वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w94 १/१ पृ. १०-१५
  • यहोवाचा आश्रय घ्या

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • यहोवाचा आश्रय घ्या
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • राज्य घोषकांचे महान ध्रुपद
  • आम्ही राहू शकतो असा एक आश्रय
  • आत्मविश्‍वासाने प्रचार करणे
  • ‘चांगुलपणाचा खजिना’
  • ‘यहोवाच्या नावात आश्रय घ्या’
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०११
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
w94 १/१ पृ. १०-१५

यहोवाचा आश्रय घ्या

“हे परमेश्‍वरा [यहोवा, न्यूव.], मी तुझा आश्रय धरला आहे.”—स्तोत्रसंहिता ३१:१.

१. स्तोत्रसंहिता ३१, आश्रय देण्याबद्दल यहोवाच्या क्षमतेवरील भरवसा कसे व्यक्‍त करते?

शरीर आणि मनाने दमलेला असला तरी, एक मनुष्य सुस्वरात गीत गातो व स्वतःला यहोवावर झोकून देतो. विश्‍वास विजयी होतो असे त्या पवित्र गाण्याचे बोल म्हणतात. छळ करत असलेल्या क्षुद्र मनुष्यांपासून सर्वशक्‍तीमानाच्या प्रतीक्षा करत असलेल्या हाताखाली ह्‍या मनुष्याला आश्रय सापडतो. “हे परमेश्‍वरा [यहोवा, न्यूव.] मी तुझा आश्रय धरला आहे,” असे स्तोत्र म्हणते. “मला कधी लज्जित होऊ देऊ नको. तू आपल्या न्यायाने मला मुक्‍त कर.”—स्तोत्रसंहिता ३१:१.

२. (अ) कोणत्या दोन आधारस्तंभावरून आम्ही, यहोवाला आमचा दृढ गड समजून त्यावर भरवसा ठेवू शकतो? (ब) यहोवा कशाप्रकारचा देव आहे?

२ स्तोत्रकर्त्याचा एक उत्तम, आश्रय होता! दुसऱ्‍या गोष्टीत शंका बाळगली तरी, ही वास्तविकता राहते: यहोवा त्याचा दृढ गड, दुर्ग आहे. त्याचा भरवसा खात्रीच्या दोन आधारस्तंभावर आधारित आहे. एक म्हणजे त्याच्या विश्‍वासाला यहोवा कधी लज्जित करणार नाही, आणि दुसरा, यहोवाच्या धार्मिकतेचा अर्थ, तो त्याच्या सेवकाचा सर्वदासाठी कधीही त्याग करणार नाही. यहोवा, त्याच्या विश्‍वासू सेवकांना लज्जित करणारा देव नाही; तो अभिवचनांना तोडणारा नाही. उलटपक्षी, तो सत्याचा देव आहे आणि त्याच्यावर मनःपूर्वक भाव ठेवणाऱ्‍यांना प्रतिफळ देणारा आहे. शेवटी, विश्‍वासाला प्रतिफळ मिळेल! बचाव केला जाईल!—स्तोत्रसंहिता ३१:५, ६.

३. स्तोत्रकर्ता यहोवाची महिमा कशी करतो?

३ स्तोत्रकर्त्याने पराकोटीला गेलेल्या त्याच्या दुःखातून आणि पीडेतून आत्मविश्‍वासाच्या कळसापर्यंत पोंहचल्यावर त्यातून उद्‌भवलेल्या सुरेल संगीताचे संकलन केले, त्यामुळे त्याला आंतरिक सामर्थ्य मिळाले. यहोवाच्या निष्ठावंत प्रीतीबद्दल तो त्याची महिमा करतो. “परमेश्‍वर [यहोवा, न्यूव.] धन्यवादित असो,” “कारण वेढा पडलेल्या शहरात सापडल्यासारखा मी झालो असता त्याने अद्‌भुत रीतीने आपले वात्सल्य मला दाखवले,” असे तो गातो.—स्तोत्रसंहिता ३१:२१.

राज्य घोषकांचे महान ध्रुपद

४, ५. (अ) आज कोणते मोठे ध्रुपद यहोवाची स्तुती करत आहे, व या गत सेवा वर्षात त्यांनी हे कसे केले आहे? (ब) राज्य घोषकांच्या ध्रुपदात सामील होण्यास आणखी लोक इच्छुक आहेत हे स्मारक विधीची उपस्थिती कोणत्या मार्गाने दर्शवते? (क) तुमच्या मंडळीतील कोणता समुदाय या ध्रुपदात सामील होण्याच्या पात्रतेचा आहे?

४ आज स्तोत्रसंहितेचे ते शब्द अधिक अर्थभरीत झाले आहेत. यहोवाच्या स्तुतीच्या गीतांचा कोणी दुष्ट विरोधी, कोणत्याही नैसर्गिक आपत्तीद्वारे, किंवा कोणत्याही आर्थिक पीडेद्वारे कोंडमारा करू शकणार नाही; खरेच यहोवाची प्रेमळ-कृपा त्याच्या लोकांकरता फार अद्‌भुत झाली आहे. अशाप्रकारे, सर्व जगभरात, गत सेवा वर्षात, २३१ देशांमध्ये ४७,०९,८८९ देवाच्या राज्य संदेशाचे महान ध्रुपद गायिले. येशू ख्रिस्ताकरवी असलेले यहोवाचे स्वर्गीय सरकार त्यांच्यासाठी आश्रय आहे ते त्यांची निराशा करणार नाही. गत वर्षात, ७३,०७० मंडळ्यामधील राज्य घोषकांनी सुवार्तिकाच्या कार्यात एकूण १,०५,७३,४१,९७२ तास खर्च केले. याचे पर्यवसान २,९६,००४ लोकांनी देवाला त्यांचे जीवन समर्पण करून पाण्याचा बाप्तिस्मा घेण्यामध्ये झाले. तसेच गत ऑगस्टमध्ये किव, युक्रेन येथे भरलेल्या ईश्‍वरी शिक्षण या आंतरराष्ट्रीय अधिवेशनातील उपस्थितांनी आश्‍चर्याचा तो केवढा आनंद उपभोगला. त्यांनी खऱ्‍या ख्रिश्‍चनांच्या पूर्वी कधीही नाही इतक्या मोठ्या प्रमाणात झालेल्या बाप्तिस्म्याला अपूर्व साक्ष देऊन यहोवाच्या साक्षीदारांच्या इतिहासातील अधिक अर्थपूर्ण घटना पाहिल्या! यशया ५४:२, ३ मधील भविष्यवाणीनुसार, देवाचे लोक, अभुतपूर्व संख्येने वाढत आहेत.

५ तथापि, देवाच्या राज्याची ऐच्छिक प्रजा ध्रुपदात सहभागी होण्यासाठी त्यांची पाळी येऊपर्यंत थांबून आहे. गत वर्षात, येशूच्या मृत्यूदिनाच्या स्मारक विधीसाठी आश्‍चर्यकारकपणे एकूण १,१८,६५,७६५ लोक उपस्थित होते. आशा केली जाते की या सेवा वर्षामध्ये यातील अनेक जण घरोघरच्या कार्यात राज्याचे गीत गाण्यासाठी लायक होतील. सत्याचा शत्रू, दियाबल सैतानाला ही संभाव्य गोष्ट किती क्रोधीत करील बरे!—प्रकटीकरण १२:१२, १७.

६, ७. यहोवाच्या मदतीने एका आस्थेवाईक मनुष्याने दुरात्मिक छळणूकीवर कशी मात केली याचे स्पष्टीकरण द्या.

६ त्या महान ध्रुपदात त्यांच्या आवाजांची भर टाकण्यापासून सैतान इतरांना अडवण्याचा प्रयत्न करील. उदाहरणार्थ, थायलंडमधील प्रचारकांना दुरात्म्यांच्या छळणूकीने मोठ्या संख्येने ग्रस्त झालेले लोक प्रचारकांना आढळत आहेत. तथापि, यहोवाच्या मदतीने अनेक प्रामाणिक लोकांना मुक्‍त केले आहे. एका मनुष्याने, कुतुहलापायी एका मांत्रिकाला भेट दिल्यावर, तो दहा वर्षे दुरात्मिक शक्‍तीच्या नियंत्रणात होता. पाळकांच्या मदतीने त्यांच्या [दुरात्म्यांच्या] शक्‍तीतून मुक्‍त होण्यासाठी त्याने प्रयत्न केला, परंतु त्यामुळे खरी सुधारणा झाल्याचा अनुभव त्याला मिळाला नाही. या मनुष्यासोबत, यहोवाच्या साक्षीदाराच्या पूर्णवेळेच्या एका सेवकाने पवित्र शास्त्राभ्यास सुरु केला, व दुरात्मिक शक्‍तीतून मुक्‍त होण्यासाठी एकमेव मार्गाविषयी त्याने त्या मनुष्याला पवित्र शास्त्रातून—सत्याचे अचूक ज्ञान घेण्याविषयी, यहोवा देवावर विश्‍वास ठेवून प्रार्थनेत त्याच्याकडे विनवणी करण्याविषयी शिकवले.—१ करिंथकर २:५; इफिसकर ४:६, ७; १ तीमथ्य २:३, ४.

७ या चर्चेनंतरच्या रात्री, या मनुष्याने स्वप्नात त्याच्या मृत वडिलांना पाहिले, आणि त्याने दुरात्मिक माध्यमात टिकून राहावे म्हणून त्याला धमकावले. त्याच्या कुटुंबाला त्रास सुरू झाला. मागे पडण्याऐवजी या मनुष्याने त्याचा पवित्र शास्त्राचा अभ्यास चालू ठेवला व तो सभेला उपस्थित राहू लागला. अभ्यासाच्या वेळी एकदा, पायनियरने स्पष्ट केले की, कधी कधी दुरात्मिक विधीमध्ये वापरल्या जात असलेल्या काही गोष्टी, दुरात्म्यांच्या शक्‍तीपासून मुक्‍त होण्याचा प्रयत्न करणाऱ्‍या लोकांची छळणूक करण्यास दुरात्म्यांसाठी मार्ग उघडू शकतात. मंत्रतंत्र टाकण्यासाठी वापरलेले थोडे तेल त्याच्याजवळ आहे असे त्या मनुष्याला आठवले. ते त्याने फेकून दिले पाहिजे हे आता त्याला समजले. ते फेकून दिल्यापासून दुष्ट आत्म्यांनी पुन्हा त्याला त्रास देण्याचा प्रयत्न केला नाही. (पडताळा इफिसकर ६:१३; याकोब ४:७, ८.) तो आणि त्याची पत्नी त्यांच्या अभ्यासात प्रगती करत आहेत व पवित्र शास्त्राच्या शैक्षणिक सभांना ते नियमित उपस्थित राहतात.

८, ९. काही राज्य घोषकांनी कोणत्या इतर अडखळणांवर मात केली?

८ सुवार्तेच्या विश्‍वसनीयतेला इतर अडखळणे दडपून टाकू शकतात. घानातील अतिशय त्रासदायक आर्थिक परिस्थितीमुळे कर्मचाऱ्‍यांना कामावरून तात्पुरते दूर करण्यात आले. उच्च राहणीमानात बेसुमार वाढ झाल्यामुळे कमीत कमी जीवनावश्‍यक गोष्टींना प्राप्त करण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. यहोवाचे लोक याला कसे तोंड देत आहेत? ते स्वतःवर नव्हे तर यहोवावर भाव ठेवण्याद्वारे. उदाहरणार्थ, एके दिवशी, एक मनुष्य बंद केलेला एक लिफाफा शाखा दप्तरातील स्वागत कक्षेवर ठेवून निघून गेला. त्या लिफाफ्यात २०० डॉलर, किंवा तीन महिन्यांचे किमान वेतन होते. तो लिफाफा निनावी देणगी देणाऱ्‍याकडून आला होता, परंतु त्याच्या वेष्टनावर असा मजकूर होता: “मी माझी नोकरी गमावली, परंतु यहोवाने मला दुसरी नोकरी दिली. मी त्याचा तसेच त्याचा पुत्र ख्रिस्त येशूचा फार ऋणी आहे. अंत येण्याअगोदर राज्याच्या सुवार्तेचा प्रसार करण्यास साहाय्य करण्यासाठी, मी विनम्र देणगी देत आहे.”—पडताळा २ करिंथकर ९:११.

९ सभांची उपस्थिती यहोवाची स्तुती करण्याच्या महान ध्रुपदात सामील होणाऱ्‍यांना तालीम देण्यास मदत करते. (पडताळा स्तोत्रसंहिता २२:२२.) अशाप्रकारे, हॉनड्युरसच्या दक्षिणेकडील भागात एल हॉरडॉन नावाची एक लहान मंडळी आहे. या लहान गटाबद्दल अधिक विशेष काय आहे? ती आहे, त्यांची सभेची विश्‍वासू उपस्थिती. प्रत्येक आठवडी सभेला उपस्थित राहण्यासाठी १९ प्रचारकांपैकी, १२ जनांना एक मोठी नदी ओलांडून यावे लागते. कोरड्या ऋतुत मात्र ही मोठी समस्या नाही, कारण आधारासाठी असलेल्या खडकांचा वापर करून ते नदी ओलांडू शकतात. तथापि, पावसाळी ऋतुमध्ये, परिस्थिती बदलते. एकदा कमी प्रमाणात दिसत असलेले हे पाणी, पाण्याचा झोत होऊन रस्त्यावरील सर्वच गोष्टी साफ करते. या अडखळणावर मात करण्यासाठी, बंधु आणि बहिणींनी उत्कृष्ठ पोहणारे असले पाहिजे. ओलांडण्याआधी ते त्यांच्या सभेचा पोशाख टिनॉ (धातुचे भांडे) यामध्ये ठेवतात व त्याला प्लॅस्टिक पिशवीत घालून बंद करतात. पट्टीचा पोहणारा तरंगत्या खूणेसारखा टिनॉचा वापर करतो आणि नदी ओलांडण्यासाठी गटाचे नेतृत्त्व करतो. दुसऱ्‍या बाजूला सुरक्षित आल्यावर ते स्वतःला कोरडे करून पोशाख बदलतात आणि राज्यसभागृहात आनंदी व स्वच्छ असे येतात!—स्तोत्रसंहिता ४०:९.

आम्ही राहू शकतो असा एक आश्रय

१०. त्रासाच्या वेळी आम्ही यहोवाकडे का वळू शकतो?

१० तुमच्यावर पूर्णपणे दुरात्म्यांचा हल्ला होत असला किंवा इतर गोष्टीपासून तुम्हाला त्रास वाटत असल्यास, यहोवा तुमचा प्रबल दुर्ग ठरु शकतो. प्रार्थनेत त्याच्याशी बोला. तो त्याच्या लोकांचे अस्पष्ट कण्हणे देखील लक्षपूर्वक ऐकतो. स्तोत्रकर्त्याने ही गोष्ट खरी असल्याचे जाणले व लिहिले: “माझ्याकडे आपला कान लाव. मला सत्वर सोडीव. तू माझा प्रबल दुर्ग हो, माझ्या बचावासाठी आश्रयस्थान हो. कारण माझा दुर्ग व माझा गड तूच आहेस; तू आपल्या नावासाठी मला हाती धरून चालीव. त्यांनी माझ्यासाठी गुप्तपणे पसरलेल्या जाळ्यातून तू मला ओढून काढ, कारण तू माझा आश्रय आहेस.”—स्तोत्रसंहिता ३१:२-४.

११. यहोवाचे आश्रयस्थान तात्पुरते ठिकाण का नाही, ते स्पष्ट करा.

११ यहोवा केवळ तात्पुरता आश्रय देत नाही तर, आम्ही सुरक्षित राहू शकू असे हल्ला करता न येणारे आश्रयाचे ठिकाण तो पुरवतो. त्याच्या नेतृत्त्व आणि मार्गदर्शनाने त्याच्या लोकांना अपयशी केले नाही. ईश्‍वरी शक्‍ती, सैतान आणि त्याच्या दुरात्म्यांच्या सर्व धूर्त योजनांना निरर्थक करील. (इफिसकर ६:१०, ११) यहोवावर पूर्ण अंतःकरणाने आम्ही भाव ठेवतो तेव्हा, सैतानाच्या पाशातून तो आम्हाला ओढून काढील. (२ पेत्र २:९) गतकाळातील चार वर्षात, यहोवाच्या साक्षीदारांचे प्रचारकार्य ३५ राष्ट्रांमध्ये उघडण्यात आले आहे. तसेच, सामाजिक, आर्थिक, किंवा राजकीय परिस्थिती सुवार्तेच्या प्रचारकार्याला अडथळा आणतात अशा जगाच्या क्षेत्रांपासून, काही मेंढरासमान लोक अधिक लोकांप्रत पोंहचू शकतील अशा ठिकाणी गेले आहेत. ज्या ठिकाणी ते गेले त्यापैकीचे एक ठिकाण जपान हे आहे.

१२. जपानमधील एका पायनियराने यहोवाला त्याचा दृढ गड कसे बनवले?

१२ जपानमध्ये, समुद्राच्या पलिकडून तात्पुरते काम करण्यासाठी विदेशी कर्मचाऱ्‍यांचा मोठा समुदाय आलेला आहे, व अनेक विदेशी भाषा बोलणाऱ्‍या मंडळ्यांना स्थापन केले आहे. जपानी मंडळीच्या एका बांधवांचा अनुभव, विदेशी भाषा बोलणारे क्षेत्र किती फलदायक आहे ते दाखवतो. अधिक गरज असलेल्या ठिकाणी जाऊन कार्य करण्याची त्याची इच्छा होती. तथापि, तो ज्या ठिकाणी होता तेथे आधीच दहा पवित्र शास्त्र अभ्यास चालवत होता. त्याच्या एका मित्राने विनोदाने त्याला म्हटले: “अधिक गरज असलेल्या ठिकाणी गेल्यावर तुला २० पवित्र शास्त्र अभ्यास चालवावे लागतील!” त्याला नेमणूक मिळाली व तो हिरोशीमा येथे गेला. परंतु, चार महिन्यानंतर, त्याला केवळ एकच पवित्र शास्त्राभ्यास होता. एके दिवशी त्याने पोर्तूगीज भाषाच केवळ बोलता येत असलेल्या ब्राझीलच्या एका मनुष्याला भेट दिली. बांधव त्या मनुष्यासोबत संभाषण करू न शकल्यामुळे, त्याने पोर्तूगीज भाषेतील एक पाठ्यपुस्तक आणले. संभाषणाचे काही साधे वाक्‌प्रचार शिकल्यावर, त्याने पुन्हा त्या मनुष्याला भेट दिली. बांधवाने त्याला पोर्तुगीज भाषेत अभिवादन केल्यावर, या मनुष्याला आश्‍चर्य वाटले व त्याने प्रसन्‍न मुद्रेने दार उघडले व त्याला आत बोलावले. पवित्र शास्त्र अभ्यास सुरू झाला. लवकरच हा बांधव २२ अभ्यास चालवू लागला, त्यापैकी १४ पोर्तुगीज, ६ स्पॅनिश आणि २ जपानी भाषेमध्ये होते!

आत्मविश्‍वासाने प्रचार करणे

१३. यहोवाची सेवा करताना कोणीही आम्हाला लज्जित करण्याचा प्रयत्न का करू नये?

१३ यहोवा त्यांचा आश्रय आहे असा पूर्ण विश्‍वास बाळगून यहोवाचे लोक पूर्ण आत्मविश्‍वासाने राज्याचे गीत गातात. (स्तोत्रसंहिता ३१:१४) ते लज्जित होणार नाहीत, यहोवा त्यांची मानखंडना करणार नाही, कारण तो त्याचे वचन पूर्ण करील. (स्तोत्रसंहिता ३१:१७) दियाबल आणि त्याचा दुरात्मिक समुह लज्जित होईल. यहोवाच्या लोकांना लज्जेपासून मुक्‍त असलेल्या संदेशाचा प्रचार करण्याची आज्ञा असल्यामुळे, प्रचार करताना इतर लोकांची त्यांना लाज वाटत नाही. यहोवा किंवा त्याचा पुत्र, त्याची अशाप्रकारे उपासना करण्यास तो त्याच्या लोकांना प्रेरणा देत नाही. लोकांचे हृदय विश्‍वास आणि यहोवाच्या चांगुलपणाच्या आणि प्रेमळ-कृपेच्या गुणग्राहकतेने भरलेले असल्यास, त्यांच्या हृदयाची चांगली परिस्थिती त्यांना बोलण्यासाठी प्रेरित करते. (लूक ६:४५) यास्तव, आम्ही प्रत्येक महिन्यात सेवेसाठी जो वेळ खर्च करतो, खासपणे, जे उत्तम ते करू शकतो अशी ती वेळ असल्यास, ते लज्जित करणारे नसून चांगले आहे. विधवेच्या अल्प देणगीची पूर्ण गुणग्राहकता येशू आणि त्याच्या पित्याने केली नाही का?—लूक २१:१-४.

१४. पायनियर कार्याबद्दल तुम्ही कोणते विवेचन मांडू शकता?

१४ प्रचारकांच्या वाढत असलेल्या संख्येत, त्यांच्या उपासनेत पूर्ण-जीवाने असण्यात पायनियर या नात्याने सेवा करण्याचा समावेश होतो—गत वर्षाचा ८,९०,२३९ उच्चांक! आधीच्या वर्षाची प्रगती ठेवल्यास ही संख्या १०,००,००० पेक्षा अधिक होण्याची शक्यता असेल. खालील अनुभव, नायजेरियातील एका बहिणीने पायनियर श्रेणीत कसे पदार्पण केले ते दाखवतो. ती लिहिते: “मी माझी माध्यामिक शाळा संपवण्याच्या बेतात असताना, यहोवाच्या साक्षीदारांच्या पायनियर प्रशालेला उपस्थित असणाऱ्‍यांसाठी स्वयंपाकात मदत करण्यासाठी गेले. तेथे मी दोन बहिणींना भेटले, ज्या माझ्या आजीपेक्षाही वयस्कर होत्या. प्रशालेला उपस्थित असणाऱ्‍या त्या पायनियर आहेत असे मला कळल्यावर, मी मनात विचार केला, ‘त्या दोघी पायनियरींग करु शकतात तर, मी का करु नये?’ यास्तव माझे शिक्षण पूर्ण झाल्यावर, मी सुद्धा नियमित पायनियर झाले.”

१५. अनौपचारिक साक्ष, यहोवाचा आश्रय करण्यासाठी कशाप्रकारे इतरांना, शक्य करुन देऊ शकते?

१५ सर्वच जण पायनियर होऊ शकत नाहीत, परंतु ते साक्षीदार होऊ शकतात. बेल्जियम येथील ८२ वय असलेली एक वयस्कर बहीण मटण आणण्यासाठी दुकानात गेली. अलिकडेच झालेल्या राजकीय क्रांतीमुळे कसायाची पत्नी फारच बेचैन असल्याचे तिला दिसले. म्हणून चटकन या बहिणीने यहोवाच्या साक्षीदारांचा काय विश्‍वास आहे? ही पत्रिका काढून तिचे बिल देताना नोटांसोबत दिली. ही बहीण दुकानात परत आल्यावर, कसायाच्या पत्नीने बिलकुल मागेपुढे न पाहता, पवित्र शास्त्र तिसऱ्‍या महायुद्धाच्या संभवनीयतेबद्दल काय म्हणते त्याची विचारणा केली. या बहीणीने तिच्यासाठी ट्रु पीस ॲण्ड सिक्युरिटी—हाऊ कॅन यु फाइन्ड इट? हे पुस्तक आणले. काही दिवसानंतर, ही वयस्कर बहीण पुन्हा दुकानात आली, तिच्यासाठी कसायाच्या पत्नीचे आणखी प्रश्‍न होते. बहिणीला या स्त्रीबद्दल सहानुभूती वाटली; तिने लगेच तिला पवित्र शास्त्राभ्यास सादर केला, आणि त्याचा तिने स्वीकार केला. आता, कसायाच्या पत्नीला बाप्तिस्मा घेण्याची इच्छा आहे. पण कसायाबद्दल काय? त्याने पत्रिका वाचली व तो देखील आता पवित्र शास्त्राचा अभ्यास करत आहे.

‘चांगुलपणाचा खजिना’

१६. यहोवाने त्याच्या लोकांसाठी चांगुलपणाचा खजिना कसा बाजूला ठेवला आहे?

१६ यहोवाने, या बिकट परिस्थितीतील शेवटल्या दिवसात, त्याचा आश्रय घेतलेल्यांसाठी ‘प्रेमळदया दाखवली’ नाही का? प्रेमळ, रक्षण करणाऱ्‍या पित्याप्रमाणे, यहोवाने त्याच्या पार्थिव मुलांसाठी चांगुलपणाचा खजिना बाजूला काढून ठेवला आहे. पाहणाऱ्‍या सर्वांसमक्ष तो त्यांच्यावर धन्यतांचा वर्षाव करत आहे, स्तोत्रकर्ता म्हणतो त्याप्रमाणे: “तुझे चांगुलपण किती थोर आहे, तुझे भय धरणाऱ्‍यांकरता तू ते साठवून ठेवले आहे! तुझा आश्रय करणाऱ्‍यांसाठी मनुष्यमात्रांदेखत तू ते सिद्ध केले आहे.”—स्तोत्रसंहिता ३१:१९, २१.

१७-१९. घानामध्ये, एका वयस्कर गृहस्थाने त्याच्या विवाहाची कायदेशीर नोंदणी केल्याचा कोणता चांगला परिणाम झाला?

१७ या कारणामुळे, जगातील लोक, यहोवाची उपासना करणाऱ्‍यांचे प्रामाणिकपणाचे प्रत्यक्ष पाहणारे साक्षीदार होऊन ते आश्‍चर्य करतात. उदाहरणार्थ, घाना येथील ९६ वर्षाचे एक वृद्ध गृहस्थ विवाहाची नोंदणी करणाऱ्‍या अधिकाऱ्‍याच्या कार्यालयात गेले व नोंदणी न करता ७० वर्षे एकत्र राहिलेल्या त्यांच्या विवाहाची आता नोंदणी केली जावी याची त्यांनी विनंती केली. विवाहाच्या अधिकाऱ्‍याला धक्काच बसला, व त्याने विचारले: “तुम्हाला तेच (नोंदणी) करायचे आहे याबद्दल खात्री आहे का? तुमच्या या वयात?”

१८ त्या गृहस्थाने स्पष्टता दिली: “मला एक यहोवाचा साक्षीदार व्हावयाचे असून जगाचा अंत होण्याआधी एका महत्त्वपूर्ण कार्यात, देवाच्या राज्याच्या सुवार्तेचा प्रचार करण्यात भाग घ्यावयाचा आहे. हे कार्य सार्वकालिक जीवनाप्रत निरवते. यहोवाचे साक्षीदार दिवाणी कायद्याचे पालन करतात ज्यामध्ये विवाहाच्या नोंदणीविषयीचा कायदा देखील आहे. यास्तव कृपया माझ्यासाठी नोंदणी करावी.” तो अधिकारी आश्‍चर्यामुळे गोंधळला. त्याने नोंदणी केली व वयस्कर गृहस्थ, आता त्याचा विवाह कायदेशीर झाल्याबद्दल आनंदाने निघून गेला.—पडताळा रोमकर १२:२.

१९ विवाहाच्या नोंदणी अधिकाऱ्‍याने त्यानंतर ऐकलेल्या गोष्टींवर विचार केला. “यहोवाचे साक्षीदार . . . अधिक महत्त्वपूर्ण कार्य . . . जगाचा अंत . . . देवाचे राज्य . . . सार्वकालिक जीवन.” या सर्वांचा त्या ९६ वर्षांच्या गृहस्थाच्या जीवनासाठी काय अर्थ असू शकेल यामुळे तो गोंधळला, या गोष्टींची अधिक माहिती मिळवण्यासाठी साक्षीदारांचा शोध घेण्याचे त्याने ठरवले. त्याने गृह पवित्र शास्त्राभ्यास स्वीकारला आणि जलद प्रगती केली. हा विवाह नोंदणी अधिकारी आज, बाप्तिस्मा घेतलेला एक साक्षीदार आहे. यास्तव, इतरांना क्षुल्लक वाटणाऱ्‍या गोष्टींमध्ये यहोवाचे पालन केल्यास, आमच्यासाठी व जे आमच्या वर्तनाला प्रत्यक्ष साक्षी आहेत अशांसाठी त्याचा परिणाम अपरंपार चांगल्यासाठी होऊ शकतो.—पडताळा १ पेत्र २:१२.

२०. म्यानमारमध्ये, एका तरुण बहिणीच्या प्रामाणिकपणाने तिला चांगली साक्ष देण्याप्रत कसे निरवले?

२० वयस्कर लोकांनी, सत्याने स्वतःचा प्रामाणिक लोकात बदल होऊ दिल्यामुळे, या अप्रमाणिक जगात तरुणांसाठी त्यांनी सुंदर उदाहरण मांडले आहे. म्यानमारमध्ये अशीच एक तरुण बहीण राहते. ती गरीब आणि दहा मुलांच्या विनयशील कुटुंबातील आहे. वडील, निवृत्ती वेतन घेणारे असून, नियमित पायनियर आहेत. शाळेत एके दिवशी, त्या बहिणीला हिऱ्‍याची अंगठी सापडली तेव्हा तिने लगेच तिच्या शिक्षिकेला नेऊन दिली. दुसऱ्‍या दिवशी वर्ग एकत्र भरल्यावर, शिक्षिकेने अंगठी कशी सापडली हे वर्गाला सांगितले व ती जिची होती तिला परत दिली. इतर मुलांनी ती अंगठी स्वतःकडेच ठेवली असती हे माहीत असल्यामुळे, नंतर तिने या तरूण बहिणीला वर्गाच्या समोर उभे राहून तिने असे का केले याविषयी तिला स्पष्टीकरण द्यावयाला लावले. बहिणीने स्पष्टीकरण दिले की ती एक यहोवाची साक्षीदार आहे व तिच्या देवाला चोरी केल्याचे, किंवा कोणत्याही प्रकारचा अप्रामाणिकपणा आवडत नाही. आमच्या बहिणीला, शिक्षक आणि विद्यार्थी या दोहोंना साक्ष देण्याची सुसंधी देऊन संपूर्ण शाळेने याविषयी ऐकले.

२१. तरुण लोक यहोवावर भाव ठेवतात तेव्हा, त्यांचे वर्तन त्याला कसे प्रतिबिंबित करतात?

२१ बेल्जियममध्ये यहोवाच्या साक्षीदारांबद्दल एका शिक्षकाने वर्गात उत्तम शेरा दिला. त्यांनी त्यांच्या विद्यार्थीनीपैकी एकीचे, जी आमची तरूण बहीण होती तिच्या वर्तनाबद्दल निरिक्षण केले होते. त्यांनी म्हटले: “यहोवाच्या साक्षीदारांबद्दल आता माझे वेगळे मत आहे. कलुषितपणामुळे मी, ते कमी सहिष्णू लोक असतील असा विचार करत होतो. त्यांच्या तत्त्वांची हातमिळवणी न करता ते अधिक सहिष्णू लोक असल्याचे त्यांनी शाबीत केले.” प्रत्येक वर्षी हुशार विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षकांकडून बक्षीस देण्यात येते. इतर बक्षीसांपैकी, एक बक्षीस नैतिक तत्त्वांबद्दल देण्यात येते. लागोपाठ तीन वर्षे, शिक्षकांकडून तीन सर्वोत्त्कृष्ट शेऱ्‍यांसाठी यहोवाच्या साक्षीदारांच्या मुलांना बक्षीस दिले गेले. यास्तव, यहोवावर निष्ठावान भाव असलेल्यांच्या बाबतीत असे अनेकदा घडते.—स्तोत्रसंहिता ३१:२३.

२२. स्तोत्रसंहिता ३१ च्या विजयाची समाप्ती कोणती आहे, आणि या व्यवस्थेच्या समाप्तीच्या दिवसादरम्यान ते आम्हाला कशी मदत करते?

२२ स्तोत्रसंहिता ३१ विजयी सुराने समारोप करते: “अहो परमेश्‍वराची [यहोवा, न्यूव.] आशा धरणारे, तुम्ही सर्व हिम्मत बांधा, तुमचे मन धीर धरो.” (स्तोत्रसंहिता ३१:२४) यास्तव, सैतानाच्या दुष्ट व्यवस्थेतील समाप्तीच्या दिवसांचा सामना करत असताना, यहोवा आम्हाला सोडण्याऐवजी तो आमच्या अधिकच जवळ असेल व स्वतःची शक्‍ती आमच्यात टाकील. यहोवा विश्‍वासू आहे व तो कधी अपयशी होत नाही. तो आमचा आश्रय आहे; तो आमचा दुर्ग आहे.—नीतीसूत्रे १८:१०.

तुम्हाला आठवते का?

▫ आम्ही आत्मविश्‍वासाने यहोवाला आमचा आश्रय का बनवू शकतो?

▫ शक्‍तीशाली ध्रुपद धैर्याने राज्याची स्तुती करत असल्याचा कोणता पुरावा आहे?

▫ सैतानाचे जाळे यहोवाच्या लोकांना अडकवणार नाही याविषयी आम्हाला आत्मविश्‍वास का आहे?

▫ यहोवाचा आश्रय घेणाऱ्‍यांसाठी त्याने कोणता खजिना बाजूला ठेवला आहे?

[१२ पानांवरील चित्रं]

यहोवाचा आश्रय घेणारे—४७,०९,८८९ शक्‍तीशाली राज्य घोषकांच्या ध्रुपदाला दृढ बनवतात!

१. सेनेगल

२. ब्राझील

३. चिली

४. बोलिव्हिया

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा