वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ४/९८ पृ. ८
  • नियतकालिके राज्याची घोषणा करतात

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • नियतकालिके राज्याची घोषणा करतात
  • आमची राज्य सेवा—१९९८
  • मिळती जुळती माहिती
  • आपल्या नियतकालिकांचा सर्वोत्तम उपयोग करा
    आमची राज्य सेवा—१९९६
  • तुमच्या सेवेत नियतकालिके सादर करा
    आमची राज्य सेवा—२००५
  • मासिक कार्यासाठी वेळ राखून ठेवा
    आमची राज्य सेवा—१९९३
  • मासिकांच्या उल्लेखनीय विषयांची प्रस्तुति
    आमची राज्य सेवा—१९९०
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—१९९८
km ४/९८ पृ. ८

नियतकालिके राज्याची घोषणा करतात

१ यहोवाचे साक्षीदार या नात्याने, देव-राज्याच्या आवेशी प्रचारासाठी आपण सर्वज्ञात आहोत. आपण वितरण करीत असलेली टेहळणी बुरूज आणि सावध राहा! नियतकालिके, देवाचे उद्देश शिकवण्यास लक्षावधी लोकांना मदत करण्याची एक जोरदार भूमिका पार पाडतात. त्यांत असलेला संदेश निश्‍चितच एक सुवार्ता आहे कारण मानवजातीची एकमेव आशा म्हणून ती देवाच्या स्वर्गीय राज्याची घोषणा करतात.

२ ही नियतकालिके लोकांच्या वास्तविक गरजा—भावनिक, सामाजिक आणि आध्यात्मिक—हाताळतात. सर्वत्र नैतिक आणि कौटुंबिक मूल्यांचा ऱ्‍हास होत असताना, बायबलची तत्त्वे कशी लागू करावीत हे दाखवून टेहळणी बुरूज आणि सावध राहा! लोकांच्या जीवनाचा दर्जा सुधारण्यास त्यांची मदत करतात. एप्रिल आणि मे या दोन महिन्यांदरम्यान नियतकालिकांच्या वर्गण्या सादर करणे आपल्यासाठी आनंदाचे कारण ठरेल.

३ ती खरोखर आकर्षक आहेत: टेहळणी बुरूज आणि सावध राहा!, जगाच्या जवळजवळ सर्व भाषांत उपलब्ध आहेत. यामुळेच, आपली नियतकालिके सर्वज्ञात आहेत. लोक त्यांच्याकडे का आकृष्ट होतात याची काही कारणे येथे दिलेली आहेत:

◼ सचोटी आणि सत्याची नियतकालिके या नात्याने योग्य आणि अयोग्य यांच्यातील फरक ती स्पष्टपणे दाखवतात.

◼ सबंध पृथ्वी देवाच्या राज्य शासनाधीन आणण्याच्या देवाच्या अभिवचनावर आधारित, येणाऱ्‍या एका नीतिमान परादीसची आशा ती देतात.

◼ सर्व पार्श्‍वभूमी व संस्कृतीच्या लोकांना आकर्षित करणारे अतिशय वैविध्यपूर्ण समयोचित विषय त्यांत सादर केलेले असतात.

◼ त्यांतील लेख संक्षिप्त, शैक्षणिक आणि वास्तविक असून पूर्वग्रह व समझोत्याचा लवलेशही त्यांत आढळत नाही.

◼ त्यांतील चित्तवेधक चित्रे त्वरित आस्था जागवितात आणि साधी लिखाणशैली त्यांचे वाचन सुलभ करतात.

४ त्यांचे विस्तृत प्रमाणात वितरण करा: प्रस्तुती तयार करण्यातील आपले परिश्रम, वेळेचे नियोजन आणि आपले संघटित प्रचार कार्य यांवर परिणामकारक नियतकालिक वितरण मोठ्या प्रमाणात अवलंबून असते. आमची राज्य सेवा याच्या जानेवारी आणि ऑक्टोबर १९९६ च्या अंकांत व्यावहारिक सूचना दिल्या होत्या. या सूचनांची उजळणी करून त्या लागू करणे लाभदायक ठरेल.

५ नियतकालिकांशी परिचित व्हा: प्रत्येक अंक वाचताना अशा एका व्यक्‍तीचा विचार करा ज्याची आस्था त्या प्रतीमुळे जागविली जाईल. तुमच्या प्रस्तुतीत उल्लेख करता येतील अशा विशिष्ट मुद्द्‌यांची किंवा शास्त्रवचनांची नोंद घ्या. संभाषण सुरू करण्यासाठी व एखाद्या विषयातील आस्था चेतविण्यासाठी एखाद्या प्रश्‍नाचा विचार करा.

६ त्या व्यक्‍तीशी प्रस्तुती जुळवा: एक साधी, लवचीक प्रस्तुती तयार करा जी एखाद्या पुरुषाला, स्त्रीला, एखाद्या वयोवृद्ध व्यक्‍तीला किंवा एखाद्या युवकाला जुळविली जाऊ शकते; मग या व्यक्‍ती तुमच्या परिचयातील असोत किंवा सर्वस्वी अनोळखी असोत.

७ टेहळणी बुरूज आणि सावध राहा! देण्यास नेहमी तत्पर असा: ही नियतकालिके अगदी सहजासहजी ब्रीफकेसमध्ये, हँडबॅगमध्ये किंवा कोटच्या खिशामध्ये ठेवली जाऊ शकतात; त्यामुळे प्रवासाला जाताना किंवा खरेदी करताना या नियतकालिकांच्या प्रती आपण सोबत ठेवू शकतो. नातेवाईकांशी, शेजाऱ्‍यांशी, सहकर्मचाऱ्‍यांशी, शाळकरी मित्रांशी किंवा शिक्षकांशी बोलताना देखील त्या सादर केल्या जाऊ शकतात. आठवड्यातील एक दिवस प्रामुख्याने नियतकालिक साक्षीकार्यासाठी राखून ठेवा.

८ नियतकालिकांसाठी कृतज्ञता दाखवा: त्यांचे मूल्य कदापि कमी होत नाही. वेळ सरून गेली असली तरी त्यांतील संदेशाचे महत्त्व कमी होत नाही. अर्थात, घेतलेल्या सर्व नियतकालिकांचे वाटप करण्याचा आपण विशेष प्रयत्न केल्यास कपाटात जुन्या अंकांचा ढीग लागण्याचा प्रश्‍नच येत नाही.

९ मार्ग साक्षीकार्य परिणामकारक आहे: बहुसंख्य लोकांसाठी नियतकालिकांचे वाटप करण्याचा हा एक सर्वोत्तम मार्ग आहे. काही प्रचारक, बाजार भरतो त्या दिवशी वर्दळीच्या रस्त्यांवर अंतराअंतरावर उभे राहून कार्य करतात.

१० व्यापारी क्षेत्र फलदायी असते: दुकाना-दुकानांत साक्षीकार्य करताना, घरी नसलेले फारच थोडके असतात. अधिकतर व्यापारी लोक सौजन्यशील असतात आणि अनेकजण मोठ्या आनंदाने नियतकालिके व वर्गण्या स्वीकारतात. संपर्क साधला जातो त्या विशिष्ट व्यापाराशी त्यास अनुरूप असलेले लेख दाखवा.

११ नियतकालिक मार्गांत बायबल अभ्यासांची संभावना असते: एखादी व्यक्‍ती वर्गणी स्वीकारत नाही पण, मोठ्या उत्सुकतेने नियतकालिकांच्या किरकोळ प्रती स्वीकारते तेव्हा पुढील अंक देण्यासाठी तिची पुन्हा भेट घेणे उचित आहे. केवळ नियतकालिकांचे वाटप करण्यासाठीच नव्हे तर बायबलमध्ये व्यक्‍तीची आस्था विकसित करण्यासाठी देखील आपण नियमितपणे पुनर्भेटी केल्या पाहिजेत. नियतकालिक मार्ग, संभाव्य बायबल अभ्यासांचा सर्वोत्कृष्ट स्रोत होय.

१२ एप्रिल आणि मे महिन्यांचा पुरेपूर लाभ घ्या: टेहळणी बुरूज आणि सावध राहा! या नियतकालिकांनी लक्षावधी कृतज्ञ वाचकांचा विश्‍वास जिंकला आहे. राज्याची घोषणा करण्यात नियतकालिके इतके परिणामकारक आहेत, की ती नेहमी आपल्यासोबत ठेवण्याचा व प्रत्येक प्रसंगी ती सादर करण्याचा आपला निर्धार असावा. एप्रिल आणि मे हे दोन महिने वर्गण्या देण्यास व नियतकालिकांचे वितरण करण्यास उल्लेखनीय ठरोत!

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा