यहोवा ईश्वरी पद्धतीने शासन करतो
“यहोवा सदासर्वकाळ राजा असेल.”—स्तोत्रसंहिता १४६:१०, न्यूव.
१, २. (अ) प्रभुत्त्व करण्याचे मानवाचे प्रयत्न फोल का ठरले आहेत? (ब) केवळ कोणत्या प्रकारचे सरकार खरेपणाने यशस्वी ठरले आहे?
निम्रोदाच्या काळापासून, मनुष्याने मानवी समाजावर शासन करण्यासाठी विविध मार्गांचा अवलंब केला. हुकूमशाही, राजसत्ताक राज्य, अल्पलोकसत्ताक राज्य, आणि लोकशाहीचे विविध प्रकार आहेत. यहोवाने या सर्वांना अनुमती दिली आहे. खरोखर, सर्व अधिकाराचा उगम शेवटी देव आहे या जाणीवेमुळे, त्याने विविध शासकांना त्यांच्या सापेक्ष हुद्यावर नेमले आहे. (रोमकर १३:१) तरीसुद्धा, सरकाराच्या बाबतीत मनुष्यांचे सर्व प्रयत्न फोल ठरले आहेत. कोणत्याही मानवी शासकाने चिरकाल टिकणाऱ्या, स्थिर, न्याय्य समाजाला निर्माण केले नाही. सर्वांनीच अनेकदा, ‘एक मनुष्य दुसऱ्यावर सत्ता चालवून त्याचे नुकसान’ केले आहे.—उपदेशक ८:९.
२ आम्हाला यामुळे आश्चर्य वाटावे का? कदापि नाही! अपरिपूर्ण मानवाला स्वतःवर शासन करण्यासाठी निर्माण केले नव्हते. “मनुष्याचा मार्ग त्याच्या हाती नाही, पावले नीट टाकणे हे चालणाऱ्या मनुष्याच्या हाती नाही.” (यिर्मया १०:२३) यामुळेच, संपूर्ण मानवी इतिहासात केवळ एकाच प्रकारचे सरकार खरेपणाने यशस्वी झाले आहे. ते कोणते? यहोवा देवाच्या अधीन असलेले ईश्वरी पद्धतीचे सरकार. बिब्लिकल ग्रीकमध्ये, “ईश्वरी शासन पद्धत” याचा अर्थ देवाकडील [थि·ओसʹ] शासन [क्रॅʹटोस]. यहोवा देवाच्या सरकाराशिवाय आणखी कोणते सरकार चांगले असू शकेल?—स्तोत्रसंहिता १४६:१०.
३. ईश्वरी शासन पद्धतीविषयी कोणती आरंभीची उदाहरणे पृथ्वीवर अस्तित्त्वात होती?
३ ईश्वरी शासन पद्धत आदाम आणि हव्वेने यहोवाविरूद्ध बंड करेपर्यंत, म्हणजे अल्प काळ टिकली. (उत्पत्ती ३:१-६, २३) अब्राहामाच्या काळी, सालेम शहरावर राजा व याजक असलेल्या मलकीसदेकद्वारे ईश्वरी शासन पद्धत अस्तित्त्वात होती असे दिसते. (उत्पत्ती १४:१८-२०; इब्रीयांस ७:१-३) तथापि, यहोवाच्या मार्गदर्शनाखाली, इ. स. पूर्व १६व्या शतकात सीनायच्या रानात पहिल्या राष्ट्रीय ईश्वरी शासनाच्या पद्धतीची प्रस्थापना झाली. ते कसे झाले? त्या ईश्वरी शासन पद्धतीने कसे कार्य केले?
ईश्वरी शासन पद्धतीचा जन्म होतो
४. यहोवाने इस्राएलाच्या ईश्वरशासित राष्ट्राची मांडणी कशी केली?
४ इ. स. पूर्व १५१३ मध्ये यहोवाने इस्राएलांना इजिप्तच्या दास्यत्वातून सोडवले व त्यांचा पाठलाग करत असलेल्या फारोच्या सैन्याचा त्याने तांबड्या समुद्रात नाश केला. नंतर त्याने इस्राएलांना सीनाय पर्वताकडे नेले. पर्वतासमोर त्यांनी तळ दिल्यावर देवाने मोशेद्वारे त्यांना सांगितले: “मी मिसऱ्यांचे [इजिप्त] काय केले, ते व तुम्हाला गरूडाच्या पंखावर बसवून मी आपणाकडे कसे आणले आहे हे तुम्ही पाहिले आहे. म्हणून आता तुम्ही खरोखर माझी वाणी ऐकाल आणि माझा करार पाळाल तर सर्व लोकांपेक्षा माझा खास निधी व्हाल, कारण सर्व पृथ्वी माझी आहे.” इस्राएलांनी प्रतिसाद दिला: “परमेश्वराने [यहोवा, न्यूव.] सांगितले आहे ते सर्व आम्ही करू.” (निर्गम १९:४, ५, ८) एक करार करण्यात आला, व ईश्वरी शासन पद्धतीच्या इस्राएली राष्ट्राचा जन्म झाला.—अनुवाद २६:१८, १९.
५. यहोवाने इस्राएलावर शासन केले असे का म्हटले जाऊ शकते?
५ यहोवा मानवी नेत्रांना अदृश्य असताना, त्याने कोणत्या मार्गाने इस्राएलांवर शासन केले बरे? (निर्गम ३३:२०) ते अशाप्रकारे की राष्ट्राचे नियम आणि याजकत्व यहोवानेच लावून दिले होते. नियमांचे पालन व ईश्वरी नियमात दिलेल्या व्यवस्थेप्रमाणे उपासना करणाऱ्यांनी थोर दैवी शासक, यहोवाची सेवा केली. शिवाय, महायाजकाजवळ उरीम आणि थुम्मीम होते, ज्याद्वारे यहोवाने तातडीच्या काळात त्यांना मार्गदर्शन दिले. (निर्गम २८:२९, ३०) पुढे लायक असलेले वडील जण ईश्वरी शासन पद्धतीत यहोवाचे प्रतिनिधी होते आणि देवाच्या नियमांच्या अवलंबाकडे ते लक्ष पुरवत. यातील काही पुरूषांचा अहवाल पाहिल्यावर, कशाप्रकारे मानवांनी देवाच्या नियमाच्या अधीन झाले पाहिजे हे आम्ही चांगल्या रीतीने समजू शकतो.
ईश्वरी शासन पद्धतीखालील अधिकार
६. ईश्वरी शासन पद्धतीत अधिकारावर असण्यासाठी मानवांना एक आव्हान का होते, व या जबाबदारीसाठी कोणत्या प्रकारच्या लोकांची गरज होती?
६ इस्राएलात अधिकाराच्या पदावर असणाऱ्यांसाठी तो फार मोठा विशेषाधिकार होता, परंतु त्यांचे संतुलन सांभाळण्यासाठी प्रयत्न आणि निश्चयाची आवश्यकता होती. यहोवाच्या नावाच्या पवित्रीकरणापेक्षा स्वतःच्या मी-पणाला अधिक महत्त्व न देण्याची खबरदारी त्यांना बाळगायची होती. “पावले नीट टाकणे हे चालणाऱ्या मनुष्याच्या हाती नाही,” हे ईश्वरप्रेरित विधान इतर मानवजातीच्या बाबतीत ज्याप्रमाणे खरे आहे, तेच इस्राएलाच्या बाततीत देखील खरे होते. इस्राएल हे ईश्वरी शासन पद्धतीचे आहे व स्वतःच्या नव्हे तर यहोवाच्या इच्छेप्रमाणे त्यांना करावयाचे होते याची आठवण वडील जनांनी ठेवली तेव्हाच इस्राएल लोकांची भरभराट होत गेली. इस्राएलाची स्थापना केल्यावर लगेच, मोशेचा सासरा, इथ्रोने ते कोणत्या प्रकारचे लोक असले पाहिजेत याचे सुंदर वर्णन दिले, ते “कर्तबगार, देवाचे भय धरणारे, विश्वासू, लाचलुचपतीचा द्वेष करणारे” असले पाहिजे.—निर्गम १८:२१.
७. यहोवा देवाच्या अधीन राहून अधिकार चालवल्याने कोणत्या मार्गांनी मोशे एक उत्तम उदाहरण होता?
७ इस्राएलात प्रथम उच्च अधिकार गाजवणारा मोशे होता. तो ईश्वरशासित व्यवस्थेत अधिकार असण्याचे उत्तम उदाहरण होता. एके प्रसंगी, मानवी कमतरता प्रगट झाली हे खरे आहे. तथापि, मोशे सर्वदा यहोवावर विसंबून राहिला. निकालात न काढण्यात आलेल्या प्रश्नांच्या बाबतीत त्याने यहोवाच्या मार्गदर्शनाचा शोध केला. (पडताळा गणना १५:३२-३६.) मोशेने त्याच्या उच्च अधिकाराच्या उपयोगाने स्वतःची महिमा करण्याच्या मोहाचा विरोध कसा केला? त्याने लाखो लोकांच्या राष्ट्राचे नेतृत्त्व केले तरीही, तो “भूतलावरील सर्व मनुष्यांपेक्षा नम्र होता.” (गणना १२:३) त्याला स्वतःची कोणतीही महत्त्वकांक्षा नव्हती तर देवाच्या महिमेची कळकळ त्याला वाटत होती. (निर्गम ३२:७-१४) शिवाय मोशेचा दृढ विश्वास होता. तो राष्ट्राचा नेता होण्यापूर्वी, त्याच्याविषयी बोलताना प्रेषित पौलाने म्हटले: “जो अदृश्य आहे त्याला पाहत असल्यासारखा त्याने धीर धरला.” (इब्रीयांस ११:२७) स्पष्टपणे, यहोवा राष्ट्राचा खरा शासक आहे ही गोष्ट मोशे कधीही विसरला नाही. (स्तोत्रसंहिता ९०:१, २) आज आमच्यासाठी किती उत्तम उदाहरण!
८. यहोवाने यहोशवाला कोणती आज्ञा दिली, व ती संस्मरणीय का आहे?
८ मोशेला एकट्याला, इस्राएलावर देखरेख ठेवण्याचे काम अधिक झाले तेव्हा, यहोवाने त्याचा आत्मा ७० वडील जणांवर ओतला जेणेकडून ते त्याला राष्ट्राचा न्याय करण्यास मदत करतील. (गणना ११:१६-२५) त्या नंतरच्या वर्षात, प्रत्येक नगरात त्यातील वडील जन असते. (पडताळा अनुवाद १९:१२; २२:१५-१८; २५:७-९.) मोशेच्या मृत्यूनंतर, यहोवाने यहोशवाला राष्ट्राचा नेता केले. अशा या विशेषाधिकारासह यहोशवाला अधिक करण्यासारखे होते याची आम्ही कल्पना करू शकतो. तरीसुद्धा, यहोवाने त्याला सांगितले की, एका गोष्टीला त्याने कधी चुकवायचे नव्हते: “नियमशास्त्राचा हा ग्रंथ तुझ्या मुखी सदैव असू दे, त्यात जे काही लिहिले आहे ते तू काळजीपूर्वक पाळ आणि रात्रंदिवस त्याचे मनन कर.” (यहोशवा १:८) यहोशवाने ४० वर्षांपेक्षा अधिक सेवा केली असतानाही, त्याला नियमशास्त्राचे वाचन करण्याची आवश्यकता होती याकडे लक्ष द्या. आमच्या सेवेचा अहवाल कितीही असला किंवा आम्हाकडे कितीही विशेषाधिकार असले तरी, आम्ही पवित्र शास्त्राचा अभ्यास व यहोवाचे नियम आणि तत्त्वांद्वारे आमच्या मनाला तजेला देण्याची आवश्यकता आहे.—स्तोत्रसंहिता ११९:१११, ११२.
९. इस्राएलात शास्त्यांच्या काळात काय घडले?
९ यहोशवा नंतर शास्त्यांची शृंखला सुरू झाली. त्यांच्या काळादरम्यान अनेकदा इस्राएली, “परमेश्वराच्या [यहोवा, न्यूव.] दृष्टीने वाईट ते करू लागले” हे दुःखाचे होते. (शास्ते २:११) शास्त्यांच्या काळाचा विचार करताना एक अहवाल असे सांगतो: “त्या काळी इस्राएलाला कोणी राजा नव्हता. ज्याला जसे बरे दिसे तसे तो करी.” (शास्ते २१:२५) प्रत्येकाने वर्तन आणि उपासनेविषयी स्वतःच निर्णय घेतले आणि इतिहास दाखवतो की, अनेक इस्राएलांनी वाईट निर्णय घेतले. ते मूर्तीपूजा करण्यात पडले व त्यांनी कधीकधी भयंकर गुन्हे देखील केले. (शास्ते १९:२५-३०) तरीही, काहींनी अनुकरणीय विश्वास प्रदर्शित केला.—इब्रीयांस ११:३२-३८.
१०. शमुवेलाच्या काळा दरम्यान, इस्राएलातील सरकारात मुळात कसा बदल झाला, व याने कशाप्रत निरवले?
१० शेवटचा शास्ता, शमुवेलाच्या जीवनमानात, सरकारच्या बाबतीत इस्राएल संकटप्रसंगातून गेले. जवळपासच्या शत्रू राष्ट्रांवर राजे शासन करत असल्याच्या प्रभावांमुळे, त्यांना देखील एका राजाची आवश्यकता वाटली. त्यांचे सरकार ईश्वरी शासन पद्धतीचे आहे व त्यांच्यावर आधीच एक राजा होता ही गोष्ट ते विसरले. यहोवाने शमुवेलाला सांगितले: “ते तुझा धिक्कार करत नाहीत, तर मी त्यांचा राजा नसावे म्हणून ते माझाच धिक्कार करीत आहेत.” (१ शमुवेल ८:७) त्यांचे उदाहरण आम्हाला, आमचा आध्यात्मिक दृष्टिकोन गमावून आम्हावर सभोवतालच्या जगाचा प्रभाव होऊ देणे किती सोपे आहे याची आठवण करून देते.—पडताळा १ करिंथकर २:१४-१६.
११. (अ) सरकारात बदल झाल्यावर देखील, इस्राएल, राजांच्या काळात ईश्वरी शासन पद्धतीचे होते हे कसे म्हटले जाऊ शकते? (ब) यहोवाने इस्राएलांच्या राजांना कोणती आज्ञा दिली होती, व कोणत्या उद्देशास्तव?
११ तरीसुद्धा, यहोवाने इस्राएलांच्या विनंतीला संमती दिली व त्यांच्या पहिल्या दोन राजांना, शौल आणि दाविदाला निवडले. इस्राएलात अजूनही यहोवाच्या शासनाकरवी ईश्वरी शासन पद्धतीने अधिकार चालत होता. जेणेकडून त्याच्या राजांना याची आठवण राहावी की, प्रत्येकाला स्वतःची नियमशास्त्राची नक्कल तयार करण्यास भाग पाडले जात होते व दररोज त्याचे वाचन करावयाचे होते, “म्हणजे त्या नियमशास्त्रातल्या सगळ्या आज्ञा व हे विधी पाळून व त्याप्रमाणे आचरून तो आपला देव परमेश्वर [यहोवा, न्यूव.] ह्याचे भय बाळगावयाला शिकेल; असे केल्याने त्याचे हृदय आपल्या भाऊबंदांच्याबाबतीत उन्मत्त होणार नाही.” (अनुवाद १७:१९, २०) होय, यहोवाच्या ईश्वरी शासन पद्धतीच्या अधिकारात असणाऱ्यांनी स्वतःला इतरांपेक्षा उंच न करण्याचे व त्यांच्या कार्याद्वारे त्याचे नियम प्रदर्शित व्हावेत असे यहोवाने इच्छिले होते.
१२. दावीद राजाने विश्वासूपणाचा कोणता अहवाल बनवला?
१२ दावीद राजाचा यहोवावर उल्लेखनीय विश्वास होता व चिरकाल टिकणाऱ्या राजांच्या घराण्यातील तो पिता असेल याविषयी देवाने त्याच्यासोबत करार केला. (२ शमुवेल ७:१६; १ राजे ९:५; स्तोत्रसंहिता ८९:२९) दाविदाने यहोवाला दाखवलेली लीन अधीनता अनुकरण करण्याच्या योग्यतेची आहे. त्याने म्हटले: “हे परमेश्वरा [यहोवा, न्यूव.] तुझ्या सामर्थ्यामुळे राजा हर्ष करतो; तू सिद्ध केलेल्या तारणामुळे त्याला केवढा उल्लास होतो!” (स्तोत्रसंहिता २१:१) दाविदाला स्वतःच्या शारीरिक कमतरतेमुळे जरी, अपशय आले, तरी नियमाप्रमाणे, तो स्वतःवर नव्हे तर यहोवाच्या सामर्थ्यावर विसंबून राहिला.
गैर ईश्वरशासित कृत्य आणि मनोवृत्ती
१३, १४. दाविदाच्या वारसदारांनी काही गैरईश्वरी शासन पद्धतीचे कोणते कार्य केले होते?
१३ इस्राएलाचे सर्वच नेते मोशे आणि दाविदाप्रमाणे नव्हते. इस्राएलात खोट्या उपासनेला अनुमती देण्याद्वारे, अनेकांनी ईश्वरशासित व्यवस्थेला अतिशय अनादर दाखवला. विश्वासू शासक देखील काही प्रसंगी गैर ईश्वरशासित मार्गांनी वागले. शलमोनाची घटना तर अतिशय शोकांतिकेची होती, कारण त्याला खूप बुद्धी आणि समृद्धता दिली होती. (१ राजे ४:२, ५, २९) तद्वत, यहोवाच्या नियमाचा अनादर करून त्याने अनेक स्त्रियांसोबत विवाह केला व इस्राएलात मूतीपूजेला अनुमती दिली. अशाप्रकारे, नंतरच्या वर्षात शलमोनाचे राज्य जाचक दिसून आले.—अनुवाद १७:१४-१७; १ राजे ११:१-८; १२:४.
१४ शलमोनाचा पुत्र रहबामाने, प्रजेवरचे जूं कमी करण्याच्या मागणीचा सामना केला. या परिस्थितीला नम्रपणे हाताळण्याऐवजी, त्याने त्याच्या अधिकाराला भांडखोरपणाने बजावले, व १२ मधील १० वंशाना गमावले. (२ इतिहास १०:४-१७) दूर झालेल्या दहा वंशाचा पहिला राजा रहबाम होता. त्याचे राज्य त्याच्यासारखीच रचना असलेल्या राष्ट्राला कधीही परत जाऊन मिळणार नाही या प्रयत्नांच्या खात्रीने, त्याने वासराच्या उपासनेची स्थापना केली. राजकीय दृष्ट्या हे हुशार पाऊल वाटले असेल, परंतु याने ईश्वरी शासन पद्धतीसाठी निर्लज्ज अनादर दाखवला. (१ राजे १२:२६-३०) यानंतर, विश्वासू सेवेच्या प्रदीर्घ कालाच्या शेवटाला, आसा राजाने त्याच्या अहवालावर कलंक लावण्यासाठी गर्वाला परवानगी दिली. सल्ला देण्यासाठी यहोवाकडून आलेल्या संदेष्ट्याला त्याने गैरवागणूक दिली. (२ इतिहास १६:७-११) होय, प्रदीर्घ सेवा करणाऱ्यांना देखील कधीकधी सल्ला देण्याची गरज पडते.
ईश्वरी शासन पद्धतीचा अंत
१५. येशू पृथ्वीवर असताना, यहुदी धार्मिक नेते ईश्वरी शासन पद्धतीत अधिकार दाखवण्यात कसे अपयशी ठरले?
१५ येशू ख्रिस्त पृथ्वीवर असतानाही, इस्राएल ईश्वरी शासन पद्धतीचे होते. तथापि, दुःखाची गोष्ट आहे की, त्यातील अनेक वडील जन आध्यात्मिक मनाचे नव्हते. निश्चितच मोशेने प्रदर्शित केलेली नम्रता विकसित करण्यात ते अपयशी ठरले. येशूने त्यांच्या आध्यात्मिक भ्रष्टतेला असे म्हणून निर्देशिले: “शास्त्री व परूशी हे मोशेच्या आसनावर बसले आहेत. म्हणून ते जे काही तुम्हास सांगतील, ते सर्व आचरीत व पाळीत जा, परंतु त्यांच्या कृतीप्रमाणे करू नका, कारण ते सांगतात पण तसे आचरण करत नाहीत.”—मत्तय २३:२, ३.
१६. पहिल्या शतकातील यहुदी धार्मिक नेत्यांना, ईश्वरी शासन पद्धतीबद्दल कसलाही आदर नसल्याचे त्यांनी कसे दाखवले?
१६ येशूला पंतय पिलाताकडे सोपवल्यावर, यहूदी नेत्यांनी ईश्वरशासित अधीनतेपासून ते किती दूर गेले होते हे प्रदर्शित केले. पिलाताने येशूचे परीक्षण केले व तो निर्दोष मनुष्य आहे अशी त्याने समाप्ती केली. येशूला बाहेर यहूद्यांकडे आणल्यावर, पिलाताने म्हटले: “पाहा, तुमचा राजा!” यहुदी येशूच्या मृत्यूबद्दल ओरडल्यावर, पिलाताने विचारले: “मी तुमच्या राजाला वधस्तंभावर खिळावे काय?” मुख्य याजकांनी उत्तर दिले: “कैसरावाचून कोणी आम्हाला राजा नाही.” (योहान १९:१४, १५) त्यांनी, ‘परमेश्वराच्या [यहोवा, न्यूव.] नावाने येणाऱ्या’ येशूला नव्हे तर, कैसराला राजा कबूल केले!—मत्तय २१:९.
१७. दैहिक इस्राएलाने एक ईश्वरशासित राष्ट्र होण्याचे का थांबवले?
१७ येशू भवितव्यातील ईश्वरी शासन पद्धतीच्या व्यवस्थेतील प्रमुख पात्र असल्यामुळे, त्याला नाकारण्याद्वारे यहूद्यांनी ईश्वरी शासन पद्धतीचा त्याग केला. येशू हा दाविदाच्या राजघराण्यातील पुत्र असल्यामुळे तो सर्वकाळ राज्य करणार होता. (यशया ९:६, ७; लूक १:३३; ३:२३, ३१) अशाप्रकारे दैहिक यहुद्यांनी देवाचे निवडलेले राष्ट्र होण्याचे गमावले.—रोमकर ९:३१-३३.
नवी ईश्वरी शासन पद्धत
१८. पहिल्या शतकात कोणत्या नव्या ईश्वरी शासन पद्धतीचा जन्म झाला? स्पष्ट करा.
१८ तथापि, देवाने दैहिक इस्राएलांना नाकारल्यामुळे पृथ्वीवरील ईश्वरी शासन पद्धतीचा शेवट झाला नाही. यहोवाने येशू ख्रिस्ताद्वारे नवी ईश्वरी शासन पद्धत स्थापन केली. वास्तविकपणे नवे राष्ट्र असलेली ही अभिषिक्त ख्रिश्चनांची मंडळी होती. (१ पेत्र २:९) प्रेषित पौलाने तिला ‘देवाचे इस्राएल’ असे म्हटले व सरतेशेवटी, त्याचे सदस्य “सर्व वंश, निरनिराळ्या भाषा बोलणारे, लोक व रा ह्यामधून” आले. (गलतीकर ६:१६; प्रकटीकरण ५:९, १०) ते मानवी सरकाराधीन राहत असताना, या नव्या ईश्वरी शासन पद्धतीतील सदस्यांवर देवाने खरोखर राज्य केले. (१ पेत्र २:१३, १४, १७) नव्या ईश्वरी शासन पद्धतीचा जन्म झाल्यावर लगेच, येशूने दिलेल्या आज्ञेचे पालन करण्याचे थांबवण्यासाठी काही दैहिक इस्राएलाच्या शासकांनी शिष्यांना जबरदस्ती केली. याची प्रतिक्रिया काय होती? “आम्ही मनुष्यापेक्षा देवाची आज्ञा मानली पाहिजे.” (प्रे. कृत्ये ५:२९) खरोखर एक ईश्वरशासित दृष्टिकोन!
१९. कोणत्या अर्थाने पहिल्या शतकातील ख्रिस्ती मंडळीला ईश्वरी शासन पद्धत म्हणता येऊ शकते?
१९ नव्या ईश्वरी शासन पद्धतीने कसे कार्य केले? महान दैवी शासक, यहोवा देवाचे प्रतिनिधीत्त्व करणारा राजा येशू ख्रिस्त होता. (कलस्सैकर १:१३) हा राजा स्वर्गामध्ये अदृश्य असला तरी, त्याच्या प्रजेवरील त्याचे शासन वास्तविक स्वरुपाचे होते, व त्याच्या शब्दांनी त्यांच्या जीवनावर प्रभुत्त्व केले. दृश्य रितीने देखरेख करण्यासाठी आध्यात्मिकतेत लायक असणाऱ्या वडील जनांची नियुक्ती केली गेली. यरूशलेमात अशा मनुष्यांचा समुदाय नियमन मंडळ या नात्याने कार्य करू लागला. त्या मंडळाचे प्रतिनिधीत्त्व करणाऱ्या प्रवासी वडिलांपैकी, पौल, तीमथ्य व तीत हे होते. व प्रत्येक मंडळीची काळजी, वडिलांचा वर्ग किंवा वडिलांद्वारे घेतली जात होती. (तीत १:५) कठीण समस्या उद्भवली तेव्हा, वडिलांनी नियमन मंडळाचा किंवा तिचे प्रतिनिधीत्त्व करणाऱ्याचा, म्हणजे पौलाचा सल्ला घेतला. (पडताळा प्रे. कृत्ये १५:२; १ करिंथकर ७:१; ८:१; १२:१.) शिवाय, मंडळीच्या प्रत्येक सदस्याने ईश्वरी शासनाच्या पद्धतीला उंचावण्यासाठी त्यांचा भाग पार पाडला. प्रत्येक जण त्याच्या जीवनात शास्त्रवचनीय तत्त्वांचे अवलंबन करण्यासाठी यहोवासमोर जबाबदार होता.—रोमकर १४:४, १२.
२०. प्रेषितानंतरच्या काळातील ईश्वरी शासन पद्धतीविषयी काय म्हटले जाऊ शकते?
२० प्रेषितांच्या मृत्यूनंतर धर्मत्यागीपणा प्रगट होण्याविषयीचा इशारा पौलाने दिला होता, व अगदी त्याप्रमाणेच हे घडले. (२ थेस्सलनीकाकर २:३) वेळ जशी निघून गेली, तशी ख्रिश्चन असल्याचा दावा करणाऱ्यांची संख्या लाखो व नंतर करोडोच्या घरात गेली. त्यांनी हाइरॅरखिकल, प्रेस्बेटेरियन व काँग्रीगेशनल यासारखे वेगळ्या प्रकारचे चर्च सरकार प्रगट केले. परंतु, या चर्चची वर्तणूक किंवा विश्वासाने देखील यहोवाच्या शासनाला प्रदर्शित केले नाही. ते ईश्वरी शासन पद्धतीचे नव्हते!
२१, २२. (अ) यहोवाने, अंत समयादरम्यान ईश्वरी शासन पद्धतीला कसे पुनर्स्थापन केले? (ब) ईश्वरी शासन पद्धतीविषयी कोणत्या प्रश्नांची पुढे उत्तरे दिली जातील?
२१ या व्यवस्थेच्या अंत समयाच्या दरम्यान, खोट्या ख्रिश्चनांपासून खऱ्या ख्रिश्चनांना वेगळे करावयाचे होते. (मत्तय १३:३७-४३) ही गोष्ट, ईश्वरी शासन पद्धतीच्या इतिहासाच्या १९१९ या केंद्रिय वर्षी घडली. तेव्हा यशया ६६:८ या महिमायुक्त भविष्यवाणीची पूर्णता झाली: “अशी गोष्ट कोणी पाहिली काय? देश एका दिवसात जन्म पावतो काय? राष्ट्र एका क्षणात जन्मास येते काय?” या प्रश्नांच्या उत्तराचा प्रतिध्वनी होय असा होता! ख्रिस्ती मंडळी १९१९ मध्ये पुन्हा एकदा “राष्ट्र” या नात्याने वेगळी अस्तित्त्वात आली. ईश्वरशासित ‘देशाचा’ जन्म खरोखर एका दिवसात झाल्याप्रमाणेच होता! अंत समयाचा काळ जसा पुढे गेला, तसा या नव्या राष्ट्राच्या संघटनेला पहिल्या शतकात होते त्यासारखे शक्य तितके त्याच्याजवळ आणले गेले. (यशया ६०:१७) परंतु ते सर्वदा ईश्वरी शासन पद्धतीचे होते. त्याने वागणूक आणि विश्वासासाठी नेहमीच शास्त्रवचनातील ईश्वरप्रेरित केलेले नियम आणि तत्त्व प्रदर्शित केले. व ते सर्वदा सिंहासनाधिष्ट असलेल्या येशू ख्रिस्ताच्या अधीन राहिले होते.—स्तोत्रसंहिता ४५:१७; ७२:१, २.
२२ या ईश्वरी शासन पद्धतीच्या संगतीत तुम्ही आहात का? त्यात तुमचे अधिकाराचे काही स्थान आहे का? असल्यास, ईश्वरशासित मार्गांने कार्य करण्याचा अर्थ काय होतो हे तुम्हाला माहीत आहे का? कोणत्या पाशांना टाळले पाहिजे हे तुम्हाला माहीत आहे का? शेवटच्या दोन प्रश्नांची चर्चा पुढील लेखात केली जाईल.
तुम्ही स्पष्टीकरण देऊ शकाल का?
▫ ईश्वरी शासन पद्धत काय आहे?
▫ इस्राएल कोणत्या मार्गात ईश्वरी शासन पद्धतीचे होते?
▫ इस्राएल हे ईश्वरी शासन पद्धतीचे होते याची आठवण राजांना, करुन देण्यासाठी यहोवाने कोणती व्यवस्था केली होती?
▫ कोणत्या मार्गाने ख्रिश्चन मंडळी ईश्वरी शासन पद्धतीची होती, व ती कशी संघटीत झाली होती?
▫ आमच्या काळात कोणत्या ईश्वरशासित संघटनेची स्थापना झाली आहे?
[२४ पानांवरील चित्रं]
पंतय पिलातासमोर यहुदी नेत्यांनी यहोवाच्या ईश्वरशासितरित्या नेमस्त असलेल्या राजा ऐवजी कैसराला राजा मानले