द वॉचटावर व अवेक!—सत्याची समयोचित नियतकालिके
“हे परमेश्वरा [यहोवा, न्यूव.], सत्यस्वरुप देवा, तू माझा उद्धार केला आहे.”—स्तोत्रसंहिता ३१:५.
१, २. (अ) एका बहिणीने द वॉचटावर मध्ये जे वाचले त्याबद्दल तिला कसे वाटले? (ब) आमच्या नियतकालिकांविषयी कोणते प्रश्न विचारले आहेत?
एका ख्रिस्ती भगिनीने लिहिले, “मी तुमचे खूप आभार मानते, तुम्ही वॉचटावर मध्ये दिलेला ‘यु कॅन फाइन्ड कम्फर्ट इन टाईम्स ऑफ डिस्ट्रेस’a लेख खूप माहितीयुक्त होता. आपण दिलेले बहुतेक मुद्दे, मला सामोरे जावे लागलेल्या माझ्या भावनांसारखेच होते; मला असे वाटले की हा लेख खास माझ्यासाठीच लिहिला आहे. पहिल्यांदा मी वाचले तेव्हा, माझे डोळे अश्रूंनी भरले होते. मला कसे वाटते याबद्दल कोणाला तरी माहीत आहे हे जाणणे किती आश्चर्यकारक आहे! मी यहोवाची एक साक्षीदार असल्याबद्दल अतिशय कृतज्ञ आहे. नजिकच्या भवितव्यात नंदनवनमय पृथ्वीवरील सार्वकालिक जीवनाचे अभिवचन व आता आमच्या जीवाकरता सांत्वन आम्हाला आणखी कोठे मिळू शकते! आभारी आहे. शतशः आपली आभारी आहे.”
२ तुम्हाला देखील त्याप्रमाणेच वाटले का? द वॉचटावर किंवा त्याच्या जोडीचे नियतकालिक, अवेक! यातील काही गोष्टी विशेषपणे तुमच्याकरता लिहिल्या होत्या असे तुम्हाला कधी वाटले का? लोकांच्या हृदयांना अपील करणारे आमच्या मासिकांमध्ये असे काय आहे? त्यात सामावलेल्या जीवन-वाचवणाऱ्या संदेशाचा लाभ घेण्यासाठी आम्ही इतरांना कशी मदत करु शकतो?—१ तीमथ्य ४:१६.
सत्याचे समर्थन करणारी मासिके
३. कोणत्या चांगल्या कारणासाठी वॉचटावर व अवेक! मासिकांनी अनेक वाचकांच्या जीवनावर प्रभाव पाडला आहे?
३ यहोवा “सत्यस्वरुप देव” आहे. (स्तोत्रसंहिता ३१:५) त्याचे वचन, पवित्र शास्त्र सत्याचे पुस्तक आहे. (योहान १७:१७) प्रामाणिक अंतःकरणाचे लोक सत्याला प्रतिसाद देतात. (पडताळा योहान ४:२३, २४.) द वॉचटावर व अवेक! ने लाखो लोकांच्या अंतःकरणावर खोल प्रभाव पाडण्याचे एक कारण, ती प्रामाणिकतेची आणि सत्याची नियतकालिके आहेत, हे होय. वास्तविकपणे, पवित्र शास्त्र सत्याच्या निष्ठावंतपणाच्या वादविषयामुळेच द वॉचटावर छापण्यास सुरवात झाली.
४, ५. (अ) कोणत्या परिस्थितीने सी. टी. रसेल यांना द वॉचटावर प्रकाशित करण्याप्रत निरवले? (ब) द वॉचटावर नियतकालिकाचा वापर “विश्वासू व बुद्धिमान दास” कसा करत आहे?
४ चार्लस् टी. रसेल यांनी १८७६ मध्ये, न्यूयॉर्क रोचेस्टर मधील नेल्सन एच. बॉर्बर सोबत संबंध जोडले. रसेल यांनी बॉर्बरच्या हेरल्ड ऑफ द मॉर्निंग या धार्मिक नियतकालिकाच्या छपाईसाठी निधी पुरवला, ज्याचे प्रमुख संपादक बॉर्बर व सहसंपादक रसेल होते. तथापि, दीड वर्षानंतर, ऑगस्ट १८७८ च्या हेरल्ड अंकात बॉर्बर यांनी ख्रिस्ताच्या मृत्युच्या खंडणीचे मूल्य नाकारणारा एक लेख लिहिला. रसेल हे बॉर्बरपेक्षा जवळजवळ ३० वर्षांनी लहान होते, त्यांनी पुढच्याच अंकात खंडणीचे मूल्य उंचावणाऱ्या लेखाने प्रतिसाद दिला, त्याचा उल्लेख त्यांनी “देवाच्या वचनातील अतिशय महत्त्वपूर्ण शिक्षण” म्हणून केला. (मत्तय २०:२८) बॉर्बर यांच्यासोबत शास्त्रवचनातून पुनःपुन्हा तर्क करण्याच्या प्रयत्नानंतर, शेवटी, रसेल यांनी हेरल्ड बरोबरील सर्व संबंध तोडून टाकण्याचे ठरवले. जून १८७९ पासूनच्या त्या नियतकालिकाच्या अंकात सहसंपादक या नात्याने रसेल यांचे नाव आले नाही. एक महिन्यानंतर, २७ वर्षांच्या रसेलने झायन्स् वॉचटावर ॲण्ड हेरल्ड ऑफ क्राइस्टस् प्रेझेन्स् (आता माहीत असलेले टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक), प्रकाशित करण्यास सुरवात केली, ज्याने सुरवातीपासूनच खंडणीसारख्या शास्त्रवचनीय सत्याला उंचावले.
५ गेल्या ११४ वर्षांपासून, द वॉचटावरने एखाद्या कुशल वकीलाप्रमाणे, स्वतःला पवित्र शास्त्र सत्याचे व सिद्धातांचे संरक्षण करणारे असे स्थापित केले आहे. या गतीत त्याने लाखो गुणग्राहकता बाळगणाऱ्या वाचकांचा आत्मविश्वास जिंकला आहे. अजूनही जोरदारपणे ते खंडणीला पाठबळ देते. (उदाहरणार्थ, फेब्रुवारी १५, १९९१ चा अंक पाहा.) आणि स्थापन झालेल्या यहोवाच्या राज्याची घोषणा करण्यासाठी व आध्यात्मिक अन्न “यथाकाळी” खावयास देण्यासाठी ते अजूनही “विश्वासू व बुद्धिमान दास” तसेच त्यांचे नियमन मंडळ यांचे प्रमुख हत्यार आहे.—मत्तय २४:१४, ४५.
६, ७. द गोल्डन एजचा कोणता स्पष्ट हेतू होता, आणि काय दाखवते की, विचारवंत लोकांनी त्याच्या संदेशाला प्रतिसाद दिला?
६ अवेक! मासिकाबद्दल काय? अवेक!ने देखील त्याच्या सुरवातीपासून सत्याचे समर्थन केले. आरंभाला द गोल्डन एज म्हटलेल्या, या मासिकाची रचना सर्व लोकांना वितरण करण्यासाठी केली गेली. ऑक्टोबर १, १९१९ मधील पहिल्या अंकाने त्याच्या उद्देशाबद्दल म्हटले: “याचा उद्देश, वर्तमान दिवसातील अभूतपूर्व घटनांचा खरा अर्थ ईश्वरी बुद्धिच्या प्रकाशात स्पष्ट करणे व विचार करणाऱ्या मनांना, महान आशीर्वाद मानवजातीच्या हाताशी असणाऱ्या वेळेची पुराव्याद्वारे निर्विवाद आणि खात्री पटवून देणे हा आहे.” विचारवंत लोकांनी द गोल्डन एजच्या संदेशाला प्रतिसाद दिला. अनेक वर्षे, याचा खप द वॉचटावरपेक्षा अधिक होता.b
७ तथापि, द वॉचटावर व अवेक! नियतकालिकांचे आकर्षण, ते प्रकाशित करत असलेल्या सिद्धांतासंबंधीच्या सत्याची वास्तविकता आणि जागतिक परिस्थितीविषयी भविष्यवादित घटना सांगण्याच्याही पलिकडे जाते. विशेषपणे, मागील एक किंवा दोन दशकात, आमच्या मासिकाने लोकांच्या अंतःकरणावर, आणखी एका कारणासाठी देखील प्रभाव पाडला आहे.
लोकांच्या जीवनावर प्रभाव पाडणारे समयोचित लेख
८. यहूदाने त्याच्या वाचकांना मंडळीतील कोणत्या प्रभावांचा विरोध करण्यास आर्जवण्यासाठी कोणत्या लिखाणाची जुळवणी केली?
८ येशू ख्रिस्ताच्या मृत्यू व पुनरूत्थानानंतर जवळजवळ ३० वर्षानंतर, पवित्र शास्त्राचा लेखक, यहुदाने एका आव्हानात्मक परिस्थितीला तोंड दिले. ख्रिश्चनांमध्ये अनैतिक, पशूवृत्तीचे लोक नकळत आत शिरले होते. अभिषिक्त ख्रिश्चनांच्या सर्वसाधारण तारणाविषयी सहख्रिश्चनांना लिहिण्याची यहुदाची इच्छा होती. उलटपक्षी, पवित्र आत्म्याने मार्गदर्शित झाल्यामुळे, मंडळीतील भ्रष्ट प्रभावांचा विरोध करण्यासाठी त्याला त्याच्या वाचकांना आर्जवणे आवश्यक वाटले. (यहूदा ३, ४, १९-२३) यहूदाने परिस्थितीला जुळवून घेतले व त्याच्या ख्रिस्ती बांधवांच्या गरजांची पूर्ती करण्यासाठी समयोचित सल्ला पुरवला.
९. आमच्या नियतकालिकासाठी समयोचित लेखांना पुरवण्यात काय समाविष्ट आहे?
९ अशाचप्रकारे, आमच्या नियतकालिकासाठी समयोचित लेख तयार करणे ही आव्हानात्मक जबाबदारी आहे. वेळ बदलतो, व याबरोबरच लोकात देखील बदल होतो, त्यांच्या गरजा व त्यांच्या आवडी-निवडी, मागील एक किंवा दोन दशकापूर्वीप्रमाणे राहिल्या नाहीत. एका प्रवासी पर्यवेक्षकांनी अलिकडे असे निरिक्षिले: “१९५०शी मध्ये मी साक्षीदार झालो तेव्हा, लोकांसोबत पवित्र शास्त्राचा अभ्यास करण्याचा आमचा प्रस्ताव हा मुलभूतपणे सिद्धांतासारखा होता, म्हणजे त्रैक्य, नरकाग्नी, जीव व इत्यादि गोष्टींचे सत्य त्यांना शिकवण्याचा होता. परंतु आता असे दिसते की, लोकांच्या जीवनात अनेक समस्या आणि अडचणी असल्यामुळे कसे जगायचे हे आम्ही त्यांना शिकवायचे आहे.” ते असे का बरे?
१०. मानवी कारभारात १९१४ पासून वेगाने ऱ्हास होत गेल्याने आम्हाला आश्चर्य का वाटू नये?
१० पवित्र शास्त्राने, ‘शेवटल्या दिवसाविषयी’ भाकीत केले: “दुष्ट आणि भोंदू माणसे ही दुसऱ्यास फसवून व स्वतः फसून दुष्टपणात अधिक सरसावतील.” (२ तीमथ्य ३:१, १३) अशारितीने, काळाची समाप्ती १९१४ पासून सुरू झाल्यामुळे मानवी कारभारात वेगाने ऱ्हास होत असल्याने आम्हाला आश्चर्य वाटता कामा नये. सैतानाचा उरलेला काळ, पूर्वीपेक्षा कमी असल्यामुळे, तो मानवी समाजावरील त्याच्या क्रोधाला पूर्वीपेक्षा अधिक वाट करून देत आहे. (प्रकटीकरण १२:९, १२) या परिणामास्तव, नैतिक आणि कौटुंबिक मूल्ये ३० किंवा ४० वर्षां आधी जे होते त्यापेक्षा खूपच भिन्न आहेत. सर्वसामान्य लोक आता, आधीच्या दशकांतील लोकांप्रमाणे धार्मिक प्रवृत्तीचे नाहीत. गुन्हे इतके बोकाळत चालले आहेत की, केवळ २० ते ३० वर्षांपूर्वी ऐकली देखील नव्हती अशी खबरदारी लोक घेत आहेत.—मत्तय २४:१२.
११. (अ) लोकांच्या मनात कोणत्या प्रकारचे विषय आहेत, आणि त्या गरजेला विश्वासू व बुद्धिमान दास वर्गाने कसा प्रतिसाद दिला? (ब) द वॉचटावर व अवेक! मधील लेखाने तुमच्या जीवनावर प्रभाव पाडल्याचे एखादे उदाहरण द्या.
११ मग, अनेक लोकांच्या मनात, भावनात्मक, सामाजिक आणि कौटुंबिक विषय आहेत यात काहीही आश्चर्य नाही. विश्वासू आणि बुद्धिमान दास वर्गाने धैर्याने, लोकांच्या वास्तविक गरजांशी संबंध ठेवणाऱ्या व त्यांच्या जीवनावर खरेपणाने प्रभाव पाडणाऱ्या समयोचित लेखांना प्रकाशित करुन द वॉचटावर व अवेक! याद्वारे प्रतिसाद दिला आहे. काही उदाहरणांचा विचार करा.
१२. (अ) एक-पालकीय कुटुंबांविषयी १९८० च्या द वॉचटावरसाठी लेख तयार का केले होते? (ब) एका बहिणीने एक-पालकीय कुटुंबावरील लेखाबद्दल कशी गुणग्राहकता व्यक्त केली?
१२ कौटुंबिक विषय. जागतिक अहवालाने एकपालकीय कुटुंबात झालेली वाढ दाखवली तेव्हा, सप्टेंबर १५, १९८० च्या द वॉचटावरने “एक-पालकीय कुटुंबे—समस्यांचा सामना करत आहेत” या विषयाचा नवीनच लेख तयार केला. या लेखांचे दुहेरी उद्देश होते: (१) एकट्या-पालकांना तोंड द्यावे लागत असलेल्या असामान्य समस्यांचा सामना करण्यास मदत करणे आणि (२) एक-पालकीय कुटुंबाबद्दल “समसुखदुःखी” व खरेपणाने “समाचार घेणे” यासाठी इतरांना ज्ञान करून देणे जेणेकडून ते देखील त्यांना मदत करू शकतात. (१ पेत्र ३:८; याकोब १:२७) अनेक वाचकांनी या लेखाची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी संस्थेला लिहिले. एका एक-पालकाने लिहिले, “मुखपृष्ठ पाहिल्यावर माझ्या डोळ्यात पाणी आले, व जेव्हा मी मासिक उघडून त्यातील माहिती वाचली तेव्हा, अगदी उचित समयी पुरवलेल्या माहितीबद्दल यहोवाला कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी माझे हृदय भरून आले.”
१३. निराशेबद्दल अधिक खोलवर केलेली कोणती चर्चा १९८१ मधील अवेक! मध्ये प्रकाशित झाली, आणि याविषयी एका वाचकाला काय सांगायचे होते?
१३ भावनात्मक विषय. द वॉचटावर व अवेक! मासिकात १९६० पासूनच निराशेचा विषय चर्चिला गेला. (१ थेस्सलनीकाकर ५:१४) परंतु, सप्टेंबर ८, १९८१ अवेक! मासिकात “तुम्ही निराशेचा सामना करु शकता!” या शृंखलेतील सुरवातीच्या विषयावर हा नवा व सकारात्मक दृष्टिकोन सादर करण्यात आला. लवकरच वॉचटावर संस्थेवर संपूर्ण जगभरातून गुणग्राहकतेच्या पत्रांचा वर्षाव झाला होता. एका बहिणीने लिहिले, “माझ्या अंतःकरणातील भावनांना मी लिहिण्याद्वारे कसे व्यक्त करु. मी २४ वर्षाची आहे, व मागील दहा वर्षांपासून माझ्यासमोर अनेक निराशेचे क्षण आले होते. परंतु आता मला यहोवाच्या नजिक वाटते व या प्रेमळ लेखाद्वारे यहोवाने त्याच्या लोकांच्या निराशेच्या गरजांकडे लक्ष दिले त्याबद्दल मी फार कृतज्ञ आहे, व म्हणून आपणाला हे सांगण्याची माझी इच्छा होती.”
१४, १५. (अ) मुलांना दिल्या जाणाऱ्या वाईट वागणूकीच्या विषयाबद्दल आमच्या नियतकालिकात कशी चर्चा केली गेली? (ब) ऑस्ट्रेलियाच्या जॉकीवर कोणत्या मासिकाच्या लेखाने छाप पाडली?
१४ सामाजिक विषय. पवित्र शास्त्राने भाकित केले की, “शेवटल्या दिवसात” मनुष्ये, “स्वार्थी, . . . ममताहीन, . . . असंयमी, क्रूर, चांगल्याबद्दल प्रेम न बाळगणारी” असतील. (२ तीमथ्य ३:१-३) यास्तव, मुलांना दिली जाणारी वाईट वागणूक आज सर्वत्र मोठ्या प्रमाणात होत असल्याने आम्ही आश्चर्य करु नये. ऑक्टोबर १, १९८३ मधील द वॉचटावरच्या “गुन्ह्यांत बळी पडलेल्यांसाठी मदत,” लेखात, या विषयाची प्रामाणिक चर्चा केली होती. आठ वर्षांनी, “मुलांना दिल्या जाणाऱ्या वाईट वागणूकीच्या जखमांना बरे करणे,” ही ऑक्टोबर ८, १९९१ मधील अवेक! सुरवातीच्या लेखांची शृंखला बळी पडलेल्यांना आशा व समज पुरवण्यासाठी तसेच इतरांना प्रज्वलित करण्यासाठी काळजीपूर्वकतेने तयार केली होती. जेणेकडून ते देखील दुसऱ्यांना मदतदायी साहाय्य देऊ शकतील. या शृंखलेच्या लेखांनी आमच्या नियतकालिकाच्या इतिहासातील वाचकांच्या सर्वाधिक प्रतिसादाला सामोरे आणले. एका वाचकाने लिहिले: “मला बरे वाटण्याचा मोठा परिणाम म्हणजे त्या लेखातील सांत्वनदायक विचार आणि शास्त्रवचनीय संदर्भ होय. यहोवाने माझ्याविषयी कमी विचार केला नाही हे जाणणे पूर्ण दिलासा देणारे होते. मी एकटाच नाही हे जाणणे देखील त्याप्रमाणेच सांत्वनदायक होते.”
१५ मेलबर्न ऑस्ट्रेलियातील एका जॉकीने दूर पल्ल्यावरून सिडनी येथील वॉचटावर संस्थेच्या दप्तराला फोन केला, त्याने घोड्याच्या शर्यतीतील सभोवतालच्या परिस्थितीबद्दल तिटकारा व्यक्त केला. त्याने म्हटले की, “रेप—वुमन्स् नाईटमेअर,” हे मार्च ८ चे अवेक! नुकतेच वाचले व अशाप्रकारचे मोलवान मासिक असेल यावर त्याचा विश्वासच बसत नव्हता. त्याने ३० मिनिटे प्रश्ने विचारले व दिलेली उत्तरे ऐकण्यात त्याला आनंद वाटला.
१६. आमच्या नियतकालिकांबद्दलची गुणग्राहकता तुम्ही कोणत्या मार्गांनी प्रदर्शित करू शकता?
१६ तुमच्याबद्दल काय? द वॉचटावर व अवेक! मध्ये प्रकाशित झालेल्या विशिष्ट लेखाने तुमच्या जीवनावर प्रभाव पाडला आहे का? असल्यास, आमच्या नियतकालिकाबद्दल तुम्हाला कृतज्ञतेची अधिक जाणीव होते, यात काही संशय नाही. तुम्ही तुमची गुणग्राहकता कशी प्रदर्शित करू शकता? निश्चितच, स्वतः प्रत्येक अंक वाचण्याद्वारे ते करु शकता. तसेच तुम्ही या मुल्यवान नियतकालिकांचे विस्तृत प्रमाणात वितरण करण्यात देखील सहभाग घेऊ शकता. हे कसे केले जाऊ शकते?
त्यांची इतरांसोबत सहभागिता करा!
१७. मासिकांचे वितरण वाढवण्यासाठी, मंडळ्या काय करू शकतात?
१७ प्रथम, प्रत्येक मंडळी करू शकते असे काही आहे. ऑक्टोबर १९५२ च्या इन्फॉरमॅट (आता आमची राज्य सेवा) च्या अंकात म्हटले: “मासिकांचे वितरण करण्याचा अधिक प्रभावशाली मार्ग म्हणजे घरोघर व दुकानातून दुकानात जाणे होय. या कारणास्तव, संस्था शिफारस करते की, मासिकांचे वितरण मासिक दिवस कार्याचा नियमित भाग असला पाहिजे.” आज देखील तो सल्ला महत्त्वपूर्ण आहे. मंडळ्या नियमित मासिक वितरण दिनाच्या, मासिक साक्षकार्यासाठी एक खास दिवस बाजूला ठेवणाऱ्या आराखड्याची योजना करू शकतील. अनेक मंडळ्यांसाठी, खास उल्लेख केलेल्या शनिवारी चांगली वेळ असेल यात काही शंका नाही, होय, प्रत्येक मंडळी मासिक साक्षकार्यासाठी—घरोघर, दुकानातून दुकानातल्या कार्यासाठी, रस्त्यावरील कार्यासाठी, मासिक मार्गासाठी, खास दिवस किंवा संध्याकाळ राखून ठेवोत. त्या सोबतच, तुम्ही राज्य प्रचारक, मासिकांचे वितरण वाढवण्यासाठी काय करू शकता?
१८, १९. (अ) वॉचटावर व अवेक! ची जाणीव राखल्याने मासिके सादर करण्यासाठी ते कसे मदत करू शकते? (ब) मासिके प्रस्तुत करताना, संक्षिप्त, मुद्देसूद सादरतेचे कोणते फायदे आहेत? (क) मासिकांना लोकांच्या घरी घेऊन जाण्याच्या मूल्याला कोणती गोष्ट दाखवते?
१८ “द वॉचटावर” व “अवेक!” ची जाणीव असणे हे पहिले पाऊल आहे. मासिकाचे आधीच वाचन करून ठेवा. प्रत्येक लेख वाचत असताना, स्वतःला विचारा, ‘हा लेख कोणाच्या आवडीचा असू शकेल?’ लेखातील आवड वाढण्यास बोलता येण्यासाठी काही गोष्टींचा विचार करा. नियमित मासिक वितरण दिनाच्या कार्याला सहकार्य देण्याव्यतिरिक्त, प्रत्येक संधीचा फायदा घेऊन इतरांबरोबर सहभागिता करता येण्यासाठी—प्रवास करताना, बाजारहाट करताना, व सहकर्मचाऱ्यासोबत, शेजाऱ्यासोबत, शाळा सोबत्याशी किंवा शिक्षकांसोबत बोलताना, आपल्या सोबत काही अंक का बाळगू नये?
१९ तुमची सादरता साधी ठेवा हा दुसरा सल्ला आहे. डिसेंबर १, १९५६ च्या द वॉचटावरने उद्धृत केले: “मासिक सादर करताना संक्षिप्त, मुद्देसुद सादरता उत्तम आहे. अधिक अंक प्रस्तुत करणे याचा उद्देश आहे. ते स्वतःच ‘बोलत राहतील.’” काही प्रचारकांना, लेखातील एखादी कल्पना काढून ते थोडक्यात मांडून मासिक सादर करणे प्रभावकारी दिसून आले आहे. घरात मासिकाचा स्वीकार केल्यावर, तुमच्याकडून मासिक स्वीकारलेल्या व्यक्तीशिवाय इतरांसोबत देखील ते मासिक “बोलू” शकते. आयर्लंडच्या विद्यापिठातील एका तरुण विद्यार्थीनीच्या वडिलाने साक्षीदारांकडून स्वीकारलेला सप्टेंबर १, १९९१ द वॉचटावरचा अंक तिने वाचला. दळणवळण आणि इतर विषयावरील लेखांनी तिच्या आवडीला जागृत केले. मासिक वाचल्यावर लगेच तिने दूरध्वनीच्या पुस्तकात पाहून साक्षीदारांना फोन केला. तिच्यासोबत त्वरीत पवित्र शास्त्राभ्यास सुरू झाला व या तरूण स्त्रीचा जुलै, १९९३ च्या “ईश्वरी शिक्षण” या प्रांतिय अधिवेशनात बाप्तिस्मा झाला. खात्रीने मग, मासिके लोकांबरोबर “बोलण्यासाठी” त्यांच्या घरी आपण घेऊन जाऊ या! एका प्रवासी पर्यवेक्षकांनी आणखी एक सोपा सल्ला पुरवला: “मासिकांना तुमच्या पुस्तकाच्या बॅगमधून बाहेर काढा.” खरे म्हणजे, तुम्ही जे काही बोलता त्यामुळे घरमालकाची आस्था खेचली जात नसल्यास, कदाचित मासिकाच्या मुखपृष्ठावरील चित्रे तुमच्याकरता मासिकांना सादर करू शकतील.
२०, २१. (अ) मासिक कार्यात भाग घेताना, तुम्ही लवचिक कसे राहू शकता? (ब) प्रत्येक महिन्याला अधिक मासिके सादर करण्यासाठी तुम्ही काय करू शकता?
२० तिसरा सल्ला लवचिक असा याविषयी आहे. (पडताळा १ करिंथकर ९:१९-२३.) काही संक्षिप्त सादरता तयार करा. एक लेख पुरूषांना व दुसरा स्त्रियांना अपील करणारा मनामध्ये ठेवा. युवकांसाठी, “तरुण लोक विचारतात . . . ” हा लेख तुम्ही सादर करू शकता. मासिक कार्यात भाग घेत असताना देखील लवचिक असा. मासिक वितरण दिनाशिवाय, संध्याकाळचे साक्षकार्य देखील घरोघरी जाऊन मासिके सादर करण्यासाठी उत्तम सुसंधी पुरवते.
२१ चवथा सल्ला वैयक्तिक ध्येय ठेवा हा आहे. एप्रिल १९८४ मधील आमची राज्य सेवेच्या पुरवणीत दिलेल्या, “मासिके जीवनाच्या मार्गाकडे निर्देश करतात,” या लेखात असे म्हटले होते: “उदाहरणार्थ, सल्ला म्हणून, प्रचारकांचे त्यांच्या परिस्थितीला अनुलक्षून प्रत्येक महिन्याला कदाचित १० मासिके देण्याचे ध्येय असेल; पायनियर ९० मासिके देण्याचा प्रयत्न करु शकतात. अर्थातच, काही प्रचारक प्रत्येक महिन्याला अधिक मासिके सादर करु शकतील या कारणामुळे ते अधिक उच्च वैयक्तिक ध्येय ठेवू शकतील. तथापि, नाजूक प्रकृती, क्षेत्राचा प्रकार, किंवा इतर उचित कारणामुळे, इतरांची ध्येये कमी असतील. तरीपण, यहोवाला असलेली त्यांची सेवा तितक्याच मोलाची आहे. (मत्तय १३:२३; लूक २१:३, ४) महत्त्वाची गोष्ट म्हणजे, वैयक्तिक ध्येय असणे ही आहे.”
२२. आमच्या समयोचित सत्याच्या नियतकालिकांबद्दल कोणत्या मार्गांनी आम्ही यहोवाला कृतज्ञता दाखवू शकतो?
२२ “सत्यस्वरूप देव,” यहोवाने आम्हाला ही समयोचित नियतकालिके पुरवण्यासाठी विश्वासू व बुद्धिमान दास तसेच त्याच्या नियमन मंडळाचा वापर केल्याबद्दल आम्ही त्याचे किती ऋणी आहोत! (स्तोत्रसंहिता ३१:५) जोवर यहोवा इच्छितो, तोवर लोकांच्या खऱ्या गरजा जाणून ही मासिके नियमित येत राहतील. यहोवाच्या नैतिकतेच्या उच्च दर्जांना ती उंच धरून राहतील. ती खऱ्या सिद्धांताचे महत्त्व वाढवण्याचे थांबवणार नाहीत. यहोवाच्या खऱ्या उपासकामधील वाढत्या संख्येच्याद्वारे, देवाचे राज्य शासन करताना, आणि पृथ्वीवर पूर्वीपेक्षा अधिक मोठ्या प्रमाणात देवाची इच्छा होत असताना ती आमच्या दिवसाला चिन्हित करणाऱ्या भविष्यवाण्यांच्या पूर्णतेवर लक्ष केंद्रित करण्यास चालू ठेवतील. (मत्तय ६:१०; प्रकटीकरण ११:१५) द वॉचटावर व अवेक! मध्ये आम्हासाठी किती मुल्यवान खजिना आहे! नम्र-अंतःकरणाच्या लोकांच्या जीवनावर प्रभाव पाडणाऱ्या या महत्त्वपूर्ण नियतकालिकांची सहभागिता करण्यासाठी आपण प्रत्येक सुसंधीचा फायदा घेऊ या.
[तळटीपा]
a ऑक्टोबर १५, १९९२, पृष्ठे १९-२२.
b अनेक वर्षे द वॉचटावर मासिकाकडे, ते विशेषपणे अभिषिक्त ख्रिश्चनांसाठीच आहे अशा दृष्टीने पाहिले जात होते. तथापि, १९३५ च्या सुरवातीला, पृथ्वीवरील सार्वकालिक जीवनाची आशा असलेल्या “मोठ्या लोकसमुदाया”ला द वॉचटावर मासिक प्राप्त करून त्याचे वाचन करण्याचे उत्तेजन देण्यावर अधिक भर दिला गेला. (प्रकटीकरण ७:९) काही वर्षानंतर, १९४० मध्ये, द वॉचटावर रस्त्यावरील लोकांना नियमितपणे सादर केले जात होते. त्यानंतर, त्याचे वितरण त्वरीत वाढले.
तुमचे उत्तर काय आहे?
▫ कोणती गोष्ट दाखवते की, द वॉचटावर व अवेक! ही सत्याची नियतकालिके आहेत?
▫ द वॉचटावर व अवेक! ने लोकांच्या जीवनावर कसा प्रभाव पाडला आहे?
▫ मासिकांचे वितरण वाढवण्यासाठी मंडळ्या काय करू शकतात?
▫ अधिक मासिके प्रस्तुत करण्यासाठी कोणते सल्ले तुम्हाला मदत करू शकतात?
[१८ पानांवरील चौकट]
लोकांच्या जीवनावर प्रभाव पाडला असे काही लेख
अनेक वाचकांनी, पुष्कळ वर्षांपासून द वॉचटावर व अवेक! मध्ये प्रकाशित झालेल्या खास लेखाबद्दलची गुणग्राहकता व्यक्त करण्यासाठी संस्थेला लिहिले आहे. अनेक विषयांपैकी काहींचा आमच्या वाचकांच्या जीवनावर प्रभाव पाडणाऱ्या विषयाची यादी खाली दिली आहे. या किंवा इतर लेखांनी तुमचे जीवन बदलले आहे का?
द वॉचटावर
“गुप्त चुकांवर मात करण्यासाठी देवाची मदत स्वीकारा” (एप्रिल १५, १९८५, इंग्रजी)
“वृद्ध पालकांच्या बाबतीत ईश्वरी भक्ती आचरणे” (डिसेंबर १, १९८७)
“उद्देशयुक्त शिक्षण” (फेब्रुवारी १, १९९३)
अवेक!
“तुम्ही निराशेबरोबर लढत देऊ शकता! (सप्टेंबर ८, १९८१ इंग्रजी)
“तुम्ही प्रीती करत असलेला कोणी मरतो तेव्हा . . . ” (एप्रिल २२, १९८५ इंग्रजी)
“तुमच्या मुलांचे संरक्षण करा!” (ऑक्टोबर ८, १९९३ इंग्रजी)
[१९ पानांवरील चित्रं]
कॅनडामध्ये मासिकासह घरोघरी प्रचार करणे
[२० पानांवरील चित्रं]
म्यानमारमध्ये जीवनाचा मार्ग दाखवणाऱ्या मासिकांना सादर करणे