा व ईश्वरी दंडाधिकारी म्हणून काम करण्यासाठी थांबून आहे.—रोमकर ८:३४; कलस्सैकर ३:१; इब्रीयांस १०:१२, १३.
१८, १९. प्रकटीकरण ६:२-८ चा शुभवर्तमानातील समांतर भविष्यवाणीसोबत काय संबंध आहे?
१८ सध्याच्या व्यवस्थीकरणाच्या नाशाबद्दलचे येशूचे भाकीत पहिल्या शतकाच्या पलिकडे लागू होते, याचे चौथे आणि शेवटले लक्षण ओळखण्यासाठी आम्ही प्रकटीकरण ६व्या अध्यायाकडे वळू या. सामान्य युग ७० च्या दशकांनंतर लिहिताना, प्रेषित योहानाने सक्रिय घोडेस्वारांच्या जोरदार दृश्याचे वर्णन केले आहे. (प्रकटीकरण ६:२-८) “प्रभूच्या दिवसातील”—त्याच्या उपस्थितीचा दिवस—हा भविष्यवादीत देखावा आमच्या २०व्या शतकाची ओळख संपूर्ण लढाईचा काळ (वचन ४), अनेक ठिकाणी अन्नटंचाई (वचने ५ व ६), आणि “मरी” (वचन ८) अशी करून देतो. स्पष्टपणे, येशूने शुभवर्तमानामध्ये जे काही सांगितले त्याची तुलना याबरोबर होते व येशूच्या भविष्यवाणीची या ‘प्रभुच्या दिवसात’ मोठी पूर्णता होणार असल्याचे शाबीत करते.—प्रकटीकरण १:१०.
१९ मत्तय २४:७-१४ मध्ये आणि प्रकटीकरण ६:२-८ मध्ये भाकीत केलेले संयुक्त चिन्ह आमच्या काळातील १९१४ मधील पहिल्या जागतिक युद्धाची सुरवात झाल्यापासून प्रकट होत आहे हे, माहीतगार लोक कबूल करतात. यहोवाच्या साक्षीदारांनी जगव्याप्तपणे घोषित केले आहे की आता ह्या वेळेला येशूच्या भविष्यवाणीची दुसरी व मोठी पूर्णता होत आहे, ज्याचा पुरावा रानटी युद्धे, नाशकारक भूमिकंप, शोकांतिक अन्नटंचाई, आणि जलदगतीने वाढणाऱ्या मऱ्या यावरून मिळतो. या शेवटच्या मुद्याबद्दल, यू. एस. न्यूज ॲण्ड वर्ल्ड रिपोर्ट (जुलै २७, १९९२) ने म्हटले: “लाखो लोकांना मरणाकडे पाठविणारा एडस् आजार . . . लवकरच इतिहासात फार किंमती व महासंकटाची मरी बनेल. १४व्या शतकात अशी आजाराची साथ होती जेथे बळी पडलेल्या व्यक्तीवर काळे डाग पडत होते, या रोगाने २ कोटी ५० लक्ष लोकांना ठार मारले. परंतु २००० वे, वर्ष येईपर्यंत आजच्या १ कोटी २० लक्ष लोकांपासून ते ३ ते ११ कोटी लोकांमध्ये एचआयव्ही व एडस्ला कारणीभूत असणारा विषाणू असेल. उपचार करता येत नाही असा एचआयव्ही विषाणू असलेल्या सर्वजणांना मृत्यू अटळ आहे.”
२०. मत्तय २४:४-२२ च्या प्राथमिक पूर्णतेमध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात, परंतु दुसरी कोणती पूर्णता स्पष्ट आहे?
२० तर मग, प्रेषितांनी केलेल्या चौकशीच्या येशूच्या उत्तरावरून आम्ही कोणत्या समाप्तीस पोंहचावे? त्याच्या भविष्यवाणीने यरूशलेमेचा नाश व तेथपर्यंतच्या गोष्टी भाकीत केल्या तसेच सामान्य युग ७० नंतर जे काही घडणार होते त्याचाही उल्लेख केला. परंतु या सर्वांची भविष्यात दुसरी आणि मोठी पूर्णता महासंकटाप्रत होणार होती, व ते महासंकट सद्य दुष्ट व्यवस्थिकरणाचा शेवट करील. याचा अर्थ, मत्तय २४:४-२२ मधील येशूचे पूर्व घोषित शब्द तसेच मार्क आणि लूक मधील समांतर अहवाल सामान्य युग ३३ पासून सामान्य युग ७०च्या संकटापर्यंत पूर्ण झाले. तरीसुद्धा, त्याच वचनाची दुसरी पूर्णता होणार, ज्यामध्ये भविष्यातील मोठ्या संकटाचा समावेश असेल. ही मोठी पूर्णता आज आमच्या समोर आहे; आम्ही ती रोज पाहू शकतो.f
कोठवर नेते?
२१, २२. अधिक घटना होणार होत्या याचे भविष्यवादित चिन्ह आम्हाला कोठे मिळते?
२१ येशूने, ‘परराष्ट्रीयांची सद्दी’ संपण्याआधीच्या काळात अद्भुत कामे करून दाखवणाऱ्या खोट्या संदेष्ट्यांचा उल्लेख करून त्याची भविष्यवाणी तेथेच समाप्त केली नाही. (लूक २१:२४; मत्तय २४:२३-२६; मार्क १३:२१-२३) तो पुढे सांगतो की आणखी आश्चर्यकारक घटना घडतील, ज्यांना संपूर्ण जगभरात पाहिले जाईल. ज्याचा संबंध मनुष्याच्या पुत्राच्या पराक्रमाने व वैभवाने येण्याशी आहे. मार्क १३:२४-२७ येशूची भविष्यवाणी पुढे चालू आहे याचे प्रतिनिधीत्व करते:
२२ “परंतु ही संकटे येऊन गेल्यावर त्या दिवसात सूर्य अंधकारमय होईल, आणि चंद्र प्रकाश देणार नाही, आकाशातून ‘तारे गळून पडतील व आकाशातील बळे’ डळमळतील. तेव्हा मनुष्याचा पुत्र मोठ्या पराक्रमाने व वैभवाने ‘मेघारूढ होऊन येत असलेला दृष्टीस पडेल. त्या वेळेस तो देवदूतांना पाठवून ‘चार दिशांकडून, अर्थात पृथ्वीच्या’ सीमेपासून आकाशाच्या सीमेपर्यंत आपल्या निवडलेल्या लोकांस एकत्र करील.”
२३. पहिल्या शतकाच्या बऱ्याच काळानंतर मत्तय २४:२९-३१च्या पूर्णतेकडे आम्ही का पाहू शकतो?
२३ मनुष्याचा पुत्र, पुनरूत्थित येशू ख्रिस्त सामान्य युग ७० मध्ये यहूदी व्यवस्थेचा अंत झाल्यावर त्या नेत्रदीपक पद्धतीने आला नाही. निश्चितच, मत्तयाच्या २४:३० मध्ये दाखवल्याप्रमाणे पृथ्वीवरील सर्व जातीच्या लोकांना त्याला ओळखता आले नाही, किंवा स्वर्गीय दूतांनी त्यावेळी संपूर्ण पृथ्वीवरच्या अभिषिक्त ख्रिस्ती जणांना एकत्र केले नाही हे निश्चित. तर मग येशूच्या ह्या विशाल भविष्यवाणीच्या जादा भागाची पूर्णता कधी होईल? आमच्या सभोवती जे होत आहे त्यात त्याची पूर्णता दिसत आहे का, किंवा आमच्या नजिकच्या भवितव्यात आम्ही अपेक्षा करत असलेल्या घटनांबद्दल ते ईश्वरी सूक्ष्मदृष्टी पुरविते? ते आम्ही नक्कीच जाणून घेतले पाहिजे कारण लूक येशूचा सल्ला नमूद करतो: “ह्या गोष्टीस आरंभ होऊ लागेल तेव्हा सरळ उभे राहा आणि आपली डोकी वर करा; कारण तुमचा मुक्तीसमय जवळ आला आहे.”—लूक २१:२८.
[तळटीपा]
a या अध्यायांचा भाग पृष्ठ २४ आणि २५ वरील तक्त्यावर मिळू शकतो; ठिपक्यांच्या रेषा, समांतर भागांना भिन्न दाखवतात.
b या घटनेच्या ऐतिहासिक पुराव्यासाठी जानेवारी १५, १९७० च्या द वॉचटावर मधील पृष्ठे ४३-५ पाहा.
c मत्तय मध्ये टोʹटे हा शब्द ८० वेळा (२४ व्या अध्यायात ९ वेळा) व १५ वेळा लूकच्या पुस्तकात आढळतो. मार्कने टोʹटे चा उपयोग केवळ सहा वेळा केला आहे, परंतु त्यातील चारमध्ये “चिन्ह” याचा समावेश आहे.
d ब्रिटिश लेखक मॅथ्यु हेन्री यांनी असे विवेचन दिले: “खास्द्यांकरवी यरुशलेमचा नाश फार भयानक होता, तथापि, हा नाश फार झाला. सर्व यहूद्यांची . . . विश्वव्यापी कत्तल होण्याची भीती यामुळे उद्भवली.”
e लूकच्या अहवालात अनेकजण, लूक २१:२४ नंतर स्पष्टतेतील बदल पाहतात. डॉ. लिऑन मॉरीस लिहितात: “येशू विदेश्यांचा काळ याबद्दल पुढे सांगतो. . . . अनेक विचारवंतांचे लक्ष आता मनुष्याच्या पुत्राच्या येण्याकडे वेधले जाते.” प्राध्यापक आर. गिन्स् लिहितात: “मनुष्याच्या पुत्राचे येणे—(मत्त २४:२९-३१; मार्क १३:२४-२७). ‘परराष्ट्रीयांची सद्दी’ विषयाची प्रस्तावना पुरवते; [लूकचे] विचार, यरुशलेमाच्या नाशापलिकडे भविष्यापर्यंत जातात.”
f प्राध्यापक वॉल्टर एल. लिफेल्ड लिहितात: “येशूची भाकीते दोन बाजूंना समाविष्ट करतात हे गृहीत धरणे निश्चितच शक्य आहे: (१) सामान्य युग ७० मधील घटनांत मंदिर व (२) दूरच्या भवितव्यात असलेल्यांचे वर्णन अधिक प्रकट केलेल्या संज्ञेने करण्याचा समावेश होतो.” जे. आर. डमलॉ यांनी संपादन केलेले भाष्य सांगते: “आमच्या प्रभूने एक नव्हे तर दोन घटनांचा उल्लेख केला आणि पहिली दुसरीचा नमुना होती याची जेव्हा जाणीव घडते तेव्हा या मोठ्या जाहीर भाषणाच्या अनेक अशा अधिक गंभीर अडचणी नाहीशा होतात. . . . [लूक] २१:२४ खासपणे ‘परराष्ट्रीयांची सद्दी’बद्दल सांगते जे, . . . यरूशलेमाचे पतन व जगाचा अंत यांच्यामधील मध्यंतराचा अनिश्चित काळ दाखवते.”
तुम्हाला आठवते का?
▫ येशूने मत्तय २४:३ येथे असणाऱ्या प्रश्नाला दिलेल्या उत्तराची कोणती पूर्णता सामान्य युग ७० पर्यंत निरवली गेली?
▫ वापरलेला टोʹटे शब्द, येशूची भविष्यवाणी समजण्यास आम्हाला कशी मदत करतो?
▫ कोणत्या अर्थाने पहिल्या शतकात, पूर्वी कधीही न आलेले “मोठे संकट” आले होते?
▫ आज आमचा समावेश असणाऱ्या, येशूच्या भविष्यवाणीच्या कोणत्या दोन असामान्य दृष्टिकोनांचा उल्लेख लूक करतो?
▫ मत्तय २४:४-२२ च्या भविष्यवाणीमधील कोणते संकेत दुसऱ्या व मोठ्या पूर्णतेला निर्देशित करतात?
[२४, २५ पानांवरील तक्ता]
४“येशूने त्यांस म्हटले: ‘तुम्हास कोणी फसवू नये म्हणून सावध असा; ५कारण पुष्कळ जण माझ्या नावाने येऊन “मी ख्रिस्त आहे” असे म्हणतील व पुष्कळांस फसवतील. ६तुम्ही लढायांविषयी ऐकाल व लढायांच्या आवया ऐकाल; घाबरुन जाऊ नये म्हणून सांभाळा. कारण असे होणे अवश्य आहे, परंतु तेवढ्यात शेवट होत नाही.
७“‘कारण राष्ट्रांवर राष्ट्र व राज्यावर राज्य उठेल, आणि जागोजागी दुष्काळ व भूमिकंप होतील. ८पण ह्या सर्व गोष्टी वेदनांचा प्रारंभ होत.
९“‘तेव्हा तुमचे हाल करण्याकरता ते तुम्हास धरुन देतील व तुम्हास जिवे मारतील आणि माझ्या नावामुळे सर्व रा तुमचा द्वेष करतील. १०त्यावेळी (तेव्हा) पुष्कळ जण अडखळतील, एकमेकांस धरून देतील व एकमेकांचा द्वेष करतील. ११पुष्कळ खोटे संदेष्टे उठतील व अनेकांस फसवतील; १२आणि अनीती वाढल्यामुळे पुष्कळांची प्रीती थंडावेल. १३परंतु जो शेवटपर्यंत टिकून राहील तोच तरेल. १४सर्व राष्ट्रांस साक्षीसाठी म्हणून राज्याची ही सुवार्ता सर्व जगात गाजवली जाईल, तेव्हा शेवट होईल.
----------------------------------------------------------------------------------------------
१५“‘दानीएल संदेष्ट्याच्या द्वारे सांगितलेला ओसाडीचा अमंगळ पदार्थ पवित्रस्थानात उभा असलेला तुम्ही पाहाल, (वाचकाने हे ध्यानात आणावे,) १६तेव्हा जे यहूदीयांत असतील त्यांनी डोंगरात पळून जावे. १७जो धाब्यावर असेल त्याने आपल्या घरातून काही बाहेर काढण्याकरता खाली उतरू नये; १८आणि जो शेतात असेल त्याने आपले वस्र घेण्याकरता माघारी येऊ नये. १९त्या दिवसात ज्या गरोदर आणि अंगावर पाजणाऱ्या स्त्रिया असतील त्यांची केवढी दुर्दशा होणार! २०तुमचे पलायन हिंवाळ्यात किंवा शब्बाथ दिवशी होऊ नये म्हणून प्रार्थना करा; २१कारण जगाच्या आरंभापासून आतापर्यंत आले नाही व पुढे कधीही येणार नाही असे मोठे संकट त्या काळी येईल. २२ आणि ते दिवस कमी केले नसते तर कोणाही मनुष्याचा निभाव लागला नसता; परंतु निवडलेल्यांसाठी ते कमी केले जातील.
---------------------------------------------------------------------------------------------
२३“‘त्यावेळेस (तेव्हा) जर कोणी तुम्हास म्हटले, “पाहा! ख्रिस्त येथे आहे,” किंवा “तेथे आहे!” तर ते खरे मानू नका. २४कारण खोटे ख्रिस्त व खोटे संदेष्टे उठतील व साधेल तर निवडलेल्यांस देखील फसवावे म्हणून मोठी चिन्हे व अद्भुते दाखवतील. २५पाहा! मी अगोदरच तुम्हास हे सांगून ठेवले आहे. २६ह्यास्तव, कोणी तुम्हास म्हणतील, “पाहा! तो अरण्यात आहे”, तर जाऊ नका; तुम्हास म्हणतील “पाहा! तो आतल्या खोल्यांत आहे,” तर ते खरे मानू नका. २७कारण जशी वीज पूर्वेकडून निघून पश्चिमेपर्यंत चकाकत जाते तसे मनुष्याच्या पुत्राचे येणे होईल. २८जेथे प्रेत असेल तेथे गिधाडे जमतील.
------------------------------------------------------------------------------------------------------
-----------------------------------------------------------------------------------------------------
२९“‘त्या दिवसातील संकटानंतर लागलेच सूर्य अंधकारमय होईल, चंद्र प्रकाश देणार नाही, तारे आकाशातून पडतील, व आकाशाची बळे डळमळतील. ३०तेव्हा मनुष्याच्या पुत्राचे चिन्ह आकाशात प्रगट होईल, मग (तेव्हा) पृथ्वीवरील सर्व जातीचे लोक शोक करतील आणि ते मनुष्याच्या पुत्राला आकाशातल्या मेघांवर आरुढ होऊन पराक्रमाने व मोठ्या वैभवाने येताना पाहतील. ३१कर्ण्याच्या महानदाबरोबर तो आपल्या दूतांस पाठवील आणि ते आकाशाच्या एका सीमेपासून दुसऱ्या सीमेपर्यंत त्याच्या निवडलेल्या चाऱ्ही दिशांकडून जमा करतील.’”
५“येशू त्यांना म्हणू लागला: ‘तुम्हांला कोणी फसवू नये म्हणून सावध राहा. ६ पुष्कळ लोक माझ्या नावाने येऊन “मीच तो आहे,” असे म्हणून पुष्कळांची फसगत करतील. ७ आणखी तुम्ही लढायांविषयी ऐकाल व लढायांच्या अफवा ऐकाल तेव्हा घाबरू नका; ह्या गोष्टी होणे अवश्य आहे, परंतु तेवढ्यात शेवट होणार नाही.
८“‘कारण राष्ट्रावर राष्ट्र व राज्यावर राज्य उठेल आणि जागोजागी भूमिकंप होतील व दुष्काळ पडतील. हा तर वेदनांचा प्रारंभ होय.
९“‘तुम्ही आपणाला सांभाळा; कारण ते तुम्हाला न्यायसभांच्या स्वाधीन करतील सभास्थानांमध्ये तुम्हाला मार देतील आणि सुभेदार व राजे ह्यांच्यापुढे तुम्ही साक्ष द्यावी म्हणून तुम्हाला माझ्याकरता त्यांच्यासमोर उभे राहावे लागेल. १०प्रथम सर्व राष्ट्रांत सुवार्तेची घोषणा झाली पाहिजे. ११ते तुम्हाला धरून नेऊन चौकशीकरता स्वाधीन करतील तेव्हा आपण कसे काय बोलावे ह्याच्याविषयी अगोदर चिंता करु नका; तर त्या घटकेस जे काही तुम्हांला सुचवून दिले जाईल ते बोला; कारण बोलणारे तुम्ही आहां असे नाही तर पवित्र आत्मा हाच बोलणारा आहे. १२तेव्हा भाऊ आपल्या भावाला व बाप आपल्या मुलाला ठार मारण्याकरता धरून देईल आणि मुले आपल्या आईबापावर उठतील व त्यांचा प्राणघात करवितील; १३आणि माझ्या नावामुळे सर्व लोक तुमचा द्वेष करतील, परंतु जो शेवटपर्यंत टिकाव धरून राहील तोच तारला जाईल.
--------------------------------------------------------------------------------------------------
१४“‘जेथे ओसाडीचा अमंगळ पदार्थ नसावा तेथे तो उभा असलेला तुम्ही पाहाल (वाचकाने हे समजून घ्यावे), तेव्हा जे यहूदीयांत असतील त्यांनी डोंगरात पळून जावे. १५जो धाब्यावर असेल त्याने खाली उतरून अथवा आपल्या घरातून काही घेण्याकरता आत जाऊ नये; १६आणि जो शेतात असेल त्याने आपले वस्र घेण्याकरता परत येऊ नये. १७त्या दिवसांत ज्या गरोदर किंवा अंगावर पाजणाऱ्या असतील त्यांची केवढी दुर्दशा होणार! १८तरी हे दिवस हिंवाळ्यात होऊ नये म्हणून प्रार्थना करा; १९कारण देवाने निर्माण केलेल्या सृष्टीच्या प्रारंभापासून आजपर्यंत झालेल्या नाहीत व पुढेही कधी होणार नाहीत इतक्या हालअपेष्टांचे ते दिवस होतील. २०आणि ते दिवस प्रभूने [यहोवा, न्यूव.] कमी केले नसते तर कोणाही माणसाचा निभाव लागला नसता; परंतु ज्यांना त्याने निवडले आहे त्या निवडलेल्यांसाठी त्याने ते दिवस कमी केले आहेत.
-------------------------------------------------------------------------------------------------
२१“‘त्या वेळेस (तेव्हा) जर कोणी तुम्हास म्हणेल की, “पाहा! ख्रिस्त अमुक ठिकाणी आहे” “पाहा! तमुक ठिकाणी आहे,” तर ते खरे मानू नका. २२कारण खोटे ख्रिस्त व खोटे संदेष्टे उपस्थित होतील, आणि साधेल तर निवडलेल्यांस देखील फसवावे म्हणून चिन्हे व अद्भुते दाखवतील. २३तुम्ही तर सावध राहा; मी अगोदरच तुम्हाला सर्व काही सांगून ठेवले आहे.
---------------------------------------------------------------------------------------------------
---------------------------------------------------------------------------------------------------
२४“‘परंतु ही संकटे येऊन गेल्यावर त्या दिवसात सूर्य अंधकारमय होईल आणि चंद्र त्याचा प्रकाश देणार नाही, २५आकाशातून तारे गळून पडतील व आकाशातील बळे डळमळतील. २६तेव्हा मनुष्याचा पुत्र मोठ्या पराक्रमाने व वैभवाने मेघारूढ होऊन येत असलेला दृष्टीस पडेल. २७त्या वेळेस (तेव्हा) तो देवदूतांना पाठवून चार दिशांकडून अर्थात पृथ्वीच्या सीमेपासून आकाशाच्या सीमेपर्यंत आपल्या निवडलेल्या लोकांस एकत्र करील.’”
८“तो म्हणाला: ‘तुम्हाला कोणी बहकवू नये म्हणून सावध राहा; कारण माझ्या नावाने पुष्कळ लोक येऊन “मीच तो आहे,” आणि “तो काळ जवळ आला आहे,” असे म्हणतील. त्यांच्या नादी लागू नका. ९आणि जेव्हा तुम्ही लढाया व दंगे ह्यांविषयी ऐकाल तेव्हा घाबरू नका, कारण ह्या गोष्टी प्रथम होणे अवश्य आहे, तरी एवढ्यात शेवट होत नाही.’
१०“मग (तेव्हा) त्याने त्यांना म्हटले: ‘राष्ट्रावर राष्ट्र व राज्यावर राज्य उठेल; ११मोठमोठे भूमिकंप होतील, जागोजाग मऱ्या येतील व दुष्काळ पडतील आणि भयंकर उत्पात व आकाशात मोठी चिन्हे घडून येतील.
१२“‘परंतु हे सर्व पूर्ण होण्यापूर्वी ते तुमच्यावर हात टाकतील व तुमचा छळ करतील तुम्हाला सभास्थाने व तुरुंग ह्यांच्या स्वाधीन करतील, आणि राजे व अधिकारी ह्यांच्यापुढे माझ्या नावासाठी नेतील. १३ह्यामुळे तुम्हाला साक्ष देण्याची संधी मिळेल. १४तेव्हा उत्तर कसे द्यावे ह्याविषयी आधीच विचार करावयाचा नाही असा मनाचा निर्धार करा, १५कारण मी तुम्हाला अशी वाचा व बुद्धी देईन की तिला अडविण्यास किंवा तिच्याविरूद्ध बोलण्यास तुमचे कोणीही विरोधक समर्थ होणार नाहीत. १६आईबाप, भाऊबंद, नातलग व मित्र हे देखील तुम्हाला धरून देतील, आणि तुमच्यातील कित्येकांना जिवे मारतील; १७आणि माझ्या नावामुळे सर्व तुमचा द्वेष करतील. १८तरी तुमच्या डोक्याच्या एका केसाचाही नाश होणार नाही. १९तुम्ही आपल्या धीराने आपले जीव मिळवाल.
----------------------------------------------------------------------------------------------
२०“‘परंतु, यरूशलेमेस सैन्यांचा वेढा पडत आहे असे पाहाल तेव्हा ती ओसाड पडण्याची वेळ जवळ आली आहे असे समजा. २१त्या वेळेस (तेव्हा) जे यहूदीयांत असतील त्यांनी डोंगरात पळून जावे जे यरूशलेमेत असतील त्यांनी बाहेर निघून जावे व जे शिवारात असतील त्यांनी तिच्या आत येऊ नये; २२कारण शास्त्रलेखांतल्या सर्व गोष्टी पूर्ण होण्यासाठी हे सूड घेण्याचे दिवस आहेत. २३त्या दिवसात ज्या गरोदर व अंगावर पाजणाऱ्या स्त्रिया असतील त्यांची केवढी दुर्दशा होणार! कारण देशावर मोठे संकट येईल व ह्या लोकांवर कोप होईल. २४ते तरवारीच्या धारेने पडतील, त्यांस बंदिवान करून सर्व राष्ट्रांमध्ये नेतील;
-------------------------------------------------------------------------------------------------
आणि परराष्ट्रीयांची सद्दी संपेल तोपर्यंत परराष्ट्रीय यरूशलेमेस पायाखाली तुडवितील.
-----------------------------------------------------------------------------------------------------------
-----------------------------------------------------------------------------------------------------------
२५“‘तेव्हा सूर्य, चंद्र व तारे ह्यांत चिन्हे घडून येतील, आणि पृथ्वीवर समुद्र व लाटा ह्यांच्या गर्जनेने रा घाबरी होऊन पेचात पडतील, २६भयाने व जगावर कोसळणाऱ्या अरिष्टांची धास्ती घेतल्यामुळे माणसे मरणोन्मुख होतील; आकाशातील बळे डळमळतील. २७त्या काळी (तेव्हा) मनुष्याचा पुत्र पराक्रमाने व मोठ्या वैभवाने मेघात येताना लोकांच्या दृष्टीस पडेल. २८ह्या गोष्टीस आरंभ होऊ लागेल तेव्हा सरळ उभे राहा आणि आपली डोकी वर करा, कारण तुमचा मुक्तिसमय जवळ आला आहे.’”
[२० पानांवरील चित्रं]
सामान्य युग ७० मधील संकट यरूशलेम आणि यहुदी व्यवस्थेने अनुभवलेल्या सर्वात मोठ्या संकटातील एक होते