कुप्रसिद्ध “वेश्या” तिचा नाश
“हालेलूया! तारण, गौरव व सामर्थ्य ही आमच्या देवाची आहेत; कारण त्याचे न्यायनिर्णय सत्य व नीतीचे आहेत. ज्या मोठ्या कळवंतीणीने आपल्या जारकर्माने पृथ्वी भ्रष्ट केली तिचा न्यायनिवाडा त्याने केला आहे, आपल्या दासांच्या रक्ताबद्दल तिचा सूड घेतला आहे.”—प्रकटीकरण १९:१, २.
१. मोठ्या वेश्येने “पृथ्वीवरील राजे” यांच्यासोबत जारकर्म कसे केले आहे आणि त्याचा काय परिणाम झाला?
जे सर्व आम्ही चर्चिले ते केवढ्या गंभीरतेतील होते. कसेहि असो तरी, प्रकटीकरण १७:२ हे या मोठ्या वेश्येने “पृथ्वीवरील राजां”सोबत जारकर्म केल्याचा उल्लेख करते. ती जरी पडलेली असली तरी अद्याप ती जगाशी गाढ मैत्री राखून आहे व आपले हेतू साध्य करण्यात जगीक अधिपतींना खुषीने ताब्यात ठेवून आहे. (याकोब ४:४) मोठी बाबेल व राजकीय अधिपती यांच्या निषिद्ध संबंधाच्या या शिंदळकीमुळे लाखो निष्पाप जिवांची हानी झाली. शिवाय, हे केवढे दुःखद की ही मोठी बाबेल पहिल्या जागतिक महायुद्धात दोन्ही बाजूला आघाडीवर होती. पण तेच, दुसऱ्या जागतिक महायुद्ध संबंधात “तिच्या पापांचा ढीग स्वर्गापर्यंत पोहोचला” होता हे नक्की! (प्रकटीकरण १८:५) आम्ही असे का म्हणतो?
२. (अ) हिटलरला जर्मनीचा सत्ताधीश बनविण्यात फ्रँझ व्हॉन पेपेनने कसे सहाय्य केले, आणि या आधीच्या एका जर्मन अध्यक्षाने त्या पोपचे सरदाराबद्दल काय वर्णन केले? (ब) नाझी राज्य आणि व्हॅटिकन यांच्यामधील करारातील कोणती दोन कलमे गुप्त ठेवण्यात आली? (तळटीप पहा.)
२ याविषयीचे एक उदाहरण पाहू की, जुलमी अधिष्ठित अडॉल्फ हिटलर, जर्मनीचा चॅन्सलर आणि हुकुमशहा कसा बनला? ते पोपच्या एका हस्तकाकरवीच्या राजनैतिक कारस्थानामुळे घडून आले, ज्याच्याबद्दल त्या आधीचे चॅन्सलर कर्ट व्हॉन शेलर यांनी म्हटले की, “विश्वासघातक्यांच्या तुलनेत पाहता, हा असा होता ज्याच्या तुलनेत यहुदा इस्कर्योतहि महात्मा ठरेल.” हा फ्रँज व्हॉन पेपेन, ज्याने कम्युनिस्टांचे विरोधात व जर्मनीला हिटलरच्या अधिपत्याखाली आणण्यात सर्व कॅथोलिक बळ एकवट केले होते. या व्यवहारात पेपेनला उप चॅन्सलर बनविण्यात आले. हिटलरने व्हॉन पेपेनच्या नेतृत्वात एक प्रतिनिधि मंडळ रोमला, नाझी संस्थान व व्हॅटिकन यांचेमध्ये सलोखा घडवून आणण्यास पाठविले. पोप पायस ११ वे यांनी जर्मन प्रतिनिधींपाशी उद्गार काढले की, त्यांना “जर्मन सरकारच्या मस्तकपदी कम्युनिस्टांना पूर्ण विरोध करणारा इसम लाभला” हे पाहून केवढा आनंद वाटला. यानंतर जुलै २०, १९३३ रोजी व्हॅटिकनमधील एका भव्य समारंभात कार्डीनल पेसेली (जे लवकरच पोप पायस १२ वे होणार होते) यांनी एका करारनाम्यावर सही केली.a
३. (अ) एका इतिहासकाराने नाझी राज्य आणि व्हॅटिकनमधील कराराबाबत काय लिहिले? (ब) व्हॅटिकनमधील स्वागतप्रसंगी फ्रँझ व्हॉन पेपेनला कोणता किताब बहाल करण्यात आला? (क) नाझींनी ऑस्ट्रियावर कबजा मिळविण्यात फ्रँझ व्हॉन पेपेनने कोणती भूमिका केली?
३ एक इतिहासकार लिहितातः “जो करार [व्हॅटिकन बरोबर] झाला तो हिटलरकरता एक मोठा विजय होता. त्यामुळे त्याला बाहेरील जगाकडून पहिला नैतिक आधार प्राप्त झाला होता व तोहि एवढ्या उच्चपदीय मुळाधाराकडून प्राप्त होता. व्हॅटिकन मध्ये चाललेल्या या महोत्सवात पॅसेलीने व्हॉन पेपेन यांना द ग्रँड क्रॉस ऑफ द ऑडर ऑफ पायसb या पोपच्या उच्चस्तरीय किताबाने भूषविले. विन्स्टन चर्चिल यांनी, द गॅदरिंग स्टॉर्म या १९४८ मध्ये प्रकाशित झालेल्या त्यांच्या पुस्तकात वर्णिले आहे की, व्हॉन पेपेन यांनी त्यापुढेहि, नाझींच्या हाती ऑस्ट्रिया पडावे म्हणून चर्चचा त्यांना पाठिंबा मिळविण्यात एक चांगला कॅथोलिक या आपल्या हक्काचा कसा उपयोग करुन घेतला. १९३८ मध्ये हिटलरच्या जन्मदिवसाच्या सन्मानार्थ कार्डींनल इनीझेर यांनी आदेश दिला होता की, ऑस्ट्रीयातील सर्व चर्चेसमध्ये स्वस्तिकचे झेंडे फडकवावेत, घंटानाद करावा आणि नाझी हुकुमशहाकरिता प्रार्थना कराव्यात.
४, ५. (अ) व्हॅटिकनवर प्रचंड रक्तपाताचा दोष का आहे? (ब) जर्मनीतील कॅथोलिक बिशपांनी हिटलरला कशाप्रकारे उघड पाठिंबा दिला?
४ असा हा व्हॅटिकनच्या मस्तकी जबरदस्त रक्तपात साठलेला आहे! मोठ्या बाबेलचा प्रमुख नेतेपद करणारा भाग या नात्याने त्याने हिटलरला सत्ताधिष्ठ बनविण्यात आणि त्याला “मनोधैर्य” देण्यात महत्वाची भूमिका पार पाडली. याच्याही पुढे जाऊन, आपल्या अविकलतेत त्याने हिटलरच्या अघोर कृत्यांनाहि मंजूरी दिली. नाझीच्या उग्र कारकिर्दीत लाखो कॅथोलिक सैनिक युद्धभूमीवर नाझीशाहीच्या गौरवार्थ लढत व मरत असता इतर लाखो अभागी हिटलरच्या गॅस भट्यात भस्म होत असताना रोमी पोप गप्प होते.
५ जर्मनीतील कॅथोलिक बिशपांनी तर उघडपणे हिटलरला आपला पाठिंबा जाहीर केला होता. महायुद्धातील जर्मनीचा सहभागी जपान याने पर्ल हार्बरवर गुपचूप हल्ला केला. त्याच दिवशी, द न्यूयॉर्क टाइम्स मध्ये बातमी होतीः “फ्लुडामध्ये भरलेल्या जर्मन कॅथोलिक बिशपांच्या अधिवेशनात एका खास ‘युद्ध प्रार्थने’ची शिफारस करण्यात आली जी सर्व ठिकाणच्या ईश्वरी भक्तीप्रसंगी प्रथम वाचण्यात यावी असे ठरविले. या प्रार्थनेत जर्मन शस्त्रावर मुबलक आशीर्वादांचा व सर्व सैनिकांच्या जीवनास व आरोग्यास संरक्षण लाभण्याचा उल्लेख होता. शिवाय, बिशपवर्गाने सर्व पाद्रीगटास निदान महिन्यातील एक सप्ताहाच्या रविवारी, जे जर्मन सैनिक, ‘भूमीवर, समुद्रात तसेच आकाशातून लढत असणार, त्यांच्या आठवणीत खास प्रवचन व प्रार्थना करण्याच्या खास सूचना दिल्या.’”
६. व्हॅटिकन आणि नाझी यांच्या दरम्यान आध्यात्मिक जारकर्म घडले नसते तर जग कदाचित कोणत्या महान मानसिक वेदना व अघोरी कृत्यांपासून बचावले असते?
६ जर व्हॅटिकन आणि नाझी यांच्यामध्ये हे प्रेमप्रकरण नसते तर महायुद्धात जे करोडो सैन्य व मुलकी लोक मारले गेले, तसेच आर्य नाहीत म्हणून ज्या साठ लाख यहुद्यांचा वध करण्यात आला व शिवाय, यहोवाच्या अगदी जिव्हाळ्याचे असणारे अभिषिक्त व “दुसरी मेंढरे” यांच्या हजारोंनी जो अमानुष छळ सहन केला व कैक हजार तर नाझींच्या राजकीय बंद्यांच्या छावण्यात मेले, या सर्व तीव्र मानसिक वेदनांपासून जगाचा बचाव झाला असता.—योहान १०:१०, १६.
वेश्येवरील जवळचा कटाक्ष
७. प्रेषित योहान मोठ्या वेश्येच्या जवळच्या कटाक्षाचे कसे वर्णन करतो?
७ प्रकटीकरणातील भविष्यवादात जो पुढील दृष्टांत उघड करण्यात आला, तो केवढा बरोबर आहे! अध्याय १७, वचने ३-५ मध्ये काढून पाहता, योहान दिव्यदूताबद्दल म्हणतोः “मी आत्म्याने संचारलेला असता त्याने मला रानात नेले; तो देवनिंदात्मक नावांनी भरलेल्या, सात डोकी व दहा शिंगे असलेल्या किरमिजी रंगाच्या श्वापदावर बसलेली एक स्त्री दृष्टीस पडली. ती जांभळी व किरमिजी वस्त्रे ल्यालेली, आणि सोने, मूल्यवान रत्ने व मोत्ये यांनी शृंगारलेली होती. तिच्या हातात अमंगळ पदार्थांनी म्हणजे तिच्या जारकर्माच्या मळाने भरलेला सोन्याचा प्याला होता. तिच्या कपाळावर ‘मोठी बाबेल, कळवंतिणीची व पृथ्वीवरील अमंगळपणाची आई’ हे गुढार्थक नाव लिहिलेले होते.”
८. (अ) मोठी वेश्या तिच्या सोनेरी प्याल्यात काय बाळगून आहे व यामुळे तिजविषयीची कोणती ओळख मिळते? (ब) मोठी बाबेल ही कशाप्रकारे लाक्षणिकरित्या “किरमिजी व जांभळी” वस्त्रे ल्यालेली आणि “सोने, मूल्यवान रत्ने व मोत्ये यांनी शृंगारलेली” आहे?
८ येथे योहान मोठ्या बाबेलला अगदी जवळून पाहात आहे. ती खरोखरी त्या अरण्यवासात, जेथे हिंस्त्र पशूंची वस्ती आहे, तेथे राहण्यालायकतेची आहे. या मोठ्या वेश्येची ओळख, तिने हाती धरलेला प्याला, ज्याचे बाह्यस्वरुप जरी फसवे पण बहुमोलाचे दृष्टीगोचर होत असले तरी त्यावरुन होते. जे देवाच्या दृष्टीने अमंगळ अशा द्रवासमान कृत्यांचा ती घोट घेत आहे. जगाबरोबरील तिची मैत्री, तिच्या खोट्या शिकवणी, नैतिकतेत ती देत असलेल्या सूटी, राजकीय सत्ताधिशांना भुलविण्याचे तिचे प्रकार—यापैकीची कोणतीही गोष्ट, जो “सर्व जगाचा नियंता”, यहोवा याला खपत नाही. (उत्पत्ती १८:२२-२६; प्रकटीकरण १८:२१, २४) तिने स्वतःला केवढे भूषविले आहे! तिजमधील वैभवशाली, उत्तुंग इमारतींचे व कलाकुसरीच्या काचकामांनी व विविध रंगानी सजविलेल्या खिडक्यांची कॅथेड्रल चर्चेस, रत्नजडीत पगोडे व व्हॅटस् आणि मंदिरे व तीर्थस्थाने यांनी मशहूर आहे. या थोर वेश्येने ठरविल्याप्रमाणे तिचा पुरोहित वर्ग आणि मठवासी भिक्षुक किरमिजी, जांभळी आणि भगव्या रंगाचे भारी किंमतीचे झगे व त्यावरील रत्नजडीत भूषणे लेवून मिरवितात.—प्रकटीकरण १७:१.
९. रक्तपाताविषयीचा केवढा प्रदीर्घ इतिहास मोठ्या बाबेलच्या पदरी आहे आणि योहान तिच्या वर्णनाचा कशाप्रकारे शेवट करतो?
९ ठपका ठेवण्यातील सर्वात दोषहार्य गुण तिजमध्ये जो आहे तो रक्तपिपासूपणा! बऱ्याच लांब मुदतीपासून यहोवा तिजकडून याचा हिशेब घेऊ पाहात आहे. आधुनिक काळच्या रक्तपिपासू हुकुमशहांना तिने आपल्या वतीने राबविले आणि तिच्या रक्तपाताचा इतिहास अनेक धर्मयुद्धे, पवित्रीकरणाचा अमानुष रक्तपाती काळ, धार्मिक युद्धे, यांच्यासह कित्येक शतके मागे, एवढेच काय पण काही प्रेषितांना व प्रत्यक्षात देवाचा पुत्र, प्रभु येशू ख्रिस्त याच्या जाहीर हत्येच्या काळापर्यंत व त्याहिपेक्षा मागच्या काळापर्यंत पोहचतो. (प्रे. कृत्ये ३:१५; इब्रीयांस ११:३६, ३७) यातच त्या यहोवाच्या साक्षीदारांचीहि मोजणी करावी लागेल ज्यांचा अधःपात गोळ्या घालून, फासावर लटकावून, कुऱ्हाडीने, गिलटीनद्वारा शिरच्छेद करुन, तरवारीने व तुरुंगात तसेच छावण्यात डांबून त्यांचा अमानुष छळ करुन केला. यात नवल ते काय की, योहानाने शेवटी म्हटलेः “ती स्त्री पवित्र जनांच्या रक्ताने व येशूच्या साक्षींच्या रक्ताने मस्त झालेली माझ्या दृष्टीस पडली”!—प्रकटीकरण १७:६.
स्त्री आणि श्वापद यांचे गूज
१०. (अ) ही मोठी वेश्या आजतागायत यहोवाच्या साक्षीदारांना कसे छळीत आहे? (ब) मोठ्या बाबेलचे पाद्री कसल्याप्रकारचे नेते आहेत?
१० योहानाने जे काही पाहिले त्याचे त्याला “फार आश्चर्य वाटले.” आज आम्हालाही आश्चर्य वाटते. १९३० आणि १९४० च्या दरम्यान या महान वेश्येने यहोवाच्या विश्वासू साक्षीदारांचा छळ करण्यास व त्यांच्यावर बंदी घालण्यास कॅथोलिक हालचालींचा आणि राजकीय छळ माध्यमांचा उपयोग करुन घेतला. आजतागायत, जेथे कोठे तिला आपला प्रभाव पाडता येतो तेथे ही मोठी बाबेल यहोवाचे साक्षीदार, जे देवराज्याची गौरवी आशा गाजवितात त्यांच्या सेवेस अडथळा, छळ अथवा विरोधक मतवाद उभा करण्यात जे करता येईल ते करते. मोठ्या वेश्येच्या धार्मिक सापळ्यात लाखोंना जखडून ठेऊन तिचे पाद्रीजन ‘अंधळ्यांकरिता अंधळे वाटाडे’ बनून त्या सर्वांस नाशाच्या खाचेप्रत नेत आहेत. ही कुप्रसिद्ध वेश्या प्रेषित पौलासारखे कधीही म्हणू शकणार नाही कीः ‘तुम्हास आज साक्ष देते की मी सर्वांच्या रक्ताविषयी निर्दोषी आहे.’—मत्तय १५:७-९, १४; २३:१३; प्रे. कृत्ये २०:२६.
११, १२. कुप्रसिद्ध वेश्येला वाहून नेणाऱ्या “किरमिजी रंगाच्या श्वापदा”चे गूज काय आहे, आणि या गूजाबद्दल १९४२ मध्ये यहोवाच्या साक्षीदारांना कोणती अधिक चांगली समज मिळाली?
११ योहानाला वाटलेले आश्चर्य पाहून देवदूताने त्याला म्हटलेः “तुला आश्चर्य का वाटले? ती स्त्री आणि सात डोकी व दहा शिंगे असलेले तिला वाहून नेणारे श्वापद यांचे गूज मी तुला सांगतो.” (प्रकटीकरण १७:७) हे “श्वापद” काय आहे? ६०० पेक्षा अधिक वर्षे आधी संदेष्टा दानीएलने दृष्टांतात काही श्वापदे पाहिली होती; व त्याला असा उलगडा करण्यात आला होता की, ती पृथ्वीवरील “राजे” किंवा राजकीय अधिपतींचे प्रतिनिधित्व करतात. (दानीएल ७:२-८, १७; ८:२-८, १९-२२) योहान आपल्या दृष्टांतातून अशा सत्तांचे संयुक्तपण—“किरमिजी रंगाचे श्वापद” पाहतो. ही, मनुष्य उत्पादित लिग ऑफ नेशन्स होती, जी १९२० मध्ये जगाचे रंगमंचकावर आली होती पण १९३९ मध्ये दुसऱ्या जागतिक महासुद्धाचा भडका उडताच अथांग डोहात लुप्त झाली. तरीपण, “स्त्री व . . . श्वापद ” यांचे गूज काय आहे?
१२ ईश्वरी कृपेने, यहोवाच्या साक्षीदारांना त्या रहस्याचा उलगडा १९४२ मध्ये झाला. त्यावेळी दुसरे जागतिक महायुद्ध त्याच्या तीव्रतेत कळसास पोहोचले होते व अनेकांना वाटत होते की याचेच रुपांतर हर्मगिद्दोनमध्ये होणार. पण यहोवाचे विचार फारच वेगळे होते! त्याच्या साक्षीदारांनी उरकावे असे बरेचसे काम उरकणे अद्याप बाकी होते. त्यांच्या, अमेरिकेतील क्लिव्हलँड, ओहायो येथे सप्टेंबर १८-२०, १९४२ रोजी झालेल्या व यालाच इतर ५१ स्थानासोबत दूरध्वनी संचालनाने जोडून भरलेल्या न्यू वर्ल्ड थिओक्रॅटिक असेंब्लीमध्ये वॉचटावर संस्थेचे त्यावेळेचे अध्यक्ष नेथन एच. नॉर यांनी “पीस—कॅन इट लास्ट?” (शांती—ही टिकणार का?) या विषयावर जाहीर व्याख्यान दिले. त्यात त्यांनी प्रकटीकरण १७:८ ची चर्चा केली, ज्यात म्हटले आहेः “किरमिजी रंगाचे श्वापद” असेल ते “होते आणि नाही; ते अगाधकुपातून वर येणार आहे व नाशात जाणार आहे.” त्यांनी हे स्पष्ट केले की कशाप्रकारे लिग ऑफ नेशन्स हे १९२० ते १९३९ पर्यंत “होते.” नंतर लिगला नामशेष केल्यामुळे ते “नाही” या पातळीवर पोहोचले. पण दुसऱ्या जागतिक महायुद्धानंतर राष्ट्रांनी संयुक्तपणे बनविलेले हे सभामंडळ परत अगाधकुपातून वर येणार. हे सर्व पवित्र शास्त्रामध्ये उल्लेखित भाकित पूर्ण झाले का? अगदीच सत्यात घडले! १९४५ मध्ये हे आंतरराष्ट्रीय “श्वापद” युनायटेड नेशन्स (संयुक्त राष्ट्र संघ) म्हणून त्याच्या अक्रियाकपणाच्या अगाधकुपातून वर आले.
१३. संयुक्त राष्ट्रसंघीय “श्वापदा”सोबत मोठ्या बाबेलने आपले वेश्या व्यवसायी मार्ग कसे चालू ठेवले?
१३ मोठी बाबेल आपल्या पतनामुळे जरी कमकुवत बनली होती तरी ती आपल्या वेश्यागिरीच्या कर्माची पुनरावृत्ती संयुक्त राष्ट्रसंघ “श्वापद” याच्या सोबतीत करु लागली. उदाहरणार्थ, जून १९६५ मध्ये स्वतःस ख्रिस्ती म्हणविणाऱ्या आणि ख्रिश्चनेत्तर अशा मिळून सात धर्मजमातीचे प्रतिनिधी, जगाच्या अर्ध्यापेक्षा अधिक लोकसंख्येच्या प्रतिनिधित्वात अमेरिकेतील सॅन फ्रॅन्सिस्कोमध्ये संयुक्त राष्ट्रसंघाचा २० वा जन्मदिन साजरा करण्यास जमले होते.c त्याच वर्षी पोप पॉल ६ वे यांनी संयुक्त राष्ट्रसंघाचे वर्णन “एकवाक्यता व शांतीची आधुनिक आशा” असे केले. नंतर पोप जॉन २ रे यांनी आपली आशा व्यक्त केली की, “संयुक्त राष्ट्रसंघ हा सर्वकाळाकरिता शांती व न्यायाचे सर्वोच्च मंदिर ठरेल.” १९८६ मध्ये खोट्या धर्माच्या जागतिक साम्राज्याने, संयुक्त राष्ट्रसंघाने घोषित केलेल्या आंतरराष्ट्रीय शांतीवर्षास पाठिंबा देण्यात पुढाकार घेतला. पण त्यांच्या धार्मिक प्रार्थनांच्या उत्तरात खरी शांती व सुरक्षितता आली का? ते तर दूरच राहिले! उलट आज राष्ट्रसंघातील अधिकाधिक राष्ट्रसदस्य हे व्यक्त करीत आहेत की त्यांच्याठायी या मोठ्या वेश्येबद्दल कोणतेही खरे प्रेम राहिलेले नाही.
वेश्येची विल्हेवाट
१४. या संयुक्त राष्ट्रसंघीय “श्वापदा”ला कोणती खास सेवा पार पाडावयाची आहे आणि देवाच्या दूताने याचे वर्णन कसे दिले?
१४ योग्य वेळी “किरमिजी रंगाचे श्वापद” स्वतः आपल्या नाशास जाईल. पण ते घडण्यापूर्वी, आणि एवढेच काय पण देवाच्या लोकांवर ते आपला अंतिम असा नश्वरी हल्ला चढविण्याआधी या राष्ट्रसंघीय श्वापदास एक खास काम पार पाडणे आहे. यहोवा ‘आपले विचार श्वापदाच्या व त्याच्या लष्करसिद्ध शिंगांठायी घालील.’ याचा काय परिणाम होणार? देवाचा दूत उत्तर देतोः “जी दहा शिंगे व जे श्वापद तू पाहिले ते कळवंतिणीचा द्वेष करतील व तिला ओसाड व नग्न करतील, तिचे मांस खातील व अग्नीने तिला जाळून टाकतील.” “तिने आपले गौरव केले व विषयभोग घेतला.” पण आता हे सर्व उलटलेले आहे. तिने मनाजोगे उभारलेले भव्य धार्मिक इमले आणि जगव्याप्त जहागिरी तिला वाचवू शकणार नाही. दिव्यदूताने म्हटल्याप्रमाणे “यामुळे तिच्या पीडा म्हणजे मरण, दुःख व दुष्काळ एका दिवशीच येतील, आणि ती अग्नीने जाळून टाकिली जाईल; कारण ज्याने तिचा न्यायनिवाडा केला तो यहोवा देव सामर्थ्यवान आहे.”—प्रकटीकरण १७:१६, १७; १८:७, ८.
१५. वेश्येचे राजनैतिक प्रियकर, उद्योगसम्राट तिच्या नाशाची आपली प्रतिक्रिया कशी व्यक्त करतील?
१५ तिचे राजकीय चाहते तिच्या अशा प्रकारच्या गमनामुळे शोकाकुल होतील व म्हणतीलः “अनर्थ! अनर्थ! बाबेल ही मोठी नगरी होती! ही बळकट नगरी होती! एका तासात तुला न्यायदंड प्राप्त झाला आहे.” तसेच मोठमोठे व्यापारी, व्यापारी संघ, ज्यांनी तिच्या नावाने अफाट फसवा नफा मिळविला, ‘तिजसाठी रडून शोक करतील व म्हणतीलः “अनर्थ! अनर्थ! . . . एका तासात ह्या इतक्या संपत्तीची ओसाडी झाली.”’—प्रकटीकरण १८:९-१७.
१६. मोठ्या वेश्येच्या नाशाविषयीची प्रतिक्रिया देवाच्या लोकात कशी उमटेल व प्रकटीकरण याला कशी पुष्टी देते?
१६ पण देवाचे स्वतःचे लोक काय उत्तर देणार? ते सर्व दिव्यदूतांच्या स्वरात स्वर मिळवून म्हणतीलः “हे स्वर्गा, अहो पवित्र जनांनो, प्रेषितांनो व संदेष्ट्यांनो, तिजविषयी आनंद करा; कारण देवाने तिला दंड करुन तुमचा न्यायनिवाडा केला आहे.” परत कधीही यहोवाचे पवित्र नाम भ्रष्टाविण्यास उद्भवू नये म्हणून मोठ्या बाबेलला मोठ्या झपाट्याने खाली टाकण्यात येईल. या मोठ्या कळवंतीणीच्या नाशास्तव मोठा उत्सव साजरा केला जाईल व यहोवाचे गौरवार्थ विजयोस्तवाची गाणी गायिली जातील. यहोवाच्या गौरवाचे सांघिक गीतातील पालूपद म्हणण्यात, आनंदात उच्च स्वराने म्हणतीलः “अहो लोकहो, यहोवाचे गौरव करा. तारण, गौरव व सामर्थ्य ही आमच्या देवाची आहेत. कारण त्याचे न्यायनिर्बंध सत्य व नीतीचे आहेत. ज्या मोठ्या कळवंतीणीने आपल्या जारकर्माने पृथ्वी भ्रष्ट केली तिचा न्यायनिवाडा त्याने केला आहे, आपल्या दासांच्या रक्ताबद्दल तिचा सूड घेतला आहे.”—प्रकटीकरण १८:२०-१९:३.
१७. मोठ्या वेश्येच्या विल्हेवाटीनंतर देवाची न्यायीकृत्ये कशी पूर्णत्वास जातील?
१७ मग, “राजांचा राजा आणि प्रभुंचा प्रभू” येशू ख्रिस्त “सर्वसत्ताधारी देव याच्या तीव्र क्रोधाच्या द्राक्षारसाचे कुंड” हर्मगिद्दोनात तुडवीत असता, देवाकडील न्यायकृत्ये त्यांच्या पूर्णतेप्रत अति वेगाने पूर्ण होत असतील. पृथ्वीवरील सैतानाच्या संस्थेतील दुष्ट अधिष्ठांचा आणि इतर सर्व उरलेल्यांचा तो त्यात नाश करील. कुजके मांसभक्षक पक्षी त्यांच्या शवांचा फन्ना उडवितील. (प्रकटीकरण १६:१४, १६; १९:११-२१) आम्ही केवढे आनंदीत व्हावे की, देवाकडील ती नियुक्त वेळ अगदी जवळ आहे, जेव्हा की आमच्या सुंदर पृथ्वीवरील हरप्रकारच्या अमंगळ, अपवित्र आणि भ्रष्ट गोष्टींचा कायमचा नायनाट होईल.
१८. प्रकटीकरणाच्या पुस्तकाचा भव्य कळस काय आहे?
१८ तर मग, प्रकटीकरणाच्या पुस्तकातील हाच का कळस आहे? नाही. अद्याप नाही. कारण १,४४,००० च्या सर्वांचे स्वर्गीय पुनरुत्थान पूर्ण झाल्यावर कोकऱ्याचा विवाह सोहळा पार पडणार. त्याची “वधु” जी तिच्या पतीकरिता सजलेली असणार, तिला “नवे आकाश” मध्ये स्थापित करणार, तेथून ती, लाक्षणिकरित्या खाली उतरणार व “मी सर्व नवे करतो” हा यहोवाचा संकल्प पुरा करण्यात तिच्या पतीस हातभार लावणार. या वधुचे आध्यात्मिक सौंदर्य पवित्र शहर नवे यरुशलेममध्ये दिसते. यालाच यहोवा आपल्या सर्वसमर्थ गौरवाच्या तेजाने प्रज्वलित करतो व कोकरा तिचा दीप आहे. (प्रकटीकरण २१:१-५, ९-११, २३) येथे जेव्हा की, यहोवाच्या नामास संपूर्ण पवित्रता लाभलेली असेल आणि कोकरा, ख्रिस्त येशू, त्याची वधू नवे यरुशलेम, हिच्यासोबत पृथ्वीवर स्थापित झालेल्या नंदनवनातील आज्ञाधारक मानवजातीवर सार्वकालिक जीवनाच्या आशीर्वादांचा वर्षाव करण्यास पुढे सरसावीत असेल, यावेळी प्रकटीकरणाचे पुस्तक आपला कळस गाठते.
१९. (अ) मोठ्या बाबेलमधून बाहेर पडण्याखेरीज तारणाकरिता आणखी कशाची गरज आहे? (ब) कोणते निकडीचे आमंत्रण अद्याप दिले जात आहे आणि याला आमचा कसा प्रतिसाद असला पाहिजे?
१९ तर, खोट्या धर्माच्या लबाडीस जागृत होऊन मोठ्या बाबेलमधून तुम्ही बाहेर पडला आहात का? तसेच स्वतःचे, संपूर्ण अंतःकरणाने बाप्तिस्म्याप्रत निरविणारे समर्पण करुन येशू ख्रिस्ताद्वारे यहोवा देवाप्रत वाटचाल करण्याचे पुढील पाऊल उचलले आहे का? हेही, तारणाकरिता अत्यंत जरुरीचे आहे. यहोवाकडील अंतिम न्यायदंड बजाविण्याची नियुक्त वेळ जवळ येत असता, अत्यंत निकडीचे आमंत्रण चोहोकडे निनादत आहेः “आत्मा व वधू ही म्हणतातः ‘ये.’” जे या हाकेस होकार देतात व त्यांचे जीवन यहोवास समर्पित करतात त्यांनीही इर्षेने इतरांना म्हणावेः “ये.” याशिवाय, दुसऱ्यांनीही, होय, “तान्हेलाहि येवो, आणि ज्याला पाहिजे तो जीवनी पाणी फुकट घेवो.” (प्रकटीकरण २२:१७) हे आमंत्रण अद्याप खुले आहे. यहोवास समर्पित आणि बाप्तिस्मा घेतलेल्यापैकी जर आपण एक असाल तर आपण जर स्वतःची भूमिका टिकविली आणि तीच भूमिका देव आणि कोकरा यांच्या सिंहासनासमोर टिकवून ठेवली तर धन्य व्हाल. आपण समजतो त्यापेक्षा ती नियुक्त वेळ अगदी जवळ आलेली आहे. होय! प्रकटीकरणाचा गौरवी शेवट अगदी जवळ आहे!
या सप्ताहाचा टेहळणी बुरुज अभ्यास संपविताना अभ्यास चालकांनी यापुढील ठराव वाचण्यास सांगावा व चाचणी म्हणून शेवटी दिलेल्या प्रश्नांची चर्चा करावी. हा ठराव, १९८८ मधील यहोवाच्या साक्षीदारांच्या “ईश्वरी न्याय” प्रांतिय अधिवेशनात सबंध जगात, “कुप्रसिद्ध वेश्या—तिचे पतन व नाश” या भाषणाच्या अंतास समंत करण्यात आला.
[तळटीपा]
a कसल्या तरी दृश्य कारणास्तव, त्यावेळी करारातील दोन कलमे गुप्त ठेवण्यात आली, जी रशियाविरुद्धच्या सर्वसाधारण गोष्टीबद्दल आणि हिटलरच्या लष्करातील कॅथोलिक पाद्रींच्या सक्तीच्या भरतीबाबतची होती. अशा प्रकारातील सक्तीची भरती, १९१९ मध्ये व्हर्सेल येथे झालेल्या कराराच्या विरुद्धतेतील होती व ज्यास अद्याप जर्मनी बांधलेला होता. यास्तव या कलमाचा जर जाहीर उव्वाच झाला असता तर इतर व्हर्सेल्स कलमे अडचणीत आली असती.
b फ्रँझ व्हॉन पेपेन हे त्या नाझींचे सोबत होते ज्यांचेवर युद्ध गुन्हेगार म्हणून १९४० मध्ये जर्मनीतील नुरेम्बर्ग येथे खटला चालविला होता. त्यांना जरी येथे सोडण्यात आले तरी नंतर जर्मनीतील नागरी हक्काच्या न्यायालयात अधिक कडक शिक्षा दिली. तरी देखील १९५९ मध्ये त्यांना पोपचा खास चेंबरलीन असे करण्यात आले.
c या मेळाव्याविषयी बोलताना, पोप पॉल ६ वे म्हणालेः “२० वर्षांआधी संयुक्त राष्ट्रसंघाच्या सनदेवर सह्या झाल्या त्याच्या स्मरणार्थ आयोजलेल्या या समारंभात शांतीविषयीचा धार्मिक विचारहि समाविष्ठ करण्यात आलेला आहे हे किती बरोबर व योग्यच आहे.”
[११ पानावरील चौकट]
पोपची स्तब्धता
१९३९ मध्ये प्रकाशित झालेल्या फ्रँझ व्हॅन पेपन—हीज लाईफ ॲण्ड टाईम्स नामे पुस्तकात एच्. डब्ल्यू. ब्लड-रेयान यांनी पोपच्या सरदारने हिटलरला कसे सत्ताधिष्ठ बनविले व व्हॅटिकनचा नाझीसोबत करार घडवून आणला याची तपशीलवार माहिती दिलेली आहे. विशिष्ठ वर्गांची पूर्वरचित भयानक कत्तल करण्याच्या यादीत यहुदी, यहोवाचे साक्षीदार आणि इतर होते. याविषयी लेखक विचारतातः “यावेळी पेसेली [पोप पायस १२ वे] गप्प का राहिले? कारण व्हॉन पेपेनच्या कटात ते भवितव्यात जर्मनीत पवित्र रोमी साम्राज्य स्थापन करण्याचे व व्हॅटिकनसह कॅथोलिक चर्च अधिक भक्कम करण्याचे स्वप्न पहात होते. . . . तेच पेसेली आता आध्यात्मिक हुकुमशहाच्या अधिकाराने लाखो जिवांवर सत्ता गाजवीत आहेत; तरीही हिटलरी आक्रमणे आणि छळांबद्दल साधा उच्चारही होत नाही. . . . हे लिखाण मी करीत असता तीन दिवस कत्तल चालू आहे, तरी व्हॅटिकनमधून त्यांच्या जिवांकरता, जे अर्ध्यापेक्षा अधिक कॅथोलिक होते, साधी प्रार्थनाहि म्हणण्यात आली नाही. या अधिकारी व्यर्क्तिची पृथ्वीवरील सर्व अधिकारपदे हिरावून घेण्यात हिशेब घेतला जाईल तेव्हा यांची केवढी दयनीय गत होईल! जो त्यांच्यापासून हिशेब घेणार त्या त्यांच्या देवासमोर ते उभे राहतील तेव्हा ते कसले समर्थन करणार? कसलेच नाही!”
[१५ पानावरील चौकट]
व्हॅटिकन गुंतवणूक
मार्च ६, १९८८ च्या द न्यूयॉर्क टाईम्स ने बातमी दिली होती की, १९८८ च्या अर्थसंकल्पात ६१.८ दशलक्ष डॉलर्स तोटा असणार असे व्हॅटिकन अपेक्षित होते. वर्तमानपत्र पुढे म्हणतेः “एक सर्वात मोठा खर्च जो समाविष्ठ आहे तो म्हणजे बॅको ॲब्रोसियानोच्या भागधारकांना १९८४ मध्ये सुमारे २५० दशलक्ष डॉलर्स देण्याच्या अभिवचनाची पूर्तता करणे. मिलन बँकेचे १९८२ मध्ये दिवाळे निघण्याआधी व्हॅटिकनचे तिजसोबत घनिष्ठ संबंध होते. तिच्या भानगडीत व्हॅटिकन एवढी अंतर्गत गोवलेली होती की शेवटी तिच्या उच्चस्तरीय तीन अधिकाऱ्यांना व एका अमेरिकन आर्च बिशपला, इटालियन न्यायालयातील खटल्याकरिता अधिकाऱ्यांच्या हवाली करण्यास तिने स्पष्ट शब्दात नकार दिला.
[१२ पानांवरील चित्रं]
व्हॉन पेपेन व हिटलर यांच्यासोबत व्हॅटिकन देखील भयंकर रक्तदोषात सहभागी आहे
[१५ पानांवरील चित्रं]
पोपनी देवराज्याविषयीचे समर्थन करण्याऐवजी राष्ट्रसंघाला ‘शांतीची शेवटली आशा’ असा गौरव दिला